समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.
हा लघुलेख साहित्यक्षेत्रातील आणि वृत्तमाध्यमांतील अशा काही अनुभवांचा आहे. साहित्याच्या प्रांतात लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक आणि लेखक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.
मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.
यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.
वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?
३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
.......
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
...................................
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.
एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये बुडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात. खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. ते वाचून जरा अस्वस्थ झालो आणि मग त्यांना ईमेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.
आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.
सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘करोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/ ) हाच आहे. मग या वृत्तपत्रास ईमेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.
गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही !
बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.
बस ... आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो .फोनबिन जाऊदे मरूदे, हे धोरण.
लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही तोपर्यंतच !
..........................................................................................
प्रतिक्रिया
30 Jun 2020 - 1:33 pm | अभ्या..
मी एका प्रिंटिंग प्रेस मध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून नोकरी करत असतानाची गोष्ट.
ती प्रेस लौकिकार्थाने प्रकाशक किंवा मुद्रक नव्हते पण कमर्शिअल प्रिंटिंगचा प्रचंड अनुभव असलेने तेथे बर्याच प्रकाशकांची पुस्तके मुद्रणासाठी येत. असेच एका प्रथितयश डॉक्टराचे पुस्तक छपाईसाठी आलेले. डॉक्टरसाहेब वैद्यकीय क्षेत्रात यथातथा प्रॅक्टीस करायचे पण सामाजिक कार्याची आवड बर्यापैकी होती. असेच त्यांनी पुस्तक लिहिलेले. एका इतिहासप्रसिध्द डॉक्टराचे चरित्र. प्रकाशक ते स्वतःच बनलेले. यथावकाश त्याचे टाईपसेटिंग पूर्ण झाले. प्रुफरिडिंग चालू असताना त्यानी कव्हरपेज डिझायनिंगचा विषय काढला. प्रेस मालकापाशी बोलताना मालकांनी सांगितले की आमचा डिझायनर करुन देईल कव्हरपेज. मग ते माझ्याकडे आले व बोलणी झाली. टाईपसेटिंग होतानाच वाचनाच्या आवडीने माझे ते पुस्तक वाचन झालेले होते. त्यानुसार एक थीम ठरवून काम सुरु केले. पेजिनेशन आणि लेऑटचेही काम माझेकडेच होते. चारपाच दिवसात एक जुन्या पुस्तकातील चित्राचे झेरोक्स चित्र घेऊन ते आले व म्हनाले हे चित्र कव्हरवर हवे. हे माझ्या मुलीने हुडकले आहे. ते चित्र रिप्रिंट करण्याइतके चांगले नव्हते आणि पूर्ण कव्हरवर तेच एक वापरावे असेही नव्हते. मग मी तसे चित्र स्वतः काढून पीसीवर एडिट करुन इतर काही इलिमेंट अॅड करुन कव्हर पेज पूर्ण केले. टायटलची कॅलिग्राफि आणि कलरस्कीम सहीत. कारण दिलेले चित्र कॄष्ण्धवल होते. पूर्ण कव्हर पाहिल्यावर त्यांना अत्यंत समाधान वाटले व त्यांनी माझे कौतुक ही केले. ऋणनिर्देशाचे पान माझा डीटीपी करणारा सहकारी करत होता. त्यात त्यांनी मुखपृष्ठ डिझाईन म्हनून आधी जे माझे नाव होते ते बदलून स्व्तःच्या मुलीचे नाव टाकायला सांगितले. त्यांची मालकाशी चर्चा होत असताना त्यांचा मुद्दा असा होता की मूळ चित्र मुलीने दिले. मालक म्हनत होते की डिझ्झीन आमच्या डिझायनरने केले तेम्व्हा त्याचे नाव टाका. लेखकमहोदयाचा मुद्दा होता की आम्ही त्यासाठी पैसे दिले आहेत आणि तो पगारी नोकर असलेने ते काम नोकरीचा भाग होता व स्वतंत्र नामनिर्देशानाची गरज नाही. काम जवळपास पूर्ण होत आल्याने वाद वाढवण्यात अर्थ नव्हता. फक्त त्यांनी मुखपृष्ठ संकल्पना असे लिहिन स्वतःच्या मुलीचे नाव टाकले बाकी पृष्ठरचना आणि सुलेखनाचे माझे नावही उडवून टाकले.
वाईट जेंव्हा वाटले एका संस्थेने दिलेले उत्कॄष्ठ मुखपृस्।ठाचे पारितोषिक त्याम्च्या मुलीने झोकात स्वीकारले. आणि कार्यक्रमातल्या भाषणात ते स्व्तः कसे साकारले याचे रसाळ वर्णन केले.
30 Jun 2020 - 3:40 pm | mrcoolguynice
@अभ्या
एक गोष्ट वाचलेली ..
एकदा एक राजा जंगलात शिकारीसाठी सकाळपासून भूक तहान विसरून फिरत असतो,
मध्यानीच्या कडकडीत उन्हात, थकून व साजेशी शिकार श्वापद न मिळाल्याने निराश होऊन, एका झाडाखाली विसावतो.
थकव्यामुळे लवकरच त्याचा डोळा लागतो. त्याच झाडावर एक हंस बसलेला असतो, त्याने सकाळपासून चाललेली राजाची वणवण पाहिली असते.
थोड्यावेळाने सूर्याचा कोन बदलतो, आता राजाच्या चेहेऱ्यावर उन्हाची तिरीप येते. हंसाला राजाची दया येते, तो आपले पंख फैलावतो की जेणेकरून
उन्हाची तिरिप पंखाने अडवून, राजाच्या चेहऱ्यावर शीतल छाया राहील. तेव्हड्यात तेथून एक कावळा उडत उडत जाताना, आपली विष्टा टाकतो, ती नेमकी राजाच्या कपाळावर पडते. राजा वैतागून झोपमोड होऊन उठतो, कपाळावर पडलेली विष्टा व शिकार न झाल्याची निराशा त्याच्या क्रोधात भर टाकतात. तो वर पाहतो, वरती त्याला हंस पंख फैलावलेला दिसतो, तो तडक धनुष्य उचलतो, व एक बाण हंसावर चालवतो. हंस मृत्यू पावतो ...
30 Jun 2020 - 7:48 pm | चांदणे संदीप
माझी 'येक रूपाया' मधली गोष्ट अशी रिलेट झालती व्हय!
माझ्याबरोबर तर अजूनही घडतच आहेत अशा गोष्टी. आता सवय झालीय.
सं - दी - प
1 Jul 2020 - 7:53 am | तुषार काळभोर
एव्ढंच म्हणू शकतो :(
त्यातून शिकणं महत्वाचं.
मी आताच्या कंपनीत काम करताना एखादी अॅक्टिव्हीटी पूर्ण झाल्यावर जी अभिनंदनाची मेलामेली होते, त्यात मी आवर्जून ॠणनिर्देश करतो. अगदी एखादा नवा मेंबर असेल ज्याने थोडासा हातभार लावलाय त्यापासून ते एखादा मोठा माणूस ज्याने सपोर्ट अन वॅलिडेशन मध्ये खूप योगदान दिलंय त्यापर्यंत.
त्याचा फायदा हा होतो की ते लोक नंतर एका मेसेजवर शनिवारी-रविवारी, रात्री उशिरा, अडलेली कामे करून देतात. नंतर एखाद्या अॅक्टिव्हिटीमध्ये जास्त डेडिकेशनने कामे करतात. जास्त सपोर्ट करतात.
दुसरं माझं काम सपोर्ट टाईप मध्ये जास्त असल्याने बर्याचदा अदखलपात्र असतं. पण शेवटी त्या अॅक्टिव्हिटीमध्ये 'याचा' किती अन काय सहभाग आहे हे टॉप मॅनेजमेंट पर्यंत सगळ्यांना माहिती असतं. (ती व्यवस्था मीच केलेली असते ;) )
त्यामुळे अप्रेजल मध्ये काही अडचण येत नाही. :) अन कॉर्पोरेटमध्ये तेच अप्रेजल महत्वाचं असतं!
1 Jul 2020 - 10:33 am | सुबोध खरे
असे अनुभव मला रोजच येत असतात.
मी सोनोग्राफीवर केलेल्या निदानाचे श्रेय घेणारे डॉक्टर आणि रुग्ण रोजच पाहत असतो.
उदा. एका अस्थिव्यंग तज्ज्ञाने रुग्णाच्या पायाला सूज आली आहे म्हणून माझ्याकडे पायाच्या डॉपलर साठी पाठवले होते. रुग्ण माझ्या दवाखान्यात आला तेंव्हा त्याचा चढलेला श्वास आणि पायाची सूज पाहूनच मला लक्षात आले कि याला पायाचा आजार नसून हृदयाचे काम नीट चालत नाही. डॉपलरच्या अहवालात शेवटी हृदयाची तपासणी करून घ्या असे मी लिहिले होते. यानंतर या महाशयांनी त्या रुग्णाला हृदयविकार तज्ञाकडे स्वतः निदान केले आहे असे गर्वाने सांगून पाठवले. तो हृदयविकार तज्ञ माझा मित्र आहे त्याने डॉपलरच्या अहवाल वाचून काय स्थिती आहे ते समजून मला तसे कळवले.
मी फक्त हसलो.
आतड्याच्या पहिल्या भागाचा (duodenum) क्षयरोग हा अतिशय तुरळक प्रमाणात असतो. अशा निदान झालेल्या सहा रुग्णांचे एक्स रे देऊन त्याबद्दल आमचा अनुभव (our experience in duodenal tuberculosis) हा शोध निबंध एका प्रख्यात आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये आमच्याच एका पोटाच्या रोगाच्या तज्ज्ञाने प्रसिद्ध केला. त्यात किमान श्रेयनिर्देश किंवा एक्स रे डॉ सुबोध खरे यांच्याकडून घेतले आहेत असे सुद्धा नमूद केले नव्हते. हि बाब माझ्याच एका वर्गमित्राने माझ्या लक्षात आणून दिली. ( एका एक्स रेच्या खाली क्रॉप करताना माझे नाव तसेच राहून गेले होते).
मी फक्त हसलो.
30 Jun 2020 - 1:57 pm | शा वि कु
चूक दुरुस्तीसाठी तुम्ही इतके प्रयत्न करता, फारच दुर्मिळ बाब. आम्ही वाचून सोडून देतो.
तुमच्या लेखावरून "ते गाढ व शांतपणे झोपले होते" आणि "ते गाढव शांतपणे झोपले होते" विनोद आठवला :))
30 Jun 2020 - 4:24 pm | शाम भागवत
खरंय.
