पनीर लबाबदार!

Primary tabs

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in पाककृती
22 Jul 2020 - 1:11 pm

तो पनिरायण मे अगली रेशिपी है.. पनीर लबाबदार!
तर ही पनीर लबाबदार व्हायला आमची होम मिनिष्ट्री च जबाबदार आहे! (लबाबदार..जबाबदार! जमलं की नै यमक,ते आगोबी गमक!.. परत जमलं! काय हे? http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif आगोबानी मारला फेसबुकवर दगड,मन म्हणलं त्याला इथेच रगड!!! आयायाया! परत पडली जिलबी!आणि झालो मी एलबी!.. थांबचत नाही. http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif बुळुक बुळुक बुळुक! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif )

तर त्याच काय झालं 3साल मागे आमचे विवाह-वाढदिवशी म्हणजे प्रथम वर्षी आम्ही आमचे वर्षेसह दिल्ली किचन नामक अट्टल ... आपलं ते हे अस्सल पंजाबी हाटीलात साजरे करणेस गेलो होतो. तेव्हा आमच्या सौ स सदर व्यंजन अट्यंट आवडले होते.. मग पुढे तेच व्यंजण रामदेव बाबा ढाबा, मग नन्तर सासवडच्या एका अश्याच खास हाटीलात आणि सरते शेवटी आमचे कात्रज बायपास वरील एका खऱ्या पंजाबी म्हणजे सरदारजी च्या हाटीलात हीच डिश ढिशशशशश करणेस बैंनी मागवली. मग म्हटलं आता हिचाच नंबर लाऊ. मग ग्येलो यु ट्युबावर.. केली थोडी फिरस्ती,आणि जमवलीच पूर्ण मस्ती! आणि मग शिस्तीत झाली कुस्ती! (मायला, आज लैच जिलब्या पडायल्यात! http://www.sherv.net/cm/emo/laughing/animated-laughing-smiley-emoticon.gif )

चला तर मग, जमवू या सगळं साहित्य..
4 लवंगा, 7/8वेलदोडे,2/3तमालपत्र,2तुकडे दालचिनी,कसुरी मेथी चिमूटभर, अर्ध बोटभर आलं, 8/10कळ्या लसूण,चमचा दीड चमचा जिरं, 7/8बदाम व तेव्हढेच काजू(गरम पाण्यात किमान अर्धा तास भिजवून घेतलेले), मध्यम कांदे 4, मध्यम टोमॅटो 3, 4/5मिरच्या, अर्धा किलो पनीर, अर्धे वाटी क्रीम किंवा ताजी घट्ट साय.
https://scontent.fnag1-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/109310837_3107089556043976_5646447468871454352_o.jpg?_nc_cat=102&_nc_sid=1480c5&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=7xEEZ-RPRMwAX_PLWEZ&_nc_ht=scontent.fnag1-1.fna&tp=14&oh=8f2189661644db9d631d4ef17c8f6106&oe=5F3E1972
दारुगोळा तयार ! आता चला रणक्षेत्रावर! हुरररररर... स्वारी स्वारी! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif हर हर महादेव!

आता ह्यावेळी मी एक डाकू डाव क्येला.. ह्या भाजीची ग्रेव्ही हे जरा संयमानि व काळजीपूर्वक करायची असलेनी मी हा अर्धा खेळ आदले दिवशी रात्रीच केला.. कारण सकाळी आमचे दिव्य बालक आमचा खरोखर हिरवा पालक करते हो! दुत्त दुत्त!!!

