[शशक' २०२०] - बाबांचं स्वप्न

ऊर्जा's picture
ऊर्जा in स्पर्धा
22 Apr 2020 - 1:24 pm

बाबांचं स्वप्न

आई गं! बाबा कुठे गेलेत?, कधी येणार? यांसारख्या असंख्य प्रश्नांनी मी आईला भांबावून सोडायचो. अखेर पाच वर्षांच्या मुलाला कुठे माहीत होतं की, आता बाबा कधी येणारच नाहीत.
आईबाबांच स्वप्न मला इंजिनिअर करायचं. त्या स्वप्नासाठी आईने माझ्या शिक्षणात कधी कमी होऊ दिली नाही.
शेवटी चांगल्या गुणांनी मी इंजिनिअर झालो. निकाल दाखवण्याच्या घाईने आईला न कळवताच मी घरची वाट पकडली.
घरात प्रवेश करणार तितक्यात काका, काकू आणि नारायण शेठचा आवाज कानी पडला.
"शरदच्या स्वप्नापायी घरदार विकून टाकलंस, घरात खायला नाही आणि म्हणे पोराला इंजिनिअर बनवणार".
मी तितक्यात आईसमोर होतो. माझा निकाल पहिला आणि आईने मला घट्ट मिठी मारली नी ढसाढसा रडू लागली.

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);

background-size: 1900px;
}

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

22 Apr 2020 - 1:31 pm | विजुभाऊ

-१.
यात स्टोरी कुठे आली तेच समजत नाही.

ज्योति अळवणी's picture

22 Apr 2020 - 5:59 pm | ज्योति अळवणी

प्रयत्न आवडला

जव्हेरगंज's picture

22 Apr 2020 - 6:07 pm | जव्हेरगंज

-१
काहीही &#128520

गुल्लू दादा's picture

25 Apr 2020 - 12:05 am | गुल्लू दादा

+1

संजय क्षीरसागर's picture

25 Apr 2020 - 12:53 pm | संजय क्षीरसागर

यापेक्षा बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेतलं असतं तर (बाबांच्या फोटो सकट), असं रस्त्यावर यावं लागलं नसतं !

तेजस आठवले's picture

26 Apr 2020 - 7:19 pm | तेजस आठवले

समजली नाही.

हॅरी पॉटर's picture

27 Apr 2020 - 4:59 pm | हॅरी पॉटर

+१