गाईड

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
4 Feb 2020 - 10:39 am

गाईड १९६५ चा सिनेमा ही इतकीच या सिनेमाची ओळख नाही.
गाईड हा सिनेमा आर के नारायणच्या कादंबरीवर बेतलेला सिनेमा ही पण याची ओळख होत नाही.
देव आनंदची ओळख बदलणारा सिनेमा, भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक स्वतःचा ठसा उमटवणारा सिनेमा. असे बरेच काही सांगता येईल याच्या बद्दल.
मी जेंव्हा पहिल्यांदा हा सिनेमा पाहिला तेंव्हा राजू नावाचा कोणताही आगापीछा नसलेल्या एका तरुणाची कहाणी इतकेच काहीसे समजले होते. अर्थात एस डी बर्मन चे म्युझीक हा मोठाच प्लस पॉईंट होता. यात नेहमी दिसणारा तो उत्साही देवानंद दिसत नाही. सळसळत्या तारुण्याची नव्हाळी वागवणारी वहिदा रेहमान दिसत नाही. जी दिसतात ती पात्रे दिसतात. जिवंत आणि सर्व भावभावना असलेली.
कथा वस्तु म्हणून पहायला जावे तर तीकाहिशी अशी आहे:-
सिनेमा सुरू होतो तोच मुळी राजू शिक्षा भोगून जेलच्या बाहेर येतो या दृष्याने. राजू हा उदयपूर शहरात पर्यटकांना ऐतिहासीक स्थळांची माहिती देण्याचे काम करणारा एक गाईड आहे. तो हे व्यवसाय म्हणून करतो. एक दिवस एक मध्यम वयीन श्रीमंत आर्कियॉलॉजिस्ट माणूस मार्को ( किशोर साहू ) शहरात येतो. सोबत त्याचे सुंदर तरुण पत्नी रोझी ( वहिदा रहेमान) आहे. रोझी एका नर्तकीची मुलगी आहे..मार्को या शहराबाहेरच्या काही गुहांमधे दडलेल्या ऐतिहासीक स्थळाचा इतिहास उलगडाण्यासाथी उत्खनन करायला आलेला आहे. मार्को ने राजू ला गाइड म्हणून सोबत घेतले आहे
मार्को गुहेतील ऐतिहासीक ठेव्याचा अभ्यास करण्यात मग्न झालेला आहे. रोझीला शहर दाखवत फिरताना राजूला अचानक रोझी एका नाचणारणीची मुलगी असल्याची पार्श्वभूमी समजते. त्याचबरोबर रोझीने मार्को बरोबर लग्न करून मार्कोची पत्नी म्हणून समाजात मानाचे स्थान कसे मिळवले हेही समजते. पण रोझीला हे स्थान फार मोठी किम्मत देऊन मिळालेले आहे. मार्कोला आवडत नाही म्हणून रोझीने तीचे नृत्यामधील सगळे भविष्य पुसून टाकले आहे. या दरम्यान रोझी विष पिऊन आत्महत्या करण्याचा असफल प्रयत्न करते. मार्कोला जेंव्हा हे समजते तेंव्हा तीला जिवंत पाहून मार्को रागवतो ,तीची निर्भत्सना करतो. ती मेली का नाही म्हणून विचारतो. तीने आत्महत्या केल्याचे नाटक केल्याचा आरोपही करतो. केवळ मार्कोला त्रास द्यायचा म्हणून तीने हे असे केले, खरोखरच मरायचे असते तर थोड्या जास्त झोपेच्या गोळ्या घेतल्या असत्या .म्हणजे ती खरोखरच मेली असती.
