श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणीतला सापमार गरुड

MipaPremiYogesh's picture
MipaPremiYogesh in लेखमाला
31 Aug 2020 - 8:33 am

1

ऑक्टोबर, २०१८.

नेहमीप्रमाणे आम्ही भल्या पहाटे - म्हणजे ५ वाजता पुण्यातून सासवडकडे कूच केले. बोपदेव घाटामार्गे सासवड पार करून यवतकडे निघालो. तिकडे थोडे अंतर गेल्यावर एक पूर्ण माळरान आहे. बऱ्याच वेळा आपल्याला माळरानाबद्दल काहीच माहिती नसते आणि बोडके डोंगर-दऱ्या दिसले की वृक्षारोपण करावे असे वाटते. पण माळरान हा एक वेगळाच अधिवास आहे, जिकडे छोट्या किड्यापासून ते गरुड, गिधाडे, तसेच वेगवेगळे प्राणी - हरणे, कोल्हे, लांडगे ह्यांची एक जीवनसाखळी आहे. आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा झुंजूमुंजू व्हायला लागले होते. गवतावर मस्त दवबिंदू पसरले होते. नेहमी दिसणारे पक्षी - लार्क, पिपीट, वेडा राघू असे पक्षी बघत आमची कार पुढे पुढे चालली होती. एका ठिकाणी आम्ही लांबून बघितले तर एक कार थांबलेली दिसली आणि बघितले तर जवळच्याच झाडावर एक मोठ्ठा शिकारी पक्षी बसला होता. आम्ही हळूहळू अ‍ॅप्रोच करत पुढे जात होतो. आम्ही त्या कारमधल्या मधल्या फोटोग्राफर्सना बराच वेळ दिला, कारण त्यांना तो पक्षी एकदम जवळून दिसत होता. आम्हीही इकडून काही फोटो उडवले आणि त्या कारमधल्यांनी काही आवाज केल्यामुळे पक्षी उडून गेला. तो पक्षी होता सापमार गरुड (Short toed snake eagle).

1

आम्ही ठरवले की पक्ष्यांच्या ह्या राजाचे नीट निरीक्षण करू, म्हणून आम्ही गाडी घेऊन गरुड जिकडे लांब उडून बसला होता तिकडे गेलो. पक्षिनिरीक्षण म्हणजे खूप अवघड आणि patience पाहणारे काम आहे. आम्ही त्याच ठिकाणी अर्धा तास बसून राहिलो निरीक्षण करत. थोड्या वेळाने अचानक तो उडाला. आम्हीसुद्धा त्याच्या मागे गाडी घेतली आणि दुर्बिणीतून पाहिले की तो एका शेतावर हॉवर करतोय.

2

आम्ही पटकन तिकडे बांधाच्या जवळ गाडी लावली आणि झोपत झोपत शेताच्या कडेला एका झाडाच्या आडोशाला जाऊन बसलो. आमच्या लक्षात आले की ह्याला काहीतरी दिसले असणार आणि आज आपले नशीब असल्यास किल बघता येईल... तो एकदम खाली उतरला आणि पायाने काहीतरी मारू लागला. त्याचे तोंड तिकडे असल्याने आम्हाला नीट दिसत नव्हते, पण नक्कीच लक्षात आले की एखादा साप असणार.

3

4

तसे करत करत त्याचे तोंड इकडे झाले आणि आम्हाला दिसले की त्याने एका सापाला आपल्या तोंडात पकडलेले आहे. पक्षिनिरीक्षण किंवा कुठल्याही वाइल्ड लाइफ फोटोग्राफीमध्ये शिकार दिसणे म्हणजे खूप भाग्य, नशीब आणि थोडाफार अभ्यास लागतो. हळूहळू त्याचे तोंड आमच्याकडे होत होते.

5

कॅमेऱ्यातून पाहत असताना खूपच जबरदस्त वाटत होते. मनात म्हणालो की ह्याने आता एकदा थेट आपल्याकडे बघावे आणि तो क्षण आला! त्याने तोंडात साप असताना आमच्याकडे बघितले आणि मी ती फ्रेम कॅमेऱ्यात बंदिस्त केली.