म्हणून तर त्यांचे वेगळेपण या संकेतस्थळावर नेहमी जाणवते.
_/\_
30 Jun 2020 - 4:27 pm | शाम भागवत
खरंय.
म्हणून तर त्यांचे वेगळेपण या संकेतस्थळावर नेहमी जाणवते.
_/\_
प्रतिसाद असा द्यायचा होता. :)
1 Jul 2020 - 7:44 am | तुषार काळभोर
इथे (माध्यम व्यवसाय - जाहिराती, बातम्या, वॄत्तपत्रे, वॄत्तवाहिन्या, मालिका) हे वाक्य चपखल बसावे.
30 Jun 2020 - 2:09 pm | कुमार१
अभ्या,
तुम्ही नक्कीच येता यात. पुस्तकाच्या यशात मुखपृष्ठकाराचा वाटा जरूर असतो.
तुमच्या दुख्खात सहभागी आहे !
शा वि कु,
छान विनोद.
30 Jun 2020 - 4:21 pm | शाम भागवत
हेच बरोबर आहे.
“ठेविले अनंते तैसेची रहावे” याचा हाच तर खरा अर्थ आहे.
आपली स्वस्थता महत्वाची.
हे सगळे अपेक्षा ठेवल्याने होते व आपल्यालाच म्हणजे सज्जन माणसालाच नेहमी त्रास होतो.
ते टाळायचेच.
30 Jun 2020 - 4:41 pm | कुमार१
शाम,
पहिला प्रतिसाद, तत्पर सुधारित प्रतिसाद आणि अभिप्राय या सर्वांबद्दल धन्यवाद !
तुमचे मार्गदर्शन उपयुक्त आहे. नेहमी लक्षात ठेवावे असे.
30 Jun 2020 - 7:22 pm | चौकटराजा
एच आर डी च्या प्रशिक्षणाला गेलो असताना त्यात " स्टीलिन्ग द क्रेडिट" हा मानवी स्वभाव असतो ,सर्वामध्ये थोडयाफार प्रमाणात हे " लक्षण" असतेच ! असे अगदी वैद्यकातील नोबेल मधेही घडलेले आहे ! बहुदा डी एन ए च्या शोधात !
30 Jun 2020 - 8:07 pm | चांदणे संदीप
मलाही अशा लष्कराच्या भाकर्या भाजायची हौस कधीतरी उफाळून येते. एकदा एकाने जीवाशी गाठ असल्याची जाणीव करून दिली होती. :)
सं - दी - प
30 Jun 2020 - 8:20 pm | सतिश गावडे
आपल्याकडे चांगली ग्राहक सेवा ही अभावानेच आढळते. विक्री होईपर्यंत "ग्राहक देवो भव" आणि विक्री झाली की "ग्राहक फाट्यावर जावो" असा खाक्या असतो आस्थापनांचा :)
30 Jun 2020 - 8:42 pm | कुमार१
*
.>>>
दोन्हीही मुद्दे छान !
*
>>>>>
सटीसामाशी २-४ भाजायच्या , हाकानाका !
30 Jun 2020 - 11:30 pm | गुल्लू दादा
नेहमीप्रमाणे वाचनीय झालाय. धन्यवाद.
1 Jul 2020 - 8:27 am | प्राची अश्विनी
तुमच्या सारखं कोणीतरी असशा भाक-या भाजतात त्यामुळेच बदल घडतात. त्यामुळे तुम्हाला धन्यवाद.
Stealing the credits/ plagiarism..
ताजा अनुभव.
दोन वर्षांपूर्वी fb वर ग्रेसच्या कवितेचे सुंदर रसग्रहण वाचले. (ओरिजिनल). नंतर पुन्हा ते शोधायला गुगललं तर एका ब्लॉगवर सापडले. त्या ब्लॉगवालीने स्वतः च्या नावावर छापले होते. मी विचारलं तुम्ही लिहिलंय? तर हो, म्हटले वर "ग्रेसची साहित्याची तिची आवड"वगैरे लंबा चौडाreply पण आला. मग मी मूळ लेखकाला कळवले. त्याने तिला विचारताच अख्खा ब्लॉग डिलीट केला, फेबुवर आम्हाला ब्लॉक करून टाकले.
काही दिवसांपूर्वी तिच्या नावाचा एक कायदेविषयक लेख , whatsappवर आला. नाव तेच. लेख इतका मुद्देसूद , शंका आली म्हणून Google translate केले तर एका कायदेविषयक साईटवर अख्खा लेख (एखादा पेरा वगळून) सापडला. तिच्या fb वर पण without credits तोच लेख. पन्नास एक शेअर्स अन् लोकांना केलेल्या कौताकाचा स्विकार. एका परिचिताला हे सांगितल्यावर त्याने तिला मेसेजवर विचारल्यावर, " हो मी त्यावरून घरी तलाय. पण तो लिहिणा-या team वर मी होते . पण तुम्ही सांगताय तर खाली स्त्रोत म्हणून लिंक देते " हे उत्तर.
ही स्त्री IP law मध्ये specialization करतेय , शिवाय एका मराठी प्रसिद्ध वृत्तपत्रात लिहिते.
आता बोला!
1 Jul 2020 - 9:30 pm | शेखरमोघे
हल्ली बर्याच नावाजलेल्या, जागतिक दर्जाच्या शिक्षणसन्स्था विद्यार्थ्यानी लिहिलेले प्रबन्ध/सन्शोधन/अहवाल काय दर्जाचे आहेत हे ठरवताना Standard Operating Procedure म्हणून Software वापरून plagiarism नसल्याची खात्री करून घेतात.
30 Sep 2020 - 3:17 pm | चलत मुसाफिर
तिचा नामोल्लेख तरी करा इथे. तिचं श्रेय तिला मिळायला नको का? :-)
1 Jul 2020 - 10:19 am | सुबोध खरे
श्रीमती इंदिरा गांधी यांनी विक्रांत जहाजावर एका तरुण नौसैनिकाला सांगितलेली एक कहाणी ( त्यांच्याच तोंडून ऐकलेली).
या जगात दोन तर्हेची माणसं असतात
१) काम करणारी
२) श्रेय घेणारी
यापैकी तू पहिल्या गटात प्रवेश कर
कारण तेथे अजिबात स्पर्धा नसते.
1 Jul 2020 - 12:46 pm | जेम्स वांड
डॉक्टर साहेब,
थोडक्यात मोठा संदेश दिला म्हणायचं इंदिराजींनी त्या नौसैनिकाला अन गप्पांच्या ओघात त्यानं तुम्हाला
तुम्हा सर्वांना माझा सलाम.
1 Jul 2020 - 10:28 am | कुमार१
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
लेखाचा मूळ मुद्दा -दाखवून दिलेली चूक मान्य करणे आणि त्यावर कारवाई करणे- हा होता.
चर्चेदरम्यान ‘श्रेय घेणे’,’ साहित्यचोरी’ इत्यादी पूरक मुद्देही पटलावर आलेत.
त्याबद्दल धन्यवाद आणि सहमती.
1 Jul 2020 - 2:29 pm | mrcoolguynice
बर्रोब्बर .... आणि म्हणूनच डिजिटल इंडिया चे जनक हे २०१४ नंतरचे नसून...
त्याची पूर्वतयारी भारतीय १९६० च्या दशकापासूनच करत होते..
डिजिटल इंडियाचा दैदिप्यमान इतिहास २०१४ च्या कितीतरी दशके आधी सुरु झाला होता.
(भारताच्या विकासाचा प्रवास २०१४ पासून सुरु झाला अशी समजूत करून देणारे व घेणाऱ्या भक्तवृंदाला समर्पित )
1 Jul 2020 - 7:16 pm | सुबोध खरे
हो ना
मग हा प्रतिसाद का लिहिला?
Sam Pitroda says not Narendra Modi but Rajiv Gandhi started digital India
1 Jul 2020 - 7:23 pm | mrcoolguynice
2014 पुर्वीच्यांचे क्रेडीड, 2014 नंतरच्यानी
फक्त स्वतःच्या (मी आणि मी) नावावर खपवू नये म्हणून...
1 Jul 2020 - 7:26 pm | सुबोध खरे
आलं का आपलं तुणतुणं
पहा
खाली लिहिलंच आहे
सत्य दाखवलं तरी लोक आपला दृष्टिकोन बदलत नाहीत.
1 Jul 2020 - 8:02 pm | शाम भागवत
असं कसं?
गारगायींमुळेच तर टीसीएस, विप्रो, टाटायन वगैरेची माहिती इथे मांडली गेली की.
:)
1 Jul 2020 - 8:17 pm | mrcoolguynice
तुम्हारी बरगल ...सच, हमारा सच ... कहानी हैं ?
तुम्हारा खून ... खून, तो क्या, हमारा खून पानी हैं ?
तुम्हारी वकिली ...सरकारी, तो, हमारी फ़रयाद ... गद्दारी हैं ?
1 Jul 2020 - 11:33 am | मनो
पुण्यातल्या, इंग्रजीतून इतिहास लेखन करणाऱ्या, आणि इंटरनेटवर नेहेमी सक्रीय असण्याऱ्या लेखकाबद्दलचा एक अनुभव.
त्यांच्या पुस्तकातील एका छायाचित्रात चूक झाली होती. ई-मेल द्वारे कळवली, त्यांनी ती मान्यही केली, आणि पुढल्या आवृत्तीत दुरुस्त करू म्हणून आश्वासनही दिले.
मग काय झाले अचानक ते कळेना. त्यांचे पुन्हा उत्तर आले की मीच बरोबर, कारण अमक्यातमक्या संग्रहालयाने हीच चूक केली आहे. बहुतेक दोन चुका एकत्र केल्या की त्या एकमेकांना रद्द करतात, अथवा सगळे करतात तीच चूक आपणही करायला हवी, अशी काहीतरी त्यांची समजूत असावी,
1 Jul 2020 - 12:53 pm | जेम्स वांड
भाकरी भाजायचा लहानपणी पासूनच शौक नाही, पण सगळ्यांचे अनुभव वाचून कायम काहीतरी शिकायला मिळतं आहे हे नक्कीच. कुमारजींना धागा काढल्याबद्दल अनेक आभार.
1 Jul 2020 - 2:44 pm | राघव
प्रथम तुमच्या प्रयत्नांमागील भावनेबद्दल आणि पाठपुरावा करण्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक.
