कालाय तस्मै नम:
आपापली कहाणी घेऊन
एकेक पाखरू आले
काडी काडी जमवून
घरटे बांधून काढले....
पाहिली जगली स्वप्ने अनेक
पिल्लांसाठी आयुष्य वाहिले
पंखांमधे बळ आले अन
एकेक पिल्लू भूर उडाले...
काळाची पाने उलटत गेली
संध्या छायेचे मेघ दाटले
क्षितिजापार गेले काही
आठवणींनी डोळे ओले....
नजर क्षीण मनात धडधड
कधी येतील आपली पिल्ले
एकमेकांच्या सोबतीनेच
त्यांनी आनंदकण शोधले....
सोसून उन्हाळे झेलून पाऊस
घरटे घरटे नाजूक झाले
हलू लागलय झाडच आता
हलू लागलीत पाळेमुळे...
लटपटते पाय आणि
पंख आता दमलेले
हिमतीने अन उभारीने
नव्या घरट्याचे धनुष्य पेलले...
आपापली कहाणी घेऊन
पुन्हा एकेक पाखरू आले
कालाय तस्मै नम: म्हणून
नवे घरटे बांधू लागले....
जुनी घरे वा गृहरचना संस्था पाडून पुनर्बांधणीचे नवे प्रकल्प घेतलेले आपण अनेक ठिकाणी पाहातो. आयुष्याच्या कातरवेळी आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून हे "सीनियर सिटिझन" होकार देतात...त्यांनी बांधलेल्या पहिल्या वहिल्या घरट्याच्या सगळ्या कडू गोड आठवणींना मनाच्या खोल कप्प्यात दडवून टाकून. त्यांच्या डोळ्यांतले अव्यक्त भाव पाहून गलबलून गेलो होतो ... अशाच एक अनुभवात.
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
9 May 2020 - 12:29 am | गणेशा
निशब्द...
खरे भाव जेंव्हा शब्दात, कवितेत उमटतात, तेंव्हा ती फक्त कविता नसते .. तर ती असते आयुष्याचा शिलालेख..
कविता मनापासून आवडली
+1
9 May 2020 - 1:00 am | मन्या ऽ
आवडली!..
9 May 2020 - 7:14 am | प्रचेतस
+१
आवडली
9 May 2020 - 9:41 am | चांदणे संदीप
कविने तसे स्पष्टही केले आहे. पण नेमके शब्द आणि मांडणी नसल्याने नाही आवडली. अजून एखाद्या प्रयत्नात ही कविता वाचण्यालायक होऊ शकते.
सं - दी - प
9 May 2020 - 11:08 am | गोंधळी
छान.
10 May 2020 - 9:55 am | तुषार काळभोर
कविता, भावना आणि कवितेच नाव आवडलं.
10 May 2020 - 12:20 pm | जव्हेरगंज
छान!
+१
10 May 2020 - 5:18 pm | Cuty
+1
14 May 2020 - 10:31 am | राघव
रचना ठीक. पुलेशु.