सरांचे आठवावे लेख । सरांचा आठवावा वाद । सरांचा आठवावा प्रताप । मिपामंडळी ।।१।।

चामुंडराय's picture
चामुंडराय in काथ्याकूट
29 Aug 2020 - 7:24 am
गाभा: 

सरांचे आठवावे लेख । सरांचा आठवावा वाद ।
सरांचा आठवावा प्रताप । मिपामंडळी ।।१।।

सरांचे कैसें लिहिणे । सरांचे कैसें पिंकणे ।
सरांचे वाद घालणे । कैसें असे ।।२।।

सर्वज्ञानी मूर्तिमंत । "काल" साक्षेपाचा योग ।
"प्यु रिंग" जिल्बी पाडण्याची लगबग । कैसीं केली ।।३।।

रतिक्रीडेचे लेख आठवावें । लॉर्ड ऑफ द रिंग मिरवावे ।
मिपालोकी आंजालोकीं उरावे । "रिंग"रूपें ।।४।।

सकलांशी वाद घालावे । उद्धारार्थ बोधामृत पाजावे ।
"मी-माझे" अध्यात्म वापरावे । पाडण्या जिल्बी ।।५।।

सर्व ज्ञानाचा महामेरू । सकल वादाचार्यांस आधारू ।
अखंड उपदेशाचा निर्धारु । श्रीमंत संक्षेपी ।।६।।

प्रतिक्रिया

अहो तो बलात्कार राहिला की.. तुम्ही बघितलेच नाही की काय?

धर्मराजमुटके's picture

29 Aug 2020 - 4:58 pm | धर्मराजमुटके

कवी म्हणून "चामुंडराय" यांच्या प्रतिभेचे कौतूक वाटले. रचना देखील आवडली पण सरांचे विचार आपल्याला पटत नाही म्हणून त्यांना खास "लक्ष्य" करावे हे काही पटले नाही बुवा ! असो.

आनन्दा's picture

2 Sep 2020 - 11:15 am | आनन्दा

खरे तर बोलणार नव्हतो, पण.

मुद्दा विचार पटत नाहीत हे नाहीच आहे.
मांडणी पटत नाही. आक्रस्ताळेपणा पटत नाही. माझा पंथ सोडल्यास इतर सगळे पंथ मूर्ख आहेत ही भूमिका पटत नाही.
त्यामुळे विरोध होतो.

मांडणी पटत नाही म्हणून अर्णव ला पण लोक लक्ष करतातच की.. मग इथे तर खूपच प्रेमाने सगळे समजावून दिले आहे. यात खटकण्यासारखे काय आहे?

प्रमोद देर्देकर's picture

2 Sep 2020 - 1:42 pm | प्रमोद देर्देकर

तेच म्हणणार होतो. जर तुम्हाला नसेल पटत तर नका त्यांचा धाग्यावर जावुन प्रतिसाद देवु किंवा प्रति-प्रतिसाद देवु नका .

आपल्या घरची ८०-९० ची मंडाळी कशी हट्टीपणा करतात म्हणुन त्यांचा पदोपदी काय तुम्ही अपमान करता काय?

या कानाने ऐका आणि त्या कानाने सोडुन द्या सगळं.

राग लोभ कुठे कोण वरती घेवुन जाणार आहे काय?

शाम भागवत's picture

2 Sep 2020 - 3:03 pm | शाम भागवत

संक्षींचे वय ८०-९० च्या दरम्यान आहे!!
बापरे. हे मला माहित नव्हते.
_/\_

कंजूस's picture

29 Aug 2020 - 5:06 pm | कंजूस

कोण?

कपिलमुनी's picture

2 Sep 2020 - 2:23 pm | कपिलमुनी

उगा यंव टीका नको त्यांव नको .
मग सर्वजनिक संस्थळाची मजा काय ?

चौकटराजा's picture

2 Sep 2020 - 8:01 pm | चौकटराजा

एका कुणीतरी एका कुणाच्या स्वभाव विशेषावर सूचक कविता केली आहे. त्यावर अगदी तिरकस प्रतिक्रिया देखील काही संहिता पाळून दिली जावी. इथे एका विशिष्टच व्यक्तीचा उल्लेख कशासाठी? आपण शहाणे आहोत व सर्व नास्तिक हे गाढव आहेत अशी दुराग्रही भूमिका घेणारी " एक " मिपाप्रिय" आय्डी ही इथे आहे.सध्या बरेच दिवसात ते इथे आलेले नाही. त्या ही आयडी ला वरील कविता लागू पडते. मीच शहाणा सर्वज्ञ असे समजणारे अनेक जण इथे आहेत. तेंव्हा कुणाला टोमणे मारायचा आनन्द घ्यायचा असेल तर त्यातही एक निखळ पणा हवा !

चौथा कोनाडा's picture

2 Sep 2020 - 8:24 pm | चौथा कोनाडा

"ती" पीडीएफ कुठं मिळेल ?

कोहंसोहं१०'s picture

3 Sep 2020 - 2:31 am | कोहंसोहं१०

उत्तम रचना...जमलंय एकदम.

काही जणांना कायम अटेन्शन हवे असते. हल्ली निगेटिव्ह पब्लिसिटी चा जमाना आहेच ज्याचा वापर करून अटेन्शन सीकर संक्षी प्रकाशझोतात राहायचा प्रयत्न करत असावेत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Sep 2020 - 8:55 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडली म्हणजे आवडली..
तुमच्या प्रतिभेला सलाम...

पैजारबुवा,

सुबोध खरे's picture

3 Sep 2020 - 9:21 pm | सुबोध खरे

विडंबन उत्तम आहे.

स्वभावविशेष उत्तम दाखवला आहे.

चित्रगुप्त's picture

29 Jul 2022 - 4:54 am | चित्रगुप्त

काही म्हणा. सरजींमुळे मिपावर येण्यात एक आकर्षण असायचे. आता काय नवीन बुवा? अशी उत्सुकता वाटायची.

सोत्रि's picture

29 Jul 2022 - 6:51 am | सोत्रि

सहमत! :)

- (सरजींचा पंखा) सोकाजी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jul 2022 - 8:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै मिस करतो. माणुस हटके होता.

-दिलीप बिरुटे
(सरांचा फॅन)

कॉमी's picture

29 Jul 2022 - 9:16 am | कॉमी

व्हय.

कंजूस's picture

29 Jul 2022 - 9:24 am | कंजूस

मनोगतवर आहेत. पण तिकडे फारसा वाव नाही कुणालाच.

कर्नलतपस्वी's picture

2 Aug 2022 - 12:41 pm | कर्नलतपस्वी

प्रथमदर्शनी वाटले की कुणी राजकारणी व्यक्ती आसावी. पुढे प्रतिसाद वाचल्यावर कळले की परीवारतलेच कुणीतरी दिसते. नवीन आसल्याने कोण ते कळाले नाही. आसो .

पण रचना मात्र भारी आवडली.