थोडं वैयक्तिक अनुभवातून आलेली फिलॉसॉफी मांडावीशी वाटली, म्हणून खाली लिहिलंय. :-)
आपण मनापसून सांगतो, पण बरेचदा समोरची व्यक्ती ते स्वीकारत नाही किंवा स्वीकारलंच तरी आपल्या कल्पनेप्रमाणे स्वीकारत नाही. मग त्यामागचं बरं-वाईट कारण काहीही असो. याचा आपल्याला खूप त्रास होतो आणि हे अगदी साहजिक आहे.
मला जेव्हा असे अनुभव आले/अजूनही येतात, तेव्हा त्यातून उमटणार्या माझ्या प्रतिक्रीया साधारण अशा होत्या -
- प्रथम प्रथम, मला ते फार लागायचं आणि चिडचिड व्हायची. [समोरच्याला काहीच फरक पडत नाही!]
- नंतर समोरच्या व्यक्तीची अक्कल काढायला सुरुवात केली. [सकाफना!]
- माझं बोलणं योग्य ठरवण्यासाठी समोरच्या व्यक्तीची मतं खोडायला लागलो. [सकाफना!]
- निराशा वाटायला लागली आणि मतप्रदर्शन करणं/स्वतःहून मदत करणं बंद केलं. [सकाफना!]
- इतरांची चुकीची मतं बघून त्रास व्हायचा, पण दुर्लक्ष करणं सुरू केलं [सकाफना!]
- माझंच काही चुकतंय का सांगण्यात हे बघायला सुरुवात केली. [सकाफना!]
- लक्षात आलं की मी माझं मत न मांडून समोरच्याला ते झिडकारायची/स्विकारायची संधीच नाकारतोय. [सकाफना!]
मग मी मला स्वतःला वाटलं तर, एकदा तरी, माझं मत मांडणं परत सुरू केलं. समोरच्याला ते पटलं तर ठीक, नाही पटलं तरी ठीक. [समोरच्याला काही फरक पडो वा न पडो, मला तरी खूप फरक पडतो!]
=====
बाकी ऋणनिर्देशाबद्दल प्रामाणिकपणे बोलायचं तर आधी मला स्वतःकडे बोट दाखवावं लागेल -
लहानपणी पाचवी-सहावीत असतांना एकदा, शिक्षकांनी सांगीतलं की वर्गात दुसरे दिवशी प्रत्येकानं एकतरी अॅक्टिव्हिटी करून दाखवावी, काही नाही तर एखादं गाणं/श्लोक्/जोक/गोष्ट तरी सांगण्याचा प्रयत्न करावा.. मी त्यात दुसर्या दिवशी एक कविता म्हणून दाखवली. सगळ्यांनी कौतुक केलं, विचारलं की कुणाची म्हणून. मला ते माहित नव्हतं. लहानपणी कधीतरी पाठ झालेली. पण मी ती माझी म्हणून खपवली. कुणालाच काही संशय आला नाही. दुसर्या दिवसापासून माझं मन मला त्रास देऊ लागलं, पण चूक दुरुस्त करण्यासाठीचं धैर्य माझ्यात तेव्हा नव्हतं. आज तसं धैर्य असूनसुद्धा ते मला दुरुस्त करता येत नाही. :-)
नाशिकचे मिलिंद जोशी आहेत. त्यांची चेपूवर "झुंज" म्हणून एक छोटेखानी कादंबरी वाचली. जवळपास २२-२३ पोस्ट्स मधे ती त्यांनी प्रसिद्ध केली होती. छान कादंबरी होती. पण एका वर्षानं मला ती कायप्पावर कुणा भलत्याच नावानं आली. ते मग मी तसं फॉरवर्ड करणार्याला कळवलं. चेपूवर जाऊन जोशींशी संपर्क साधला आणि त्यांना ती कादंबरी किंडलवर का होईना प्रसिद्ध करण्याची विनंती केली. पुढे काय झालं माहित नाही.
हापिसात हकीकत अपरोक्षपणे कळाली - एक टीम लीड एका टीम मेंबरला असं म्हणाला, "देख भाई, तूने जरूर ये काम किया है और बहुत अच्छा किया है| पर अभी तू नया है और तुझे काफी मौके बाद मे मिल जाएंगे| इस बार मेल मै भेजुंगा|". ते श्रेय घेण्यासाठी, त्याच टीम मेंबरच्या कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, शेवटचा मेल त्यानं स्वतः टाकला, श्रेय घेतले आणि स्वतःच्या अप्रायझलची सोय करून घेतली. आम्ही काही जणांनी मिळून नंतर त्या टीम लीडला अकाऊंट मधून हुसकावून लावलं, पण तो गुणी टीम मेंबर हकनाक दुखावल्या जाऊन कंपनी सोडून गेला.
=====
हे असे अनुभव सार्वत्रिक आहेत. त्यांची दाहकता त्या-त्या व्यक्तींच्या स्वभावातील ग्रे शेड्स च्या प्रमाणावर ठरते.
पण हे जे जग चाललंय ते कुणीतरी चांगलं वागताहेत म्हणूनच ना? :-)
=====
मला आजवर आलेल्या अनुभवांतून माझं एवढं शिकणं झालंय:
- आपला जो स्थायीभाव / मूळ स्वभाव असतो ना, त्याच्याकडे तटस्थपणे आणि धैर्यानं [होय, ही खूप मोठी गोष्ट आहे] बघावं. आपलं वागणं योग्य वाटलं तर चांगलंच, ते जोपासावं. नाही वाटलं तर त्यातून शिकावं, ते प्रामाणिकपणे आपल्यात सुधारावं आणि पुढं जावं.
1 Jul 2020 - 7:24 pm | सुबोध खरे
हे असे अनुभव सार्वत्रिक आहेत.
जालावर वावरायला लागलेला एक दशकाहून जास्त काळ लोटला यात एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे
तुम्ही एखादी गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध केली तरी लोक आपला दृष्टिकोन बदलत नाहीत.
तुम्ही सत्य दाखवून लोकांचे तोंड गप्प करता परंतु त्यांची विचारसरणी बदलता येत नाही.
त्यामुळे आपण आपले काम करत जायचे, जीवाला लावून न घेता.
ज्याला बदलायचे आहे तो बदलतो बहुसंख्य बदलत नाहीत.
आपण सुखासमाधानात राहावे
1 Jul 2020 - 7:59 pm | शाम भागवत
@राघव,
हेच तर मकाफना (मला काहीच फरक पडत नाही) :)
सगळ्या सकाफनाचं मकाफना झालं पाहिजे.
कारण सफाकना आपल्या हातात नसतं,
तर मकाफना आपल्या हातात असतं.
2 Jul 2020 - 9:41 pm | प्रकाश घाटपांडे
आवडली प्रतिक्रिया
1 Jul 2020 - 2:53 pm | कुमार१
वरील तिन्ही प्रतिसादकांचे आभार !
तुमची खालील वाक्ये खूप आवडली. विचारप्रवर्तक.
१.
बहुतेक दोन चुका एकत्र केल्या की त्या एकमेकांना रद्द करतात, अथवा सगळे करतात तीच चूक आपणही करायला हवी
२. सगळ्यांचे अनुभव वाचून कायम काहीतरी शिकायला मिळतं आहे
३. आपला जो स्थायीभाव / मूळ स्वभाव असतो ना, त्याच्याकडे तटस्थपणे आणि धैर्यानं [होय, ही खूप मोठी गोष्ट आहे] बघावं.
1 Jul 2020 - 3:08 pm | कंजूस
वास्तव आहे.
-------------
मुळीक यांची दोन पुस्तकं आहेत. ओपेक आणि वाटर कलर पेंटिंग मराठीत. चित्र आहेत आणि रंगवण्यासाठी काय करावं.लागतं याचं तंत्र दिलेलं आहे. म्हणजे असं की तंत्र वापरून तुम्ही रंगकाम साध्य करा.
इथे एक चित्र आलं. मी लिहिलं " जरा धोंडे, झाडं यांचे आकार आणि जागा तरी बदला हो, मुळीकांच्या पुस्तकांत अमुक पानावर हे चित्र आहे." गाशा गुंडाळला. माबोवर मात्र धोधो पाऊस पडत होता छानछानचा. त्यातच धन्य.
1 Jul 2020 - 7:36 pm | भीमराव
1 Jul 2020 - 7:36 pm | भीमराव
कॉलेजात असताना नियतकालिकाच्या एका विभागाचा संपादक म्हणून काम केलेलं. मिसळपाववर सुद्धा वाचक मात्र होतो, ढापलेलं शोधायची आयडिया इथंच समजलेली मला. मग काय, कविता, लेख काही येऊदेत पहिल्यांदा गुगल करून बघायचो, ढापलंय का स्वत:च आहे. माघारी देताना मुळ लेखकाचं नाव/पेज अथवा साईट चं नाव टाकून द्यायचो
1 Jul 2020 - 9:00 pm | गामा पैलवान
अवांतर :
कूनागा,
टेलिकॉम क्रांतीत सॅम पित्रोदांचे नक्की योगदान काय हे कोणी सांगू शकेल का, असा प्रश्न गिरीश खऱ्यांनी विचारला आहे.
टेलिकॉमच्या तथाकथित क्रांतीवर इथे लेखाखाली गिरीश खरे यांचे दोन प्रतिसाद आहेत : https://www.aksharnama.com/client/article_detail/4272
आ.न.,
-गा.पै.
1 Jul 2020 - 9:06 pm | कुमार१
एक विनंती:
हा लघुलेख साहित्यक्षेत्रातील आणि वृत्तमाध्यमांतील अशा काही अनुभवांचा आहे त्यातील चुकांबद्दलचे तुमचे अनुभव यावेत.
हे सर्वांनी ध्यानात घेऊन त्यातील आपले अनुभव लिहावेत. अवांतर टाळावे ही वि.
2 Jul 2020 - 12:24 am | गामा पैलवान
कुमारेक,
अवान्तराबद्दल क्षमस्व. अवांतर प्रतिसाद उडवायची विनंती सरपंचांना केली आहे.
आ.न.,
-गा.पै.
1 Jul 2020 - 9:50 pm | चामुंडराय
कुमार१ सर, हे थोडंसं अवांतर होते आहे त्या बद्दल क्षमस्व परंतु -
"लष्कर" च का?
आणि
"भाकऱ्या" च का?
माहिती नाही म्हणून विचारले.
2 Jul 2020 - 8:03 am | शाम भागवत
लष्कर-लष्करच्या-भाकरी-भाजणें<\a>
2 Jul 2020 - 6:38 am | कुमार१
हा प्रश्न मलाही लेख लिहिण्याआधी पडला होता.
