कर्नाटका समुद्र आणि सह्याद्री - १

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
14 Jan 2020 - 11:10 pm

कर्नाटका - समुद्र आणि सह्याद्री - १

कर्नाटक राज्यास कारवार ते मंगळूर समुद्र किनारा पश्चिमेला लाभला आहे. राज्याच्या पूर्व भागातले हंपी, बेंगळुरु हे भाग पाहिले होते पण सह्याद्रीचा पश्चिम घाट कसा आहे हे पाहण्याची उत्सुकता होती. 'कोस्टल कर्नाटका' #नावाच्या सहली आहेत त्यात काही ठिकाणं दाखवतात. बरीचशी धार्मिकच आहेत. नकाशे आणि माहिती वाचून एक छोटीशी सहल आखली. त्यात तीनचार समुद्र किनारे, एक ऐतिहासिक ठिकाण ठरवले. रेल्वे आणि स्थानिक एसटी बस मार्गे जेवढे होईल तेवढेच. एक धावती भेट.
शिवाय ट्रेकिंग करता येण्यासारख्या काही जागा तपासणे हा हेतू होताच. भाषेची अडचण येऊ शकेल का शंका कारण आतल्या भागातले लोक स्थानिक भाषाच समजतात.

फक्त रेल्वे आरक्षण. कोकण रेल्वेच्या एक्सप्रेस गाड्या कारवार आणि मंगळूर (जंक्शनला) नक्की थांबतात. पण इतर ठिकाणी काही ठराविकच. मत्स्यगंधा एक्स (12619) ही कोकण आणि गोव्यात फार अपरात्री जात असल्याने तिकडचे प्रवासी याचे आरक्षण करत नाहीत. पुढे गोकर्ण, कुमटा, होनावर, भटकळ वगैरेला थांबते पण भल्या पहाटेच.
१) ठाणे(15:45) ते मुर्डेश्वर (04:00), 12619 .मत्स्यगंधा एक्स
२) मुर्डेश्वर (09:10) ते गोकर्ण रोड (10:10),
56640 मंगळूर-मडगाव passenger. 80 km. बसपेक्षा ट्रेन फास्ट जाते.
३) कुमटा (17:00) ते ठाणे (03:30), 12134. किंवा 12620.

मत्स्यगंधा एक्स ही कर्नाटक कोकणाची गाडी. तुळू भाषेत हळू आवाजात बोलणारे प्रवासी अधिक. आपण जे उडुपि,मंगळूर, इत्यादी नावे म्हणतो त्यास त्यांची नावे वेगळी आहेत असं कळलं.
मुर्डेश्वरास गाडी उशीरा पोहोचली तरी उत्तमच. रिक्षावाले दोन किमी जाण्यास पहाटे ८० रु घेतात. सहाला उजाडले, समुद्र आणि देऊळ ,गोपूर, शंकर दिसायला लागले. संक्रांत जवळ आल्याने शबरीमलैला ( केरळ) जाणारे काळे कपडेवाले भाविक पुरुषच अधिक. लहान मुलीही होत्या. त्यांनी गळ्यात घंटा अडकवलेल्या. स्त्रियांना कोर्टाने जा सांगितले तरी अजून बऱ्याच स्त्रियांचाच विरोध आहे. तर हे सर्वजण टेंपो, सुमो वगैरे वाहने( झेंडे लावलेल्या) करून फिरत फिरत ११ तारखेपर्यंत पायथ्याला जातात. सार्वजनिक स्वच्छतागृहे, समुद्र,किंवा रेल्वे डब्याच्या टॉइलेटांतही आंघोळी करत ,राहण्याचा खर्च वाचवत पुढे जात असतात. त्यांच्यांच तीसचाळीस गाड्या होत्या.

मुर्डेश्वरास किनाऱ्यावर एक जुने देऊळ होते कंदुका खडकावर. रावणाला फसवून गुराख्याच्या रुपातल्या गणपतीने शंकराचे आत्मलिंग गोकर्णला ठेवल्यावर रावण चिडला व त्याने इतर वस्तू इकडे तिकडे भिरकावल्या तेव्हा गुंडाळलेले वस्त्र इकडे दूर येऊन पडले अशी पौराणिक कथा आहे.
आता इथे एका नवीन शेट्टी नावाच्या भाविकाने खूप खर्च करून नवीन रूप दिले आहे. एकवीस मजली अद्ययावत गोपूर त्यापैकीच एक. तिथे लिफ्टने वरती जाऊन दृष्य पाहता येते. ( तिकिट १०/-, सातला सुरू होते.) वरून दृष्य पाहाणे बऱ्याच मुंबईकरांना नाविन्य नसले तरी इथे इतरांना गंमत वाटेल. एक भला मोठा शंकर(पुतळा) आहे तो, किनारा, कोळ्यांच्या होड्या वगैरे वरून छान वाटतात.
फोटो १) मुर्डेश्वर

