सपन
चंद्या, चल ना बे घराला. काल्याने आवाज दिला. चंद्या काय येत नाय तवर काल्या आन मोगरी रस्त्याच्या कडंला येऊन गोनपाटाचं तोंड बांधायला लागलं.
मायची खोकल्याची बीमारी आन मायचं सपन शिकून सवरुन साब झाला पाहिजेन. सकाळ धरुन चारपाच कचरा कुंड्या हुडकून झाल्या व्हत्या. सोनाराच्या आळीतल्या कचराकुंडीत तारेचं येटूळं, राख, उचकता उचकता सापडलं ते थुक्यानं पुसलं. आन चंद्या चमकला.
नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये म्हणून पोलिस गाडी फ़िरत होती. चंद्या, मोगरी आन काल्या पोलिसायले नजरेत आलं. पोलीस मागं आन चंद्याची टीम पुढं. गल्लीबोळातून पळताना चंद्याचा पाय नडला, पडला. मूठ सैल झाली. पोलिसायनी तींबलं. तवर लांब फ़ुफ़ाट्यात पडलेलं मुठीतलं सपन चंद्याला फ़िदीफ़िदी हसत होतं.
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
21 Apr 2020 - 8:48 am | प्रचेतस
+१
21 Apr 2020 - 10:17 am | मोहन
+१
21 Apr 2020 - 1:39 pm | गवि
÷ १
21 Apr 2020 - 1:43 pm | प्रचेतस
भागिले १ असे लिहिले असल्यास गुण गृहित धरले जातील की नाही?
21 Apr 2020 - 1:48 pm | गवि
गप रे
सारख्या शंका, वशाड मेलो..
21 Apr 2020 - 3:34 pm | प्रशांत
+१
21 Apr 2020 - 4:52 pm | तुषार काळभोर
.
21 Apr 2020 - 5:58 pm | जव्हेरगंज
तारेचं येटूळं,
हेचमुठीतलं सपन
आहे का? कसे?10 Mar 2023 - 10:13 am | उग्रसेन
सोन्याची तार.
26 Apr 2020 - 6:49 pm | ब़जरबट्टू
..
10 Mar 2023 - 10:13 am | उग्रसेन
सगल्या साहेब लोकाचे आभार.
10 Mar 2023 - 10:37 pm | चौथा कोनाडा
सही !
+१