उत्कंठा
बोले आता ती एक थेंब नाही, असाही दिवस येतो.
आठवण येतेच मधून आज, शायर दोस्त मैफलांची.
एक एक दिवस मोजले, सोसले सर्व काही आज
बातमी येते उत्साहाची, पण तुजही आठवण येते सांग
वाटते कसे आयुष्य उजाड, ताळेबंदीत गुंतला श्वास.
बदनाम जन मज करी, पचवतो अपमान रांगेत आज.
दोन दीस ग्रीन झोन झाले, दोन दीस स्वप्नता गेले.
खिडकीत याद आली, चांदणी मज खु़णवून गेली..
कसे जगलो दिवस कळले नाही, आनंद थोडे आले.
वाटते आयुष्य सारे, लॉकडाऊन कायम झाले.
पाहता तुज आता, शहारुन मन आज आले.
स्पर्श सुगंध रुप दर्शन, मज मोक्ष मिळवून गेले.
body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 2500px;
}
प्रतिक्रिया
4 May 2020 - 3:25 pm | प्रचेतस
+१
झक्कास
4 May 2020 - 4:12 pm | श्वेता२४
दारु साठी काय पण....
4 May 2020 - 6:27 pm | प्रशांत
रांगेत उभे राहून कविता लिहली असावी.
5 May 2020 - 7:57 am | तुषार काळभोर
कळस!!
शब्दा शब्दातून विरह सांडतोय..
9 May 2020 - 8:30 am | चांदणे संदीप
विषय तर भन्नाट निवडला पण शब्दांची निवड चुकली.
हलकी फुलकी पाहिजे होती कविता. मजा नाही आली.
सं - दी - प
22 May 2020 - 9:40 pm | प्रसाद साळवी
विषय थोडा काळ तरी जीव धरून रहावा कवितेचा.