ग्रेव्ही ह्या रेशीपीची जान आहे. तेंव्हा ती आधी नीट करायला घेतली. इंडक्शनला 600 tm वर पॅन तापायला लावला 2मोठ्ठे चमचे तेल सोडलं आणि जिरं,तमालपत्र इत्यादी सगळा खडा मसाला थोडा लसूण जरा नाकाची हजेरी घेईपर्यंत परतला.
https://scontent.fnag1-3.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/109547058_3107090049377260_5308001527694794439_o.jpg?_nc_cat=108&_nc_sid=1480c5&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=u-KlTLAdwlAAX_bSvSt&_nc_ht=scontent.fnag1-3.fna&tp=14&oh=6313c25449955d186329a1a4505a19f5&oe=5F3F0A6C
मग हिट एकदम कमी करून आललसूण पेस्ट टाकली, तिला चराचरी आल्यावर मग हिरव्या मिरच्या https://scontent.fnag1-3.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/109514229_3107091136043818_6494492801951897015_o.jpg?_nc_cat=100&_nc_sid=1480c5&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=6Fk0ha6mNXcAX_4dsv3&_nc_ht=scontent.fnag1-3.fna&tp=14&oh=c30a6519b4997858205b1645a2ea3972&oe=5F3EB267
आणि सावकाश नीट परतवले. https://scontent.fnag1-3.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/109514229_3107091136043818_6494492801951897015_o.jpg?_nc_cat=100&_nc_sid=1480c5&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=6Fk0ha6mNXcAX_4dsv3&_nc_ht=scontent.fnag1-3.fna&tp=14&oh=c30a6519b4997858205b1645a2ea3972&oe=5F3EB267
मग उभा चिरलेला कांदा काजू बदाम टाकून तो बर्यापैकी लालवला. https://scontent.fnag1-3.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/109269287_3107091942710404_4964924149628030549_o.jpg?_nc_cat=108&_nc_sid=1480c5&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=I89xRn6FpSIAX9K44AE&_nc_ht=scontent.fnag1-3.fna&tp=14&oh=3093fddb84fcecbe2e43372e639a588a&oe=5F3F042E
त्याचा मसाल्याबरोबर मंद वास यायला लागल्यावर उभा चिरलेला टोमॅटो सोडला.. या सगळ्याला त्याच मंद आचेवर सावकाश परतत बसलो. https://scontent.fnag1-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/109444938_3107092389377026_7490542283208108433_o.jpg?_nc_cat=104&_nc_sid=1480c5&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=C-BaC_P3nFgAX9q_ZJV&_nc_ht=scontent.fnag1-1.fna&tp=14&oh=cf6ad4ea272ec03d75828d882713f35d&oe=5F3F0D1Fhttps://scontent.fnag1-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/109342134_3107093049376960_6502502813996572434_o.jpg?_nc_cat=102&_nc_sid=1480c5&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=EOab0eAvmRUAX80qGeb&_nc_ht=scontent.fnag1-1.fna&tp=14&oh=7813b95fe84829827c949eeaf727d34f&oe=5F3C0E45
10 मिनीटं परतवल्यावर 5मिनिटांसाठी झाकण मारले. मग झाकण काढल्यावर टोमॅटो चांगला निपचित पडलाय की नाही याची बोटांनी दाबून खात्री करून घेतली..https://scontent.fnag1-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/109734897_3107093722710226_6490502398210253845_o.jpg?_nc_cat=104&_nc_sid=1480c5&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=FNpG-RBYDq4AX99UDyI&_nc_oc=AQlNaydcTVwojFGMUpcyxien6n-jg8pCKDl2xzNGQHPcPpWtDjehGQDTznVbP1ZbxxXeXvEsxTO6rPZnlMjmt4YQ&_nc_ht=scontent.fnag1-1.fna&tp=14&oh=fd933ebe531646e138d2c06e2c3fc94c&oe=5F3D4198 पुढे परत 10 मिनिट फास्ट परतत राहिलो. https://scontent.fnag1-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/109564744_3107093359376929_198396856391881442_o.jpg?_nc_cat=104&_nc_sid=1480c5&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=MbAc9LPvwhUAX-o__Wi&_nc_ht=scontent.fnag1-1.fna&tp=14&oh=0406197467c8c7e03f8b24ec0602e7c6&oe=5F3CC20C आणि इंडक्शन बंद करून पॅन पूर्ण गार होऊ दिला..
मग पॅनमधला सगळा मसाला,तमालपत्र इत्यादी सगळा खडा मसाला त्यातून न काढता मिक्सरवर बारीक फिरवून घेतला.. अगदी टूथपेस्ट सारखी घट्ट मुलायम पेस्ट काढून घेतली. https://scontent.fnag1-2.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/109714151_3107094152710183_1664294264355277505_o.jpg?_nc_cat=107&_nc_sid=1480c5&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=3m2PbXuRBHQAX-eWWgy&_nc_ht=scontent.fnag1-2.fna&tp=14&oh=83bcfae8b65a846574f1d589ebc0d381&oe=5F3E3C07
मिक्सर चिकटायला लागला तर थोडं पाणी टाकलं,नाहीतर ते ही नाहीच. मिक्सवलेली ग्रेव्ही फ्रिजला टाकली.. आणि मग गै गै गै गै गै...
http://www.sherv.net/cm/emoticons/sleep/sleeping.gif
ढुररररररर... फुससससस!!!

