[शशक' २०२०] - प्रसाद

मायमराठी's picture
मायमराठी in स्पर्धा
15 Apr 2020 - 10:07 am

प्रसाद

आत मूर्तीचं मनासारखं दर्शन आणि बाहेर आपल्या शाबूत चपला, यापेक्षा सच्च्या भक्तांना देवळांत काय हवं असतं? दोन्ही मिळालं होतं. आता भूक आणि ऊन यांच्या निराकरणासाठी समाधानी भक्तगणांचे पाय सरसावले होते.

एक भिकारी त्यांच्या बाजूने चालत होता. मागितलं तर काहीच नव्हतं तरीही हातात फळांची पिशवी असलेल्याला दया आली. काही फळं त्याच्या हातात ठेवली गेली.

गाडीजवळ पोचल्यावर कोणाला तरी तो फळांच्या दुकानात दिसला. पुनर्विक्रीची सोपी अर्थनीती उमगून सगळयांच्या जिभांनी जागीच यथेच्छ गोळीबार झाडला.

हातात ताट घेऊन तो काचेवर टकटक करत होता.
काच किंचित खाली झाल्यावर आमच्या खवचटपणाच्या उद्रेकाला वाव न देताच म्हणाला,

" घाईत जनू? तुमास्नी फोडी करून आनल्यात. घ्या परसाद. संपवा समदं."

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);

background-size: 1900px;
}

प्रतिक्रिया

नावातकायआहे's picture

25 Apr 2020 - 1:15 pm | नावातकायआहे

मला माफ करा माझी चूक झाली असे नमुद करुन, तंबाखुचा (३० रुपये पुडी) गुळणा धरुन गप्प बसतो.

वामन देशमुख's picture

24 Apr 2020 - 2:12 pm | वामन देशमुख

+१

यश राज's picture

24 Apr 2020 - 2:33 pm | यश राज

+१

रीडर's picture

26 Apr 2020 - 3:06 pm | रीडर

+1

मनस्विता's picture

27 Apr 2020 - 11:54 am | मनस्विता

+१

तुर्रमखान's picture

28 Apr 2020 - 7:02 pm | तुर्रमखान

+१

शब्दसखी's picture

29 Apr 2020 - 1:20 pm | शब्दसखी

+१

रुपी's picture

30 Apr 2020 - 6:48 am | रुपी

+१

लोथार मथायस's picture

30 Apr 2020 - 7:26 pm | लोथार मथायस

+१

शब्दसखी's picture

3 May 2020 - 9:32 pm | शब्दसखी

अभिनंदन!!

मायमराठी's picture

5 May 2020 - 8:23 pm | मायमराठी

शब्दसखीजी, अनेकानेक धन्यवाद.

मायमराठी's picture

5 May 2020 - 8:30 pm | मायमराठी

सर्वच वाचकांचे खूप खूप आभार. गुण देणं न देणं यापेक्षा आपली कथा वाचली जाणं; काही क्षण का होईना शब्दांत गुंतून पडणं; मिसळपाव वरून जाताना काहीतरी सोबत घेऊन जायला मिळणं, हे जास्त महत्त्वाचं आहे.