लॉकडाऊन: बाविसावा दिवस

जोजो's picture
जोजो in काथ्याकूट
15 Apr 2020 - 8:04 am
गाभा: 

व्यायामाची नशा : व्यायामाची आवड तशी जुनीच आहे मला...काॅलेजचै दिवसात रोज सकाळी तासभर जीममधे घासल्याशिवाय बरं वाचायचं नाही...लोकांचे नाही माहीत पण अंग मोडून व्यायाम केल्यावर शरीराचा प्रत्येक अंजर पंजर बोलायला लागले मला बरं वाटतं...चांगल्या व्यायामाची पावती आहे ती...स्क्वाट्स मारून झाल्यावर दुसर्या दिवशी दुपारी पाय लटपटलेच पाहीजेत...साधं सोफ्यावर बसायलासुद्धा त्रास झालाच पाहीजे...कुणीससं म्हटले आहे ‘no pain, no gain '
तीच आवड आजदेखील जिवंत आहे ( रामाची क्रूपा ) आणि वाढल्या वयाबरोबर वेगवेगळे व्यायाम करायची हौसदेखील वाढली...व्यायामशाळेत जाऊन वजनं उचलण्यात मजा येईनाशी झाली...मजा म्हणण्यापेक्षा नशा हा योग्य शब्द आहे...मला वेगवेगळे व्यायाम करण्याची नशा आहे ....रनिंग, सायकलिंग, वेट ट्रेनींग हे सगळं मी आनंदाने करतो...ह्या सगळ्या ॲक्टीवीटी करताना मी सगळं काही विसरतो...

‘सायकल सायकल‘ गटात सामिल: त्यातच मला एक अवलियाचे भेटला...बदलापुरला जात होतो सायकलवरून. एकटाच होतो आणि प्रारुप चाललो होतो...एक काका निवांत चालले होते...नमस्कार चमत्कार झाले, बदलापुरला चहाचं दुकान बघून थांबलो आणि मग औपचारिक ओळख झाली...विनायक वैद्य...भटक्या खेडवाला...काही माणसं आपल्याला द्यायलाच आलेली असतात...भोखेकाकांनी मला एक व्यासपीठ दिले ‘सायकल सायकल‘

सगळे एकसे एक अवलीये...सायकीलींचे अतीरथी, महारथी...त्यांच्याकडून खुप प्रोत्सहन मिळाले...मी काही त्यांच्याएवढी सायकल चालवली नाही पण तरी बरीच चालवली...सायकलिंग बरोबर इतर व्यायामदेखील शेअर होऊ लागले...डाएट प्लान येऊ लागले...साधारण नोव्हेंबर १९ ला डाॅकने त्याचे फोटो टाकले...झालं ...लगेच मला कंड आलीच...डाॅकला फोन करून किटोची दिला घेतली...पहिले २० दिवस खुप प्रामाणिकपणे डाएट प्लान फाॅलो केला आणि छान फरक जाणवला...वजन कमी झालं, फॅट परसेंट कमी झालं आणि खिसापण हलका झाला...मग लो कार्बवर शिफ्ट झालो...३ महान्यांमधे १२ किलो वजन आणि ६% बाॅडी फॅट कमी केलं...खरं सांगायचे झालं तर हे फक्त विरून दिसणारे बदल होते...दुपारी झोपावं असं अजुनही वाटत नाही...पोट डब्ब नाही आणि मेंदू एकदम चौकन्ना असतो...ह्याचा फायदा असा कि धावायचा स्पीड वाढला, सायकलींगचा स्पीड वाढला...दिवसभर फ्रेश वाटू लागलं...दुर्दैवाने माझं बाँडच फॅट पर्सेंटचं टार्गेट पुर्ण होण्याच्या आत लाॅकडाऊन झाला...व्यायाम नाही सोडला पण तोंडावरचा ताबी नक्कीच सुटला...

२३ मार्च २०२०२ पासुन वजन ७८.५ वरून ७६.२ ला वळसा घालून ७७.४ ला स्थिरावले आहे...
लॉकडाऊन
ह्या लाॅकडाऊनचे दुष्परीणाम बरेच आहेत आणि त्याबद्दल बरेच तज्ञ बोलत आहेत. पण त्याला एक चांगली बाजु आहे...हे सगळे व्यायाम, ॲाफीस, त्यानिमीत्ताने होणारं भटकणं ह्यातून कुटुंबाला वेळ दिला जात नाही...आता दुसरे काही नाहीच करण्यासारखं त्यामुळे जबरदस्ती का होईना घरातील चार कामं होतात आपल्या हातून...मनवाचा अभ्यास हा विषय मी माझ्या सिलॅबसमधे घेतलाच नव्हता, ती आता आला. ॲाफिसचं काम सांभाळून माझी काही आवडीचीकामं मी करतोच आहे...बाथरूम साफ करणे ( आवडीपेक्षा ते साफ असण्याचं obsession आहे मला ). त्याबरोबर मी चक्क किचनमधे घुसखोरी केली आणि एकदा बटर चिकन, एकदा बिर्याणी आणि बदमी कबाब ट्राय केले...आणि फक्कड जमले..परत किचन आणि भांडी घासुन पुसुन दिली बायकोला त्यामुळे तीही खुश...शेफ केडी बर्याचदा पदार्थ करून पोस्ट टाकतो..म्हटलं आपण पण बघावं...मोदकाने केलेलं लोणचे चाखायला जाणे आहे आहे लाॅकडाऊन संपला की...

घरात बसायची सवय नसलेल्या आमच्यासारख्यांना करावं काय हा प्रश्ण मोठा असतो. पण आज मला विचाराल तर I don’t miss going out...माझा दिवस अगदी प्लॅन केल्यासारखा जातो...व्यायाम, घरातील कामं, ॲाफीसची कामं, १.३० ला जेवण, परत स्काईप काॅल आणि पुर्णविराम. त्यानंतर फक्त अम्मीजान, नेटफ्लीक्स आणि बातम्या. सकाळ मात्र फार उत्साहात जाते कारण व्यायाम आणि ग्रूपात येणारी चॅलेंज.

७ दिवस रोज ३७५ बैठका मारायच्या.. हे बैठकांचं चॅलेंज माझ्या डोक्यतुन आल, मला स्वत:ला खात्री नव्हती पण फाटली नाही तर चॅलेंज कसलं म्हणुन सुरू केलं आणि पुर्णदेखील झालं. माझ्यासोबत डॉक (डॉ श्रिहास) ने पण हे चॅलेंज पुर्ण केल.
लगेच डाॅक म्हणाला दोन दिवस ब्रेक सोमवार १३ एप्रिल पासुन ७ दिवस रोज १०० बर्पी हे चॅलेंज घेवुया..बघतां बघतां ८ जणं तयार...ह्याला म्हणतात उत्साह

एक चांगली गोष्ट अशी कि वर्क फ्राॅम होममुळे बायको आणि मुलगीदेखील माझ्यासोबत व्यायाम करतात...सुर्यनमस्कार, बर्पी सगळं करतात..त्यामुळे व्यायामपण मजेशीर होऊन जातो. सोमवारी बर्पी चॅलेंजला सुरवात झाली...माझ्या १०० बर्पी झाल्या आणि मिनलच्या २५, मनवा ५...मजा येते...हे काही कायम जमणार नाही पण जेवढे दिवस जमेल तेवढे आपले
...हा लेख लिहू पर्यंत सिए केडी आणि अनुप बदलापुरचे आजचा अपडेट यायचे आहेत बाकी सगळे २ दिवसातून रोज १०० बर्पी काढत आहेत .

पुढच्या आठवड्यात अजुन काहीतरी निघेल...एकूण काय तर, लाॅकडाउन मधे आम्ही जास्त जोमाने व्यायाम करतोय...ट्रेक डोमानेवर टांग कधी मारतोय असं झालाय खरं पण ती वेळ येईल तेव्हा I will be ready & fitter than I was on 19th March 2020 ( last ride )

तुम्हि पण सामिल व्हा ७ दिवस रोज १०० बर्पी चॅलेंज मधे कदाचित काहिंना सुरुवातीला १०० बर्पी काढण शक्य होणार नाहि जमतिल तेवढ्या काढा आणि येथे टाका.

प्रतिक्रिया

मस्त रे..सायकल सायकल मुळे व्यायाम होतो तरी, आता १०० बरपीज चॅलेंज घेतलंय तुझ्या नादी लागून :-)) बघू जमतंय का ते...

मस्त सुरू आहे, कीप इट अप!

प्रशांत's picture

15 Apr 2020 - 10:15 am | प्रशांत

आत्ताच १०० बर्पी काढुन झाल्या.

यापुर्वी १० पेक्षा जास्त बर्पी काढल्या नव्हत्या.
११ तारखेला १० X ३ = ३० काढल्या धन्स टू ज्याक ऑफ ऑल. त्यानी पाठवलेल्या व्हिडिओ मुळे फायदा झाला.

१२ ला १० X ५ = ५०

सोमपासुन १० X १० काढायला सुरुवात केली बघु किति दिवस जमते ते.

डॉ श्रीहास's picture

15 Apr 2020 - 9:34 am | डॉ श्रीहास

२५०० स्क्वॅट्स ७ दिवसात मारू असं सांगून फसवलं .... २६७५ स्क्वॅट्स माराव्या लागल्या जोजोमुळे ... ३७५ रोजच्या चालू असायच्या मध्ये हा भाऊ ४०० मारायचा मग मलाही मारणं आलंच ;))
बर्पीज् चॅलेंज मलाच सुचलं होतं ... म्हटलं जोजोनी दिलेलं पूर्ण केलं आता त्याला चॅलेंज देऊ , कसचं काय हा गडी १०० बर्पीज् सोबत ५ अजून वेगवेगळे व्यायाम करून अपडेट देतो आहे _| ̄|○
स्क्वॅट्स चा ऱ्हीदम जाऊ नये म्हणून १०० बर्पीज् + १०० स्क्वॅट्स असं चालू ठेवलंय ...
आहाराबाबत जोजोनी अगदी शिष्यासारखं ऐकलं आणि जमेनासं झाल्यावर बदलसुद्धा सांगूनच केले ... मला ह्याचा जास्त अभिमान वाटतोय की ज्याला आपण आहारासाठी गाईड केलं त्याला माझ्यापेक्षा चांगला रिझल्ट दिसावा (पण मुख्य कारण हा भाऊ वर्षानुवर्षं मेहेनत करत होता). चला थांबतो स्ट्रेचिंग बाकी आहे _/\_ .

कंजूस's picture

15 Apr 2020 - 9:45 am | कंजूस

फोटो टाका ना.

बरपीज म्हणजे जोर बैठका?

आवडलं. बैठे खेळ ( पत्ते, क्यारम, बुद्धिबळ नावाचा गेम असतो) आवडत नाहीत. भटकणे जमते. दोन दिवस गेलो नाही कारण तीन दिवस भाजी बाजार बंद. त्या निमित्ताने फिरतो. कुणाकडे इमारतीत जात नाही. पुण्यात असतो तर केडी, मोदक,अभ्या ,सगा,आणि गुर्जी ( सिंहगड परिसर);वल्ली, चौराकाका, (पिंचिंकर) यांच्या एअरिआत चक्कर टाकली असती. (लोणचे, किंवा इतर पदार्थ यासाठी )रिकामी बरणी नेली असती.
औरंगाबाद फारच दूर. ( सरांनी रागवू नये. )

सायकल चालवण्याचे ( रस्त्यावर) धाडस नाही, पण सायकलिस्टांबद्दल आदर आहे. साइकलिस्ट मासिकही परवा चाळले.

कळावे लोभ असावा। आपला मिपाकर.

१०० बर्पी तर कठीण वाटतयं, पण १०० बर्फी खायचं चॅलेंज असेल तर सांगा.
ह. घ्या.

तसे माझे सुद्धा दिवसातून दोन वेळा फिजिओ थेरेपी होते, ज्याच्यात core muscle strengthening चे प्रकार आहेत. सकाळी ३ किमी चालणे होते.

लॉकडाऊन् अगोदर वजन ३ महिन्यात ८३ वरून ७४ वर आणले होते, ते परत वाढू नये म्हणुन प्रयत्न करत आहे.

भारी लिहिलंय जोजो. माझे पण 2 दिवस झालेत 100 बर्पिज चे. हे पूर्ण होईलच. पुढच्या सोमवारपासून काय चॅलेंज असणार तो विचार करतोय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Apr 2020 - 12:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सायकलवाल्यांच्या धाग्यामधे आपल्याला काय स्कोप नसतो. प्रशांतसर सकाळीच असा व्यायाम केला तसा व्यायाम केला इतक्या बर्प्या झाल्या वगैरे सांगत असतात तरीही तुमचं समस्त लेखन वाचलं, आवडलं. तितकं ते किचन आणि भांडीकुंडी घासली. इतकं नै करायला पाहिजे. सवय लागू शकते, दुसरं काय. झाडलोटपर्यंत ठीक आहे. अर्थात हे ज्याची त्याची मतं हं. (ह. घ्या)

बाकी, वाल्मिकीचं रामायणाचं युद्धकांडातले सर्ग वाचतोय. रामायण मालिकाही पाहतोय. रामायण मालिका पूर्वीही पाहिलेली लोकांच्या घरी जाऊन. अँटेनावर कावळा बसला की त्याला हुसकायला जावं लागायचं. तर रामायणात राम लखन यांना जेव्हा नागपाशाचे दंश होतात आणि ते वेदनेने तळमळत असतांना बेशुद्ध पडले असतील तेव्हा त्रिजटा सितेला विमानातून ते दृश्य दाखवायला नेते . हा भाग रामानंद सागर यांनी दाखविला नाही पण, त्रिजटा आणि सिता परत परत फिरते तेव्हा सिता ज्या काही मन की बाते करते त्यात ती स्वतःच्या सौंदर्याचं वर्णन करते तेव्हा वाल्मिकीच्या प्रतिभेची कमाल वाटली. फार खोलात जात नाही.

बाकी, काल गावाजवळच्या नदीकाठी असलेल्या मासेमारी करणार्‍याकडून थेट नदीवरची मासे मिळवले. चिंगळ्या मिळाल्या, भारी वाटलं. दाळभाताने अशक्तपणा यायला लागला होता. इकडे काल पासून एसारपी रस्त्यावर उतरले आहे, फटकावणे सुरुच आहे. ऑनलाईन बुद्धीबळ सुरु आहेच. पुस्तकंही चाळणे सुरुच आहे.
काल बांद्र्याला जी गर्दी जमली त्यात राजकारण दिसत आहे, एबीपी माझाचाही बराच हात दिसतोय. खरं तर संकटाच्या प्रसंगी असे होऊ नये असेही वाटले.

मिपावर पडीक आहेच.

-दिलीप बिरुटे

वाल्मिकींची खरी प्रतिभा विविध ऋतुवर्णनात दिसते. अफाट लिहिलंय.
बाकी चेस खेळा भो एकदा माझ्याशी.

मोदक's picture

15 Apr 2020 - 2:53 pm | मोदक

भारी बे जोजो.. लॉकडाऊन झाल्यावर बिन्धास्त चक्कर मार.. लोणचे आणि चिवडा असा प्लॅन करू.

मी २ दिवसांपूर्वी धडपडलो आणि पाय सुजवून घेतला आहे त्यामुळे एकच दिवस चॅलेंज पूर्ण झाले. नीट झालो की परत बर्पीला सुरूवात करेन.

कुणीतरी जोरबैठका / दंडबैठका (शक्यतो व्हिडिओसहित) समजावून सांगा राव.

मला हे प्रकार करण्याची खूप इच्छा आहे पण (युट्युबवरही) नीट मार्गदर्शन मिळालं नाही अजून मिळायचं आहे.
(नकारात्मकता खोडून सकारात्मक लिहितो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न!)

सौंदाळा's picture

15 Apr 2020 - 7:43 pm | सौंदाळा

मस्त,
लॉक डाऊन मुळे माझा अजगर झालाय, आता तरी काहीतरी करायलाच पाहिजे

चंबा मुतनाळ's picture

15 Apr 2020 - 8:08 pm | चंबा मुतनाळ

छान लिहलयस जोजो !!
मी देखील आठवडाभर १०० बर्प्यांचे चॅलेंज घेतलेय. बघूया जमतय का ते !!

प्रशांत's picture

15 Apr 2020 - 8:21 pm | प्रशांत

बघूया जमतय का ते !!

तुम्हाला ५०० म्हणायचे होते का?

चंबा मुतनाळ's picture

15 Apr 2020 - 10:51 pm | चंबा मुतनाळ

काय सर्पंच! चेष्टा करताय काय पामराची !

तापमान वाढलेय, घामने अंघोळच करतोय असं वाटतय... टकुर्‍यावर वाढलेल्या जंगलाचा लईच कंटाळा येउन राहिलाय !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jatt Ludhiyane Da... :- Student Of The Year 2

मी तर रोज शेतावर जाऊन काम करतोय. गेले १० ते १२ दिवस बरीच कामे मार्गी लावली.

चौकस२१२'s picture

16 Apr 2020 - 10:06 am | चौकस२१२

शेतावरच्या जीवनाचे ४ फोटू टाका कि

जास्त फोटो नाही काढले. खालील कामे केली:

- वालाची काढणी.
- भेंडीची ४० आळी बनवून त्यात बिया पेरल्या.
- कंपोस्टसाठी मटेरियल गोळा करुन एका ड्रममध्ये टाकले.
- हळदीची काढणी सुरु आहे.
- तूर काढणी पूर्ण केली.
- मेथी, मुळा, जिरे आणि ओवा लहानशा वाफ्यांमध्ये पेरला आहे.
- हळद, आले आणि अळू लावण्यासाठी वाफे तयार करतोय.

सतिश गावडे's picture

16 Apr 2020 - 10:12 pm | सतिश गावडे

"एक प्रवासः रेड हॅट लिनक्स ते हिरवं गार शेत" असं काहीतरी येऊ द्या आता.

धर्मराजमुटके's picture

20 Apr 2020 - 12:48 pm | धर्मराजमुटके

रेड हॅट चं मार्केट कितपत उरलय ? उबंटू आल्यापासून पर्सनल पीसी लेव्हल वर तरी मार्केट कमी झालं असावं असा अंदाज. सर्वर साईडला फारसा बदल झाला नसावा रेड हॅट च्या मार्केट मधे. कारण तिथे पेड सपोर्ट ची आवश्यकता लागतेच.

'contagion' हा २०११ साली बनलेला सिनेमा पाहिला. सध्याच्या साथीचे आणि चित्रपटातील तपशील आश्चर्यकारक रित्या जुळताहेत. चित्रपट बनविणारे भविष्यदर्शी आहेत असेच म्हणावे लागेल.

तुषार काळभोर's picture

16 Apr 2020 - 6:22 pm | तुषार काळभोर

- आळशी पैलवान..

माझीही शॅम्पेन's picture

17 Apr 2020 - 5:31 pm | माझीही शॅम्पेन

छान लिहलयस जोजो !!

संपूर्ण तरुण वर्गासाठी तू एक प्रेरणास्थान आहेस

जगप्रवासी's picture

20 Apr 2020 - 12:39 pm | जगप्रवासी

आम्हाला पण सांगा की नेमकं हे बर्पी चॅलेंज कुठे चालू आहे, आम्ही पण जॉईन करू.

सध्या तरी ३० पुश अप्स, ३० बैठका, ३० सूर्यनमस्कार, ९० जम्पिंग जॅक चालू आहेत. आणि सायकलिंग साठी चालू केलेले स्ट्रेचिंग आणि इतर व्यायाम प्रकार चालू आहेत.

सायकल सायकल चा ग्रुप मस्त आहे.. पण आजकाल सायकल चालवणे होत नाही सो तिकडे जास्त फिरकलो नाही...
पहातो..

लिहिले चांगले आहे.. आणखीन थोडे हवे होते