पथ स्वप्नांचे का
पथ स्वप्नांचे का
असे मध्येच थिजले
दीप त्यावरील का
असे मध्येच विझले
धडाधडा का कोसळले
स्वप्नांचे उत्तुंग मजले
दुःखाचे कढ मनोमनी
आसवांनी डोळे भिजले
तुझ्या पावलांचा आवाज
अन चाहुली कीटक बुजले
पण तू सोडून देता ठाव
अभद्र चाल करण्या धजले
चालत रहा म्हणूनच तू
होईल जागे नशीब लाजले
सार बाजूला महाभयंकर
हे वाईटाचे तण माजले
चांदण नक्षी पदरावर
घेऊनि आकाश सजले
रात्रीच्या अंधारात ह्या
स्वप्न प्रकाशाचे निजले
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
10 May 2020 - 1:32 pm | गणेशा
चांदण नक्षी पदरावर
घेऊनि आकाश सजले
रात्रीच्या अंधारात ह्या
स्वप्न प्रकाशाचे निजले
+१
10 May 2020 - 9:46 pm | प्रचेतस
+१
11 May 2020 - 12:30 am | मन्या ऽ
सुंदर..
11 May 2020 - 11:25 am | कौस्तुभ भोसले
सुरेख रचना
14 May 2020 - 10:21 am | राघव
रचना ठीक.
पण शेवटच्या ओळीसाठी खास +१. :-)
14 May 2020 - 6:26 pm | तुषार काळभोर
कविता आवडली
17 May 2020 - 12:43 pm | चांदणे संदीप
कविता नीटशी कळाली नाही.
पुलेशु!
सं - दी - प
25 May 2020 - 1:28 pm | बिपीन सुरेश सांगळे
प्रतिसादकांचे खूप आभार