6

हे बघत असताना अक्षरशः अंगावर काटा आला, कारण असा क्षण टिपणे किंवा बघायला मिळणे दुर्मीळ असते. पुढच्या ५-१० मिनिटात त्याने तो साप संपवला आणि हळूहळू पुढे चालत यायला लागला.

7

आता त्याने पंख उघडले.

8

आणि आम्ही पटापट तयार झालो उडतानाचे फोटो काढण्यासाठी. स्तब्ध बसलेला पक्षी आणि उडणारा पक्षी ह्याचे फोटो काढताना थोडे बदलावे लागतात. तुमचा अभ्यास चांगला असल्यास पक्षी कधी उडणार हे लक्षात यायला वेळ लागत नाही आणि तशा प्रकारे तुम्ही तयार राहू शकतात. आणि तो उडाला, पण बघतो तर काय, तो थेट आमच्याच दिशेने उडायला लागला आणि कॅमेऱ्यातून पाहिले, तेव्हा त्याचे भेदक डोळे एकदम जबरदस्त दिसायला लागले.

9

भानावर येत पटकन फोटो काढत राहिलो. वाइल्ड लाइफ फोटोग्राफीमध्ये तुम्हाला खूप कमी वेळ (० ते ३ सेकंद) असतात. आणखी एक फ्रेम मिळाली, त्यात तो आणखी जवळ आला होता.

10

आणि पुढच्याच क्षणी तो आमच्या डोक्यावरून उडत निघून गेला. पुढची ५ मिनिटे आम्ही अक्षरशः स्तब्ध बसलेलो, कारण असा दुर्मीळ क्षण आम्हाला बघायला मिळाला. त्या दिवशी येताना सासवडची सुप्रसिद्ध 'मोहिनी मिसळ'ची स्पेशल मिसळ मागवून हा क्षण आम्ही साजरा केला.
2

श्रीगणेश लेखमाला २०२०

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

31 Aug 2020 - 1:23 pm | चौथा कोनाडा

जबरदस्त थरारक अनुभव !
एकसे एक फोटो ! वर्णन देखिल तितकेच समर्पक !
सापमार गरुडाने तोंडात साप धरलेला असतानाचा फोटो अल्ट्राखतरनाक आहे !
पक्षांचे फोटो काढणे खरंच किती अवघड असते याची कल्पना आली !

वॉव, मिप्रेयो !

अप्रतिम, फोटो आणि वर्णनसुद्धा
तुमच्या बरोबरच असल्यासारखे वाटत होते

टर्मीनेटर's picture

31 Aug 2020 - 1:41 pm | टर्मीनेटर

वाह! फारच छान अनुभव आणि फोटोज.

स्वराजित's picture

31 Aug 2020 - 2:35 pm | स्वराजित

अप्रतिम फोटो

कंजूस's picture

31 Aug 2020 - 2:52 pm | कंजूस

वा!

माळरान हा एक वेगळाच अधिवास आहे, जिकडे छोट्या किड्यापासून ते गरुड, गिधाडे, तसेच वेगवेगळे प्राणी - हरणे, कोल्हे, लांडगे ह्यांची एक जीवनसाखळी आहे.

हो. आणि तुमची वेळ. सकाळची. यावेळी साप ,सरडे ऊन खातात. फार हालचाल करत नाहीत. हीच वेळ हे पक्षी सावज धरण्यासाठी पकडतात.

सुंदर. फोटो अप्रतिम.

संजय क्षीरसागर's picture

31 Aug 2020 - 3:08 pm | संजय क्षीरसागर

.

विनिता००२'s picture

31 Aug 2020 - 3:18 pm | विनिता००२

मस्त वर्णन व फोटो!

अनन्त्_यात्री's picture

31 Aug 2020 - 3:35 pm | अनन्त्_यात्री

अनुभव शब्दात आणि फोटोत सारख्याच प्रभावीपणे पकडलाय!

कुमार१'s picture

31 Aug 2020 - 4:31 pm | कुमार१

अप्रतिम, फोटो आणि वर्णनसुद्धा
थरारक !

शा वि कु's picture

31 Aug 2020 - 4:33 pm | शा वि कु

फोटो आणि वर्णन भारी !

एकदम मस्त फोटो.. लहानपणी खूप वेळा पाहिलाय हा पक्षी.. पण आता खूप दुर्मिळ झालाय..

