corona हा तसा एक सामान्य इंग्लीश शब्द. त्याचे मूळ लॅटिनमधले crown, अर्थात मुकुट. सध्या जगभर धुमाकूळ घालून एका महासाथीला कारण ठरलेला विषाणू त्याचा मुकुट मिरवतोय.
सहज उत्सुकता म्हणून ‘करोना’ शब्दाचे अनेकविध अर्थ पाहिले आणि ते रोचक वाटले. जगात जवळपास एक डझनभर प्रकारचे करोना आहेत. ते आपल्या परिचयाच्या अनेक क्षेत्रांत आहेत. जरा त्यांची यादी तर बघा:
आकाश, वनस्पती, शरीर, विद्युतक्षेत्र, वास्तुकला, धार्मिक केशभूषा, मुद्रानामे आणि अर्थात सूक्ष्मजीव .
सध्याच्या जमावबंदीमुळे आपण घरांत काहीसे जखडले गेलो आहोत. करोनाच्या ‘कोविद१९ ’ बद्दल सतत वाचतोय, ऐकतोय आणि इथे व्यक्तही होतोय. या माहितीच्या भडीमाराने डोके अगदी भंजाळून जातेय. साथीच्या बातम्यांनी आपली चिंताही वाढते आहे. म्हणून घटकाभर हा विरंगुळा.
विश्वातील विविध करोनांची काही चित्रे सादर करतोय. अर्थात ती सर्व जालावरून साभार !
१. सुरवात करूया सूर्याच्या करोना अर्थात त्याचे प्रभामंडलापासून. माझ्याप्रमाणे ज्यांनी खग्रास सूर्यग्रहण पाहिले आहे त्यांनी हे दृश्य अगदी जिवापाड डोळ्यांत साठवले असेलच. ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले नसेल त्यांनी आयुष्यात एकदा तरी खग्रास पहायची संधी घ्याच !
..................
२. एखाद्या फुलाचा शास्त्रीय अभ्यास करताना आपल्याला ‘करोला’ आणि करोना भेटतात. हे पाहा:
.............
३. विद्युत प्रकाशाची अनेक रूपे आपल्याला परिचित आहेत. या चित्रात जो लखलखाट दिसतोय तोही एक करोनाच.
..............................
४. आता वास्तुकलेत देखील करोना असतो तो पाहू. इमारतीच्या शीर्षकावरील हे देखणे शिल्प :
...............................
५. आणि हा आहे घराच्या सजावटीतील करोना. अशी बरीच झुंबरे आपल्याला परिचित असतात.
........................................
६. विशिष्ट धार्मिक केशभूषेत केलेला हा बघा डोक्यावरील करोना:
..............................................
७. मानवी मेंदूचा शास्त्रीय अभ्यास करताना हे दृश्य दिसते. त्याला म्हणतात करोना रेडीएटा:
..............................
८. करोना हे नाव विविध वस्तू-उत्पादकांनाही आकर्षित करते. धूम्रपानासंबंधी देखील एक करोना आहे आणि त्या प्रकाराला म्हणतात ‘करोना सिगार’. यात ‘फुल’ आणि ‘हाफ’ करोनाही असतात म्हणे !.
(धूम्रपान हे आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आहे , हेवेसांनल . केवळ विरंगुळा म्हणून हे उदा.)
.......................................................................
आणि वाचकहो,
सरतेशेवटी आपणा सर्वांना अतिपरिचित झालेल्या करोना विषाणूचा उल्लेख करतो. त्याचे चित्र आपण सतत अनेक ठिकाणी पाहतोच आहोत. म्हणून पुनरुक्ती टाळतोय.
.....या व्यतिरिक्तही काही करोना असू शकतील. माहिती असल्यास तुम्हीही भर घाला.
धन्यवाद !
प्रतिक्रिया
24 Mar 2020 - 4:16 pm | आनन्दा
आणि दारू?
24 Mar 2020 - 4:52 pm | टर्मीनेटर
छोटेखानी सचित्र लेख आवडला!
२४ ऑक्टोबर १९९५ रोजी खास विद्यार्थ्यांसाठी खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी आयोजित केलेल्या एका सहलीला हमीरपुर (उत्तर प्रदेश) येथे जाऊन खग्रास सूर्यग्रहण पाहिले होते. आणि अर्थातच त्यावेळी पाहिलेल्या कोरोना आणि डायमंड रिंग हि दोन्ही दृश्ये तुम्ही म्हंटल्या प्रमाणे अगदी जिवापाड डोळ्यांत साठवली आहेत.
24 Mar 2020 - 5:22 pm | कुमार१
२४ ऑक्टोबर १९९५
>>>द्या टाळी ! मी देखील हेच पाहिले आहे. राजस्थान मधल्या एका खेड्यातून.
युवाशक्ती बरोबर गेलो होतो.
लक्ष्मीपूजनाचा दिवस , बरोबर ?
24 Mar 2020 - 7:58 pm | राजेंद्र मेहेंदळे
बादवे, करोनाची दहशत म्हणता म्हणता चीनने न व्या विषाणुला जन्म दिलाय "हंता"
24 Mar 2020 - 9:13 pm | कुमार१
हन्ताविषाणू हा एकदम नवीन नाही.
तो १९८०मध्ये उंदरांमध्ये सापडला होता.
१९९३मध्ये अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिम भागांत त्याचा उद्रेक झाला होता.
24 Mar 2020 - 10:56 pm | तुषार काळभोर
25 Mar 2020 - 5:36 pm | गामा पैलवान
कुमारेक,
छोटेखानी लेख आवडला. फक्त विश्वव्यापी न म्हणता जगद्व्यापी म्हणायला हवं. हिंदीतून मराठीत रूढ झालेला हा शब्द यथार्थ नसल्याचं माझं मत आहे.
आ.न.,
-गा.पै.
25 Mar 2020 - 5:44 pm | कुमार१
गा पै,
तुम्ही लिहिलेल्या मुद्द्यावर विचार करेन.
25 Mar 2020 - 6:30 pm | Nitin Palkar
या लेखात वर्णन केलेल्यांपैकी क्र. १ आणि ३ ऐकलेले होते. क्र. २ बॉटनी मधील करोला अमिताभच्या चुपके चुपके चित्रपटात ऐकलेला आठवतोय.
पैलवान यांनी प्रतीसादलेला नववा करोना अलीकडेच कायप्पावर बघितला होता. सचित्र लेख आवडला!
26 Mar 2020 - 10:38 am | कुमार१
अजून एक करोना.
ही आहे हवामानशास्त्रातील एक घटना.
यात चंद्र वा सूर्यप्रकाशाचे जलबिंदू किंवा ढगांमुळे विघटन होते.
हा पहा चांद्रीय करोना परिणाम :
26 Mar 2020 - 1:23 pm | Nitin Palkar
_/\_
3 Apr 2020 - 7:24 pm | कुमार१
असाही एक करोना :
कोविड आणि कोरोना, दाम्पत्यांनी केलं जुळ्यांचं नामकरण
रायपूर येथील घटना :
(https://marathi.hindustantimes.com/national-world/story-amazing-chhattis...)
19 May 2020 - 2:15 pm | कुमार१
अजून एक भर !
मांडवा (जि. नगर) येथील नव्या रस्त्याचे नाव :