मार्कोने काही नव्या गुंफांचा शोध लावलेला आहे आणि तो त्यात अधिकच रमलेला आहे . इतकेच नव्हे तर तो तिथल्या आदिवासी मुलीबरोबर जरा जास्तच खेळकरपणे वागतोय हे पाहून रोझीच्या मनाने पुन्हा एकदा आपले आयुष्य संपवण्यासाठी उचल खाल्ली .
आत्महत्या करणे हे पाप आहे . आयुष्य हे जगण्यासाठी आहे. स्वतःच्या आवडीसाठी आनंदाने जग, स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जग असे सांगुन राजूने तीला शांत केले. रोझीने स्वतःची स्वप्ने साकारण्यासाठी नवी वात चोखाळायची ठरवले. तीने मार्को सोबतच्या संसाराला सोडून दिले. मार्कोची बायको ही ओळख पुसून टाकायचे ठरवले. आता तीला घराचे एखाद्या आसर्‍याची गरज आहे. राजू तीला आपल्या घरी गेऊन येतो. राजुच्या समाजात नृत्य करणार्‍या स्त्रीला चांगले समजले जात नाही. काही जण तीला मुजरा करणारी / वेश्याही म्हणतात. ( त्या काळी केवल मुजरा करणार्‍या बायकाच राजदरबारात शास्त्रीय नृत्य करायच्या ) यामुळे राजूसमोर खूप अडचणी उभ्या राहिल्या.
राजुची आई आणि त्याचा मामा ही रोझीला घराबाहेर काढ म्हणून म्हणून मागे लागताले. राजू त्यांच्या विरोधाला जुमानत नाही. त्याची आई त्याला सोडून जाते. राजूचे मित्र आणि ड्रायव्हरही दुरावतात. राजूच्या व्यवसायावर याचा परीणाम होतो. सगळॅ शहरच जणू विरोधात गेले आहे.
या अशा अडचणी आणि विरोधा मुळे राजूवर फारसा परीणाम झालेला नाही. तो रोझीला मदत करतो. रोझी ला तीच्या गाणे आणि नृत्याच्या करीयर कडे पुन्हा वळायला मदत करतो. रोझी यशाची शिखरे सर करत जाते. तीचा यशाचा आलेख वर वर जायला लागतो. ती स्टार बनते. ती जसजशी स्टार बनत जाते. राजू पार्ट्या , जुगार ,दारू मधे रमत जातो रोझी कलेच्या क्षेत्रात यशाची एक एक शिखरे गाठत आहे.दरम्यान रोझी आणि राजू मधे दुरावा निर्माण होतो. रोझी तीच्या कलेच्या विश्वाला सर्वस्व समजते. राजूला ती स्वतःच्या जवळ फिरकुही देत नाही. इतकेच नव्हे तर रोझी राजूला प्रेमाला निव्वळ मतलबी ठरवते. त्याचा अपमान करते. राजू हा रोझीच्या कमाईवर जगतोय असेही म्हणून दाखवते. पुरुषाने बाईच्या कमाईवर जगू नये असे सांगते.राजू तीला तीची कमाई ही राजुमुळेच शक्य झाली याची जाणीव करून देतो. तीची कला ही राजूने केलेल्या मदतीमुळे प्रकाशात आली.
मार्को रोझीला हार फुलांचे गुच्छा देवून रोझी चे मन जिंकायचा तीला पुन्हा आपलीशी करायचा प्रयत्न करतो.
मार्को रोझीला त्याने केलेल्या संशोधनाचे पुस्तक पाठवतो. त्या राजूला धन्यवाद देत म्हणतो की या गुफांचा शोध लावणे हे त्याच्या नशीबात होते म्हणून त्याला जमले. राजू पुस्तक रोझीपासून लपवून ठेवतो. मार्कोचा एजंट / मदतनीस रोझीला मार्कोने ने दिलेले दागिने सोफ डिपॉझीट मधून काढून घेऊन टाक म्हणून सांगतो. राजूला इर्ष्या वाटते. त्याला मार्कोने रोझीच्या संपर्कात येऊ नये वाटते. पैशाचे प्रेम नाही तर रोझी आणि मार्को पुन्हा एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून कागदांवर राजू रोझीच्या खोट्या सह्या करतो .
