http://www.indiaprwire.com/downloads/200711295895-3.jpg
नि षेध! त्रिवार निषेध!!
"देशद्रोही'वरील बंदीनं केवळ अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटलेला नाही, तर एका उदयोन्मुख अभिनयसम्राटाचा, भावी सुपरस्टारचा आणि प्रतिभावंत कलावंताच्या उमेदीचा गळा घोटला आहे. एका जातिवंत कलाकाराच्या अभिनयसामर्थ्याच्या पाठीत खंजीर खुपसला आहे...
"इसके कहने पे मैं मुंबई छोड दूँ...उसके कहने पे मैं दिल्ली छोड दूँ...क्यूँ? ये देश मेरा है। क्या मुझे कहीं भी रहने का हक नहीं?'
असा तेजतर्रार, बाणेदार, हृदयाचा ठाव घेणारा जळजळीत डायलॉग आतापर्यंत ऐकला होता कधी? "जब तक बैठने के लिए न कहा जाए, शराफत से खडे रहो...ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं' किंवा "ये ढाई किलो का हाथ किसीपे पडता है, तो आदमी उठता नहीं, उठ जाता है,' म्हणणारे तुमचे अँग्री यंग किंवा ओल्ड मॅन पाचोळ्यासारखे उडून जातील या संवादफेकीपुढे! तरुणाईचा, राष्ट्रभक्तीचा, देशप्रेमाचा धगधगता अंगार आपल्या संवादांतून, देहबोलीतून ओकणाऱ्या या नव्या अभिनयसम्राटाचं नाव कमाल खान!
हा कमाल खान कोण बुवा, असा कुत्सित, बाष्कळ प्रश्न तुम्ही विचारणार असाल, तर तुमच्या अकलेची, सारासार विवेकबुद्धीची आणि सामान्यज्ञानाची कीवच करायला हवी. "देशद्रोही' नावाचा राष्ट्रभक्तीचा ज्वलंत हुंकार गेला महिनाभर विविध वाहिन्यांवरील जाहिरातींच्या माध्यमातून देश पेटवतो आहे. (ही जाहिरात पाहिल्यानंतर टीव्हीच पेटवावासा वाटतो, अशी काहींची प्रतिक्रिया आहे. यालाच म्हणतात प्रत्ययकारी अभिनय!)
"देशद्रोही'चा नायक-निर्माता (आणि कदाचित कथा-पटकथा-संवादलेखक, दिग्दर्शकही!) कमाल खान याच्या तोंडून हा डायलॉग एखाद्या ज्वालामुखीसारखा बाहेर पडतो आणि तमाम प्रस्थापित अभिनयसम्राटांच्या छाताडावर थयथया नाचतो! बहुधा, या प्रस्थापित अभिनयसम्राटांना या नव्या उद्रेकाचे हादरे जाणवू लागले होते, म्हणून जुलमी, निष्ठुर व्यवस्थेशी संगनमत करून त्यांनी चित्रपटावर बंदी घातली. कमाल खान या उमलत्या कळीची (किंवा कळ्याची म्हणा हवं तर!) फुलण्याची स्वप्नंच खुडून टाकली.
एक वास्तव पडद्यावर साकार होण्याआधीच पडद्याआड गेलं.
आता कायदेशीर लढाई लढली जाईल. तमाम अन्यायग्रस्तांचे वाली, दीनदुबळ्यांचे आशास्थान आणि सर्व न-अभिनेत्यांचे प्रेरणास्थान मा. महेश भट यांची साथ असल्यामुळे कुठल्या कुठल्या परिसंवादांतून, मुलाखतींतून या अन्यायाला तोंड फोडलं जाईल. न्याय मिळेल...न मिळेल. कदाचित, कमाल खान वेगळ्या नावानं, पण हीच "श्टोरी' वापरून हाच चित्रपट पुन्हा काढेल. पण तरीही, "देशद्रोही'वरील बंदी उठली नाही, तर त्याच्या सर्वोत्कृष्ट भूमिकेला, अभिनयाला प्रेक्षक नक्कीच मुकतील.