मी जालावर ४ संदर्भ पाहून "लष्कराच्या" याची खात्री केली.
बहुसंख्य म्हणी ग्रामीण उगमाच्या असल्याने भाकरी चे अनेकवचन भाकऱ्या होत असावे .
2 Jul 2020 - 8:06 am | कुमार१
चामुंडराय,
तुम्ही बहुतेक ही म्हण कशी आली असावी, असे तर विचारले नाही ना? तसे असल्यास हे स्पष्टीकरण:
पूर्वी ज्या गावी लष्कराचा तळ असे त्या गावच्या लोकांना शिपायांची, भाकऱ्या भाजणे यासारखी कामे करावयास लावीत. >>>>
म्हणजेच आपला ज्याच्याशी अर्थाअर्थी संबंध नाही अशी कामे करणे
संदर्भ:
https://www.transliteral.org/dictionary/%e0%a4%b2%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a...
2 Jul 2020 - 1:04 pm | ज्ञानोबाचे पैजार
अशी ती म्हण आहे
पैजारबुवा,
2 Jul 2020 - 3:43 pm | मराठी कथालेखक
पण स्पेलिंगनुसार (Corona) कोरोनाच योग्य वाटते.
2 Jul 2020 - 3:54 pm | कुमार१
लेखातील माझे वाक्य बघा :
मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( kuh-roh-nuh) हाच आहे.
(https://www.dictionary.com/browse/corona?s=t)
2 Jul 2020 - 5:01 pm | मराठी कथालेखक
हो. पण शब्दकोषही अनेक असतात. आणि इंग्लिशच्या बाबतीत तीच गंमत आहे की एकच एक उच्चार आदर्श मानला तरी इतर सगळे चूक असं काही नसतं.
उदा: vitamin ला सहसा अनेक लोक व्हिटॅमिन म्हणतात पण काही कॉन्व्हेंटमधून शिकलेले व्हायटॅमिन म्हणतात. आता काय बरोबर आणि काय चूक ?
अजून एक उदाहरण : मी संगीतातल्या Bass ला (Bass treble) नेहमीच बास म्हणत आलो, पण जिथे म्युजिक सिस्टीम्स विकल्या जातात त्या शोरुम मधले विक्रेते"बेस" म्हणतात म्हणजे कदाचित त्यांना तसेच ट्रेनिंग दिले गेले असावे.मला वाटू लागले की मीच चूकतोय की काय पण मध्यंतरी एका कॉन्व्हेंटमधून शिकलेल्या मित्राकडूनही "बास" असेच ऐकले .. मग बरे वाटले ..काही उच्चार काळानुरुपही बदलतात की काय कुणास ठावूक.
असो.
तसेच तुम्ही जे ‘करोना’ ( kuh-roh-nuh) म्हणताय तो इंग्लिश शब्दकोषातला उच्चार झाला (त्यात पण त्या ३ h चे काय करायचे ?) मराठी शब्दकोषातला नव्हे. जरी एखादा शब्द इंग्लिश असला तरी त्या शब्दाचा इंग्लिश भाषेतला उच्चार आणि मराठी भाषेतला उच्चार वेगळा असू शकतो. उदा. मराठीत जपान असा उच्चार आहे पण इंग्लिशमध्ये जापान. त्यामुळे इंग्लिश शब्दकोषाला प्रमाण बनवून मराठीतला उच्चार चूक वा बरोबर ठरवणे तितकेसे योग्य होणार नाही असे मला वाटते.
2 Jul 2020 - 6:15 pm | कुमार१
म क,
तुमचे विश्लेषण आवडले. पण
हा मुद्दा नाही पटला.
याच धर्तीवर असे म्हणतो. जर एखाद्या मराठी शब्दाचा उच्चार पाश्चिमात्य किंवा पौर्वात्य माणसाने मराठी शिकताना करायचे ठरविल्यास त्यासाठी मराठी शब्दकोश प्रमाण मानावा की नाही?
असो. या मुद्द्यावर मी थांबतो.
… माध्यमांतील मोठ्या चुकांवर लक्ष केंद्रित करूयात. अन्यथा छोटा मुद्दाच फार रेटला जातो.
तुमच्या मताबद्दल आदर आहेच. :))
2 Jul 2020 - 6:45 pm | मराठी कथालेखक
यातलं मराठी शिकताना हे महत्वाचं. मराठी शिकणे बोलणे हे वेगळं आणि मराठीतील शब्द इंग्लिश संभाषणात वापरणे हे वेगळं.
इंग्लिश माणूस मराठी शिकत/बोलत असेल तर त्याने "बाळासाहेब" असंच म्हणायला हवं. पण इंग्लिशमध्ये तो "बालासाहेब" असं म्हणेल. (हेच मी जपान आणि जापान या उदाहरणाने दाखवलं होतं)
कोरोना वा करोना शब्द मराठी शब्दकोषात कसा लिहिला गेलाय हे महत्वाचं.
बघा पटतंय का ?
अहो असं का ? आपण रेटत नाही आहोत, विश्लेषण होतंय, उहापोह होतोय.. मला वाटतं मुद्दा छोटा असला तरी आपली चर्चा सकारात्मक पद्धतीने होतेय. आपण गुद्द्यावर आलो नाही ना :)
2 Jul 2020 - 7:12 pm | कुमार१
म क
१.अगदी नक्कीच. त्याबद्दल प्रश्नच नाही. फक्त लेखाचा मुख्य उद्देश ‘घोड्चुकांबाबत माध्यमांची बेफिकिरी’ हा आहे. करोना हे तळातील उदा. सामान्य आहे.
२. दुसरा मुद्दा. तुम्ही जसे छान विश्लेषण केलेत,तसेच जरा का संबंधित वृत्तपत्राच्या अधिकाऱ्याने मला पत्रोत्तर देऊन ‘ते आमचे भाषिक स्वातंत्र्य आहे”, एवढे जरी म्हटले असते तर मी हा मुद्दा इथे लिहीलाही नसता.
३. सामान्य वाचकाची संपादकांकडून दखल न घेणे, या मुद्द्यावर अधिक चर्चा व्हावी , हा लेखाचा उद्देश आहे.
.......
२०-२१ मे च्या सुमारास याच ‘दर्जेदार’ इ-दैनिकाने डॉ हर्षवर्धनना केंद्रीय गृहमंत्री करून टाकले होते ! ( मी वाखुसा चा आळस केलाय, आता ते मिळत नाही).
अशा चुकांवर अधिक चर्चा व्हावी.
2 Jul 2020 - 9:49 pm | प्रकाश घाटपांडे
मराठी कथालेखक मुद्दा पटला.
2 Jul 2020 - 11:40 pm | मराठी कथालेखक
धन्यवाद सर
24 Mar 2022 - 4:42 pm | पी महेश००७
इंग्रजी शब्दांच्या उच्चाराचा घोळ अनेकदा येतो. आता Kieren हा शब्द ‘किरेन’ असा उच्चारायचा की ‘कायरेन’ असा उच्चारायचा? विंडीजचा क्रिकेटपटू पोलार्डचंच उदाहरण घ्या.. kieron हा शब्द काही ठिकाणी ‘कायरन’ असा आहे. मग तो किरन असाही होऊ शकतो आणि किरोन असाही...
उच्चाराचंच काय घेऊन बसलात... उकार, वेलांट्यांबाबतही बरेच घोळ आहेत. डबल ओ (oo) असेल तर पहिली उकार द्यायची की दुसरी.. डबल ई (ee) असेल तर दुसरी वेलांटी द्यायची.. मग ‘ie’ एकामागोमाग आले तर कोणती वेलांटी द्यायची?
2 Jul 2020 - 3:57 pm | कुमार१
लोकसत्ता, म टा , अक्षरनामा (सर्व इ-अंक) पहिल्या दिवसापासून ‘करोना’ असेच छापत आहेत.
2 Jul 2020 - 4:25 pm | कुमार१
इंग्लिश मध्ये स्पेलिंगनुसार उच्चार बरेचदा नसतात याबद्दल बर्नार्ड Shaw यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी यासंदर्भात केलेला एक विनोद जगप्रसिद्ध आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी लिहितो :
ghoti याचा उच्चार त्यांनी ‘फिश’ असा केला !
कारण........
• gh = फ ( as in enough )
• o = इ ( …. Women)
• ti = श ( .... nation ).
3 Jul 2020 - 10:20 am | कुमार१
चांगल्या चर्चेबद्दल आपणा सर्वांचे आभार.
वृत्तपत्र छापतानाची एक घोडचूक आणि त्यामुळे संबंधिताची गेलेली नोकरी, यासंबंधी एक रोचक किस्सा पुढच्या प्रतिसादात लिहितो.
ह मो मराठे यांनी तो त्यांच्या स्वतःबद्दलच त्यांच्या पुस्तकात लिहिलेला आहे. आता माझ्याजवळ ते पुस्तक नसल्याने त्या घटनेतील राजकीय व्यक्तीचे नाव मात्र लिहीत नाही.
3 Jul 2020 - 10:23 am | कुमार१
सुमारे तीस ते पस्तीस वर्षांपूर्वीचा काळ. तेव्हा हमो सकाळी एक नोकरी, संध्याकाळी अभ्यासक्रम आणि आर्थिक गरज म्हणून रात्रपाळीची एक अर्धवेळ नोकरी एका दैनिकात करत होते. रात्रीची नोकरी अकरा वाजता सुरू होई. एके दिवशी ते खूप त्रासलेले आणि दमलेले होते. तरीही रात्रपाळीस गेले होते.
त्यादिवशी एक महत्वाची बातमी कार्यालयात येऊन धडकली होती. ती एका राष्ट्रीय पक्षाच्या सर्वोच्च नेत्याबद्दल होती. त्यांना पेप्टिक अल्सरचा बराच मोठा त्रास झाला होता. त्यामुळे रुग्णालयात ठेवले होते. हमोना बातमीचा मथळा लिहायचा होता :
“ अमुक-तमुक यांना अल्सरचा आजार”.
तेव्हा हमो बरेच पेंगुळलेले होते आणि ते तपशीलात असे लिहून गेले :
“***** यांना कॅन्सरचा आजार” !
मुद्रितशोधन न करता हमो घरी निघून गेले.
आता लक्षात घ्या. त्याकाळी कर्करोगाचे उपचार आजच्या इतके प्रभावी नव्हते. त्यामुळे एकदा कर्करोग झाला की ‘आता आज ना उद्या सगळे संपले’, हीच जनभावना होती.
