आकर्षणाचा सिद्धांत
विचारांच्या चिखलात रुतलेला मध्यमवर्गीय माणूस आणि विहिरीतील बेडूक यांची परिस्थिती सारखीच. आपण आपल्या भोवतालच्या काटेरी कुंपणातून निघून खुल्या आसमंतात वावरलं पाहिजे. ज्या परिस्थितीत आपण जन्मलो त्यातच मेलो तर अश्या पापकर्मीयांना नरकात अव्वल स्थान आहे.
आपण जसा विचार करतो तसच जीवन आपल्या पदरी पडते. असा आकर्षणाचा सिद्धांत सांगतो. सकारात्मक विचारसरणीची महेंद्रसिंग धोनी, अब्राहम लिंकन.....अशी मूर्तिमंत उदाहरणे आहेत.
आयुष्यच्या कोणत्याही टप्प्यावर जर काय करावं हे कळत नसेल तर टोकाच्या निर्णयाऐवजी पुन्हा शून्यापासून केलेली सुरुवात ही कधीही योग्यच आहे. एकोणावीशीत जर मला ह्या गोष्टी कळल्या, आपण तर माझ्या पेक्षा मोठे आहात.
अश्याच विचारसरणीतून येत्या दशकात या धर्तीवरचा नामांकित हृदयरोगतज्ञ म्हणून मी नावलौकिकास येईल.....
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
21 Apr 2020 - 3:23 pm | स्वलिखित
+१
21 Apr 2020 - 3:27 pm | स्वलिखित
किंबहुना श श कथा ची थिम अशी पोजीटीव (+) विषयावरती असती तर छान वाटले असते
21 Apr 2020 - 6:05 pm | जव्हेरगंज
+1
मस्त!
22 Apr 2020 - 1:35 pm | विजुभाऊ
-१
कथा काय घडते आहे ते समजले नाही दादा.
25 Apr 2020 - 12:07 pm | चौथा कोनाडा
मला पण नाय कळली.
याच वाक्यात गोम दिसते. आत्महत्या ?
नामांकित हृदयरोगतज्ञ ? हे काय ?
25 Apr 2020 - 12:18 pm | संजय क्षीरसागर
> टोकाच्या निर्णयाऐवजी पुन्हा शून्यापासून केलेली सुरुवात ही कधीही योग्यच.
लेखक रिवर्स घेणारे. १०वीला पुन्हा बसून तो आता मेडिकलला ट्राय करणारे. ही त्याची दशवार्षिक योजना आहे !
25 Apr 2020 - 12:20 pm | चौथा कोनाडा
+१
25 Apr 2020 - 12:25 pm | गुल्लू दादा
लेखक 12 वीत असावा.
25 Apr 2020 - 12:31 pm | संजय क्षीरसागर
म्हणजे २ वर्ष माती खाल्ली असा अर्थ होईल. लेखक एसवाय बीएला असेल आणि आता साईड बदलणारे असं दिसतंय !
25 Apr 2020 - 5:21 pm | चौथा कोनाडा
हृदयरोगतज्ञ म्हणून नावलौकिकास येईल.....
म्हन्जे एकोणावीशीत कुणाला तरी ह्रुदय देऊन प्रेमात फेल झाला की काय ?
22 Apr 2020 - 4:12 pm | चांदणे संदीप
तुम्हांला शुभेच्छा!
सं - दी - प
25 Apr 2020 - 12:06 am | गुल्लू दादा
+1
27 Apr 2020 - 4:59 pm | हॅरी पॉटर
+१