प्रपोज
आज आभाळ भरून आले होते. कोणत्याही क्षणी पाऊस चालू होईल अशी परिस्थिती. अश्या रम्य वातावरणात ती माझ्यासमोर उभी होती.
'आज विचारूनच टाकतो. नाहीतर ही सल आयुष्यभर मनात तशीच राहिलं. इतके दिवस ती माझ्यासोबत आहे ,ती का म्हणून नाही म्हणेल ? '
माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते. अनेक दिवसांपासून मी ज्या क्षणाची मी वाट पहात होतो तो क्षण जवळ आला.
मी तिच्यासमोर गुडघ्यावर बसलो आणि "माझ्याशी लग्न करशील ?" हा प्रश्न तिला विचारला. तिच्या चेह-यावर आश्चर्याचे भाव स्पष्ट दिसत होते. कातर आवाजात ती म्हणाली, "
.
.
"अहो भाजी आणता ना ?"
"हो. आणतो आता" असे म्हणत मी पेन टाकून डायरी बंद केली.गोष्ट अधुरीच राहिली.
कल्पनेतही !
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
20 Apr 2020 - 11:36 am | कोण
+१
20 Apr 2020 - 1:21 pm | मोहन
+१
20 Apr 2020 - 4:55 pm | निओ
+१
20 Apr 2020 - 8:15 pm | शब्दानुज
कोणी समजावून सांगेल काय?
21 Apr 2020 - 11:58 pm | श्वेता२४
+१
22 Apr 2020 - 12:02 am | टीपीके
+१
23 Apr 2020 - 6:13 am | बांवरे
+१
शेवटच्या शब्दाने मजा आणली !
27 Apr 2020 - 1:58 pm | टर्मीनेटर
+१
29 Apr 2020 - 11:44 pm | निशाचर
+१