झाले, सकाळी ही बातमी छापून अंक वितरित झाले. दुसऱ्या दिवशीच त्या संपादकाचे धाबे दणाणले. संबंधित पक्षाकडून असंख्य फोन त्यांना येत राहिले त्यांनी कपाळावर हात मारला आणि हमोना बोलावणे धाडले. हमो तिथे गेल्यावर त्यांनी छापलेला अंक त्यांच्या समोर धरला आणि सांगितले की आता याचे प्रायश्चित्त तुम्हीच घ्यावे.
क्षणाचाही विलंब न लावता हमोनी त्या नोकरीचा राजीनामा दिला होता.
3 Jul 2020 - 11:12 am | शाम भागवत
बापरे.
हमोंची नोकरी गेली व त्या राजकारण्याचे आयुष्य वाढले की काय?
;)
3 Jul 2020 - 11:52 am | अभ्या..
पण एकाच्या चुकीच्या मृत्यू लेखाने नोबेलसारखे अवार्ड ही सुरू झाले.
3 Jul 2020 - 9:19 pm | चौकटराजा
हमो माझे आवडते लेखक ! अगदी रत्नाकर मतकरी व अरूण साधू यान्च्या प्रमाणेच !
3 Jul 2020 - 11:19 am | कुमार१
आयुष्य तर वाढलेच.....
आणि कालांतराने ते देशाचे सर्वोच्च नेता झाले !!
;)
3 Jul 2020 - 11:33 am | mrcoolguynice
ह.मो. मराठेंची ’काळेशार पाणी’ ही कादंबरी आधी ‘साधना’त प्रकाशित झाली होती. नंतर ती पुस्तकरूपात प्रकाशित झाली. ’काळेशार पाणी’मधले काही प्रसंग वासना चाळवणारे, अश्लील आहेत, असा आरोप व्हायला लागला. प्रसिद्ध साहित्यिक ना. सी. फडके यांनी या कादंबरीला ओंगळ, अलिच्छ आणि अश्लील ठरवून आगपाखड करायला सुरुवात केली. हा सगळा वाद सुरु असताना वाचकांतही 2 गट पडले. तरुणांचा गट हमोंच्या बाजूने आणि म्हाताऱ्यांचा विरुद्ध बाजूने.
पुढे हे प्रकरण कोर्टात गेलं. साधनाचे विश्वस्त एस. एम. जोशी यांनी 1973 च्या सुमारास कादंबरीच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटला लढवू, असे जाहीर केले. पुढे महाराष्ट्रात ’पुलोद’ सरकार आले आणि त्यांनी ’काळेशार पाणी’वरचा खटला मागे घेतला.
4 Jul 2020 - 9:27 am | कुमार१
विषयाच्या अनुषंगाने ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्रातील एका सदराबद्दल लिहीतो.
काही वर्षांपूर्वी मी ते त्यांच्या छापील अंकात पाहिले होते. रोजचा अंक वाचल्यानंतर जर वाचकांना त्यातील चुका - म्हणजे स्पेलिंग, तपशील, व्याकरण किंवा वाक्यरचना- याबद्दल काही सुधारणा सुचवाव्या वाटत असतील, तर त्यासाठी मुभा होती. त्यांच्या रोजच्या अंकात असे एक सदर होते. त्यात सुरुवातीस असे वाक्य होते “ जास्तीत जास्त निर्दोष अंक देण्याचा आम्ही प्रयत्न करतोच. पण शेवटी चुका कोणाच्याही हातून होऊ शकतात. वाचकांनी अशा सर्व चुका रोजच्या रोज आम्हाला कळवत जाव्यात.”
त्या सदरात चूक आणि सुधारणा असे दोन्ही छापले जाई.
गेल्या तीन वर्षात मी द हिंदू पाहिलेला नाही त्यामुळे सध्याची कल्पना नाही.
4 Jul 2020 - 10:06 am | मराठी_माणूस
ह्याच धर्तीवर मुंबई मिरर मधे एक सदर दर गुरुवारच्या अंकात प्रसिध्द होते , सदराचे नाव "Have a bone to pick with us?"
4 Jul 2020 - 10:23 am | १.५ शहाणा
आपले हे म्हणणे १०० % पटले
4 Jul 2020 - 11:08 am | कुमार१
सर्वांना धन्यवाद.
चर्चा रंगली आहे तर आता वैद्यकीय पाठ्यपुस्तकांतील चुकांवर काही लिहितो.
सुमारे चाळीस वर्षांपूर्वी अभ्यासक्रमात बरीच पुस्तके ही ब्रिटिश असायची. त्यामध्ये स्पेलिंगची चूक तर जवळजवळ कधीच नाही आणि तपशिलाची चूक अभावानेच असायची. गेल्या वीस वर्षात या क्षेत्रावर अमेरिकी पगडा बसला. आता जास्त पुस्तके अमेरिकेतून येऊ लागली. स्पर्धा आणि हट्ट यांपोटी काही पुस्तकांच्या आवृत्त्या अतिवेगाने निघू लागल्या. यामुळेच हळूहळू मुद्रितशोधन ढासळले.
आता स्पेलिंगच्या आणि तपशिलाच्या चुका देखील अधूनमधून दिसू लागल्या. अशाच माझ्या एका पुस्तकात एक घोडचूक सलग तीन आवृत्यापर्यंत चालू होती. त्यामुळे मी अस्वस्थ होऊन तिचा कसा पाठपुरावा केला याचा किस्सा पुढील प्रतिसादात लिहितो……..
4 Jul 2020 - 11:26 am | कुमार१
पुस्तकातील विषय होता: पायाच्या अंगठ्याचा एक आजार. त्याचे वर्णन सुरू झाले. पुढे दोन परिच्छेद झाल्यावर एकदम मजकुरात ‘ हाताच्या अंगठ्याचा सांधा’ अशी ओळ आली. लगेच पुढे पायाचे वर्णन चालू.
आता ही चूक पाठ्यपुस्तकात अक्षम्य आहे. म्हटलं, मुद्रणदोष आहे, सोडून द्या. दोन वर्षांनी पुढची आवृत्ती आली आणि ते पान उघडून बघितले. चूक जशीच्या तशीच. मग प्रकाशकाच्या संस्थळावर गेलो आणि तिथल्या संपर्कातून ईमेल पाठवली. महिनाभर वाट पाहिली. काही उत्तर नाही. पुन्हा स्मरणपत्र. प्रतिसाद नाहीच.
या पुस्तकातील धडे वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेले होते. संबंधित धडा अमेरिकी लोकांनी. अन्य काही धडे आपल्या चेन्नईच्या एका लेखिकेने लिहीले होते. मग त्या बाईंच्या
संस्थेच्या संस्थळावर गेलो. इथे त्यांचा वैयक्तिक ईमेल मिळाला. त्यांना विचारले की तुम्ही ती चूक दुरुस्त करण्यासंबंधी काही मदत कराल काय? त्यांचे उत्तर आले, “होय, मी जरी त्या धड्याची लेखिका नसले तरीदेखील मी तुमचा निरोप प्रकाशकांपर्यंत पोचवते”.
……..
आता या पुस्तकाच्या पुढील आवृत्तीची मी वाट पाहत आहे.
4 Jul 2020 - 10:15 pm | अनिंद्य
लष्कराच्या भाकऱ्यांबद्दल तुमचे अभिनंदन डॉक्टर ! पण ते किती मनस्तापाचे काम आहे याची कल्पना आहे.
लेखक- कवी, वार्ताकार, भाषेचे शिक्षक, पत्रकार ई. भाषाजीवींनी तरी निर्दोष लिहावे, तसा किमान प्रयत्न दिसावा ही माझी अपेक्षा असते. But this is wishing too much :-)
द हिंदू ची आठवण विशेष आवडली. Proof reader नकोसा असल्यास / परवडत नसल्यास हे तरी किमान सर्वच छापील माध्यमांना करता येईल.
5 Jul 2020 - 10:40 am | टर्मीनेटर
हि पहा परवाच्या ई-लोकसत्तातली बातमी...
दोन वेळा बरोबर मवाळ शब्द आणि दोनवेळा 'मळाव' शब्द दोन ठिकाणी टंकला आहे.
बाकी वेगळ्या विषयावरचा तुमचा हा लेख आवडला!
8 Jul 2020 - 10:42 am | महासंग्राम
सध्या प्रूफरीडर परवडत नसल्याने बऱ्याच वृत्तपत्रांनी ती जबाबदारी उपसंपादकांवर दिली आहे, पण यांना उपसंपादक न म्हणता उपदव्याप संपादक म्हणावं अशी परिस्थिती आहे, २०१६ साली एक वृत्तपत्रात इंटर्नशिप करत असतांनाचा किस्सा, सगळी वृत्तपत्र सहसा त्यांच्याकडे आणून दिलेली मृत्यूवार्ता आणि फोटो एका छोट्या जागेत छापतात. एके दिवशी उपसंपादकाच्या डुलकीमुळे त्या कॉलम मध्ये मृत्यूची बातमी देतांना चुकून सध्या सत्तेत असलेल्या एका मोठ्या नेत्याचे नाव आणि फोटो दुःखद निधन म्हणून छापून आले होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती बातमी वाचून त्या नेत्याच्या समर्थकांनी वृत्तपत्राच्या कार्यालयात फोन करून मुख्य संपादकांना जेरीस आणलं होतं. दुसऱ्या दिवशी दिलगिरी छापून कसबसं ते प्रकरण मिटवण्यात आलं.
ऑनलाईन एडिशनमध्ये होणाऱ्या चुकांबद्दल मागे एबीपी माझा चे खांडेकर आणि लोकसत्ताचे कुबेर यांना कित्येक वेळा ट्विटर वर टॅग करून चुका दाखवून दिल्या होत्या, पण त्यांना शष्प फरक पडत नाहीत, इतके ते कोडगे झाले आहेत. तेव्हा तो प्रकार सोडून दिलाय सध्या
8 Jul 2020 - 10:56 am | कुमार१
महासंग्राम,
तुम्हीही भाकऱ्या भाजतय त्याबद्दल कौतुक !
अरेरे... काय करणार ?
8 Jul 2020 - 11:07 am | कुमार१
"भाजताय", असे वाचावे.
24 Mar 2022 - 4:48 pm | पी महेश००७
मी अशाच प्रकारची एक चूक एका प्रथितयश दैनिकात वाचली होती. त्या वेळी अण्णा हजारेंची आंदोलनं विशेष चर्चेत होती. त्यामुळे दैनिकांमध्ये समाजसेवक अण्णा हजारे हे नाव सतत वाचायला मिळायचे. एका दैनिकात समाजसेवक हे नाव मसाजसेवक असे छापून आले होते. मसाजसेवक अण्णा हजारे हे वाचताना गंमत वाटली.