एक दिवस रोझी राजूला स्वतःच्या जवळ येवू देण्यासही नाही म्हणते. राजू दुखावतो.रोझी राजूला पुस्तक कुठे लपवले म्हणून जाब विचारते. रोझी ला राजू नकोसा वाटायला लागतो. रोझी राजूशी बोलायचेही टाळते तीच्या बेडरूम मधून राजूला बाहेर जायला सांगते. इतकेच नव्हे तर रोझीने राजूला स्वतंत्र केले आहे तो कुठेही जाऊ शकतो असे सांगते.राजू दुखावला जातो. रोझीला न सांगताच सोडून निघून जातो. तो आईला बोलवून घेतो.
खोट्या सह्या केल्या म्हणून राजूवर पोलीसानी वॉरंट बजावले आहे. रोझीनेच ही तक्रार केली आहे. . रोझीला भेटल्यावर रोझी तू असे का केलेस विचारते. पैशांची गरज होती तर मला सांगितले असते तर दागिने विकूनही मी पैसा उभे केले असते. घर विकले असते. जग काही म्हणॉ तू तरी समजशील असे राजू म्हणतो. रोझी उत्तर देते. मी तुला सजमले नाही. तू मला समजला नाहीस.
राजूला खोट्या सह्या केल्या म्हणून दोन वर्षांची जेल होते. जेल मधे राजूला रोझी भेटायला येते. सोबत सुटल्यावर तीला राजूचे महत्व जाणवते.
राजूची जेल मधून सुटका होणार असते त्या दिवशी रोझी आणि राजूची आई त्याला घ्यायला जेल मधे येतात तेंव्हा त्याना समजते की राजू ची सहा महिन्यांपूर्वीच सुटका झाली आहे.
जेल मधून सुटका झाल्या नंतर राजू घरी जावे की कसे हे ठरवता न आल्यामुळे असाच निरुद्देश भटकत रहातो. निनावी, भणंग एकलकोंडे आयुष्य जगत रहातो. भुकेने व्याकूळ झालेला असताना एका क्षणी एक साधुंचा तांडा जात असताना त्यांच्या मागे मागे जातो. त्यांच्या सोबत एका छोट्या गावाबाहेरच्या एका पडीक देवळात एक रात्र घालवतो. जातान त्यातला एक साधू राजूच्या अंगावर शाल पांघरून जातो. गावातली एक बाई राजूला साधू समजते. राजू तीला तीच्या नवर्‍याला दोन समजूतीच्या गोष्टी साम्गतो. गावातले लोक राजूला स्वामी समजतात. गावात दुष्काळ पडलेला आहे. राजू गावकर्‍यांना काही सांगत असताना कोण्या एके काळी कोणीतरी उपास करून पाऊस पाडला होता असे सांगतो. लोक हे खरे मानतात आणि त्यांच्या साठी राजू उपोषणाला बसतो.
बातमी सगळी कडे पसरते. राजूची आई आणि रोझी राजूला भेटतात . पाऊसही पडतो पण उपोषणामुळे राजू मात्र मरण पावतो.
एक सशक्त कथानक हीच या चित्रपटाची एकमेव ओळख नाही.
चित्रपटात दिग्दर्शन , संवाद, त्यातील पात्रे , कॅमेरा संगीत , गीते हे सगळे बरेच काही सांगतात.