अवांतर : महेश भट यांच्या आगामी चित्रपटाचा विषय "देशद्रोही'वरील बंदीनाट्य हाच आहे म्हणे!
प्रतिक्रिया
20 Nov 2008 - 8:13 pm | बिपिन कार्यकर्ते
सगळा लेखच धगधगता आहे. इतक्या सुंदर चित्रपटाला अशी वागणूक दिल्याबद्दल संबंधितांचा त्रिवार निषेध. :)
ही जाहिरात पाहिल्यानंतर टीव्हीच पेटवावासा वाटतो, अशी काहींची प्रतिक्रिया आहे. यालाच म्हणतात प्रत्ययकारी अभिनय!
=)) =)) =))
बाकी ग्रेसी सिंग छान दिसते हां....
बिपिन कार्यकर्ते
20 Nov 2008 - 10:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त खुशखुशीत लिखाण!
सगळा लेखच धगधगता आहे. इतक्या सुंदर चित्रपटाला अशी वागणूक दिल्याबद्दल संबंधितांचा त्रिवार निषेध.
बिपीनचंद्रराजेंनी त्रिवार लिहून एकदाच निषेध केला म्हणून आणखी दोनदा निषेध, निषेध!
ते ट्रेलर पाहिल्यापासून माझी दिवसाची झोप उडलेली आहे, रात्री काही सुचत नाही (आणि झोपच लागते) ... काय भारी आहे कमाल खान. किंग खान (कोणाला रे किंगकाँग ऐकायला आलं?) कौन, कमाल खान, कमाल खान!
बाकी ग्रेसी सिंग छान दिसते हां....
तिचा मेकअप, कपडे, दिग्दर्शन कुणा २७१.८२ वर्षांच्या माणसाकडे सोपवलं होतं का? ;-)
एवढ्या सुंदर, देखण्या, राजबिंड्या कमाल खानसमोर ती काहीतरीच दिसते.
अवांतरः कालच एका बिहारी मित्रानी घरुन परत आला तेव्हा दुध-खवा अशी वडी दिली; वाह, काय भारी होती ती! या अशा मिठाया मिळणार असतील तर ....
21 Nov 2008 - 9:48 am | मृगनयनी
अभिजीत जी,
आज दि. २१/११/०८ रोजी "सकाळ" या वृत्तपत्राच्या "टुडे"मध्ये "देशद्रोही" वर आलेला हा लेख, जसाच्या तसा उतरवून काढण्यापेक्षा, नवीन काही प्रतिक्रिया दिली असती, तर जास्त रंजक वाटले असते.
कारण ८०% पुणेकरांकडे "सकाळ" हे वृत्तपत्र नियमित येते. त्यामुळे हा लेख सकाळीच वाचून झालाय.
:)
(किमान आपल्या लेखाच्या खाली "सौजन्य- -- -सकाळ" असे
लिहिण्याचे तरी सौजन्य दाखवायला हवे होते.....)
21 Nov 2008 - 10:35 am | धमाल मुलगा
हा हा हा...
अगं 'सकाळ'मध्ये लेख लिहिणारा तो 'आपलाच अभिजीत' आहे गं :)
अभिदा, बेश्ट रट्टे रे!
बाकी, आम्ही २ आठवडे पुण्याच्या ऍक्सेंचरमध्ये जात होतो तेव्हा तिथल्या एकुण ६ लिफ्ट्समध्ये पुर्णवेळ केवळ ह्याच चित्रपटाचे ट्रेलर दाखवत होते...