24 Mar 2022 - 5:22 pm | कुमार१
>>> अ गा गा गा 😀
5 Jul 2020 - 11:20 am | कुमार१
अनिंद्य व टर्मिनेटर,
धन्यवाद. सहमती.
……………………………
ज्यांना निर्दोष लेखन हा महत्त्वाचा विषय वाटतो, त्यांच्यासाठी एक पुस्तक सुचवेन. पुस्तकाचे नाव आहे Write better, Speak better. रीडर्स डायजेस्टचे हे प्रकाशन आहे. बरेच जुने पुस्तक आहे.
जरी ते इंग्लिश असले तरी त्यातील बहुमूल्य सूचना आपल्याला कुठल्याही भाषेसाठी उपयुक्त आहेत. त्यातील एका प्रकरणातील एक वाक्य माझ्या मनावर कायमचे कोरले गेले. लेखकाने असे म्हटले आहे, “तुम्ही एक कोरा कागद घ्या आणि त्याच्यावर पानभर मजकूर स्वतःच्या मनाने लिहा. नंतर शब्दकोश बघून तो मजकूर तपासायला घ्या. जर का त्या संपूर्ण मजकूरात तुम्ही एकही स्पेलिंगची चूक केलेली नसेल, तर तुम्ही स्वतःच स्वतःचे अभिनंदन करण्यास पात्र आहात !”
( स्पेलचेक वगैरे सेवा नसलेल्या काळातील हे वाक्य आहे. सध्या मजकूर वा तपशीलातच होणाऱ्या चुकांना संगणक तरी काय करणार? लेखकच जबाबदार असतो).
10 Jul 2020 - 12:05 pm | मदनबाण
भाकर्या भाजताय ते योग्यच आहे. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oh China | Oh Corona | :- The Truthist
12 Jul 2020 - 4:29 pm | कुमार१
या चर्चेत भाग घेतलेले आपण सर्व जण निर्दोष लेखनाबाबत जागरूक आहोत. यासाठी आपण व्यक्तिगत पातळीवर प्रयत्नही करतोय.
या संदर्भात समूह पातळीवर काही उपक्रम माझ्या पाहण्यात आले होते. त्याच्या काही आठवणी लिहीतो. तुम्हीही लिहा. शालेय शिक्षकांच्या मार्गदर्शक आठवणी देखील लिहीता येतील.
.....
‘अंतर्नाद’ मासिकात कित्येक सलग अंकांमध्ये महाराष्ट्र शासनाची शुद्धलेखनाची मूलभूत नियमावली छापलेली असायची. संपादक सर्व लेखकांना आवाहन करीत, की या मासिकाकडे लेखन पाठवताना त्या नियमावलीनुसार लिहीत चला. लेखन करताना जेव्हा आकडे लिहायचे असतात तेव्हा ते अंकात / अक्षरात कधी लिहायचे याचेही बारकावे त्यात असत.
माझ्यासह अनेक लेखकांना त्याचा चांगला उपयोग झाला.
13 Jul 2020 - 6:14 pm | कुमार१
दुकानांच्या पाट्यांवरील लेखनात बऱ्यापैकी चुका आढळतात. त्या सुधारण्यासाठी बऱ्याच वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाच्या वृत्तविद्या विभागाने एक सुरेख उपक्रम राबवला होता. तो म्हणजे रंगाऱ्यांसाठी कार्यशाळा.
बहुतेक दुकानदार हे त्यांच्या दुकानाच्या पाटीवरील लेखन शुद्धतेबाबत जागरूक नसतात. एका गावातील पाट्या रंगवण्याची कामे करणारे रंगारी साधारण ठरलेले असतात. हा मुद्दा ध्यानात घेऊन सदर कार्यशाळा आयोजली होती.
अशा प्रकारे रंगारी प्रशिक्षित झाले, तर पाट्यांवर लेखनही निर्दोष होईल अशी यामागे धारणा होती.
28 Jul 2020 - 4:12 pm | कुमार१
रोचक बातमी !
स्पेलिंग चुकलं अन् चार वर्षाची तुरुंगवारी निश्चित झाली...
https://www.loksatta.com/trending-news/man-gets-caught-because-of-spelli...
28 Jul 2020 - 4:14 pm | कुमार१
https://www.loksatta.com/trending-news/man-gets-caught-because-of-spelli...
17 Aug 2020 - 4:22 pm | कुमार१
आता ३.३१ दुपारी ही बातमी :
निशिकांत कामत यांच्या निधनाच्या अफवा; रुग्णालयाची माहिती
https://www.loksatta.com/manoranjan-news/critically-acclaimed-director-n...
.................................
पण त्याआधीच मटा मृत्यू जाहीर करून बसले होते. (तसेच काही टीव्ही वाहिन्या, इ.)
हे पाहा एक जागरूक वाचक :
(https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-...)
लेटेस्ट कमेंट
लाज वाटली पाहिजे तुम्हाला मटा.. खोटी बातमी दिली होती.. ती चूक मान्य करून दिलगिरी तरी व्यक्त करा
ujjwal pawaskar
उज्व्वल याना धन्यवाद !
17 Aug 2020 - 4:25 pm | कुमार१
17 Aug 2020 - 4:25 pm | कुमार१
17 Aug 2020 - 4:37 pm | कुमार१
21 Aug 2020 - 12:56 pm | कुमार१
"बातम्यांपासून लांब राहण्याची डझनभर कारणे"...
एक रोचक लेख :
https://www.aksharnama.com/client/article_detail/4518
11 Sep 2020 - 11:19 am | कुमार१
आजची अक्षम्य चूक : त्यावर मी अशी इ मेल केली आहे :
प्रति
संपादक
सकाळ , पुणे
महोदय
आपल्या ११/९/२० च्या अंकात पान ७ वर मोठी चूक झालेली आहे. ( (https://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel.aspx#currPage=7)
)
ती अशी :
बातमी : ‘अतिघाई महागात जाई “
चौकटीतले वाक्य :
Rapid antigen चाचणीत रुग्णाच्या रक्ताच्या नमुन्याचीच चाचणी होते
वरील वाक्यात “रक्ताच्या नमुन्याचीच” हे अत्यंत चुकीचे आहे.
या चाचणीत नाकातील swab चा नमुना घेतात.
लोभ असावा
30 Sep 2020 - 9:48 am | कुमार१
मराठीतील ‘ळ’ आता हिंदीतही वापरायचा : केंद्र सरकारचा आदेश.
https://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel.aspx#currPage=3
प्रकाश निर्मळ यांच्या प्रयत्नांना यश.
1 Oct 2020 - 12:25 pm | निनाद
ळ संस्कृत उद्भव आहे इतकेच नोंदवतो.
ऋग्वेदाची सुरुवात - अग्निमिळे पुरोहितं...
1 Oct 2020 - 12:39 pm | कुमार१
धन्यवाद !
16 Oct 2020 - 11:09 am | कुमार१
एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यातील स्वाभाविक घटनेचा विनाकारण बागुलबुवा करून अतिरंजित बातम्या दिल्या जातात. त्यांचा सुरेख समाचार घेणारे हे विश्लेषण.
16 Oct 2020 - 7:24 pm | सुबोध खरे
गिरीश कुबेर हे लोकसत्तेला गाळात नेऊन टाकणार हे मात्र खरं
21 Oct 2020 - 5:52 am | निनाद
मला वाटले आधीच टाकला!
😜
20 Oct 2020 - 3:38 pm | कुमार१
सध्या समाजात वावरताना आपण जे ‘शारीरिक अंतर’ पाळत आहोत त्यासाठी एकच मराठी शब्दाचा शोध वृत्तमाध्यमांतून कसा उत्क्रांत होत गेलाय ते पाहणे रोचक आहे.
सामाजिक अंतर >>> शारीरिक अंतर >> अंतरसोवळे (हा अपेक्षेप्रमाणेच वादग्रस्त !) .....
परवा ‘सकाळ’मध्ये ‘अंतरभान’ वाचला आणि तृप्त झालो. सुंदर !
याहून वेगळा वाचला असल्यास लिहा.
30 Dec 2020 - 4:03 pm | कुमार१
कसे फसवे शीर्षक देतात बघा:
जानेवारीत 14 दिवस राहणार बँका बंद; व्यवहार करण्याआधी जाणून घ्या कधी आहेत सुट्या
https://www-esakal-com.cdn.ampproject.org/v/s/www.esakal.com/arthavishwa...
या १४ (२शनि व सर्व रवि वार धरून) मध्ये संपूर्ण देशाला फक्त ७ लागू आहेत!
बाकी स्थानिक शहरानुसार वेगवेगळ्या.
16 Jan 2021 - 8:39 am | कुमार१
काही चांगल्याची दखल घेतो.
कोविडचर्चे दरम्यान अनेकदा 'co-morbid' हा शब्दप्रयोग यायचा. त्यासाठी सुटसुटीत मराठी शब्दाच्या शोधात होतो.
परवा लोकसत्तात 'अनियंत्रित सहव्याधी' वाचला आणि आवडला.
16 Jan 2021 - 9:35 am | मराठी_माणूस
नुसता सहव्याधी योग्य वाटतो.
16 Jan 2021 - 9:53 am | कुमार१
बरोबर.
जेव्हा सहव्याधी नियंत्रित असते तेव्हा कोविडने गंभीर होण्याचा धोका कमी असतो.
जेव्हा ती अनियंत्रित होते तेव्हा धोका खूप वाढतो .
19 Jan 2021 - 12:15 pm | कुमार१
एक अक्षम्य चूक :
"कमला हॅरिस या नुकत्याच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणजे त्या अमेरिकेच्या ‘सेकंड लेडी’ आहेत."
https://www.loksatta.com/blogs-news/joe-biden-twitter-account-kamala-har...
27 Feb 2021 - 8:55 am | शा वि कु
आज रात्री 9 PMपासून डान्स मचवणार.
25 Mar 2021 - 6:34 pm | कुमार१
असा मथळा देणे खटकले.
‘पुढील दोन आठवड्यात दिवसाला १००० जणांचा मृत्यू होणार’;
'अंदाज' असे म्हणणे योग्य आहे.
26 Mar 2021 - 10:10 am | मराठी_माणूस
बरोबर.
हे जर संख्या शास्त्रावर आधारीत अंदाज असतील तर असे मथळे देणे आणि लोकांच्यात घबराट पसरवणे सर्वथा चुक.