अगदी सुरवातीला राजूची जेल मधून सुटका होते. जेलचा दरवाजा उघडतो. आणि झाडावरचे पक्षी उडू लागतात. राजू रस्त्याच्या एका तिठ्यावर येवून उभा रहातो. आणि फ्लॅशबॅक मधून चित्रपट उलगडत जातो. तब्बल सव्वादोन तासांच्या फ्लॅशबॅक नंतर चित्रपट पुन्हा वर्तमानात येतो. राजू निश्चित आयुष्य नाकारुन अनाम भटकत रहातो.
कॅमेरा आणि फोटोग्राफीबद्दल काय सांगावे. चितोडच्या किल्ल्यातील आज तो जिने की तमन्ना है … हे गाणे रोझीच्या मनातले सर्व काही दाखवते. किल्ल्याच्या भिंती , मोकळे आकाश त्यात उडणारे पक्षी, चितोडच्या किल्ल्यातला तलाव जणु रोझीच्या भावना बोलून दाखवतात. प्रत्येक फ्रेमअन फ्रेम बोलकी आहे.
दुश्काळात गावकर्‍यांचे क्लोजाप्स खूप काही सांगून जातात. एक चित्र हजार शब्दांपेक्षाही बोलके आहे हे जणु अधोरेखीत करत असते.
तीच गोष्ट गाण्यांची. वहाम कौन है तेरा मुसाफीर पासून आज तो जीने की तमन्ना है आज तो मरने का इरादा है किंवा मग क्या से क्या हो गया... गाता रहे मेरा दिल.पैया तोसे नैन अलागे रे. दिन ढल जाये हाय रात न जाये. प्रत्येक गाणे जणु त्या त्या सिच्यूएशनचा प्राण होऊन आले आहे. गाण्याचा आशय इतका गडद की गाणी मनात वाजू लागतात.
पार्श्व संगीत आणि गाण्यांचे संगीत या बद्दल जितके बोलावे लिहावे तितके कमीच. राजूच्या मनातील भावना बोलताना मागे वाजणारी बासरी तशी जाणवत नाही. पण मुद्दामहून ऐकली तर ती चित्रपटभर जणू राजूच्या भावना होऊन कुठेना कुठे सतत ऐकू येते. गाण्यांच्या चाली मधे संगीताने शब्दांवर कुठे वरचढ पणा दाखवलेला नाही.
"गाता रहे मेरा दिल "गाण्याच्या वेळेस दाखवलेली पर्वतराजी आणि ढग. पहायला गेले तर हे चित्रपटातील प्रेम गीत पण खूप समजूतदार शब्द . आणि हळुवार बासरी न वापरता सॅक्सोफोनवर वाजलेली सुरावट त्यातला वेगळेपणा दाखवून देते.
पिया तोसे नैना लागे रे हे गाणे तर चित्रपताचा हायलाईट ठरावा इतके सुंदर दाखवले आहे. पडद्यावर आणि संगीतातूनही. मोंताज मधून रोझीच्या यशाचा प्रवास दाखवणारे हे गाणे संगीतातही तितकेच वैषिष्ठ्यपूर्ण. दोन कडव्यां ना जोडणारे संगीत प्रत्येकवेळेला वेगळे आहे. तरीही एकसंध .
या चित्रपटातील पात्रे इतकी जिवंत वाटतात.अगदी आजही आपल्या अवतीभवती असणारी. कुठे भडक टोकाचा चांगुलपणा , बेगडी वाईट खलनायक , दे धमाल मारामारी करत १५/ २० जणाना लोळवणारा नायक नाही. सगळी पात्रे त्यांच्या गुणदोषांसहीत वावरतात. हीरो आहे म्हणून त्याचा सद्गुणाचा पुतळा केलेला नाही. त्यालाही राग लोभ आहेत. कुठेतरी वाट हरवून बसलेला , कोणतेच ध्येय नसलेले असे अनेक जण अवतीभवती पहायला मिळतात. नायकाचे परीवर्तन वेगवेगळ्या