वाटा वाटा वाटा ग..

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
26 Jul 2020 - 4:00 pm

***माझ्या जगावेगळ्या मैत्रिणी****

“मैत्री अलवार नात
चालत राहील पाहिजे
निरंतर...”

ही जर माझ्या आयुष्यात नसते तर मी मैत्रीचा गंध कधीच अनुभवला नसता.कारण माझ्याकडून मैत्री निभावली जाईला का याची मी काळजी हाकते.पण जी काही केल्या तुटतच नाही ती मैत्री...कधीही भेटलं तरी सहज संवाद साधणारी मैत्री असते...
सुलू...प्रेमाने आम्ही अशीच हाक मारतो तिला.ती सगळ्यांना प्रेम वाटते ,तिला त्याहून दुप्पट मिळाव असे मला वाटत...आजही आमच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये सगळ्यांच्या संपर्कात असणारी तीच आहे.सतत मदत करायला तयार असते.कस काय जमत तिला काय माहित?जोडण हे तिच्या स्वभावात आहे अस मला वाटत...
सुलूच शालेय शिक्षण मुंबईला झाल त्यामुळे आमच्या ग्रुपमध्ये तीच सर्वात बोल्ड ,बिनधास्त होती.आम्ही सगळ्या गरीब गाय....सुलूला कॉलेजमध्ये खूप मित्र होते.साधारणत: ५-६ अफेअर पहिले आम्ही तिचे.पण दरवेळेस ब्रेक अप समोरचा मुलगाच करायचा ..ह्याला मी निदान ३ प्रकरण तरी साक्षीदार आहे.मग ती अशीच खूप रडायची चिडायची...मग जाऊ दे म्हणायची......मला आश्यर्य नाही काळजी वाटायची सुलूची....पण ती वेगळीच...हिच्या घरी आम्ही मैत्रिणी तर हुडदुस घालायचो...काका काकू दोघे डॉक्टर...ही शेंडेफळ ...लाडाची...फारच मौज करायचे मी हिच्या बरोबर...ATKT चे विषय एका semester ला आमचे दोघींचे एकच होते...मी अभ्यासू असून मला kt लागली ..पण सुलूला काही फारक पडला नाही...हिचा अभ्यास घेतला मी..मग काय कॉलेज संपल..हि पण lecturer झाली ..ती दुसऱ्या आणि मी दुसऱ्या ठिकाणी..शिक्षणानंतर मुलींच्या घरी लग्नाची घाई असते आई वडिलांना...तीची पण सुरु होती लगीनघाई...
पण मला वाटल हि नक्की love marriage करणार..एव्हढी मनमुराद प्रेम करायची ती.. पण मधल्या काळात आमचा संपर्क तुटला आणि एकदम तिच्या लग्नाच arrange marriage आमंत्रण मिळालं.तिला पाहिज्या त्या शहरात तिने लग्न केलं..तिचा कायम फोन यायचा पण....आम्ही दोघी मग आमच्या जॉब्सचे धुण धुवायचो...बॉस कसा...Colleague कसे वागतात...बर वाटायच...बहुतेक तिला...कारण मी job मध्ये मी सगळ्यांना पुरून उरणारी होती...मला कळायचं की तिला कामाची आवड आहे....तिला स्वतःच अस्तित्व आवडते म्हणून ती करते नोकरी... म्हणून मी तिला सतत प्रोत्साहन द्यायचे...लक्ष नको देऊ म्हणायचे मी...घराच्या कुरबुरी आम्ही कधी share नाही केल्या...आम्ही दोघी समजूतदार होतो या बाबतीत...कारण आम्ही मैत्रिणी आहोत ..आपली स्वप्न सांगायचो..आणि चालायचो..
नंतर कधीही ती माहेरी आली की सगळ्यांना फोन लावणार गेट together arrange करणार...तर उत्सुक कोण कोणीच नाही....मी मात्र न चुकता तिला भेटायला जाते.सुलू medical क्षेत्रात गेली आहे, मला infertility ते मातृत्व ह्या प्रवासात हिने ४ वर्ष जे counselling केले,सल्ले दिले त्यामुळे हिला मी कधीच नाही दुखवू शकत नाही ...कारण दुखा:त साथ देणारे कधीच नाही सुटत....आजपण तिने कधीही call केला की आम्ही खूप वेळ बोलतो.सगळ्यांची खुशाली कळते मग मला हिच्याकडून...परत लहान होते मी..एवढ्या मैत्रिणी पण मला हिच्याशीच जास्त बोलाव वाटत कारण तिला मी कळते...विशेषतः मी उदास असेल तर हमखास कळते तिला...लगेच माझा fb,whats app status,chat बघून लगेच हिचा फोन येतो...मला खूप बर वाटत...मग सुलू माझे कान ओढते फोनवरूनच..हीच मन रमत मैत्रीत...फार थोड्यांना व्यवहारच्या पुढे जाऊन नात जपत येत.अशी हि माझी सुलू...love u सुलू.अशीच मैत्री जपू या....
(नाव बदलले आहे.)
भक्ती

व्यक्तिचित्रण

प्रतिक्रिया

गणेशा's picture

26 Jul 2020 - 6:24 pm | गणेशा

भक्ती, छान लिहिले आहे...

लिहित रहा.. वाचत आहे