सर्व पाहायला दोन तास पुरेसे होतात. अगदी समुद्राकडे SN CANTEEN आहे पण तिकडे पायऱ्या चढून वेळ न घालवता बाजूच्या बीचवरच्याच टपऱ्यावर गरम वडे इडली चहा घेऊन परत मुर्डेश्वर स्टेशनास आलो.
56640 passenger वेळेवर आली. रिजव डब्यात रिकामा असला तरी कुणाला बसून देत नाहीत. गोकर्ण स्टेशनला उतरल्यावर रिक्षानेच १० किमी जावे लागते(२००रु). कुमटा-गोकर्ण बसेस एक किमी दुरून जातात.
अरुंद रस्त्यांचं, दोन्ही बाजूस छोटी दुकानं असणारं गोकर्ण गाव इथल्या गोकर्ण- महाबळेश्वर देवळामुळे प्रसिद्ध आहे. बस स्टँडजवळच काही हॉटेल्स आहेत. कामत लॉज बरे वाटल्याने रुम घेतली. ( एसी/नॉन एसी ८५०/१२००. फोन 9341730834, 9481950834, 7483379661 ). रुमवर सामान टाकून प्रथम जवळच्याच राघवेंद्र खानावळीत जेवलो. फारिनरही तिकडेच खात होते. एकूण परिस्थिती बिकट होती. रस्त्यावर बऱ्याच भाजीवाल्या मुळे आणि लाल माठ विकत होते त्याचं रहस्य उलगडलं. मुळ्याचीच खूप पातळ भाजी आमटी जेवणात होती. असो. मग रुमवर थोडा आराम करून समुद्र,देवळासाठी बाहेर पडलो. ज्यास कार स्ट्रीट म्हणतात त्या थोड्या रुंद रस्त्याच्या दुतर्फा फारिनरांसाठी कपडे, माळा यांची दुकाने लागलेली. गेल्या वर्षापासून गोव्यात येणारे परदेशी कमी झाले आहेत. तिकडे गर्दी झाली की इकडच्या समुद्राकडे येतात. वाटेतच रथ दिसला आणि पुढे देऊळ.
फोटो २) रथ ,गोकर्ण

देऊळ नेहमीप्रमाणेच बंद. साडे पाचला उघडणार. मग जवळच समुद्रावर गेलो. किनारा छानच. थोडे फारिनर जरा दूर जाऊन पाण्यात गेलेले. उतार खुप छान आणि स्वच्छ. बाजूला एका ठिकाणी प्लास्टिक कचरा गोळा करून ठेवला होता. इथे आणखी चारपाच बीचेस आहेत. कुडले,ओम, प्यारडाईस वगैरे. तिथे एक टेकाड ओलांडून जाता येते. जरा पाय भिजवून परत आलो. देवळापर्यंत शंभर मिटरांत मसाल्याची चारपाच दुकाने होती. काजू (७००/-कि), तुकडा काजू (३८०/- किलो), लवंग (४००/- १००ग्राम) ,वेलची (४८०/- १००ग्राम). थोडी खरेदी झाली. अजून देऊळ उघडायला पाऊण तास काढायचा होता. दर्शनासाठी न थांबताच रुमवर परतलो. तसं गोकर्ण सुस्त शांत गाव आहे. आवडलं. हे ठिकाण 'करण्याचं' नसून रेंगाळण्याचं आहे. दुसऱ्या दिवशी रुम सोडून कुमटा (२४ किमी) येथे गेलो. जे अंतर काल ट्रेनने २५ मिनिटांत कापले त्यास बसने दीड तास लागला. रस्ते साधेच पण छान आहेत. बसेस स्वच्छ. कुमट्याहून हुबळीकडे जाणाऱ्या बसने शिरसी (६० किमी) येथे निघालो. इकडे बस तिकिट एक रु किमी. उत्तम लेलँड बसेस. शिरसी ६०० मिटरस उंचावर सह्याद्रीच्या वर. रस्त्याला दोन्ही बाजूस दाट झाडी. खाली सूर्यप्रकाश येत नाही कुठेकुठे. ४० किमीचा घाट चढण आहे. ( एवढा ट्रेक शक्य नाही.)पण इकडच्या प्रवाशांना घाट लागून ओकाऱ्या होत नाहीत. वाटेत दोनतीन वाड्या/पाडे बाकी वस्ती नाही.
शिरसी बरेच मोठे शहर वाटले. झटपट एका हॉटेलात रुम घेतली. गावातल्याच मरिकांबा देवळाकडे गेलो. दीड किमी. मोठे प्रशस्त आहे. स्थापना १६८०!