कस्स्स्स्सला द-य-नि-य वाटतो तो कमाल =))
च्यायला, ह्याच्या तोंडाकडे पाहिल्यावर, 'ह्यानं मारलेलं झुरळ तरी मरेल का?' अशी शंका येते आणि हे महाराज मात्र धडाधड गोळ्या मारुन मुंबई पोलीस उडवत असतात....त्या येड्याला मुंबई पोलीस म्हणजे काय व्हिडिओगेममधले पोलीस वाटले की काय?
21 Nov 2008 - 10:38 am | कपिल काळे
तो इथे टॉपिक टाकण्यापुरता येतो , त्यामुळे कुणाला म्हैत नसावा.
20 Nov 2008 - 8:15 pm | स्वानन्द
अगदी शिरीष कणेकर किवा तम्बी दुराई च्या ईश्टाईल मध्ये लिहिलय!!
20 Nov 2008 - 8:22 pm | शंकरराव
महेश भट यांच्या आगामी चित्रपटाचा विषय "देशद्रोही'वरील बंदीनाट्य हाच आहे म्हणे!
भटाची पोर जर त्या शिनेमाची व्हिरोइन असेलतर आग अजून भडकेल
20 Nov 2008 - 8:31 pm | अनामिका
फारच बाई अन्याय झाला मात्र या असामान्य अश्या होतकरु नायकावर. पहिल्याच चित्रपटावर बंदी आणली हे म्हणजे जरा अतीच नाही का?
१५ कोटीचा चित्रपट आहे देशद्रोही "खेळ आहे का इतका पैसा खर्च करण म्हणजे?
"चित्रपटावरील बंदी मुळे निर्मितीवर् (कर्माची निर्मिती! #o )झालेला खर्च आता आगांमी निवडणु़कीत उमेदवार म्हणुन उभे राहुन (अर्थात उत्तरप्रदेशातुनच ) वसुल करणार" इती होतकरू नायक कमाल खान .
कमाल खान उवाच"उत्तरप्रदेश मधिल प्रत्येक व्यक्ती ही जन्मजात राजकारणी असते" :?
राज अरे ! तुझ्या त्या फुटकळ आंदोलनापायी मनापासुन इच्छा असुनदेखिल आपले आबा ही बंदी उठवु शकत नाहित. :T
ही जाहिरात पाहिल्यानंतर टीव्हीच पेटवावासा वाटतो, अशी काहींची प्रतिक्रिया आहे. यालाच म्हणतात प्रत्ययकारी अभिनय!)
मला तर त्या *****लाच पेटवावीशी वाटते कानशिलात ;) .
"अनामिका"
21 Nov 2008 - 12:38 pm | राघव
अन्याय खरंच फार झालाय! (हळहळत्या स्वरांत) स्टार होता होता राहिला बिचारा! १५ कोटी म्हणजे काय चेष्टा आहे? आता कसे हे पैसे व्याजासकट (व्होटसकट?) परत करणार तो बिहारच्या नेत्यांना!
असे करायला नको होते महाराष्ट्र सरकारने. शेवटी महाराष्ट्र हे सगळ्यांचे राज्य आहे. (मराठींचे जरा कमी असले म्हणून काय झाले?) सगळ्यांना येथेच राहून गरळ ओकण्यासाठी खास आमंत्रण देतात येथे.
खरे तर कमालखानचे खास अत्तर गुलाबाने स्वागत व्हायला हवे होते. तशी सूचना बहुदा राज ठाकरेंकडूनच गेलेली होती सरकारला असे ऐकतो. शेवटी काही म्हटले तरी सरकारच्या व्होटबँकेचा सवाल होता हो, राजना त्याची काळजी नसणार तर अजून कुणाला??
बाकी लेख नेहमीप्रमाणेच ब्येश्टेश्ट!!
ही जाहिरात पाहिल्यानंतर टीव्हीच पेटवावासा वाटतो, अशी काहींची प्रतिक्रिया आहे. यालाच म्हणतात प्रत्ययकारी अभिनय! =)) =)) हे तर फारच जबरा!
