श्री गणेश लेखमाला २०२३

1

महाराष्ट्र सत्तानाट्य २०१९, विश्लेषण

गणेशा's picture
गणेशा in राजकारण
28 Nov 2019 - 3:36 pm

नोटः प्रत्यक्ष राजकारणावरील हा माझा अलिकडच्या काळातील पहिलाच लेख... मला वयक्तीक राजकिय मते आहेत. पण तीच मते बरोबरच आहेत असा माझा कुठलाही दावा नाही. एक सामान्य माणुस म्हणुन समोर जे दिसते आणि जे मनाला वाटते यावरुन हे लिखान आहे. त्यात मला देशातील ३ नेते सर्वात जास्त आवडतात आणि ते आहेत स्व. माननीय अटलबिहारी वाजपेयी, लोकनेते श्री. शरद पवार आणि हिंदू ह्रद्य सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे. तसेच, राजकीय विचार हे प्रत्येक माणसाचे असावेतच, या मताचा मी आहे. त्यात सर्व पक्षाचे समर्थन करणारे माझे अगदी जवळचे मित्र आहेत त्यामुळे हेच बरोबर आणि तेच चुकीचे असे माझे म्हणणे नाही. माझी मते काही चुकीची किंवा काही बरोबर असतीलही पण ती माझी आहेत त्यामुळे चुकभुल देणे घेणे. आणि संपुर्ण वाचल्यानंतर मत प्रदर्षण करणे आणि वयक्तीक हेवे दावे करु नये.
--

विश्लेशण करायचे झाल्यास, सुरुवाती पासुन शेवट पर्यंत काय झाले हे लिहायला आणि पुन्हा वाचायला जरा जास्त बोर वाटेल. त्या पेक्शा आपण घडलेल्या गोष्टी आणि त्याबद्दलचे राजकारण आणि विश्लेषण पाहु, घटनांचे क्रम मात्र मी उलटेसुलटे कसेही घेतो आहे, त्यामुळे सरळ वाचण्याचे बोरिंग काम टाळता येवू शकते असे वाटते.

१. महायुती तुटली:

महायुती तुटली याचा मागमुस जर काढायचा म्हंटला तर त्याची पाळेमुळे २०१४ पासुन पाहता येतात. मुळात २०१४ ची निवडणुक च युती ने एकत्र लढवलेली नव्हती. त्यातच, उद्धव ठाकरे यांचे, 'युतीत आम्ही २५ वर्ष सडलो' हे वाक्य सगळे काही बोलुन गेले. आणि खरी युती तिथेच तुटली.
तरीही २०१४ ते २०१९ सेना आणि भाजपा ने एकत्र सरकार दिले असे आपण म्हणु. पण माझ्या मते, २०१४ ला भाजपा च्या १२२ जागा निवडुन आल्या होत्या, आणि भाजपाला बिनशर्त बाहेरुन पाठिंबा देवून शरद पवारांनी एका अर्थी शिवसेनेला सांगितले होते, की आता नाईलाज आहे, त्यामुळे गप तुम्ही दोघे एकत्र येवुन सरकार चालवा आणि शिवसेना पक्षात होऊ पाहणारी फुट थांबवा. मला तरी हेच वाटते. जर भाजपा बरोबर सेना गेली नसती आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेवून भाजपा आपली नैतिकता अबाधित ठेवू शकत नसल्यास, त्यांनी शिवसेनेला उभे खिंडार पाडलेच असते असे मला वाटते..शिवसेनेत फुट अश्या संधर्भातील बातम्या तथाकथीत सूत्रांनी तेंव्हाही दिल्या होत्याच.
त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात मात्र शिवसेनेच्या या नाईलाजाचा फायदा भाजपाने घेतला आणि शिवसेनेची सरकार मध्ये असुन ही जी फरफट दिसली ती नक्कीच एक मित्रपक्ष या नात्याने चांगली नव्हती. हे उद्धव ठाकरे यांना कळत नव्हते का ? ते त्यांना नक्कीच माहीती होते, आणि त्यामुळे 'हीच ती वेळ' या टॅग लाईनचा खरा अर्थ आपणाला निवडुनक रिझल्ट नंतर लक्षात यायला लागतो.
२०१४ पासुन, कुठलाही निर्णय हा फक्त भाजपा ने घेतलेला निर्णय हे असेच दिसले गेले , शिवसेना बरोबर असली काय किंवा विरोधात उभी राहिली काय , जे झाले ते भाजपाचेच म्हणण्याने झाले हे समोर दिसत होतेच.
त्यामुळे आता २०१९ विधानसभा मध्ये १०५ विरुद्ध ५६ हे तथाकतीत जागांवरुन पद आणि जबाबदार्‍या वाटप शिवसेनेला मान्य नव्हतेच आणि नव्हे ते नसावेच. कारण याच फॉर्मुल्याने ते कधीच सत्तेत असुनही कुठल्याही निर्णयप्रक्रीयेवर कधीच दिसले नसते. भले सांखिक द्रुष्ट्या त्यांनी मुख्यमंत्री पद मागुच नये असे दिसत असले तरी २०१४ पासुनच्या राजकारणात झालेल्या फरफटीचाच तो बदला होता हे वेगळे सांगावे लागुच नये.
तरीही शिवसेने ने येथे जी क्लिप दाखवली ज्या पत्रकार परिषेदेत, खुद्द अमित शहांबरोबर, देवेंद्र फडणवीस सांगतायेत, की लोकसभेला आम्ही युती केली आणि विधानसभेबद्दल आम्ही पद आणि जबाबदार्‍यांचे समसामान वाटप करु हे जनते समोर होते. त्यामुळे राजकिय द्रुष्ट्या पद म्हणजे मुख्यमंत्री पद पण हे जसे भाजपाचे लक्षात आले नाही, परंतु उद्धव ठाकरेंना एक राजकारणी म्हणुन नक्कीच हे वाक्य मोठे करुन गेले.
जसे ५६ या संख्येंवरुन उद्धव यांनी मुख्यमंत्री पद मागणे चुकीचे वाटत असले तरी पद आणि जबाबदार्‍यांचे सम समान वाटप करु असे म्हणणारे फडणवीस ही चुकीचेच ठरतात.(कोणाला क्लिप हवी असेल तर लिंक पुन्हा देण्यात येइल)
आणि या सर्व गोष्टींचे परिणाम युती तुटण्यात झाले. यात कुठे ही काँग्रेस शी हातमिळावणीच करायची होती. शरद पवार यांनीच युती तोडली , आम्हीच कसे हिदुत्व वादी, शिवसेनेनी हिंदुत्व सोडले असल्या कुठल्या ही शंका घेणे मला रास्त वाटत नाही.
जे लोक भाजप + राष्ट्रवादी च्या वेळेस सत्ता पाहिजेच त्याशिवाय कामे करता येत नाही असे जे म्हणतात, तेच शिवसेनेने ही केले आहे . सत्तेतील मुख्यपात्र होऊन राजकारण करणे हेच कदाचीत त्यांचे ध्येय होते, आणि हीच ती वेळ होती.