फोटो ३) मरिकांबा, शिरसी.

मठ/देऊळ पाहून बनवासी (२०किमी) जाणाऱ्या सिटी बसचा स्टॉप समोरच आहे तिथून बनवासीला गेलो. दर पंधरा वीस मिनिटांनी बसेस आहेत. बस स्टँडपासून दीड किमीवर मधुकेश्वरा मंदिर आहे. देवळापासचा शंभर मिटरस रस्ता खूप रुंद आहे. तिथे रथयात्रा, कदंबोत्सव डिसेंबरात होतो. एका बाजूस वरदा नदी, आणि पश्चिमाभिमुख मंदिर .मोठा नंदी, दगडी पलंग खास आहेत. दोन तास पुरतात. एक ते दोन साधा भातामटीचा प्रसाद आहे. " ऊटा माडी बन्नी." पण इकडे फारसे पर्यटक येत नसावेत. देवळात पुजा होते कित्येक वर्षं.
((चौथे ते सहावे शतकांत कदंब राजे, चौदा ते सोळाव्या शतकात हंपिचे राजे असे मिश्र बांधकाम आहे. )) एका खोलीत बरेच शिलालेख ठेवले आहेत. कन्नडा भाषेत आहेत.
देवळातले काही फोटो, विडिओ--
फोटो ४)पाटी, मधुकेश्वरा

फोटो ५) शिलालेख देवळातला

फोटो ६)देव्हारा. बनवासी. हा बहुतेक नंतर इथे ठेवला आहे.

फोटो ७)खांब,बनवासी.

फोटो ८ ) नंदी,बनवासी.

फोटो ९)वरचा कळस. इथे पूर्वी नागपूजा होती म्हणतात.

फोटो १०)ऐरावतावर इंद्र

फोटो ११) एका शुभशकुनी काल्पनिक प्राण्यावर आरुढ

विडिओज -

१) मंदिर मधुकेश्वरा. १० एमबी.
https://youtu.be/q7i6nHwYCRs
२)दगडी पलंग
https://youtu.be/z-1gINLehcc

दुसरे दिवशी शिरसी सोडून कुमटा येथे परत गेलो. वाटेत एका ठिकाणी आत २० किमीवर 'याना' जागा आहे. दोनतीन विचित्र खडक ट्रेकिंगवाल्यांसाठी आहेत. तिकडे गेलो नाही. कुमटालाही बीच आहे. एक महाळसा नारायणी मंदिर बाजारात आहे ते पाहिले. कुमटा बस स्टँड ते रेल्वे स्टेशन चालत दहा मिनिटांवर आहे
हे बरे कामाचे.
आसपासची न पाहिलेली ठिकाणे -
कुमटा ते होनावर १४ किमी.
होनावर इथे - इडगुंजी, गेरसोप्पा (जोग धबधब्याचा तळ), कासारगोड बीच आणि अप्सराकोंडा धबधबा आहे. यासाठी दोन दिवस वाढवायला लागतील.
समुद्र आणि सह्याद्री पुन्हा बोलावत आहे.
-----–-----
# कोस्टल कर्नाटका सहली - अनुभव ट्रावल्सची टुअर plan itinerary आणि कॉस्ट पाहा.

प्रतिक्रिया

प्रसाद_१९८२'s picture

15 Jan 2020 - 10:47 am | प्रसाद_१९८२

माहितीपूर्ण प्रवास लेखन.
-
आवडले.

शशिकांत ओक's picture

15 Jan 2020 - 10:56 am | शशिकांत ओक

पर्यटन स्थलांच्या नोंदी, वाहन, भोजनादि व्यवस्था यातून चटपटीतपणा असलेल्या उत्सुकांची सोय करून दिली आहेत.

श्वेता२४'s picture

15 Jan 2020 - 11:20 am | श्वेता२४

नेहमीप्रमाणेच सुंदर माहिती. दोनवेळा गोकर्ण व मुरुडेश्वरला जाऊन आलेय. मुरुडेश्वर मध्ये मंदीरात आत (बहुदा प्रदक्षिणा मार्गावर) वॅक्स म्युझिअम आहे. त्यात रावणाची गोकर्ण लिंगस्थापनेच्या कथेच्या अनुषंगाने पुतळ्यांची उभारणी केली आहे. ते पाहिले की नाही?

