दोन मिनि मायक्रो पोस्त्स

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
8 Dec 2019 - 2:09 pm
गाभा: 

"कांदे पोहे" कार्यक्रमात आपणास नकारलेल्या मुलिची जेंव्हा काहि वर्षानंतर लग्न समारंभ वा तत्सम कार्यक्रमात भेट होते व ति आपल्या पोट सुटलेल्या व टकल्या नव~याची ओळ्ख करुन देते त्या वेळी मनात कोणत्या भावना असाव्यात..आनंद..सुड..अनुकंपा?
---------------------------
कांदे पोहे प्रोग्रॅम मध्ये मी मागे एकांकडून असं एकलंय की मुलगी बघायला जाताना मुलीकडे कमी आणि मुलीच्या आईकडे नीट बघावं. कारण जी मुलगी बघायला जातो ती आणखी 15/20 वर्षानंतर कशी दिसेल याची तिच्या आईकडे बघून कल्पना येते

प्रतिक्रिया

Nitin Palkar's picture

8 Dec 2019 - 2:17 pm | Nitin Palkar

पूर्वार्धाबद्दल तटस्थ किंवा खरं तर उदासीन हा शब्द अधिक योग्य.
उत्तरार्धाबाबत- शितावरून भाताची परीक्षा हा वाक्प्रचार वाचला होता पण भटवरून शिताची परीक्षा करण्याची उफराटी पद्धत नवीनच वाटते....

मुलगी समजा बापावर पडली असेल, तर बापाकडे पाहून त्याप्रमाणे,
१५-२० वर्ष्यानी ती टकली थोराड कानामागे केसांचे पुंज.… अशी कल्पना तरी कशी करवेल ?

जॉनविक्क's picture

15 Dec 2019 - 8:05 pm | जॉनविक्क

मुलीच्या आईकडे प्रेमाने पहावे सोबतच कात्री चालवून तिचे केस कापून त्याचे गंगावन बापाच्या टाकल्यावर ठेवावे आणी अंदाज घ्यावा :)) =))

मुलीच्या आईकडे ' नीट ' बघताना आजूबाजूच्या लोकांचा गैरसमज झाला तर ?

खिलजि's picture

11 Dec 2019 - 6:10 pm | खिलजि

हे असं होईल ..

===================

वऱ्हाड घेऊन दारात आलोय

वाजंत्री वाजतेय

कुठं लपून बसलीय

दिसलीच नाही , सासूबाई का लाजतेय ?

ढोल ताशांच्या गजरामध्ये

गोंधळ म्या घातला

नाचता नाचता, तिचा समजूनि

सासूचा हात पकडला

मुंडावळ्या सारुनी बाजूला

खसकन मारला डोळा

सासू लाजून चूर झाली

सासरा पडला काळानिळा

गडबड होता उगा फुकाची

भानावर म्या आलो

माफी मागुनी सासूची

गुमान बोहल्यावर चढलो

पाषाणभेद's picture

11 Dec 2019 - 8:17 pm | पाषाणभेद

सही खिलजी. ( मूळ नाव खिल. जी आदरार्थाने)
मस्त. वेगळीच लिहायला हवी होती.

कंजूस's picture

9 Dec 2019 - 5:13 am | कंजूस

सध्या सासऱ्याच्या बँक ब्यालन्सकडे लक्ष ठेवतात. एक धरलं तर दुसरं सोडावं लागतं.

धर्मराजमुटके's picture

9 Dec 2019 - 6:00 pm | धर्मराजमुटके

वॉव ! केवळ आध्यात्मिक लेख ! प्रचंड आवडला आहे हे वेगळे सांगणे न लगे !
मृत्युनंतर स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून आयुष्यभर दारु प्यायची नाही, व्याभिचार करायचा नाही वगैरे वगैरे !

पाषाणभेद's picture

11 Dec 2019 - 8:15 pm | पाषाणभेद

विरप्पन श्रीलंकेत गेला अन पेढे फारच महाग म्हणून बाकरवडी साडीत रंग ओला असतो. रॉकेट महाग पोपट दरवाजा चित्रपट आहे. मायाळू गरबा फारच हिमालय नाही.

आत्ता कुठं लक्षात आलं की पाषाण भेद कसा करायचा असतो.
;)

विजुभाऊ's picture

5 Mar 2020 - 7:29 am | विजुभाऊ

हाण …… तेज्या……..
लैच्च बेक्कार हसत सुटलोय प्रतिसाद वाचून.

पाषाणभेद's picture

12 Dec 2019 - 7:24 am | पाषाणभेद

अकुंच्या लेखनात भरपूर पोटेंशीअल असते. त्यांनी ट्विटरसारखे लेखन करून मराठी ब्लॉगरच्या/ फोरमच्य क्षेत्रात क्रांती आणली आहे. आधीच्या धाग्यात न का उघडकीला येवो पण या घाग्याच्या नावातच त्यांनी त्याची चुणूक दाखवली आहे. एक नव्हे तर दोन दोन मायक्रो ब्लॉग त्यांनी येथे लिहून यापुढील शतकात मराठी ब्लॉगची काय स्थिती राहणार आहे ते सुचित केले आहे.

इतिहासाचे लेखन तर सारेच करू शकतात कारण तो घडून गेलेला असतो. पण भविष्यकाळाचे कथन करणे ज्यांना जमते तेच द्रष्टे असतात.

मुक्त विहारि's picture

13 Dec 2019 - 9:00 pm | मुक्त विहारि

आवडले

चौकस२१२'s picture

5 Mar 2020 - 7:51 am | चौकस२१२

पोट सुटलेल्या व टकल्या..
मास्तर, अहो हे आपण त्यावेळेल्स कोणत्या परीस्थित आहोत त्यावर अवलंबून नाही का? स्वतः आपणच जर तसे असलो तर कसला आनंद..सुड..अनुकंपा? आपलीच लाज !
- आई वरून मुलीचा अंदाज! ... एकदा मित्राचा किस्सा .. आमुक अमुक कुटुंबातील मुलगी सांगून आली आहे हे ऐकल्यावर तो २ दिवस हवेत होता कारण ..त्याला आठवलं कि अरे हि तर आपण लहान असल्यापासून बघत असलेल्या त्या शाळेतील छान दिसणाऱ्या बाईंची मुलगी ! वाह लॉटरी लागली कि आपली !

कांदे पोहे प्रसंग नंतर हिरमुसलं तोंड घेऊन आला.. का रे विचारला तर म्हणाला... उगाच उडत होतो... पोरगी आई नाही, बापावर गेलेली निघाली ...

चौथा कोनाडा's picture

8 Mar 2020 - 5:22 pm | चौथा कोनाडा

अश्या कार्यक्रमांना फक्त "कांदे पोहे" या पदार्थाचा आस्वाद घ्यावा, फार इचार करू नये !