[शशक' २०२०] - माल

चहाबाज's picture
चहाबाज in स्पर्धा
23 Apr 2020 - 7:09 pm

माल

दर रविवार रात्री साडे नऊला गडद काचेची गाडी समोरच्या घरासमोर यायची.
घरातून एक तरुण बाहेर यायचा आणि गाडीचा दरवाजा उघडून कसलेसे पुडके घ्यायचा.

शिंदेबाईंना काही चैन पडेना.
"अहो! बघा जरा. आपलया डोळयांसमोर काय धंदे चाललेत समोरच्या घरात ते.
ड्रगचा माल पुरवतायत आठवड्याचा.
पोलिसात तक्रार करा म्हणते आत्ताच्याआत्ता.”

दुसऱ्या दिवशी सकाळी शिंदेबाईच्या दारावर थाप पडली.
बाहेर समोरचा तरुण होता. हातात रात्रीचे पुडके होते.
"माफ करा हं. मी समोर राहतो भाडेकरू म्हणून. मेडिकल कॉलेजात फायनलला आहे.
माझा फ्रिज पहाटे बिघडला.
एक दिवसापुरते तुमच्या फ्रिजमधे हे पुडके ठेवता आले तर आपले खूप उपकार होतील माझ्यावर.
आई काल रात्री माझं आठवड्याचं जेवण देऊन गेली."

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);

background-size: 1900px;
}

प्रतिक्रिया

स्वलिखित's picture

23 Apr 2020 - 8:44 pm | स्वलिखित

दोन्ही कडुन वाजवलय कथेत

कुमार१'s picture

23 Apr 2020 - 8:49 pm | कुमार१

+१

ज्योति अळवणी's picture

23 Apr 2020 - 10:52 pm | ज्योति अळवणी

मस्त

श्वेता२४'s picture

23 Apr 2020 - 11:46 pm | श्वेता२४

+१

मोहन's picture

24 Apr 2020 - 1:26 pm | मोहन

+१

ऋतु हिरवा's picture

24 Apr 2020 - 2:52 pm | ऋतु हिरवा

चांगली आहे

गडद काचेची गाडी पण जेवण देणार पुडक्या मध्ये ? आणि ते ही आठवड्याचे ..आणि ते पण आई..
का असे काही कळाले नाही ...

चांदणे संदीप's picture

24 Apr 2020 - 4:35 pm | चांदणे संदीप

जाम हसलो या प्रतिसादाला. =))

सं - दी - प

जव्हेरगंज's picture

24 Apr 2020 - 5:31 pm | जव्हेरगंज

मी पण.. &#129315

मनिम्याऊ's picture

25 Apr 2020 - 12:14 pm | मनिम्याऊ

मला पण हिच शंका आली. आई एकतर व्यवस्थित डब्बा देईल आणि अस पटाकन निघून नाही जाणार. नाहितर मुलगा घरी जाईल जेवायला.
पुडके मे कुछ काला है boss

संजय क्षीरसागर's picture

25 Apr 2020 - 12:24 pm | संजय क्षीरसागर

घरची गाडी वगैरे असेल तर इतका उद्योग करण्यापेक्षा सरळ बाईपण ठेवता येईल ...... स्वयंपाकाला.

सुखी's picture

28 Apr 2020 - 11:11 pm | सुखी

Corona ग्रस्तांच्या dekhbhaliwar असेल कदाचित... म्हणून डबा देऊन गेले असतील

तरुणावर विश्वास ठेवलात? का?

पुडक्यात काय होते ते कोणास माहित. "स्वलिखित" ह्यांना कळले.

सुखी's picture

28 Apr 2020 - 11:09 pm | सुखी

.