२. शरद पवार आणि विशानसभा निवडणुकांचा प्रचार:

शरद पवार, या व्यक्ती बद्दल आपण शब्दात जितके लिहिल तेव्हडे थोडेच आहे, तरी या निवडणुकी पुरते मी बोलतो.
खरे तर राज्यात विरोधी पक्षच उरला नाही, समोर पहिलवानच नाही अशी वल्गना भाजपा आणि श्री देवेंद्र फडणवीस करत राहिले आणि या भट्टीत शरद पवारांसारखे सोने पुन्हा जास्तच चमकू लागले हे आता निवडणुकानंतरही कळालेच असेल.
खरे तर शरद पवार अलिकडच्या काळात, लोककार्‍यातुन नाही पण सक्रिय राजकारणातुन थोडे अलिप्त झालेत काय असे वाटत असतानाच, लोकसभेला खुद्द अमित शहा यांनी बारामतीत येवुन, 'शरद पवार को उखाड देंगे' हे वाक्य म्हंटले आणि शरद पवार सारख्या मवाळ असणार्‍या राजकारण्याला डिवचले, त्याचे पडसात सातार्‍याजवळील निवडणुकीत शरद पवारांच्या भाषणात दिसले.. आणि 'काय उखडायचे ते उखडा ' या प्रत्युतरात त्यांना काय बोलायचे आहे ते कळाले.

पुढे २०१४ च्या विधानसभेचा संपुर्ण महा आघाडीचा निवडणुक प्रचारच त्यांनी आपल्या अखत्यारीत घेतला, आणि सोबतीला मात्र अजित पवार , राहुल गांधी यांना त्यांनी घेतले नाही. राहुल गांधींना या प्रचारात जाणिव पुर्वक न आणाण्याचे काम बहुतेक शरद पवार यांनीच केले आहे असे माझे मत. कारण भाजपा, हा वयक्तीत हल्ला करुन या नेत्यांविरोधात रान उठवून मते मागील आणि जे साध्य करायचे आहे ते साध्य होणार नाही, ह्याची चुनुक नक्कीच त्यांनी आधी ओळखली असणार.
त्यातच त्यांना भाषणात साथ मिळाली राष्ट्रवादीचा स्वच्छ असलेला आणि नैतिक मुल्य जपणारा नेता, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची.