बाकी मोहिनी मिसळ मध्ये पहिल्यासारखी "ती" चव राहिलेली नाही.. हे नमुद करू इच्छितो.

MipaPremiYogesh's picture

2 Sep 2020 - 3:13 pm | MipaPremiYogesh

वाह छान कुठे पाहिलात हा पक्षी?
मोहिनी मध्ये जाऊन ६-८ महिने झाले, तेंव्हा तर चांगली होती, एवढ्यात गेलो नाही कधी..

नूतन's picture

31 Aug 2020 - 5:05 pm | नूतन

वर्णन आणि फोटो दोन्ही सुंदर

गणेशा's picture

31 Aug 2020 - 5:54 pm | गणेशा

अप्रतिम.. फोटो, ती नजर जबरदस्त..
एकदम मस्त..

लेखन हि तितकेच छान झालेय.. पण फोटो पाहतच रहावेत असे.
बाकी सासवड ची मिसळ आठवली.. उरुळीवरून बऱ्याचदा गेलेलो तिकडे

स्मिताके's picture

31 Aug 2020 - 8:58 pm | स्मिताके

जबरदस्त दुर्मिळ अनुभव, मस्त लिखाण आणि अप्रतिम फोटो.

सुमो's picture

1 Sep 2020 - 4:30 am | सुमो

आणि थरारक अनुभव. लिहिलंय पण छान.

अप्रतिम, फोटो आणि वर्णनसुद्धा

तुषार काळभोर's picture

1 Sep 2020 - 3:05 pm | तुषार काळभोर

प्रसंग, वर्णन, फोटो, सगळंच अफलातून!

गरुडाची नजर पण काय भेदक आहे.

किसन शिंदे's picture

1 Sep 2020 - 8:53 pm | किसन शिंदे

जबरदस्त अनुभव. फोटोही सगळे भारी आहेत.

गामा पैलवान's picture

2 Sep 2020 - 12:35 pm | गामा पैलवान

मिपाप्रेमीयोगेश,

अप्रतिम प्रकाशचित्रांबद्दल धन्यवाद. तुमचा संयम वाखाणणीय आहे. शेवटचा फोटो कसला जबरदस्त आहे. चोरायची प्रचंड इच्छा होते आहे. जमल्यास त्यावर पाणछाप ( = जलमुद्रा = watermark) टाका.

'भानावर येत पटकन फोटो काढत राहिलो.' या वाक्याच्या वरच्या फोटोत गरुडाच्या पंखांच्या टोकांचा एक विशिष्ट आकार प्रतीत होतो. तो ही रोचक वाटला. तशा अवयवामुळे त्यास कमी श्रमात अधिक उंच उडता यावं, अशी निसर्गाची योजना दिसते आहे.

पुनश्च धन्यवाद.

आ.न.,
-गा.पै.

MipaPremiYogesh's picture

2 Sep 2020 - 3:17 pm | MipaPremiYogesh

धन्यवाद वॉटरमार्क याबद्दल लिहिल्या बद्दल, काळजी घेतो त्याची. आणि हो शक्यतो घर, गरुड हे पक्षी तुम्ही बघितले तर सकाळच्या वेळात बसलेले असतात आणि जसं ऊन चढत जातं तसे ते उडायला लागतात. ह्या मागे एक योजना अशी असते कि ते गरम हवेवर स्वर होऊन घिरट्या मारत मारत वरती जातात कमीतकमी उर्जे मध्ये. निसर्गाने प्रत्येकाला अशी काही ना काही सोय दिलेली असते.

MipaPremiYogesh's picture

2 Sep 2020 - 3:19 pm | MipaPremiYogesh

तुम्ही सगळ्यांनी वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. खूप छान वाटले.

भ ट क्या खे ड वा ला's picture

2 Sep 2020 - 7:15 pm | भ ट क्या खे ड वा ला

भन्नाट अनुभव,सुंदर थरारक फोटोज ,अप्रतिम वर्णन

सुधीर कांदळकर's picture

8 Sep 2020 - 6:19 am | सुधीर कांदळकर

खरेच, वाचतांना श्वास रोखून धरणारे लेखन. प्रकाशचित्रे सुंदर आणि अद्वितीय. वा! धन्यवाद.