मग सकाळी लवकर उठुन आवरून बाकीचा सोपा खेळ झटकन करून टाकला.. अर्ध्या तासात.
मोठ्ठ्या कढईत दोन चमचे बटर टाकलं.. https://scontent.fnag1-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/109431533_3107094449376820_1519926133293952557_o.jpg?_nc_cat=105&_nc_sid=1480c5&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=gfKlsPRgtrYAX9naTC6&_nc_ht=scontent.fnag1-1.fna&tp=14&oh=ffd5f707346c3e741be7369303e2e8cb&oe=5F3EACFE
ते वितळून गरम झाल्यावर (धूर काढायच्या आत!) बारीकस जिरं व अगदी शास्त्रापुरती एक कळी लसूण व 7/8 आल्याच्या काड्या टाकून https://scontent.fnag1-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/109520275_3107094659376799_226142919799568454_o.jpg?_nc_cat=104&_nc_sid=1480c5&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=W7eTmy_jaB4AX9DwSPi&_nc_ht=scontent.fnag1-1.fna&tp=14&oh=21289f8532a7aac72a6c32ad7206d2a7&oe=5F3D5917
त्याला चरचरी आल्यावर ही आदले रात्री केलेली ग्रेव्हीपेस्ट सगळी त्यात टाकली
https://scontent.fnag1-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/109676332_3107095076043424_4113605021116355379_o.jpg?_nc_cat=104&_nc_sid=1480c5&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=xTfNowiBbTcAX83bzk6&_nc_ht=scontent.fnag1-1.fna&tp=14&oh=0804f96234cad59ee1082396c4749f29&oe=5F3E53E9
थोडी गॅस ची आच मोठी करून वास सुटेपर्यंत परतवली.
https://scontent.fnag1-2.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/109670648_3107095392710059_1811214698240945467_o.jpg?_nc_cat=110&_nc_sid=1480c5&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=cyJg95fx1soAX9_p7we&_nc_ht=scontent.fnag1-2.fna&tp=14&oh=32275c3c9d2eea92a2e457cf24a06db4&oe=5F3CBB75
मग हवं तेव्हढं पाणी टाकलं,उकळी आल्यावर थोडी कसुरी मेथी सोडून वर दोन तुकडे पनीर किसून टाकलं.
https://scontent.fnag1-2.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/109404906_3107095866043345_6622935826711427442_o.jpg?_nc_cat=110&_nc_sid=1480c5&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=qWJYtz1zsisAX-54l_5&_nc_ht=scontent.fnag1-2.fna&tp=14&oh=0747c5fd88da34e3dc4aa2c2f0185a41&oe=5F3D0BF1
यांनातर काश्मिरी लाल तिखट किंवा रंग वापरतात.. तो मी मुद्दाम टाळला. नको वाटला मला. आणि मग पनीरचे तुकडे टाकून सावकाश ते ग्रेव्हीत मिसळवले.
https://scontent.fnag1-3.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/109688989_3107096316043300_2536081269097652011_o.jpg?_nc_cat=100&_nc_sid=1480c5&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=N1cXvAoT5S0AX9TEjZt&_nc_ht=scontent.fnag1-3.fna&tp=14&oh=08a3c9733d8846669d1ad0f2281c75c7&oe=5F3F2B53
एक झाकण मारून गॅस बंद केला..
आणि सहचारिणी सह डिश सजवून चरता जाहलो.
https://scontent.fnag1-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/100615814_2962139457205654_8350368922616201216_o.jpg?_nc_cat=105&_nc_sid=8024bb&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=QEPJYws3TaoAX-jWiFg&_nc_ht=scontent.fnag1-1.fna&tp=14&oh=b2bf6f40526f775d0a6829616168337a&oe=5F3EE74A
======================================================
ही रेशिपी बादशाही चवीची आहे. खमंगपणा व तेजचव(तिखट नव्हे!) हे हिचे वैशिष्ट्य आहे. काजू बदाम असल्याने व त्याची सावकाश परतवून मग ग्रेव्ही वाटल्याने याला एक जबरदस्त मंद धुंद तेज चव येते.
http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/super-hungry.png
तेंव्हा नक्की करून पहा.. व खुश व्हा. "लक्ष्मीरमणा गो...विंदा!!!" च्या चालीवर बोला , "कोरोना कोविडा...नाईSsssssन टिना!!!"
भेटू पुन्हा मग .. बाय बाय..
http://www.sherv.net/cm/emoticons/smile/cute-3d-smiling-smiley-emoticon.gif
जय कोरोना, जय लॉक-डाऊन, जय ओपनअप !