21 Nov 2008 - 9:48 am | मृगनयनी
अभिजीत जी,
आज दि. २१/११/०८ रोजी "सकाळ" या वृत्तपत्राच्या "टुडे"मध्ये "देशद्रोही" वर आलेला हा लेख, जसाच्या तसा उतरवून काढण्यापेक्षा, नवीन काही प्रतिक्रिया दिली असती, तर जास्त रंजक वाटले असते.
कारण ८०% पुणेकरांकडे "सकाळ" हे वृत्तपत्र नियमित येते. त्यामुळे हा लेख सकाळीच वाचून झालाय.
:)
(किमान आपल्या लेखाच्या खाली "सौजन्य- -- -सकाळ" असे
लिहिण्याचे तरी सौजन्य दाखवायला हवे होते.....)
»
21 Nov 2008 - 10:47 am | मनिष
(१) आपला अभिजीत हाच सकाळ मधे लिहिणारा अभिजीत पेंढारकर आहे.
(२) हे माहित नसले तरी, "आजचा लेख त्याला कालच कसा कळणार/वाचता येणार?" असा विचार केला का?
21 Nov 2008 - 10:49 am | सखाराम_गटणे™
>>(२) हे माहित नसले तरी, "आजचा लेख त्याला कालच कसा कळणार/वाचता येणार?" असा विचार केला का?
सहमत
21 Nov 2008 - 11:08 am | मृगनयनी
अभिजीत जी,
आय ऍम रिअली सॉरी,
आपल्या विषयी ...इ-स्पेशली आपल्या प्रोफाइल विषयी, मी पूर्णपणे अनभिज्ञ होते, त्यामुळे मला वाटले, की कोणीतरी 'सकाळ' मधला टॉपिक जसाच्या तस्सा उचलला आहे,...
कारण मागे एकदा हा प्रकार खरडफळ्यावर घडला होता...
असो...... आधी आपली ओळख पटली असती, तर आपल्याला अशी प्रतिक्रिया नक्क्कीच दिली नसती...
"सकाळ" मधील आपले लेख आणि चित्रपट-सारांश, यांची मी चाहती आहे...
कृपया, वरील प्रतिक्रिया मनावर घेऊ नये......
:)
-->>उचलेगिरी करणार्यांबद्दल प्रचंड चीड असणारी,
"मृगनयनी"
21 Nov 2008 - 7:16 pm | आपला अभिजित
माझ्याच लेखांची `उचलेगिरी' करायला परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद!
आणि प्रतिसादांबद्दलही!
21 Nov 2008 - 11:55 am | परिकथेतील राजकुमार
हमार कमालवा सबका आन्खो मे जल रहा है का ! अरे तोहार जैसे लोग हि हम लोगोका मजबूर करत हो . कमल हमरा कलेजवा का टुकडा है याद रखीयेगा.
जय तबेलेवाली मां !!
++++ प्रसाद ++++
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची...
http://papillonprasad.blogspot.com/
21 Nov 2008 - 11:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हमार कमालवा सबका आन्खो मे जल रहा है का ! अरे तोहार जैसे लोग हि हम लोगोका मजबूर करत हो . कमल हमरा कलेजवा का टुकडा है याद रखीयेगा.
जय तबेलेवाली मां !!
हीहीही ...
एक नंबर.
कमाल खानएवढा डॅशिंग, चार्मिंग, हॅण्डसम हीरो ना कधी झाला ना कधी होईल!
आणि मीतर ब्वॉ पिच्चर पहाणार!
21 Nov 2008 - 2:48 pm | नाशिककर
अरे बापरे किती अन्याय होतात "त्यांच्यावर" या मुंबईत आणि महाराष्ट्रात....!!
महाराष्ट्र सरकार ने कमाल (के ) खान याच्या चित्रपटावर लावलेली बंदी... म्हणजे महाराष्ट्रात होणार्या भैयांवरील अत्याचारांना, अन्यायाला वाचा फोडणार्या या क्रांतिकारी
विचारांना थांबण्याचे काम या जुलमी सरकारने केले आहे...!! त्याबद्द्ल या सरकारचा निषेध निषेध निषेध आणि निषेध!!!!!!!!!