पातळीवर होते. पण त्याचे सामान्य माणूसअसणे , शारीरीक पातळीवर प्रेम जगणे आणि जेल मधून बाहेर पडल्या नंतर उद्वीग्न मनस्थितीत वर्तमान नाकारणे , पोटाची निवार्‍याची सोय होते म्हणून साधू बनणे आण इसर्वात शेवटी आपला जीव कोणाच्या तरी कामी येतोय म्हणून उपोषणास बसणे इतके परिवर्तन नायका मधे घडताना दिसते. जगण्याची आसक्ती आहे पण तरीही मरणाला सामोरे जातोय. यात धीरोदत्त पण नाहिय्ये पण हताशाही नाहिय्ये. जे झालंय ते आपण स्वीकारलंय पण हे होताना तो नायक कुठेही उदात्त , लार्जर दॅन लाईफ होत नाही. शेवटच्या प्रसंगातही तो सर्वसामान्यच वाटतो. इतका खरखुरा नायक हिंदी चित्रपटात क्वचितच दाखवला गेलाय.
जी गोष्ट राजू ची तीच रोझीची. ही नायीका ही अनेक अर्थाने वेगळी आहे. परिस्थितीने पिचलेली. मार्कोच्या अरसीक रुक्ष स्वभावाल कंटाळलेली, आत्मविश्वास हरवलेली. नायीका. अचानक " आज फिर जीने के तमन्ना है ... आज फिर मरनेका का इरादा है..." गाण्यात तीला गवसलेले मोकळे आकाश . ते मिळाल्यानंतर लहान मुलासारखे तीचे धावत जाणे हे खूप काही सांगून जाते. " कल तक आप लग रही थी एक चालीस साल की बुढी औरत..... और आज " हा राजूचा त्या नंतरचा संवाद नसता तरी चालले असते इतका. सुंदर अभिनय केला आहे वहिदाने. रोझी बंडखोर आहे. मार्को बरोबरचे आस्तित्वहीन जगणे तीला नको आहे. स्वतःची कला, जगण्यातला मोकळेपणा तीला हवा आहे. राजूला समजून घ्यायला ती चुक हे तीच्या बोलण्यतल्या सूरामधून तीच्या हालचालींमधून शब्दांशिवायही समजून येते.
या चित्रपता राजु आणि रोझी हे देव आनंद आणि वहिदा रहेमान म्हणून समोर येत नाहीत. ते राजू आणि रोझीच रहातात. हिंदी चित्रपटात असे फार कमी वेळा घडलेय. पार्टीत त्याला दुर्लक्षुन सगळे रोझी कडे जातात त्या वेळेस देव आनंदचा हसरा चेहेरा दिग्दर्शकाला जे हवे ते शब्दाशिवाय बोलून जातो.
या चित्रपटात नायक , खलनायक असे कोणीच नाही. राजू गाईडची गोष्ट आहे म्हणून तो नायक इतकेच. मार्को चा राग येत नाही. रोझीच्या अती व्यवहारी असण्याबद्दल तीची काही चूक आहे असे वाटत नाही. किंवा राजू च्या शहराकडे पाठ फिरवून अज्ञात वाट चोखाळणे यातही काही धक्कादायक वाटत नाही. ती अगदीसहज प्रतिक्रीया वाटते.
गाईड हा जगातला सर्वोत्तम चित्रपट आहे असे म्हणत नाही. पण पात्रांचा विचार केला तर तो एक खराखुरा चित्रपट आहे हे मात्र नक्की. पटकथा , चित्रीकरण संवाद गीत संगीत अभिनय सर्वच बाजूनी उजवा असलेला एक सशक्त चित्रपट आहे .म्हणूनच की काय आजही ५५ वर्षांनंतरही आजही " गाईड" तितकीच मोहीनी घालतो.
यातील गाण्यांबद्दल पुन्हा पुन्हा कधीतरी........