प्रतिक्रिया

फोटो आणि वर्णन नेहमीप्रमाणेच फर्मास! आता करून बघणे आले .बाकी त्या भाजीबरोबर बाजूला असलेल्या पोळ्या तितक्याच सुबक दिसत आहेत

गुर्जी धडाका लावलाय पनीरचा ...
पण तुमच्या
छान छान रेसिपि बघून मजा येते ...

जर जमलं तर विविध प्रकारच्या कढी (ताक वाल्या ) ट्राय करून रेसिपी द्या ..
"रसोई/विष्णुकृपा" सारखी कढी आणि आमट्या रेसिपी द्या ..

अभ्या..'s picture

22 Jul 2020 - 2:39 pm | अभ्या..

मस्त रेशिपि गुर्जी. अफाट जम्लम.
ते पीपीडी अट्रुप्त काय आहे सीसीडी सारखे?
पराग पनीर डे असं काही आहे का? की आगामी फूड चेनची झैरात?

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jul 2020 - 2:57 pm | अत्रुप्त आत्मा

PPD - parag purushottam divekar.

अत्रुप्त हे निकनेम

ते मिपावर तीनचार बल्लवाचार्य आहेत त्यांच्या पंक्तीत बसलात. फोटो काय, वर्णन काय. जबरदस्त.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jul 2020 - 6:35 pm | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद हो कंजूस काका.

पैलवान's picture

22 Jul 2020 - 8:04 pm | पैलवान

कलर तुमच्या(च) टिक्का रश्श्या हून जरा डावा हाय, पण ते बदाम अन् किसलेले पनीर, चव रुबाबदार व्हणार ह्याची गॅरंटी!
बाय द वे, सासवडचा कोणतं हाटील म्हणायचं? प्रोपर सास्वडात मला फक्त मोहिनी माहितीये. अन् अलीकडे काळेवाडी - झेंडेवाडी मध्ये मयुर अन् गारवा ढाबे.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jul 2020 - 10:14 pm | अत्रुप्त आत्मा

@बाय द वे, सासवडचा कोणतं हाटील म्हणायचं? >>> स्वागत ढाबा हॉटेल.
गणेश मंगल कार्यालय समोर. किंवा सोपान काका हॉस्पिटल समोर.. सासवड मेन रोड.
बाकी या हॉटेल बद्दल माझ्याकडून भरभरून बोलले जाण्याची शक्यता अधिक आहे ..,याचं कारण इथल्या अन्नाची कॉलिटी कॉन्टिटी चव आणि त्या हिशोबात आश्चर्य वाटावं असे रेट! उदाहरणार्थ व्हेज बिर्याणी . जी आम्ही सासवडहुन संध्याकाळी येता-येता अनेकदा पार्सल आणतो. अतिशय चांगला तांदूळ उत्तम शिजवलेला. तेल आणि मसाले यांचा छान मिश्रण आणि अफलातून चव! कॉन्टिटी एवढी की दोघेजण अगदी पुरेपूर खातो .आणि किंमत 130 रुपये होती जी आता दीडशे झालेली आहे गेल्या महिन्यापासून. आत मध्ये भाज्या पनीर जे अतिशय ताज असतं त्याला कधीही शिल्लक राहिलेल्या वापरल्याचा वास वगैरे येत नाही. जो उडप्याच्या हॉटेलाल्या बिर्याण्यांना नेहमी येतो.
जशी यांची व्हेज बिर्याणी, याच प्रकारची खासियत त्यांच्या जवळपास प्रत्येक पदार्थाची आहे म्हणून तिथे बसून खाणाऱ्या पेक्षा पार्सल ची ऑर्डर कायमच दुप्पट असतात.
.....
@प्रोपर सास्वडात मला फक्त मोहिनी माहितीये. :- मोहिनी साऊथ इंडियन पदार्थात खरच 1नंबर आहे. सकाळी 7 ते 12च्या आत सगळ्यात फ्रेश चव असते.

