तू गेलीस तेंव्हा
दिवेलागणीला , सांज घनव्याकुळ कंपित
वितळला मेघ शापित, पापण्यांच्या डोहात ||
रंगगंध विस्कटले, आकाशी निजला सूर्य
कापरे दिव्यात रात, चैत्रस्पर्श सुगंधीत ||
पेटले आकाश सारे, रक्तगंधाचे दिवे
उजळल्या शब्दओळी, ओठांच्या तबकात ||
रात्र उभी पापण्यात, काजळ अंधार मनी
उसवले श्वासधागे, काळजाच्या अंतरात ||
उडाले प्राणपक्षी, सजवाया नभकोंदण
किती स्मरु चंद्रखुणा, स्वर्गज्योत उजळीत ||
मालवून स्वप्नदिप, रीती आसवांची झोळी
क्षितिजावर विरल्या हाका, खिन्न गर्भरात ||
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}
प्रतिक्रिया
7 May 2020 - 7:58 am | प्रचेतस
+१
क्या बात है..!
अप्रतिम शब्दयोजना
7 May 2020 - 3:57 pm | जव्हेरगंज
सुंदर!!
+१
7 May 2020 - 9:47 am | मन्या ऽ
अप्रतिम काव्यरचना!
7 May 2020 - 8:54 pm | चिगो
सुंदर, ‘ग्रेस’फुल कविता..
7 May 2020 - 11:10 pm | कानडाऊ योगेशु
"मेघ शापित" आय गॉट इट (डोळे मारणारी स्माईली) ;)
8 May 2020 - 2:12 pm | कौस्तुभ भोसले
अदिम
8 May 2020 - 2:30 pm | संजय क्षीरसागर
कवितेला कोणताही आकृतीबंध नाही, यमक नाही; कल्पनेत सुस्पष्टता नाही. काही तरी भारी शब्द आधेमधे पेरुन शेवटी त येईल असं बघितलंय.
पण जनरेट्यापुढे लोकशाहीचा इलाज नाही !
9 May 2020 - 8:22 am | मोगरा
एक एक शब्द उत्तम.
यावर्षी बाबा गेले त्यामुळे तू गेलास तेंव्हा अशीच वाचली
आसवे थाबंत नाही||
सूर्य निजला म्हणजे आपला बाप जगात नाही ||
त्याचे सारे शब्द/प्रेम आता विस्कटले आहे हे सांगताना
संध्याकाळचे वर्णन अतीव सुंदर|| आठवणींचा स्पर्श चैत्रस्पर्श ?
तू सांगितल्या गोष्टी उजळून लख्ख दिसतात
ते दाखवताना आकाश पेटले आणि चांदण्या म्हणजे रक्तगंध तूच आहे ग्रेस ची आठवण झाली||
रात्र आली || डोळ्यात
सुंदर.
तुझे प्राण गेलेत शोभा आकाशाची वाढली || नभ कोंदण ||
पण तूझे अस्तित्व, तुझ्या खुणा मी शोधते येथे
आता रडून आसवे संपली || मी हाका मारतेय बाबा ||
पण तुझ्या आठवणी रात्री ने गर्भात घेतल्या? खिन्न वाटते आहे ||
माझा आवाज पोहचत नाही मी हताश.. किती हाका मारू?
+1
~~~
प्रिती.
9 May 2020 - 12:41 am | गणेशा
+1
उंबऱ्यावर सांजसमयी
मन माझे रडते आई...
दारातली आर्त रांगोळी
तुझेच गीत गाई..
- गणेशा
9 May 2020 - 8:12 am | मोगरा
डोळ्यात अश्रू आले
9 May 2020 - 9:04 am | चांदणे संदीप
निव्वळ शब्दांचा सोस मूळ आशयाला निष्प्रभ करून सोडतो तसे काहीसे झाले आहे. नाही आवडली.
सं - दी - प
9 May 2020 - 1:10 pm | तुषार काळभोर
कविता आवडली.
"ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता" अन् ' तू गेल्यावर असे हरवले सूर ' यांची आठवण झाली.... उगाच! एक आईसाठी आहे, एक प्रेयसी साठी.
(आठवण व्हायला निमित्त पुरते)
कवितेला यमकाचे बंधन नाहीच.
वृत्ताचे ही नाही.
लयीचेही नाही.
गेयतेचे ही नाही .
त्यात फक्त भावना असावी, प्रवाही.
23 May 2020 - 8:20 am | आगाऊ म्हादया......
+1
23 May 2020 - 11:59 pm | मायमराठी
सुंदर
2 Jun 2020 - 4:37 pm | सत्यजित...
व्याकुळ मनाची सैरभैर,संभ्रमावस्था कवितेच्या भावात,सोबतच कुठेकुठे आकृतीतही उतरती झाल्यासारखे वाटले!