नाट्यआस्वाद

प्रतिक्रिया

निमिष ध.'s picture

4 Feb 2020 - 8:00 pm | निमिष ध.

सुंदर ओळख करून दिलीत विजुभाऊ. गाईड माझ्याही आवडत्या चित्रपटांमधील एक आहे. खरं म्हणजे राजूचा तुरूंगातून बाहेर पडून शेवटाकडे जाणारा भाग मला खुप आवडतो. त्याचे ते स्वप्नातील स्वतःशीच होणारे द्वंद्व एक अविस्मरणीय सीन आहे.

अर्रर्रर्र... 'गाईड' हा नव्व्याण्णव टक्के 'गोल्डी'चा ऊर्फ विजय आनंदचा चित्रपट आहे आणि चित्रपट परिचयात त्याचेच नाव नाही! गोल्डीने साथ सोडली आणि देव आनंद हा देव आनंद राहिला नाही. असो. ह्या चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेमवर गोल्डीची छाप आहे. प्रत्येक गाण्याचे टेकिंग बघा. तो जंगलातला वहिदा आणि बंजारा मुलीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचा (तिचे नाव विसरलो) डान्स बघा. त्या मुलीइतकी इंटेसिंंटी वहिदाच्या डान्स मध्ये यावी म्हणून त्या एक्स्ट्रा ऍक्टरेसला गोल्डीने वहिदाच्या जोडीने नाचायला लावले तेव्हा कुठे वहिदाचं बेभानपण तिच्या स्टेप्समध्ये उतरलं. बादवे चित्रपटाचा शेवट हा मूळ कादंबरीपेक्षा वेगळा आहे. कादंबरीत पाऊस पडत नाही. इथे उगीचच राजू उर्फ स्वामीजींच्या आत्म्याच्या तोंडी उदात्त स्वगत घातलं आहे. ती कदाचित व्यावसायिकतेसाठी केलेली तडजोड असावी.

माणसाच्या प्रवाहपतीत वृत्तीचं दर्शन टोकदारपणे घडवणारा हा एक व्यावसायिक सिनेमा म्हणूनच भावतोही सामान्य माणसाला. या निमित्ताने विजय आनंद यांना श्रद्धांजली! अ ट्रूली डायरेक्टर्स कट...

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Feb 2020 - 8:37 am | ज्ञानोबाचे पैजार

आजपर्यंत अनेक वेळा पाहिलेला गाईड विजुभाउंच्या नजरेतून वाचतानाही तेवढीच मजा आली.

लेखात विजय आनंदचे नाव नाही हे थोडेसे खटकले, गाईड हा सर्वस्वी त्याचाच चित्रपट होता.

पैजारबुवा,

रमेश आठवले's picture

5 Feb 2020 - 12:53 am | रमेश आठवले

पर्ल बक या अमेरिकेन लेखिकेने गाईड हा सिनेमा इंग्लिश भाषेत निर्माण केला होता.

श्वेता२४'s picture

6 Feb 2020 - 12:30 pm | श्वेता२४

मी अजुन हा चित्रपट पाहिला नाही. पण तुमचे हे रसग्रहण वाचून नक्की बघेन. यातील गाणी मात्र ऑल टाईम फेवरीट आहेत माझी.

उत्तम ओळख करून दिलीत.

नुसतं नाव ऐकलं होतं या चित्रपटाचं. आज स्टोरी कळली.

सिरुसेरि's picture

6 Feb 2020 - 6:32 pm | सिरुसेरि

गाईड चित्रपटाची सुंदर ओळख . पहिल्यांदा जेव्हा दुरदर्शनवर गाईड पाहिला तेव्हा डोक्यावरुनच गेला . कारण तोपर्यंत देव आनंदचे शहरी , हलके फुलके चित्रपट बघितले होते . पुढे जेव्हा अनेकदा हा चित्रपट पाहिला , तेव्हा प्रत्येक वेळेला , त्यामधील नव नवीन वैशिष्ट्ये जाणवत गेली . अगदी नवकेतन या निर्मिती संस्थेच्या नावाला साजेशी . हा एक कल्ट हिट सिनेमा आहे . उदयपुर , चितोडगड मधील चित्रीकरण , सपेरा डान्स , "अल्ला मेघ दे , पानी दे रे " , " वहां कौन है तेरा " हि एस डी बर्मनने गायलेली गाणी , आणी त्याला असलेला बासरीचा साज या सर्वच बाबींमुळे गाईड उल्लेखनीय झाला आहे .

गाईड चित्रपटाचा दिग्दर्शक हा मुद्दाम वेगळ्या लेखाचा विषय ठेवलाय.
चित्रपटातील दिग्दर्शकाच्या म्हणून सांगाव्या अशा खूप जागा आहेत. ( उदा: गाईडचा दोन पंडीतांसोबतचा संवाद.) गाईडचा स्वतःसोबतचा संवाद हा फार ढोबळ पणे घेतला आहे.
या चित्रपटात रोझीचे आणि मार्कोचे संबन्ध जसे दाखवलेत त्यासाठी दिग्दर्शकाला खरेच सलाम. कुठेही भडक पणा न आणता त्याने मार्कोचे पात्र रेखाटले आहे.
पण या बद्दल वेगळ्या लेखात लिहीन.