कंजूस's picture

15 Jan 2020 - 11:46 am | कंजूस

श्वेता२४,

देवळाच्या मागे जो मोठा शंकरपुतळा आहे तिकडेच स्ट्याच्यू पार्कात सर्व पुतळे आहेत. पण तिकडे गेलो नाही. रेल्वेतून उतरल्यावर लगेच गेल्याने बरोबर ब्यागा होत्या. इकडे थोडे दोन तासात फिरून गोकर्णला जाऊन राहायचं असंच ठरवलं होतं. जालावरच्या माहितीप्रमाणे प्लान केलं. तसा आता पुतळ्यांचा कंटाळा आलाय.
आख्यायिका तिथे ऐकण्यासाठी ठीक पण पटणाऱ्या नसतात. हिमालयात कुठे रावणाने तपश्चर्या केल्यावर तो गोकर्ण मुर्डेश्वर मार्गे पश्चिम किनाऱ्याने श्रीलंकेला शॉर्टकट कशाला मारेल? :)

तेजस आठवले's picture

15 Jan 2020 - 6:54 pm | तेजस आठवले

रावणाला डोसे आवडत असतील किंवा त्याला पण दाऊद सारखा दम दिलेला असणार.
अवांतर : आमचा एक मॅनेजर तिकिटांच्या अनुपलब्धतेमुळे चेन्नई-मुंबई-हॉंगकॉंग-जपान-कॅलिफोर्निया-डल्लास ह्या मार्गाने आम्रविकेत प्रवेश करता झाला होता.

सायंसंध्या करताना सुर्याला अर्ध्य द्यायला तो पश्चिम किनार्‍याला आला. त्याचे स्वतःचे विमान होते त्यामुळे कनेक्टिंग फ्लाईट्ची झंझट नव्हती.

श्वेता२४'s picture

15 Jan 2020 - 3:23 pm | श्वेता२४

हिमालयात कुठे रावणाने तपश्चर्या केल्यावर तो गोकर्ण मुर्डेश्वर मार्गे पश्चिम किनाऱ्याने श्रीलंकेला शॉर्टकट कशाला मारेल? :)

खरंय.......!

कुमार१'s picture

15 Jan 2020 - 4:48 pm | कुमार१

सुंदर !

लेख उत्तम हो बाकी. आटोपता घेतल्यासारखा वाटला

ही सहल एवढीच मर्यादित ठेवली होती. बनवासीबद्दल माहिती विकिवर भरपूर आहे. (Search : Kadambas of Karnataka. / Kadam bas of Goa.)
बनवासीचा उल्लेख बौद्ध काळापासून आहे. पण पुरावे सापडत नव्हते. ते हल्लीच एका ठिकाणी विटांच्या बांधकाम स्वरुपात मिळाले आहेत. ती कदंब राजांची माहिती दिली नाही.

प्रचेतस's picture

16 Jan 2020 - 8:22 am | प्रचेतस

भरपूर फिरणं झालं काका.
वृत्तांत आवडला.

संजय पाटिल's picture

17 Jan 2020 - 1:12 pm | संजय पाटिल

अरे वा!! छान...
मी पुढच्याच आठवड्यात जायचं ठरवत होतो त्यात तुमच्या लेखाने मस्त मुड बनवला...
आता नक्की जाणार....

संजय पाटिल, नक्की जा. स्वत: गेल्यास हव्या त्या ठिकाणी जास्ती वेळ देता येईल. स्वस्तात सहल होते.
दुसरी अनेक स्थळं उडुपि -मंगळूर आणि चिकमंगळूर या त्रिकोणात आहेत पण हे सर्व एकदम करण्यास कार हवी किंवा वेगळी सहल करणे.

कंजूस's picture

17 Jan 2020 - 1:38 pm | कंजूस

दुसरी बरीच नेचर रिझॉटची ठिकाणे माहिती पत्रके आहेत. कुणास हवी असल्यास देतो.

अभिरुप's picture

17 Jan 2020 - 1:40 pm | अभिरुप

अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण वर्णन.
पु. भा. प्र.

कंजूस's picture

17 Jan 2020 - 6:19 pm | कंजूस

Nature and adventure camps website हा प्रोजेक्ट अगोदर कर्नाटक सरकार आणि Tiger Tops यांचा होता. आता बहुतेक कर्नाटक सरकारचा आहे. बारा adventure camps आहेत. तीन येणार आहेत.