मग जेंव्हा रुग्णसंख्या कमी होत होती तेंव्हा अमुक अमुक दिवसांनी रुग्णसंख्या शुन्य होइल असा का नाही अंदाज वर्तवला .
दुसरे , लोकांनाच सतत दोष का ? पुर्ण टाळेबंदी असतानाही रुग्णसंख्या वाढतच होती ना ? तेंव्हा काय कारणीभुत होते ?
27 Mar 2021 - 11:59 am | कुमार१
"आता अभिनेते आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे खासदार परेश रावल यांना करोनाची लागण झाल्याचं समोरं आलं आहे."
https://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-actor-paresh-rawal-te...
...... विकीवरुन खात्री केली की ते माजी खासदार आहेत.
(त्यांना नंतर मध्येच कधीतरी राज्यसभेवर घेतले की काय, असा वाचणाऱ्याचा गैरसमज होऊ शकतो.)
29 Mar 2021 - 5:31 pm | कुमार१
छान लेख
पुस्तकाच्या मुखपृष्ठापासूनच असंख्य चुका दिसत असताना लेखिकेने पुस्तकविक्रेत्याचा सल्ला मनावर घेऊन सर्व दुरुस्त्या केल्या !
संबंधितांचे अभिनंदन.
29 Mar 2021 - 8:52 pm | तुषार काळभोर
आणि लेख वाचून छान पण वाटलं.
मराठी वृत्तपत्र, मराठी वृत्तवाहिन्या, मराठी जाहिराती, मराठी मालिका अन् मराठी सिनेमा मधील बातम्या, लेख, कथा, पटकथा, संवाद, लिहिणाऱ्या सर्व व्यक्तींना असे उपचार करून सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे!
29 Mar 2021 - 9:31 pm | धर्मराजमुटके
मी देखील एकेकाळी मुद्रण व्यवसायाशी संबंधित असताना अगदी गणेश / नवरात्री मंडळांचे अहवाल, पतपेढ्यांचे अहवाल अशा प्रकारचे अंक असले तरी शुद्धलेखनाचा आग्रह ठेवत असे आणि स्वतःच त्यासंबंधी दुरुस्त्या विनामोबदला करत असे. त्यामुळे लेख आवडला आणि मनाला भिडला ! बीएआरसी मधे असलेल्या बंगाली लोकांचा सार्बोजनीन नवरात्रोत्सवाचा अंक हा याला अपवाद. हे लोक्स मुद्रित संशोधनाबाबत फार जागरुक असत आणि त्यांच्या क्वचीतच असलेल्या चुका शोधायला मला फार आवडे.
30 Mar 2021 - 8:05 am | कुमार१
तु. का. +१११
ध मु +११
>>> आवडले ! छान.
28 Apr 2021 - 10:57 am | कुमार१
तपशील व भाषा : सगळाच आनंद !
मुंब्रा कळवा मतदारसंघाचे आमदार आणि गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ...
................
आणि हा एक नवाच शब्द !
"पंकजा मुंडेंचं बीडमधील रेमडेसिव्हिरच्या अवैद्य विक्रीवरून अजित पवारांना पत्र"
हा 'वैद्य ' चा विरूद्धार्थ आहे काय ?
:)))
4 May 2021 - 9:42 am | कुमार१
हल्ली भाषा आपण सोडूनच देतो.
पण निदान समाजशास्त्राची माहिती तरी नीट असावी ना ?
हे पाहा:
बंगाल व गोव्याला विधान परिषद असल्याचा नवा शोध !
आता ममता पुन्हा मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या तरी त्यांना सहा महिन्याच्या आत विधान परिषदेवर निवडून जावं लागणार आहे.
....गोव्यात पार्सेकरांना सहा महिन्यांच्या आत डच्चू
त्यानंतर सहा महिन्यांमध्ये भाजपाने पार्सेकरांना विधान परिषदेवर न पाठवता
https://www.loksatta.com/explained-news/west-bengal-election-2021-mamata...
आणि हे त्याहून भारी :
ढाका- पश्चिम बंगालचे परराष्ट्रमंत्री एके अब्दुल मोमिन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.
https://www.esakal.com/global/bangladesh-minister-abdul-momin-criticize-...
4 May 2021 - 9:48 am | प्रचेतस
पूर्वी एक अमृत नावाचे एक प्रसिद्ध मासिक की पाक्षिक होते, त्यात उपसंपादकांच्या डुलक्या (उसंडु) नावाचे एक लोकप्रिय सदर होते, त्याची आठवण आली.
4 May 2021 - 9:56 am | कुमार१
प्रचेतस,
>> यावर इथे चर्चा झाली होती.
4 May 2021 - 10:01 am | प्रचेतस
धन्यवाद ह्या दुव्याबद्दल.
17 May 2021 - 8:04 am | कुमार१
एखाद्या इंग्लिश शब्दाचा नीट उच्चार करता येणार नसेल तर तो चुकीच्या मराठीत लिहिण्याऐवजी सरळ इंग्लिशमध्ये लिहिलेला परवडतो.
ही एक घोडचूक बघा :
राजीव सातव यांना संसर्ग झालेला सायटोमॅजिलो विषाणू
https://www.loksatta.com/maharashtra-news/mp-rajeev-satav-death-after-cy...
विषाणूच्या मूळ नावात megalo (मेगालो) शब्द आहे आणि त्याचा अर्थ ‘मोठा’ असा आहे. आता याचे 'मॅजिलो' असले विचित्र अर्थहीन मराठी रूप छापण्यात काय मतलब आहे ?
आजच्या छापील सकाळ मध्येही अगदी हीच चूक केलेली आहे.
अशाने सामान्य माणूस हाच चुकीचा आणि अर्थहीन उच्चार करू लागतो आणि विनाकारण अपभ्रंश रूढ होतात.
17 Jun 2021 - 8:03 am | कुमार१
या धाग्यावर मौलिक सूचना करणाऱ्या सर्वांना आवडेल असा एक लेख आजच्या छापील सकाळमध्ये संपादकीय पानावर आहे.
‘मराठीच्या व्रतस्थ अभ्यासक’ हा यास्मिन शेख यांच्यावरील गौरव लेख आहे.
२१ जूनला त्या वयाची ९६ वर्षे पुरी करणार आहेत. त्यांना आपल्या सर्वांतर्फे ‘शतायुषी व्हा !’ अशा शुभेच्छा देतो आणि वंदन करतो.
या लेखातील एकच वाक्य उद्धृत करतो :
“आजही कुठे मराठीतली चूक दिसली की कुणीतरी अंगावर ओरखडा काढल्यासारखे दुःख त्यांना होते”.
अंतर्नाद मासिकाने त्यांना 23 वर्षे मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून नेमले होते ही विशेष नोंद करतो.
25 Jun 2021 - 1:55 pm | गामा पैलवान
शंभरच कशाला सव्वाशे वर्षं होऊ द्या आयु!
यास्मिन शेख यांना दंडवत.
-गा.पै.
26 Jun 2021 - 7:04 am | तुषार काळभोर
औरंगाबाद मध्ये कॉपी पकडल्याने विद्यार्थ्याने कॉलेजच्या इमारतीच्या क्ष व्या मजल्यावरून उडी मारली.
हा क्ष विविध वृत्तपत्रांत व्हेरीएबल आहे.
लोकमत - पाचवा मजला
लोकसत्ता - तिसरा मजला
महाराष्ट्र टाईम्स - इंटरनेट आवृत्तीत दुसरा मजला (आणि छापील वृत्तपत्रात चौथा मजला!!)
:)
26 Jun 2021 - 2:35 pm | गॉडजिला
इंटरनेट आवृत्ती मोफत असू शकेल पण छापील आवृत्ती आपण विकत घेतो व एक ग्राहक म्हणून वस्तूचा/सेवेचा दर्जा याबाबत आपण ग्राहक न्यायालयात तक्रार नोंदवू शकतो का ?
28 Jun 2021 - 10:22 am | कुमार१
हा मुद्दा रोचक आहे.
मी माझ्या माहितीतील एका माहितगार व्यक्तींना याबद्दल विचारले आहे. ते विचार करून सांगतो म्हणालेत.
कळल्यावर लिहीन
28 Jun 2021 - 3:01 pm | गॉडजिला
वृत्तपत्र ही सेवा असल्याने मला वाटते की ते ग्राहक न्यायालयाच्या कक्षेत यावे... जाणकारांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत
26 Jun 2021 - 9:47 am | कुमार१
खरे आहे.
आधीच दुःखद बातमी आणि त्यात अशा अक्षम्य चुका...
28 Jun 2021 - 6:14 pm | Nitin Palkar
ग्राहक न्यायालयात दाद मागता येते का...या बाबतीत आणखी काही गोष्टींचा खुलासा अपेक्षित आहे. वृत्तपत्राकडून झालेली चूक आहे की हलगर्जीपणा हे पहावे लागेल त्या बरोबरच त्या चुकीमुळे अथवा हलगर्जीपणामुळे कोणाचे/कितीजणांचे काय आणि किती नुकसान झाले या सर्वांवर ग्राहक न्यायालयात दाद मागणे व तिथून न्याय/समाधान/नुकसानभरपाई मिळणे हे अवलंबून असेल.
मराठीतील प्रख्यात वृत्तपत्रातील 'अग्रलेख मागे घेत आहोत' ही घटना बहुतेकांना आठवत असेल. ज्यांचे नुकसान झाले (पक्षी भावना दुखावल्या गेल्या) त्यांचे उपद्रव मूल्य काय आहे या वर बरेचदा या गोष्टी ठरतात.
सध्या प्रादेशिक भाषांमधील वृत्तपत्रांमध्ये काम करणारे बहुतांश पत्रकार आणि तत्सम कर्मचारी बहुधा इंग्रजी माध्यमातून शिकलेले असतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या 'उसंडू' वाचायला मिळतात.
तुमच्या लेखात उल्लेख केलेल्या चुका सामान्य वाचकाच्या दृष्टीने नक्की हानिकारक आहेत. त्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे नक्की तक्रार करता येईल.
28 Jun 2021 - 6:19 pm | कुमार१
माहितीपूर्ण प्रतिसाद !
माझ्या विनंतीवरून आपण वेळ काढून योग्य ती माहिती इथे दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे.
28 Jun 2021 - 7:08 pm | गॉडजिला
इफ अशुद्ध लिखाणाचे ट्रॅक रेकॉर्ड पृव्हन एस्टॅब्लिश बेइंग असेल
2 Jul 2021 - 7:37 pm | Nitin Palkar
_/\_
2 Jul 2021 - 6:24 pm | कुमार१
वृत्तमाध्यमातील बेफिकिरीबद्दल आतापर्यंत बरेच काही लिहून झाले आहे. एकंदरीत जालावरील देवनागरी लिखाणाबाबतच्या बेफिकिरीचे अजून एक उदाहरण देतो.
