आस
अशाच या कातरवेळी
निशब्द असावा
आसमंत सारा
त्यासमयी रवि तु
क्षितिजाच्या कुशीत निजावा
रवि तुज निजवताना
वारा ही गाई झुळझुळ गाणे
ती लुकलुकणारी चकोर ही
बघ तुज कथा सांगे
अशाच एका कातरवेळी
बघ. कोण पणती
त्या तुळशीसमोर लावे
मंद अश्या त्या प्रकाशात
माझा ऊर भरुन वाहे
तेव्हा दुरवर कोठेतरी
मज ऐकु येते ती किणकिणारी घंटा
'आस' लागे मनास कान्हा
तसाच ऐकु येईल का रे मज
एक दिन तुझा मधुर पावा..
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
10 May 2020 - 12:15 am | कौस्तुभ भोसले
छान
10 May 2020 - 1:35 pm | गणेशा
डोळ्यासमोर चित्र उभे राहिले ... मस्त..
+१
10 May 2020 - 5:15 pm | Cuty
+1
10 May 2020 - 7:51 pm | गोंधळी
मस्त.
10 May 2020 - 9:48 pm | प्रचेतस
+१ मस्त
12 May 2020 - 7:10 pm | स्मिताके
+१ सुंदर
17 May 2020 - 12:33 pm | चांदणे संदीप
+१
सं - दी - प
25 May 2020 - 1:09 pm | बिपीन सुरेश सांगळे
मन्या , कविता आवडली.
पुलेशु
25 May 2020 - 8:02 pm | मन्या ऽ
सर्व प्रतिसादकांना मनापासून धन्यवाद! :)
वाचकांचे आभार! :)
28 May 2020 - 6:44 am | मन्या ऽ
कृपया असे वाचावे.
लुकलुकणारी चकोर ऐवजी लुकलुणारी कोर असे वाचावे.