दुर्गविहारी's picture

17 Jan 2020 - 7:49 pm | दुर्गविहारी

अतिशय सुंदर लिखाण आणि उपयुक्त माहिती. आणखी असेच नवनवीन ठिकाणाना भेट देत रहा आणि मि.पा. वर धागे लिहा.

Nitin Palkar's picture

17 Jan 2020 - 8:23 pm | Nitin Palkar

तुमच्या नेहमीच्या लेखनाप्रमाणेच सुंदर आणि माहितीपूर्ण!

चौकटराजा's picture

26 Jan 2020 - 6:28 am | चौकटराजा

फेब्रु 2020 मधे भीमबेटका व ओर्छा अशी सहल करणार आहे. नंतर दीव चा प्लान मनात आहे .तसेच याना ही डोक्यात आहे. आपला व्रुतांत जस मला हवा असतो तसाच आला आहे. 1972 मधे गोकर्ण शिरसी ला गेलो होतो. त्यावेळी शिरसीला 15 नये पैसे इडली साम्बार खाल्याचे आजही आठवते आहे. फारच रम्य परिसर आहे तो !

याना'साठी हे कुमट्याहून बस आहे. बारापंधरा किमी. पण शिरसीवरून याना गेल्यावर परत वर शिरसीच्या हॉटेलला जाणे वेळेचा अपव्यय होतो.
शिरसीपासून -
१'२)सोंडा, सहस्रलिंग - हे शिरसी येल्लापूर रोड उत्तरेकडे.
३)बनवासी - शिरसीच्या पूर्वेला,
४)उन्चाली फॉल्स(लुसिंग्टन) हे पश्चिमेला,
५)जोग फॉल्स (तळगुप्पा मार्गे )दक्षिणेल),
६)याना - नैऋत्येला घाट उतरून
असे असल्याने सर्व ठिकाणे होत नाहीत.
------------
@चौकटराजा, ओर्छा छानच आहे. भीमबेटकाची चित्रे पाहिली नाहीत.

सुधीर कांदळकर's picture

27 Jan 2020 - 8:38 pm | सुधीर कांदळकर

वर्णन, फोटो छान जमले आहे.

माझ्या आठवणी ताज्या झाल्या. मुर्डेश्वरला मंदीर परिसरात गीतोपदेशाचा सुंदर देखावा आहे. तिथे समुद्रात घुसलेल्या भागात एक शाकाहारी उपाहारगृह आहे. तीन बाजूंना समुद्र दिसतो. भल्या मोठ्या ताटात जेवण मिळते. मुंबईकरांना एवढे जास्त जेवण पाहून भिती वाटते पण साधे चविष्ट आणि हलके असते.

नंतर एकदा मुर्डेश्वरला मित्रांबरोबर रात्री पोहोचलो. आर एन शेट्टीच्या वसतीगृहात उतरलो. पुण्यत आलो असे वाटावे अशी मोठ्ठी सूचनांची जंत्री फलकावर. मद्यपान निषिद्ध, एका रूमवर दोनच ग्लास मिळतील, नियमभंग केल्यास त्वरित हाकलून देण्यात येतील, पैसे परत मिळणार वगैरे वगैरे. २ ऑक्टोबर तारीख होती. त्यामुळे मद्यपानाला जास्तच रंगत आली.

तीसपस्तीस वर्षांपूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी एकदा शिरसीला होतो. दर्शनासाठी त्या मंदिराबाहेर मोठ्ठी रांग होती. आमचे उत्तमांग, तिची भगिनी आणि नवरा, मुले रांगेत होती. नंतर नंबराची टोकन दिली गेली. तीनशेपलीकडचा नंबर होता. ध्वनीवर्धकावरून नंबरांचा पुकारा होत होता. तेव्हा कन्नड संख्यांची ओळख झाली. अरवत्त म्हणजे साठ आणि अरवत्त वंदु ६१ पासून अरवत्त हंबत्तू ६९ पर्यंत अद्याप लक्षात आहेत.

छान लेखाबद्दल धन्यवाद.

वाह. सुंदर भटकंती आणि नेटकी माहिती. या भागात कुठेतरी असाही सागरी रस्ता आहे ज्याच्या एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला नदी की खाडी असे आहे. आणि मध्ये चिंचोळा रस्ता. मागे कुणीतरी एक फोटो दाखवला होता. ते ठिकाण पहायच्या यादीत आहे.