अरे काय चाललयं .... काहिहि सिनेमे काढतात लोक... अरे आवरा याला... म्हणे उच्च न्यायालयात जाणार.. कसला कमाल रे.... तुझ्या पेक्ष्या हमाल बरा...!!!
21 Nov 2008 - 8:12 pm | एडिसन
मी पाहिला हा चित्रपट..का पाहिला ते कळले नाही.. :''( पण आता अजून काही सांगण्याच्या अवस्थेत नाही.. ~X(
Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.
22 Nov 2008 - 12:16 am | मनिष
ही ईमर्जन्सी आहे, तातडीने चांगल्या डॉक्टरकडून इलाज करून घे. विश्रांती घे..... काळजी घे हो! =))
22 Nov 2008 - 11:57 am | परखड
मी नुस्ता trailor बघुन ICU मधे आहे. #:S 8| तुम्ही पुर्ण चित्रपट कसा काय पाहू शकला?
या चित्रपटावर बंदी घालण्याची गरज नव्हती. असाही कुणीच तो पाहीला नसता. या भैय्यासमोर मी प्रदीपकुमार किंवा मनोजकुमारला सुद्धा अभिनयसम्राट म्हणायला तयार आहे.
22 Nov 2008 - 12:29 pm | आंबोळी
>>या भैय्यासमोर मी प्रदीपकुमार किंवा मनोजकुमारला सुद्धा अभिनयसम्राट म्हणायला तयार आहे. =)) =)) =))
आरे तो भारतभूषण राहिला....
इतक्या मोठ्या अभिनय सम्राटाचा महाराष्ट्र सरकारने बंदी घालून अभिमन्यू सारखा केलेला अंत मनाला चटका लाउन गेला.
>>तुमचे अँग्री यंग किंवा ओल्ड मॅन पाचोळ्यासारखे उडून जातील या संवादफेकीपुढे!
खरे आहे. आणि त्याची फाईट तर लाजवाब आहे. थोडासा पळत येउन नंतर गुडघ्यावर घसरत येउन समोर्च्याच्या बेंबी खाली आणि मांड्यांच्या वर मारलेली फाईट देवगण पिता-पुत्रांची करीयर संपवणारीच वाटली मला. त्याचे ते गोळ्यांच्या वर्षावात स्लोमोशन मधे पळणे.... अहाहा....
या बंदी बद्दल मी ही सर्वांचा निषेध करतो.
जय हिंद ! जय बिहार !!
आंबोळी
24 Nov 2008 - 12:04 pm | राघव
>>या भैय्यासमोर मी प्रदीपकुमार किंवा मनोजकुमारला सुद्धा अभिनयसम्राट म्हणायला तयार आहे.
आरे तो भारतभूषण राहिला....
परत अन्याय झालाय असे वाटते! पण यावेळी भारतभूषण, प्रदीपकुमार अन् मनोजकुमार यांच्यावर झाल्यासारखा वाटतोय!!! :D
22 Nov 2008 - 2:32 pm | परिकथेतील राजकुमार
चुप्प करियेगा आप लोग. हमार कमलवा का फिलम आस्कर के लिये जात रहि. नया फिलमवा भी आवत है 'द मैट्रीक्सवा' आउर 'मक्कड म्यान.' दिल थाम लिजियेगा हमार बबुआ के वास्ते. आउर कल गाव मा चिठ्ठी भी आ गया हय वैसा. अंग्रेजी मा कुच घिसा हुआ हइ ! “We Recommended Your Movie Should Be Entertainment Tax Free As It Not Contained Any Type Of Entertainment.”
++++ प्रसाद ++++
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची...
http://papillonprasad.blogspot.com/