@अन् अलीकडे काळेवाडी - झेंडेवाडी मध्ये मयुर अन् गारवा ढाबे>> मयूर ठीक. गारवा अट्यंट दिखाऊ आणि बोगस आहे. खाल्ल्यावर एसीडीटी होणारच. शिवाय पोट तडस लागेल असं जड होतं.
त्यापेक्षा गारवाच्या थोडा आधी पंचरत्न 1 नंबर आहे.

MipaPremiYogesh's picture

24 Jul 2020 - 10:32 pm | MipaPremiYogesh
MipaPremiYogesh's picture

24 Jul 2020 - 10:34 pm | MipaPremiYogesh
रुपी's picture

24 Jul 2020 - 11:15 am | रुपी

फारच भारी!
लिहिण्याची style पण झकास. नाकाची हजेरी काय आणि tomato निपचित पडले काय.. मस्तच

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jul 2020 - 11:22 am | अत्रुप्त आत्मा

हाही हाही ही!
धन्यवाद

रातराणी's picture

24 Jul 2020 - 11:28 am | रातराणी

भारी!! प्रत्येक पाकृवर प्रतिसाद दिला नाही पण गुरुजींच्या पनीरायणवर लक्ष ठेवून आहे.. पनीर टिक्का मसाला करूनही पाहिला आणि अप्रतिम झाला होता. फोटोबिटो काढण्याएवढा पेशन्स नाही आमच्यात ;)

MipaPremiYogesh's picture

24 Jul 2020 - 10:29 pm | MipaPremiYogesh

वाह परागजी काय अप्रतिम भाजी दिसत आहे..पनीर आपलं एकदम आवडतं आहे..विकांताला करून बघतो..

सान्वी's picture

25 Jul 2020 - 12:08 am | सान्वी

अगदी जबरी. मी मागच्या महिन्यात केली होती ही रेसिपी गुगल कृपेने, भन्नाट लागते आणि कमी तिखट पण स्वादिष्ट आणि रीच पण.
बादवे, दिल्ली किचन औंधातल म्हणताय का?तेच असेल तर माझं खूप आवडीचं आहे. तिथलं बटर चिकन अजून कुठेच त्या तोडीचं मिळत नाही असं माझं मत. आणि बाकी अस्सल नॉर्थ इंडियन पदार्थ ही मस्तच.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jul 2020 - 6:11 am | अत्रुप्त आत्मा

दिल्ली किचन , दीप बंगला चौक , मॉडेल कॉलनी, पुणे

हि करून बघेन असं वाटतंय, पण फोटो चा पेशन्स मला पण नाही.

प्रचेतस's picture

27 Jul 2020 - 8:57 am | प्रचेतस

असेल धमक तर जुळेल यमक
वैनीने खबरदारी घेतली (त्यांच्या दिव्य बालकास सांभाळायची) तर बुवाने जबाबदारी घेतली (पाकृ बनवायची) त्यातून ही पनीर लबाबदारी जन्मास आली.

आता यमक्या बुव्याकडे जायलाच हवं हे पनीरायण खायला.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jul 2020 - 7:49 pm | अत्रुप्त आत्मा

आगोबा ---
http://www.sherv.net/cm/emo/happy/raspberry-smiley-emoticon.gif

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jul 2020 - 7:27 pm | अत्रुप्त आत्मा

सर्व वाचक, प्रतिसादक, आस्वादक:- सर्वेषां धन्यवादम् .. इत्यर्थे http://www.sherv.net/cm/emoticons/thanks/signboard-thank-you-smiley-emoticon.gif

पियुशा's picture

29 Jul 2020 - 11:22 pm | पियुशा

ओ गुर्जी , बोले तो वेज अंडा बुर्जी , किती जिल्बया पाडल्या न किती स्माइल्या टाकल्या , माझा प्रतिसाद रैला तरी आभार प्रदर्शनाच्या पाट्या लिवल्या ;) पनीर लबाबदार ला आमची वैनी जबाबदार , म्हणूनशान तुमची रेसेपी दिसते लय चवदार , अशाच रेसीप्या बनवत रहा , न इथे आपल्या भाषेत "जिल्बया पाडत रहा " :) गुरजी टेम्पोत बसतोय का प्रतिसाद ;)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jul 2020 - 11:39 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif जिल्बुचा नि टाकली जिलबी,आत्मा झाला एलबी! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif