लॉकडाऊन: तिसरा दिवस.

गवि's picture
गवि in काथ्याकूट
27 Mar 2020 - 7:09 am
गाभा: 

झोपेतून उठताच "भारतात 24 तासातील सर्वाधिक नवीन रुग्णसंख्या" अशी उत्साहित होऊन ऑनलाईन पेप्रांनी दिलेली बातमी वाचली. त्यापाठोपाठ चवदा एप्रिलपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाल्याची अधिकच उत्साहवर्धक बातमी वाचली.

सुटीतील सहलींच्या बेतांचे तेरावे आम्ही कालच जेवलो.

मुंबईत न येता कोंकणातच निवांत स्थायिक राहिलो असतो तर बरे झाले असते असे म्हणावे तर तिथेही हे शिंचे करोना घुसले आहेच.

आता माशीद्वारेही करोना प्रसार होऊ शकतो असं एक चिलट आलं आहे.

पाण्याद्वारे, डासाद्वारे वगैरे व्हायला लागल्याचा शोध बाहेर पडला की आपण बाहेर पडायला मोकळे.

आज तिसराच दिवस आहे लॉकडाऊनचा, हेही झटकन जाणवलं. कधीतरी तरुण असताना लॉकडाऊन सुरू झाला होता असं फिलींग आहे. आणि तीनच दिवस झाले ? दोनच खरं तर.. अं ?

बाकी कार्यालयीन कामकाज घरून दुप्पट वेगाने आणि दुप्पट व्यापाने व्हावे अशी अपेक्षा दिसतेय. डोक्याला कल्हई होतेय रोज.

त्यामुळे ते मोकळा वेळ मिळून छंद, बागकाम, तबला, चित्रकला (जळली ती लहानपणीच), फ्यामिलीसोबत गोड गप्पा वगैरे लोकांच्या अनुभवांना अधेमधे असूयेने वा वा म्हणणे चालू आहे.

सांगा आता आणखी कशाकशाने पसरतोय करोना आणि किती लाख लोक बाधित होणारेत?

अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनांबद्दल आभार आणि अभिनंदन.

ता.क. : कतरीना कैफने परवा भांडी घासली आणि काल केर काढले. गृहकृत्यदक्ष दिसते. आता आज भरतकाम.

प्रतिक्रिया

window.addEventListener("message",e=>{e.data&&"6564582"===e.data.id&&document.getElementById(`${e.data.id}`)&&(document.getElementById(`${e.data.id}`).style.height=`${e.data.frameHeight+30}px`)});

पांढरे माझे आहेत

प्रतिस्पर्ध्याने गेम रिझाईन केला का? चेकमेट दिसत नाहीये.

फुटूवाला's picture

27 Mar 2020 - 8:49 am | फुटूवाला

त्यांनी काहीही केलं असती तरी माझ्या पुढच्या चालीत चेकमेट झाला असता..

भंकस बाबा's picture

27 Mar 2020 - 4:03 pm | भंकस बाबा

या मैदानात , दोन चालीत चेकमेट करतो की नाही बघा तुम्हाला !
नाव बदलून टाकिन

फुटूवाला's picture

27 Mar 2020 - 8:20 am | फुटूवाला

पाण्याद्वारे, डासाद्वारे वगैरे व्हायला लागल्याचा शोध बाहेर पडला की आपण बाहेर पडायला मोकळे.

प्रचेतस's picture

27 Mar 2020 - 8:37 am | प्रचेतस

नेहमीच्या ऑफिसच्या सवयीने लवकरच उठणं होऊन आवरणं होतंय. सध्या वर्तमानपत्र नसल्याने डिजिटल आवृत्ती वाचणे सुरू.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2020 - 9:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सकाळी नियमित सुरु झाली. मिपावर तुमचा धागा पाहिला खुसखुशीत दिवसाची सुरुवात झाली थँक्स. सकाळीच ऑनलाईन दैनिकांच्या आवृत्त्या तुम्ही म्हणता तशाच असतात म्हणून त्या बातम्या आता वाचायचं जरा जीवावर येतं. दररोज रुग्णांची संख्या वाढतेय, आपली हळुहळु वाढतेय असे म्हणून थोंडं बरं वाटलं (काहीही असतं आपलं)रुग्ण बरे होताहेत हेही वाचून बरं वाटतं.

पाण्याद्वारे, डासाद्वारे वगैरे व्हायला लागल्याचा शोध बाहेर पडला की आपण बाहेर पडायला मोकळे.

हा हा हे मात्र खरं आहे. आपण मरणाच्या वेशीवर आपण उभे आहोत असे वाटायला लागते. म्हणजे आपण आता कशामुळे मरायचे बाकी आहोत, असा प्रश्न पडतो. चोही बाजूंनी मृत्युदूत धारदार भाला आपल्यावर रोखून आहे, असे वाटायला लागते. आयुष्यात इतकी भिती पहिल्यांदा वाटली. चीनच्या मातेची आठवण केली सकाळी सकाळी.

कतरीना कैफने परवा भांडी घासली आणि काल केर काढले. गृहकृत्यदक्ष दिसते. आता आज भरतकाम.

आता ही स्टार मंडळी काय काय करतेय ही एक करमणूकच आहे. बाकी, माझ्याच्याने घरातली कोणतीही कामे होत नाही. मगरीसारखा सुस्त पडून असतो. आणि मिपा आहे, तुम्ही लोक आहात म्हणून बरे. बाकी आयुष्यात अजून काय हवं असतं.

अरे हो, सांगायचं राहीलं. काल रात्री मोबाईलचं नेट बंद करु म्हटलं की एका मित्राचा मेसेज. सर, पगार होईल का ? आता प्रश्न तसा सोपा आहे आणि म्हटलं तर अवघडही आहे. म्हटलं होईल, पण पन्नास टक्केच होऊ शकतो. किंवा नाहीही. असं सांगून टाकलं. का तर त्याने त्याचे काही प्लॅनिंग करावे म्हणून तसे बोललो. असो.

गविसेठ, खुसखुशीत धाग्याबद्दल आभार. मिपावर पडीक आहेच बोलत राहू. आज कोणी कितीही गोड बोलले तरी प्रचेतस या आयडीबरोबर बुद्धीबळाचा डाव लावणार नाही. नाही म्हणजे नाही.

-दिलीप बिरुटे

प्रशांत's picture

27 Mar 2020 - 11:35 am | प्रशांत

एवढे का निराश होता सर

बरेच दिवस झाले तुमचा डबल बॅरल स्टाईल लेख आला नाहि येत्या दिवसात येवु द्या.

प्रचेतस's picture

27 Mar 2020 - 11:38 am | प्रचेतस

१००% सहमत.

बऱ्याच वर्षात सरांनी काही लिहिले नाही, करोनानिमित्ताने त्यांनी बोळा काढून टाकावा.

नावातकायआहे's picture

27 Mar 2020 - 3:42 pm | नावातकायआहे

चीनच्या मातेची आठवण केली सकाळी सकाळी !!
:=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2020 - 9:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लॉकडाऊन एकवीस दिवसच राहील असे वाटत नाही. एक महिना, दोन महिने असंही होऊ शकतं.

-दिलीप बिरुटे
(शंकेखोर)

फुटूवाला's picture

27 Mar 2020 - 9:10 am | फुटूवाला

लॉकडाऊन काढलेच तरीही बरेच निर्बंध असतील. लग्नकार्यासाठी इतकेच माणसं, क्रीडास्पर्धा घ्यायच्या नाही वगैरे... लवकर सुस्थितीत यावं हीच प्रार्थना आता...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2020 - 9:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्याकडे लोकांना शिस्त नाही, हे अनेकांनी बोलले आहे. आपण बदलूच शकत नाही. बाहेर आपलं मरण वाट पाहात आहे असे समजून लोकांनी वागलं पाहिजे. परिस्थिती बदलायची तर योग्य काळजी आणि गर्दी टाळली पाहिजे.

सॉरी फुटूवालासेठ, आपला व्यवसाय गर्दीच्या, सण उत्सवावर, विधी, संस्कारावर अवलंबून असेल तर काही दिवस सर्वच बाजूंनी तान येणार काळजी घ्या, योग्य प्लॅन्स करा इतकेच सांगेन.

-दिलीप बिरुटे
(फुटुवाल्यांच्या गावाकडे राहणारा)

म्हणजे घरं लॉक करून लोक बाहेर सुसाट. म्हणजे चौकाचौकांत.

बद्धीबळाची हाणामारी वाढल्यास ती दुसऱ्या धाग्यात सरकवा.
------
वल्लीशी हरतोय असं वाटल्यास आपली बाजू त्यास (पटफिरवून) देऊन बघा काही फरक पडतोय का. आगावू शुभेच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2020 - 9:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण काही मित्रांशी वेळ जावा म्हणून बुद्धीबळ खेळलो, त्यांनी शिमग्याच्या सणाप्रमाणे आमच्या पराभवाच्या बोंबा गावभर मारल्या.
आपलं ठरलं, नाय म्हणजे नाय. बाकी, तुमचं काय चाललंय विशेष ?

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

27 Mar 2020 - 9:51 am | प्रचेतस

हार जीत तर होतंच असते आयुष्यात सर, त्याचं इतकं काय मनाला लावून घ्यायचं. खेळत राहा. कधीतरी जिंकालच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2020 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

''हारसे डर नही लगता रे भावा, बोंब होनेसे ज्यादा तकलीफ होती है''

तुम्हाला कोणाचे काय मेसेज बिसेज ?

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

27 Mar 2020 - 9:58 am | प्रचेतस

टाकताय का एक डाव?
बाकी मेसेज वगैरे कुणाचे नाही.

फुटूवाला's picture

27 Mar 2020 - 10:08 am | फुटूवाला

द्या लिंक

प्रचेतस's picture

27 Mar 2020 - 10:17 am | प्रचेतस
प्रचेतस's picture

27 Mar 2020 - 10:23 am | प्रचेतस

या भो लवकर

फुटूवाला's picture

27 Mar 2020 - 11:39 am | फुटूवाला

मी वाट पाहिलं पण नंतर विसरून गेलो.
व्यनि करतोय तुम्हाला पहा.

फुटूवाला's picture

27 Mar 2020 - 11:43 am | फुटूवाला

Contagion 2011
हा कोरोनासारख्या व्हायरसवर असलेला चित्रपट पाहण्यात मी विसरून गेलेलो.
व्यनि केलाय तुम्हाला.

प्रसाद गोडबोले's picture

27 Mar 2020 - 12:08 pm | प्रसाद गोडबोले

परत डाव मांडणार असल्यास आम्हास ही कळवा.

आणि हो, चेस.कॉम पेक्शा लिचेस.कॉम सोयिस्कर आहे बहुतेक.

प्रचेतस's picture

27 Mar 2020 - 12:19 pm | प्रचेतस

मस्त झाला खेळ.
माझ्याकडून बऱ्याच चुका झाल्या. तुम्ही जिंकलात, चांगले खेळलात.

हा प्रतिसाद फुटूवाल्याना आहे.
मार्कसशेठ, कधी खेळायचे बोला.
व्हाट्सअपवर पिंग करा

फुटूवाला's picture

27 Mar 2020 - 12:32 pm | फुटूवाला

window.addEventListener("message",e=>{e.data&&"6564780"===e.data.id&&document.getElementById(`${e.data.id}`)&&(document.getElementById(`${e.data.id}`).style.height=`${e.data.frameHeight+30}px`)});

मी पूर्ण गोत्यात अडकलेला असताना मला संधी मिळाली तुमच्याकडून...
चुकून जिंकलो :)

चालायचंच. त्यांचं नेहमीचं टार्गैट आता कुकुचकु आणि गाईगाई करायलासुद्धा येत नाही मिपावर त्यामुळे असं झालं असेल.

सध्या ग्यालरीतली झाडं इकडून तिकडे करत बसतोय.

तुमच्याकडे डबलब्यारलचं (बंदुकचं) लायसन आहे का? केळीच्या बागावाल्यांना लागतं ते. कधीकधी आवाज काढून वानरांना पळवतात.

चौथा कोनाडा's picture

27 Mar 2020 - 5:24 pm | चौथा कोनाडा

.... अन त्या धाग्याला "लॉकडाऊन बद्धिबळ" असे नाव द्या :-)))

ओनलाईन पटाचा दुसरा धागा काढा एवढंच म्हणतोय. इकडे लाकडंडाऊनमध्ये बातमी द्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2020 - 4:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपला मूड फास्ट खेळायचा असतो आणि हे दिलीप वेंसरकर सारखं टुकुटुकु खेळतात अर्थात म्हणून जिंकतात. हरलो आत्ता. माझा वजीर गेला दिला सोडून सामना.

-दिलीप बिरुटे

भंकस बाबा's picture

27 Mar 2020 - 4:08 pm | भंकस बाबा

मासे पाळण्याचा छन्द असणाऱ्याची सध्या गोची झाली असणार. डास मारून घातले तर दुहेरी समाधान लाभते हो!
(इथे खुदूखुदू हसणारी स्माइली कल्पावी)

फिशफुड खाणारे मासे ठेवतो. ते पोळीचा चुरा खातात. सगळे फ्यान्सी मासे फक्त किडे खातात. ते ठेवत नाही.
गप्पी, ब्ल्याक मॉली,शेवाळंही खातात. ते आहेत.
(( फुकुशिमा जपानमध्ये सुनामचत न्युक्लिअर प्लान्ट फुटल्यावर लोक गाव सोडून गेले. चार महिन्यांनी आल्यावर फिश ट्यान्कमधला गप्पी मासा जिवंत होता.))

भंकस बाबा's picture

27 Mar 2020 - 4:08 pm | भंकस बाबा

मासे पाळण्याचा छन्द असणाऱ्याची सध्या गोची झाली असणार. डास मारून घातले तर दुहेरी समाधान लाभते हो!
(इथे खुदूखुदू हसणारी स्माइली कल्पावी)

भंकस बाबा's picture

27 Mar 2020 - 4:09 pm | भंकस बाबा

मासे पाळण्याचा छन्द असणाऱ्याची सध्या गोची झाली असणार. डास मारून घातले तर दुहेरी समाधान लाभते हो!
(इथे खुदूखुदू हसणारी स्माइली कल्पावी)

चौथा कोनाडा's picture

27 Mar 2020 - 5:25 pm | चौथा कोनाडा

हा .... हा .... हा ...... !

दुपारपासून मोबाईलचे नेट बंद करून ठेवलय.
शाळेच्या मित्रांच्या ग्रूपवर तासाभरात तीनशे मेसेज पडत असतात. त्यात तेच्तेच ढकलपात्र आणि कैच्याकैच दावे असतात.
तरी नशीब अजून नाना पाटकर , नांगरे पाटील , प्रकाश आमटे , पोपटराव पवार ,सुधा मूर्ती यांच्या नावाने आणि व पू काळे ,पूल देशपांडे यांचे मेसेजेस यायला सुरवात झालेली नाहिय्ये.
तरीपण एकूणच नकारात्मक बातम्यांचे पीक आलेय.
काल माझ्या मातोश्रींना कोणीतरी एक मेसेज पाठवला . त्यात काय तर म्हणे कोरोना भारतात कित्येक लाख लोकांना होणार आहे. हॉस्पिटल मधे बेड मिळणार नाहीत आनि ज्येष्ठ नागरीकांना त्यामु़ळे ट्रीमेंट शिवाय तसेच ठेवले जाईल. मातोश्रींना जाम टेन्शन आले. तो मेसेज पाठवणारा समोर असता तर पायताणाने बडवले असते.
समजत नाही का लोकांना हे असले भयानक मेसेज पाठवायचे नसतात. विकृत आनंद मिळत घेत असावेत समाजजागृतीच्य नावाखाली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2020 - 8:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोक स्वत: या विषयातले तज्ञ असत नाही. पण कुठून तरी मेसेज येतो. आला की कोणतीही शहनिशा न करता पाठव पुढे. त्रासदायक आहे, गप्प बसवत नाही लोकांना.

-दिलीप बिरुटे

सोत्रि's picture

28 Mar 2020 - 6:45 am | सोत्रि

तीन दिवसांची काय मातब्बरी, गेले तीन आठवडे माझा लाॅकाॅउट चालू आहे!

३ आठवड्यांपूर्वी बायको पासपोर्ट नुतनीकरणासाठी भारतात गेली दोन आठवडे लागणार अस गृहीत धरून बाॅसशी बोलून वर्क फ्राॅम होम अप्रुव्ह करून घेतले होते. पहिला आठवडा मजेत गेला. दुसरा आठवडा बायको परत येण्याच्या आतुरतेत चालला होताच की मलेशियन सरकारने बाॅम्ब टाकला MCO (Movement Control Order). त्यापाठोपाठ भारत सरकारने जाहिर केले मलेशियातून विमाने भारतात लॅंड होऊ शकणार नाहीत.

सो, ३ आठवडे घरबंदी चालू आहे. अजूनतरी सुरळीत चालू आहे. मुलं मी बनवलेलं जेवण जेवताहेत :).

टिळकांचं गीतारहस्य - कर्मयोगशास्त्र वाचून संपत आलं आहे (पारायण १)
हा तेल नावाचा ईतिहास आहे, धर्मयुद्ध - वाचून झाली
सुशी आणि वपु- घरात असलेला सगळा साठा परत वाचून झाला
विवेकानंदांचे ज्ञानयोग आणि राजयोग - वाचून संपवायचा प्लान आहे.

मेडही येत नसल्याने वेगवेगळ्या रेसिपीज करण्यावर बंधने येत आहेत, कारण तेलकट भांडी घासणे हा अतिशय किचकट प्रकार रोज करणे तापदायक आहे. हापिसातले काम चालू असल्याने वेळेवरही बंधने येत आहेत. पण एकंदरीत बाहेरच्या जास्त जेवणामुळे तब्बेतीवर परिणाम होण्याची शक्याताही आहे.

बहुतेक एप्रिल महिनाही असाच जाईल अशी मानसिक तयारी करून ठेवली आहे!

- (घरबंदीत असलेला) सोकाजी

उगा काहितरीच's picture

28 Mar 2020 - 9:27 am | उगा काहितरीच

ॲमेझॉन प्राईम वर उपलब्ध असलेले चांगले चित्रपट , चांगल्या सिरीज सुचवु शकेल का कुणी ?

मदनबाण's picture

28 Mar 2020 - 10:08 am | मदनबाण

सध्या जसा वेळ मिळतोय तसे चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याचा धडाका लावला आहे.

हल्लीच पाहिलेले चित्रपट :-

Mardaani 2
CHAPPIE
Gravity
The Body
BLOODSHOT

वेब सिरीज :-
कालच समांतर चा १ ला सिझन पाहुन पूर्ण केला, जबरदस्त आहे.
Altered Carbon चा पहिला सिझन रोचक वाटल्याने आता २ रा सिझन डाउनलोड मारुन ठेवलाय. वेळ मिळताच याच्या मागे लागणार आहे.
Mirzapur Season 2 ची आतुरतेने वाट पाहतोय... सिझन पहिला जबरदस्त होता आता दुसर्‍या सिझनची उत्सुकता फार वाढलेली आहे. [ Sacred Games ने दुसर्‍या सिझन मध्ये शेण खाल्ले आणि लोकांच्या शिव्या देखील. ]

बादवे... दुचाकी वरुन खड्ड्यातील प्रवास सध्या शरीराला मिळत नसल्याने ते बेचैन आहे ! :))) घरुन काम करणे म्हणजे केव्हाही उपलब्ध असणे !
असो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Raftaara... :- Lucifer

चौकस२१२'s picture

28 Mar 2020 - 10:13 am | चौकस२१२

हंटर (अल पचिनो )
चोरीचा मामला

कतरीना कैफने परवा भांडी घासली आणि काल केर काढले. गृहकृत्यदक्ष दिसते. आता आज भरतकाम.

हा हा हा