कोण आहे तिथे
डोंगर रांगांच्या पल्याड लपले आहे एक गाव
कोण आहे तिथे , विचारु नका तुम्ही राव
गावाकडची वाट कशी किर्र जंगलातुन जाते
वाटेमधे लांडग्यांची फौज तुमची वाट पाहते
गावाकडची वाट कशी उंच टेकड्यांतुन जाते
खोल खोल काळदरी कधी तुमचा घास घेते
गावाकडे जाताना वाटेत आहे एक नदी
मगरी कुठे नाहीत ना , पाहुन घ्या आधी
गावातल्या पडक्या वाड्यात लपला आहे खजिना
पिवळाधमक राखणदार तिथे काढुन बसतो फणा
चेटकिणींचा जाप चालतो रोज रात्री वाड्यात
हडळींनाही कंठ फुटतो भयाण अंधारात
मशाल पेटवुनी भुते नाचती ओसाड वेशीवरती
भान हरपुनी बघत राहती सैतानाच्या करामती
काय म्हणता खोटे सारे , या असती भय कल्पना
चला जाउया आपण सारे , नको फुका वल्गना
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
10 May 2020 - 9:44 pm | प्रचेतस
+१
लैच भारी.
आतापर्यंतची सर्वात जास्त आवडलेली कविता, एकदम हलकीफुलकी. विंदा आठवले.
12 May 2020 - 9:00 pm | कानडाऊ योगेशु
अजुन संस्करण हवे होते. स्पर्धेसाठी पाठवताना धीर धरवला नसावा. पण एकूण कविता आवडणेबल आहे.
11 May 2020 - 1:03 am | कौस्तुभ भोसले
आवडली
11 May 2020 - 10:52 am | चौथा कोनाडा
+१
व्वा, भारी !
11 May 2020 - 12:19 pm | बबु
तुम्बाडची आठवण झाली राव.
11 May 2020 - 3:49 pm | स्वलिखित
+१
11 May 2020 - 5:41 pm | गणेशा
+1
खुप सुंदर वर्णन..
साधे सरळ तरीही मनात भिडणारे गाव आवडले
11 May 2020 - 11:58 pm | जव्हेरगंज
बालकविता जमून गेलीये अगदी!
+१
12 May 2020 - 8:36 pm | बरखा
+१छान जमली आहे कविता.
14 May 2020 - 9:24 am | राघव
रूपक आहेसे वाटले.
बाकी धारपांची आठवण होतेय अगदी!
14 May 2020 - 7:04 pm | तुषार काळभोर
एकदम कडक ...
स्पर्धेतील अतिशय वेगळी कविता.
17 May 2020 - 12:58 pm | चांदणे संदीप
बालकविताही म्हणता येईल अशी.
कवितेला + १
सं - दी - प
24 May 2020 - 12:02 pm | पाषाणभेद
एकदम झकास!
25 May 2020 - 1:10 pm | बिपीन सुरेश सांगळे
अनपेक्षित ! सुंदर रचना
25 May 2020 - 2:36 pm | सिरुसेरि
सर्व वाचकांचे आभार . चतुरस्त्र लेखक / साहित्यकार श्री. माननीय रत्नाकर मतकरी यांना या कवितेच्या रुपात विनम्र आदरांजली .