माझा एक छंद आहे. गाजलेली जुनी हिंदी गाणी मी अशाप्रकारे ऐकतो:
एका विंडोत मी LyricsIndia.net या संस्थळावरून त्याचे हिंदीतील शब्द समोर ठेवतो आणि दुसऱ्या विंडोत पार्श्वभूमीला तेच गाणे युट्युब वरून लावतो. शब्द समोर असल्याने ते गुणगुणायला खूप आनंद वाटतो. देवनागरीतून गाणी लिहिलेली पाहून सुरुवातीला मी या संस्थळावर खूश झालो.
पण अलीकडे दोन गाण्यांबाबत मात्र कटू अनुभव आला. गाण्यातील एखादा शब्द पूर्ण बदलणे, चुकीचा देणे वा शब्दांचा क्रम बदलणे असे काही प्रकार तिथे दिसून आले.
त्याने निश्चितच रसभंग होतो.
9 Jul 2021 - 10:49 am | कुमार१
मध्यंतरी सहयाद्रीच्या बातम्यांत हे ऐकले:
"केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांनी एका परिषदेचे आभासी उदघाटन केले."
'आभासी उदघाटन ' हा प्रयोग कानाला बरोबर वाटत नाही. ते शब्दशः भाषांतर झाले.
त्यापेक्षा आधी असे ऐकले होते:
"….. दूरदृश्यप्रणाली द्वारा उदघाटन केले"
हे अधिक बरे वाटते. छान आहे हा शब्द. गेले वर्षभर हा वापरात आहे.
22 Jul 2021 - 2:53 pm | कुमार१
कुंद्रा प्रकरणात वृत्तवाहिन्यांची भयानक अक्षम्य चूक.
मराठी कलाकार उमेश कामतला झाला प्रचंड मनस्ताप
22 Jul 2021 - 5:28 pm | गुल्लू दादा
कडक कारवाई व्हायला हवी. वृत्तपत्रे सुटलेत कसेपण.
22 Jul 2021 - 2:54 pm | कुमार१
अटक झालेली व्यक्ती उमेश गणपत कामत ही वेगळी आहे.
22 Jul 2021 - 6:53 pm | तुषार काळभोर
करिष्मा कपूरचं लग्न झालं तेव्हा अशीच बौद्धिक दिवाळखोरी झाडून सगळ्या वृत्तवाहिन्यांवर दाखवली होती.
करिष्मा कपूरचं लग्न झालं दिल्ली स्थित उद्योगपती संजय कपूर सोबत.
आणि प्रत्येक हिंदी मराठी वृत्तवाहिनी शक्ती पिक्चरचे सीन दाखवत होती.
करिष्मा कपूर व (माजी पती) संजय कपूर
शक्ती चित्रपट (अनिल कपूरचा भाऊ संजय कपूर)
22 Jul 2021 - 7:37 pm | कुमार१
धन्य आहे !
बेफिकीरी...
23 Jul 2021 - 6:31 pm | कुमार१
धमालच धमाल !!
ही बातमी :
प्रसिद्ध अभिनेत्री सन्नी लिओन हिच्या कारच्या नंबर प्लेटचा वापर दुसराच कोणीतरी करत होता.त्यामुळे वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी सन्नीला वाहतूक पोलीस शाखेकडून वारंवार ई-चलन पाठविण्यात आले.
तर दुसरीकडे सन्नीच्या पत्नीने त्यांच्या गाडीचे कागदपत्रे आणून पोलिसांना दाखवली.
https://www.esakal.com/mumbai/after-twenty-hours-lost-vinayak-found-by-n...
………..
सन्नीचा नवरा कोण म्हणून गुगल केले असता असा प्रश्न दिसतो :
Who is Daniel Weber's husband?
Sunny Leone and Daniel Weber celebrated their 10th wedding anniversary
https://www.google.com/search?sxsrf=ALeKk01IUt3xosRFvxci1JP9k3UDoXbq-g:1...
सन्नीला पत्नी आहे तर Daniel ला नवरा !
13 Aug 2021 - 9:10 pm | कुमार१
ज्याप्रमाणे इंग्रजांनी ‘मुंबई’ शहराचं नाव उच्चारताना बदलून ‘बॉम्बे’ असं केलं होतं,
>>> वास्तविक असं नाहीये. मूळ bom baim हे नाव पोर्तुगीजांनी दिलेले आहे.
ब्रिटिशांनी फक्त त्याचं स्पेलिंग बदलून Bombay हे केले.
30 Aug 2021 - 8:33 pm | कुमार१
कोविड बातमी :
दरम्यान डॉ. पांडा यांनी एक गोष्ट नोंदवली ती म्हणजे दुसऱ्यापेक्षा तिसरी लाट कमी उंचीची असेल
https://www.esakal.com/desh/early-signals-of-3rd-wave-seen-in-some-state...
... वरच्या वाक्यात उंचीपेक्षा तीव्रता शब्द योग्य वाटला असता
11 Sep 2021 - 6:37 pm | शाम भागवत
ते दुसऱ्या व तिसऱ्या लाटेच्या आलेखाबाबत बोलत असतील तर उंची शब्द कदाचीत चूकीचा म्हणता येईलच असे नाही.
6 Sep 2021 - 3:16 pm | कुमार१
हे पहा इथे:
https://www.loksatta.com/blogs-news/money-heist-season-5-review-professo...
फ्लॅशबॅकमध्ये बर्लिनच्या मुलाला दाखवण्यात आले आहे. तो एक आयआयटी एक्स्पर्ट आहे.
आयआयटी >>> आय टी म्हणायचे असावे ना ?
का स्पॅनिश मालिकेत आपल्या आयआयटीतले कोणी घेतलेय !!
11 Sep 2021 - 6:04 pm | कुमार१
(https://www.aksharnama.com/client/article_detail/5453)
लेखनाला जोर येण्यासाठी जर परभाषेतील शब्द वापरायचा असेल तर तो काळजीपूर्वक वापरावा. वरील कंसातील मूळ शब्द फ्रेंच असून त्याचे स्पेलिंग avant-garde आहे.
इंग्लिश मध्ये garde चा अर्थ ‘गार्ड’ असा होतो.
बऱ्याचदा हे नीट समजून न घेतल्याने तिथे लोक grade करून टाकतात !
15 Sep 2021 - 9:55 pm | कुमार१
अन फोटो कुणाचा !
9 Oct 2021 - 12:34 pm | कुमार१
"अर्थात, ‘पॅराडाइज’ ही त्यांची कादंबरी ‘बुकर पुरस्कारा’च्या लघुयादीत आल्यामुळे अधिक लोकांपर्यंत पोहोचली."
https://www.loksatta.com/sampadkiya/vyakhtivedh/profile-abdulrazak-gurna...
लघुयादीत >>> 'शिफारस यादीत' हे चांगले वाटते.
4 Dec 2021 - 9:42 pm | कुमार१
https://www.loksatta.com/mumbai/rajesh-tope-first-reaction-after-first-c...
"आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. “जनतेने घाबरून जाण्याचं शून्य टक्के देखील कारण नाही. कारण दक्षिण अफ्रिकेत मृत्यू दर नाही. तसेच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांचंही प्रमाण नाही,”
….असं असलं तरी घाबरण्याचं शून्य टक्के कारण नाही. कारण दक्षिण अफ्रिकेचा पूर्ण अभ्यास केला तरी तिथंही मृत्यू दर नाही"
,................
…. या सगळ्याकडे आपण शून्य टक्के दुर्लक्ष करावे काय ? :)
जाम सुधरेना भाषा ही.
11 Jan 2022 - 1:49 pm | कुमार१
या माहितीत
दरम्यान लता मंगेशकर यांनी पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके याशिवाय राष्ट्रीय तसंच अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे...
भारतरत्न न लिहिणे हे अक्षम्य आहे.
बाकी "यांनी" बद्दल तर सोडूनच देऊ.
11 Jan 2022 - 1:50 pm | कुमार१
https://www.loksatta.com/mumbai/corona-lata-mangeshkar-admitted-to-breac...
12 Jan 2022 - 2:27 am | राघवेंद्र
तुमचे म्हणणे पटले
27 Jan 2022 - 8:15 am | पुष्कर
त्याच बातमीत असं लिहिलं आहे की 'यश चोप्रा यांचा २००४ मध्ये आलेल्या ‘वीर-झारा’ चित्रपटात त्यांनी शेवटचं गाणं गायलं होतं. ३० मार्च २०२१ ला हा चित्रपट रिलीज झाला होता.' अरेच्चा!!! २००४ की २०२१?
27 Jan 2022 - 1:44 pm | कुमार१
ती बातमी म्हणजे असा प्रकार आहे:
जास्तीत जास्त चुका शोधून काढा आणि बक्षीस मिळवा
:)
1 Mar 2022 - 9:41 am | कुमार१
'शहीद किंवा हुतात्मा शब्दांचा वापर चुकीचा ; वीर जवानांसाठी 'या' शब्दांचा करा वापर'; भारतीय लष्कराची माहिती
नको असलेल्या त्या शब्दांसाठी लष्कराने जे हिंदी व इंग्लिशमध्ये पर्याय सुचवले आहेत ते लांबलचक वाटतात.
सुटसुटीत छोटे मराठी शब्द शोधणे हे आव्हान आहे.
3 Mar 2022 - 1:44 pm | सुशान्त
सैन्याच्या मुख्यालयाने दिलेल्या स्पष्टीकरणाशी बव्हंशी सहमत आहे. Martyrसाठी सावरकरांनी हुतात्मा ही अर्थवाही मराठी संज्ञा सुचवली. पण आता ती कुठेही कशीही वापरण्यात येते; तो भाग वेगळा. प्रसंगानुसार उचित शब्दयोजन ही दुर्मिळ होत चाललेली गोष्ट आहे. इंग्लिश शब्दांची भाषान्तरे करताना प्रसंग दुर्लक्षण्याचे 'प्रसंग' वारंवार येतात.
मराठीत वीरमरण, बलिदान, धारातीर्थी पडणे, कामी येणे, प्राण वेचणे इ. प्रयोग रूढ आहेत. युद्धात कामी येणाऱ्या सैनिकांसाठी ते योजताच येतील.
3 Mar 2022 - 1:56 pm | कुमार१
ते चांगले पर्याय आहेत
धन्यवाद !