बातमी
"पेपर कुठे आहे ग? मला सकाळी चहासोबत पेपर लागतो माहिती आहे ना? "
"टेबलवरच आहे. जरा बघत जा आजूबाजूला. "
"सापडला एकदाचा. हे काय पुन्हा एक बलात्काराची बातमी ! "
"अहो ते रोजचेच झाले आहे आता. आम्हा बायकांना बाहेर फिरायचेच अवघड करुन टाकले आहे ह्या नराधमांनी. अगदी काही महिन्याच्या पोरीपासुन ते जख्ख म्हातारीपर्यंत कोणालाही सोडले नाही ह्यांनी.
"अगं पुढे म्हटले आहे की या प्रसंगात खुनापर्यंत गेली आहे त्यांची मजल."
"अहो म्हणूनच हे प्रकरण उघडकीस आले म्हणायचे. नाहीतर अश्या कित्येक केसेस बाहेरच येत नाहीत. "
"हे मात्र खरे की खुन झाला नसता तर ही घटना उघडकीस आलीच नसती "
"का हो ?"
"पिडीत व्यक्ती 'ती' नाही , 'तो' आहे !"
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
25 Apr 2020 - 8:48 pm | चौथा कोनाडा
+१
बाबौ !
विचार करण्याजोगे.
25 Apr 2020 - 9:01 pm | चहाबाज
आवडली.
25 Apr 2020 - 9:14 pm | शब्दानुज
+1
25 Apr 2020 - 10:48 pm | ज्योति अळवणी
हा विचार कोणीच करत नाही
25 Apr 2020 - 11:08 pm | संजय क्षीरसागर
आयपीसीप्रमाणे पुरुष बलात्कार पिडीत असू शकत नाही.
शिवाय त्याचा मर्डर केल्यामुळे घटना उघडकीस आली हे फारच गौडबंगाल आहे
26 Apr 2020 - 6:54 pm | तेजस आठवले
+१
चांगली कथा आहे. एका पुरुषाचा खून झाला असता त्याच्यावर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले - हे असे मृतदेहाच्या शारीरिक तपासणीत आढळले का कसे ?
26 Apr 2020 - 7:24 pm | शेखर
+१
26 Apr 2020 - 7:34 pm | मोहन
+१
26 Apr 2020 - 7:53 pm | प्रमोद देर्देकर
+1
27 Apr 2020 - 11:47 am | मनस्विता
+१
28 Apr 2020 - 10:15 am | टर्मीनेटर
+१