हे गगना तू मजला ताऱ्यांचे दान दे
हे गगना तू मजला ताऱ्यांचे दान दे
तुजपर्यंत पोहोचण्यास पुष्पक विमान दे
घेऊन जा उंच नभी, अंबरात राहू दे
गगनातुनी सुंदर वसुंधरा मज पाहू दे
हे धरती तू मजला हरितसृष्टी दान दे
मुक्तपणे विहारण्यास घनदाट रान दे
काम क्रोध मत्सराने व्यापली धरा ऊभी
प्रेम क्षमा शांती फुलवण्या देहात त्राण दे
हे वरुणा तू मजला चैतन्य वरदान दे
झुळझुळ ती ऐकण्यास अंतरी दोन कान दे
जीवन तू सृष्टीचे , फुलवतोस धरा सारी
कोपू नको कधी पुन्हा, संयमाचे वाण घे
हे समीरा तू मजला निर्भयता दान दे
कणाकणात पोहोचण्यास वाहण्याचा मान दे
पोहोचावे सत्वरी उखडून त्या मत्सरा
फुलवुनी चैतन्य जगी , षड्रिपूंचे प्राण घे
हे अग्नी तू मजला , दग्धता प्रदान दे
वैरभाव हवन सारा आहुतीचा मान घे
पंचभूत नमन तुम्हा तुम्हासमोर लहान रे
प्रेमसुख न्हाऊ घाला , मम् पंचेंद्रिये दान घे
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
11 May 2020 - 11:11 pm | गणेशा
हे गगना तू मजला ताऱ्यांचे दान दे
वा भारी झाली आहे कविता, आवडली मनापासून मनापर्यंत
11 May 2020 - 11:16 pm | गणेशा
+1 द्यायचाच राहिला कवितेच्या विचारात
+1
11 May 2020 - 11:16 pm | मन्या ऽ
प्रचंड आवडली!
12 May 2020 - 12:01 am | मोगरा
+1
12 May 2020 - 8:23 pm | मीनल गद्रे.
कविता आवडली.
15 May 2020 - 9:33 pm | साहित्य संपादक
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.![](https://flyclipart.com/thumb2/sunglasses-emoji-clipart-smiley-face-848289.png)
13 May 2020 - 7:58 am | आगाऊ म्हादया......
मुलांना शिकवायला हरकत नाही
15 May 2020 - 9:33 pm | साहित्य संपादक
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल.![](https://flyclipart.com/thumb2/sunglasses-emoji-clipart-smiley-face-848289.png)
17 May 2020 - 1:09 pm | चांदणे संदीप
जरा आटोपशीर हवी होती खरी.
सं - दी - प
14 May 2020 - 7:08 pm | तुषार काळभोर
एकदम १९६० दशकातील कवितांची आठवण करून देणारी
17 May 2020 - 1:09 pm | चांदणे संदीप
कवितेला + १
सं - दी - प
24 May 2020 - 11:11 am | पाषाणभेद
छान , आवडली!
25 May 2020 - 1:11 pm | बिपीन सुरेश सांगळे
मस्त आवडली