कोळंबीची खिचडी (छायाचित्रासह)

पांथस्थ's picture
पांथस्थ in पाककृती
11 Nov 2008 - 10:57 pm

पाककृती येथुन घेतलेली आहे - कोळंबीची खिचडी

१. ताजे कोळंबी
मी मध्यम आकाराचे टायगर प्रॉन्स वापरले आहेत

२. कोळंबी परतुन घेणे
लवंग, हिरवी वेलची, दालचिनी, शहाजिरे, आल-लसुण पेस्ट, कोळंबी, हळद, गरम मसाला, तिखट, धने-जिरे पावडर हे सगळं ह्याच क्रमात तेलावर परतुन घेणे

३. तांदुळ, नारळाचे दुध, पाणी घालुन मंद आचेवर शिजविण्यास ठेवणे
दोन वाट्या तांदळाला दोन वाटि नारळाचे दुध, दोन वाट्या पाणी आणि चवीनुसार मिठ. खिचडी एकदम मंद आचेवर होउ देणे.

४. खिचडी तयार

५. मारा हात
काय सुटले का पाणी तोंडाला?

हि पाकृ करण्यास अत्यंत सोपी आहे आणि झटपट होते. आणि चव तर काहि विचारु नका. पोट आणि डोके एकदम थंड :)

तेव्हा मंडळी लागा कामाला. तुमचे रसानुभव कळविण्यास विसरु नका!!!

प्रतिक्रिया

साती's picture

11 Nov 2008 - 11:34 pm | साती

सचित्र पा. कृ. आवडली.
साती

यशोधरा's picture

11 Nov 2008 - 11:44 pm | यशोधरा

मस्तच!!

विसोबा खेचर's picture

11 Nov 2008 - 11:51 pm | विसोबा खेचर

सं प लो...!

शब्द नाहीत...

चित्र पाहून खूप मानसिक त्रास झाला...

विठ्ठला, सोडव रे बा या मोहमायेच्या दुनियेतून..! :)

पांथस्थराव, आपल्याला सलाम...

कोलंबीची खिचडी ही
असे किती चवदार,
घासाघासावर वाटे
करावा जीव उदार..!

:)

तात्या.

पक्या's picture

11 Nov 2008 - 11:55 pm | पक्या

लाजवाब !!!
चित्रे पण खलास एकदम.

पक्या's picture

11 Nov 2008 - 11:55 pm | पक्या

लाजवाब !!!
चित्रे पण खलास एकदम.

वल्लरी's picture

12 Nov 2008 - 12:05 am | वल्लरी

वा!!!!!!!!!!!
छानचं....

सुक्या's picture

12 Nov 2008 - 12:17 am | सुक्या

पाककृती उत्तम आहे. रविवारी बनवायला हवी.
परंतु छायाचित्रे देउन मानसिक छळ करु नये ही विनंती.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

संताजी धनाजी's picture

20 Nov 2008 - 3:06 pm | संताजी धनाजी

च्यायला हे बरं आहे. मागच्या वेळी आम्ही एका लेखात जेवणाची छायाचित्रे टाकली नव्हती तर लोकांचा जीव वर खाली झाला होता. आणि आता छायाचित्रे टाकली आहेत परत तेच. X(

नक्की काय ते ठरवा राव! ;)

- संताजी धनाजी

सहज's picture

12 Nov 2008 - 5:00 pm | सहज

छायाचित्रांनी मजा आणली पांथस्थ.

यापुढे अश्याच प्रकारच्या पाककृती टाका भौ!

वेताळ's picture

13 Nov 2008 - 1:28 pm | वेताळ

मज्जा आली राव. एकदम झक्कास्स्स्स्स्स्स्....तोंडाला पाणी सुटते बघुन.येत्या बुधवारी नक्की कोंलबी खिचडी....
एक प्रश्न ह्यात चिंचेचा कोळ वापरावा काय?
आग्या(पोटात आग लागलेला)वेताळ

सुनील's picture

13 Nov 2008 - 1:48 pm | सुनील

पाकृ आणि ती देण्याची अभिनव पद्धत आवडली.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पांथस्थ's picture

13 Nov 2008 - 8:09 pm | पांथस्थ

आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांबद्द्ल धन्यवाद!

संताजी धनाजी's picture

20 Nov 2008 - 3:08 pm | संताजी धनाजी

पांथोबा,
झकास! खातानाचा एक फोटो चढवायचास की ;)
हा प्रकार करुन बघितला पाहिजे.

- संताजी धनाजी

अथांग सागर's picture

18 Jun 2009 - 6:13 am | अथांग सागर

नारळाच्या दुधासाठी दुसरा पर्याय आहे का? ..... बाकी खिचडी एकदम मस्त झाली आहे!!!

--अथांग सागर