हिरव्या टमाटरची चटणी

Primary tabs

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
9 Sep 2020 - 6:23 pm

आमच्या अहोंच अस काम आहे ,भाजीपाला आणायला सांगितला तर हमखास तीन चार हिरवे टमाटर आणतात.आता हे कधी पिकणार ? या विचारात न पडता ,मैत्रिणीच्या डब्यात असणारी सगळी माझ्याच वाट्याची असणारी टमाटर हिरवी चटणी आणि तिचा स्वाद जिभेवर रेंगाळतो. साधारण ३-४ वेळा प्रयत्न करून ही अंतिम केलेली पाककृती लिहिते.

हिरव्या टमाटरची चटणी:
साहित्य:
१.तीन हिरवे टमाटर
२. १/२ वाटी तीळ +शेंगादाणे(प्रमाण वाढवू नका.नाहीतर हेच वरचढ होतात.)
३.तीन हिरव्या मिरच्या(तुमच्या मिरच्या किती तिखट आहेत त्यावरून ठरवू शकता किती घ्यायच्या ते )
४. एक लसूण (५-६ पाकळ्या)
५.एक चमचा गुळ
६.चवीनुसार मीठ,तेल,जिरे
७.आवश्यकतेनुसार कोथिंबीर

कृती:
आधी शेंगादाणे चांगले भाजायचे मग तीळ भाजायचे वेगवेगळे खरपूस भाजायचे.
आता हिरवे टमाटर मध्यम आकारात कापायचे.(जर आता लाल बी असेल तर काढून टाका.त्याने पदार्थाचा
रंग बदलतो).
तर कढई ताई ऐवजी तवा मामा घ्यायचा.काळा काळा लोखंडी ,नॉन स्टिक नको.(चटणी गावठी बाजाची आहे.)
तवा मामा तापल्यावर तेलाची टाकायचे.जिरे टाकायचे.द्यायची.तडतडून नाचायला लागले की.. टमाटर ,लसूण टाकायचे..चर्रर आवाज..क्या बात..
या पाककृतीत टमाटरची हिरवी मैत्रीण मिरची टाकायची.
खरपूस रंगात उठणारे मीठ ,शेंगादाणे आणि तीळ यांना शेवटी एन्ट्री द्यायची.(हे साईड अभिनेते आहेत.)
एक वाफ येऊ द्यायची.आता भांड्यात साहित्य घेतल्यावर चिरलेली कोथिंबीर आणि गुळ टाकायचा .
हे सर्व साहित्य मिक्सरवर वाटून घ्यायचं.तो रंग हिरव्या छटेतला मनमोहून घेतो.
मस्त मोहरी,हळद,हिंग ,कढीपत्ता यांची फोडणी करायची.चटणीला चमचमीत करायचं.
तर ही आंबट गोड तिखट चटणी .. संपूर्ण!
-भक्ती

प्रतिक्रिया

फोडणी ** द्यायची.शब्द राहिला.

नीलस्वप्निल's picture

9 Sep 2020 - 6:37 pm | नीलस्वप्निल

छान... सुट्टीच्या दिवशी करुन पाहावे म्हणतो... :)

धन्यवाद ! नक्कीच करा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Sep 2020 - 10:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या पाककृतीप्रमाणे करुन पाहण्यात येईल. पाककृतीत फ़ोटो नसेल तर ती पाककृती फॉल समजल्या जाते.
टमाटे आवडत नाही, टमाट्याची चटणी ब-याचदा डब्यात असते. पण, ती चटणी सहन करतो.
टमाटे ही बहुउपयोगी भाजी असल्यामुळे टमाटे आमच्याकडे कशातही अधुन-मधुन डोकावत असतात.
(कपाळ ठोकणारी स्मायली)

पुढील पाककृतीस शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

Bhakti's picture

10 Sep 2020 - 10:33 am | Bhakti

टमाटे ही बहुउपयोगी भाजी असल्यामुळे टमाटे आमच्याकडे कशातही अधुन-मधुन डोकावत असतात.
(कपाळ ठोकणारी स्मायली)
हो ना!टमाटर पाहिजेच :)
फोटो कन्येने मोबाईलमधून delete केला.(कपाळ ठोकणारी स्मायली)

मग पुन्हा कर आणि फोटो काढ :-))

Bhakti's picture

10 Sep 2020 - 5:25 pm | Bhakti

थम्स अप स्मायली :)

सतिश म्हेत्रे's picture

15 Sep 2020 - 9:42 pm | सतिश म्हेत्रे

फोटो दिसत नाही आहे मोबाईल वर.

सतिश म्हेत्रे's picture

15 Sep 2020 - 9:44 pm | सतिश म्हेत्रे

ड्राईव्ह वर अपलोड करून लिंक वापरू शकता.

फोटो नाही, काही वाचले नाही!

- (ही रेसीपी फाउल धरणारा) सोकाजी

Bhakti's picture

11 Sep 2020 - 11:38 pm | Bhakti

हसावे की रडावे स्मायली.. धन्यवाद

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Nov 2020 - 8:48 pm | अमरेंद्र बाहुबली

टमाटर- हिंदी
टमाटे- मराठी