[कविता' २०२०] - करोनाचे गर्वगीत

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
5 May 2020 - 11:01 am

करोनाचे गर्वगीत

ओळखलेस कारे मला तू, आपलं अद्वैत नातं आहे l
विश्वाचा रंगमंच आपलाच, नाटक आपलं रंगत आहे ll
युगायुगांचीं संगत अपुली , विसरलास तू काय गड्या l
सिद्धांत आहे माल्थसचा, विसरलास रे तू गधड्या ll
नवा अवतार मी आहे, मी अवतार विध्वंसाचा l
सत्य सुंदरच आहे, मी अवतार आहे शिवाचा l
चीन माझा भारत माझा , अमेरीकाही माझीच आहे l
हे विश्वची माझे घर, मी विज्ञानेश्वर आहे ll
वसुंधरेच्या आक्रोशाचा शिल्पकार तू रे दगडा l
तू पामर मानवा, शिकविला तुला मी नवा धडा ll
नाती घडवली-बिघडवली, नवे महाभारत रचतो आहे l
लॉक-आऊटच्या कुरुक्षेत्री, मीच तुझा सारथी आहे ll
निरोप घेऊ या रे आता, मीही प्रवासी अनंताचा l
प्रभा चिद्विलासाची फाकली, तुही पुत्र अमृताचा ll

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}

प्रतिक्रिया

मन्या ऽ's picture

5 May 2020 - 3:48 pm | मन्या ऽ

सत्यवचन! :-(

प्रचेतस's picture

5 May 2020 - 5:03 pm | प्रचेतस

+१

शब्दयोजना अतिशय आवडली.

तुषार काळभोर's picture

5 May 2020 - 6:07 pm | तुषार काळभोर

प्रतिभेचा उत्तुंग आविष्कार..

ऊमा बधे's picture

8 May 2020 - 6:57 pm | ऊमा बधे

+१

कवितेचा मला भावलेला सरळ अर्थ :
१. मीही तुझ्याप्रमाणे ईश्वराचा अंश असल्याने आपले अद्वैत नाते आहे प्रत्येकजण आपापली भूमिका करण्यासाठी या विश्वाच्या रंगमंचावर येतो , त्याप्रमाणे मी आलो आहे व माझी भूमिका करत आहे. हे नाटक आता रंगत आहे.
२. माल्थसचा सिद्धांत ( Malthusian Theory of Population ) तू विसरलास काय? लोकसंख्येची प्रमाणाबाहेर झालेली वाढ रोखण्यासाठी निसर्गक्रमाचा भाग म्हणून वेळोवेळी मी आलो आहे.
३. मी नवा अवतार असून विध्वंसाचे काम करत आहे. सृष्टीचा लय करण्याचे काम करणाऱ्या सत्य सुंदर शिवाचा मी अवतार आहे.
४. चीन , भारत, अमेरिका हे सर्व माझेच आहेत कारण हे विश्वच माझे घर आहे. विज्ञानाच्या मदतीने प्रयोगशाळेत विषाणू तयार केला हे निर्देशित करण्यासाठी विज्ञानेश्वर ही संज्ञा वापरली असावी.
५. पाषाणहृदयी माणसा, पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे आक्रोश करणारी पृथ्वी तू त्तयार केली आहेस,म्हणून हे क्षुल्लक मानव प्राण्या, तुला मी नवा धडा शिकविला आहे.
७. नाती घडविण्याचे आणि बिघडविण्याचे काम मी करत आहे. महाभारतात झालेल्या विध्वंसाप्रमाणे मी विध्वंस करत आहे. कुरुक्षेत्रावर संभ्रमित झालेल्या अर्जुनाप्रमाणे तुझी अवस्था झाली आहे. पण माझ्यामुळे लादलेल्या लॉक-आउटमध्ये सारासार विचाराने तू मार्ग काढत आहेस.
८. आता आपण निरोप घेण्याची वेळ आली आहे. तुझ्याप्रमाणे मीही अनंताचा प्रवासी आहे. साऱ्यांना व्यापून उरणारे चैतन्य आणि चैतन्याचा विलास म्हणजेच चिद्विलास तुला जाणवत नाही काय? तूही अमृताचा पुत्र असल्याने माझ्यावर नक्कीच मात करशील.

चांदणे संदीप's picture

9 May 2020 - 8:52 am | चांदणे संदीप

माऊली, आपण उत्तम निरूपण केले. आपलीच तर रचना नव्हे? ;)

सं - दी - प

सचिन's picture

8 May 2020 - 8:22 pm | सचिन

सुरेख कविता !!

चांदणे संदीप's picture

9 May 2020 - 8:55 am | चांदणे संदीप

वर एका माऊलींनी निरूपण केले नसते तर कदाचित मी कविता समजून घेण्याचे कष्ट घेतले नसते.

कवितेला + १

सं - दी - प

सत्यजित...'s picture

2 Jun 2020 - 5:01 pm | सत्यजित...

या संकटाकडेही आध्यात्मदृष्टीने पाहण्याचे आणि त्यातूनही चिद्विलासाप्रत पोहचण्याच्या वैचारीक प्रगल्भतेचे!