खरे तर शरद पवारांचे या निवडणुक प्रचाराचे रुप पाहिले तर , कायम जुनी जाणती, म्हतारी कोतारी माणसे त्यांना साहेब म्हणुन त्यांच्या बाजुनी उभी रहायची. पण यावेळेस प्रथमच मी असे पाहिले की तरुणांचे जथ्थेच जथ्थे शरद पवार यांच्या मागे उभे होते. ठिकठिकाणी जावून केलेल्या भाषणात तरुणांचा जो जल्लोष दिसत होता, तो स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या सभे इतका नसला तरी तसाच जल्लोष शरद पवार यांच्या बरोबर होताना दिसत होता. आणि यातुनच शरद पवार काय चीज आहे हे पुन्हा महाराष्ट्र पाहत होता.

१९७८ साली एक छोटीशी केस त्यांच्या नावावर होती, त्या नंतर आजतायग कीतीही , कसले ही आरोप झाले तरी त्यांच्या नावावर एक ही केस नाही, त्यामुळे २००२ च्या दंग्यातुन स्पष्ट सुटका झालेले मोदी पाहिले तरी केसच न दाखल झालेले पवार पाहिले की कोणी लीगली त्यांना काहीच बोलू शकत नव्हते, त्यामुळे तातपुरते, संबंध नसताना त्यांच्या मागे ईडी ची पिडा लावून आपण निवडणुक वेगळ्याबाजुला न्हेवू हा डाव ही शरद पवार यांनी लिलया पेलला.. आणि भाजपाचा मुखवटा फाडायला त्यांनी जणु तेथुन सुरुवात केली...

त्यातच, भाजपा ने , राष्ट्रवादीला उभी भेग पाडत त्यांचे कित्येक आमदार, आणि त्यांच्याबरोबर हजारो नगरसेवक आपल्या पक्षात घेवून राष्ट्रवादी संपली असीच भावना ठेवली आणि तेथेच भाजपाच्या नैतिकतेची कसोटी चालु झाली. उलट अजित पवार वगळता, भ्रष्टाचाराबाबत आरोप ठेवलेलेले सगळे नेते भाजपात गेले, आणि एक नवीनच फळी राष्ट्रवादीने निवडुन आणली हे राष्ट्रवादीच्या विजयाचे द्योतक माणले पाहिजेच.
त्याच बरोबर कॉन्ग्रेस चे ही ४४ आमदार निवडुन आणायला राष्ट्रवादीची मदत झालीच हे कॉन्ग्रेस ही नाकारु शकत नाही.
वंचित ची साथ जर महाआघाडीला असती तर चित्र अजुन थोडे वेगळे असते असे मला वयक्तीक वाटते. मतांच्या टक्केवारी, आमदारांचे आकडे हे संख्येवरुन चित्र जरी दिसत असले तरी लोकांची माणसिकता ही वेगळी होती हे कोणीच नाकारु शकणार नाही हे ही तितकेच खरे.

३. २३ नोव्हेंबर ला देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा घेतलेली मुख्यमंत्री पदाची शपथ :

खरे तर, शिवसेना आमच्या सोबत येत नाही असे म्हणुन आम्ही विरोधात बसू या भुमिकेशी ही प्रतारणा होती. त्यात अंगी असलेला अहंकार, आम्ही काहीही करु शकतो, कसे ही करुन सरकार बनवु शकतो, आमच्या पुढे कोणी किस झाड की पत्ती अश्या पद्धतीचा अहंकार असल्याने सद्वविवेक बुद्धी ने काम न करता, ज्या पक्षा वर विशेष करुन ज्या माणसावर सर्वात जास्त आरोप केले, त्यालाच हाताशी धरुन, राष्ट्रवादीला पुन्हा उभी भेद करुन राष्ट्रवादी बरोबर, नव्हे अजित पवार बरोबर पुन्हा सत्ता स्थापन करणे हे सर्वशी चुकीचेच होते.

अजित पवार का आले, यामागे कोण होते, हे जर तर, शंका कुशंका इथे बोलण्याचा फायदाच नाही. ज्या अजित पवार विरुद्ध , ज्या राष्ट्रवादी बद्दल देवेंद्र फडनवीस आणि भाजपा बेंबीच्या देठा पासुन ओरडत होती.. त्यांच्या बरोबर पुन्हा सत्ता स्थापण करताना देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नक्की काय दाखवत होती हेच कळाले नाही.
या मुळे पार्टी विथ डिफरंस, भ्रष्टाचार विरोधी भुमिका, सिंचन घोटाळ्याबद्दल केलेली २०१४ पासुनची वक्तव्य याचा कुठलाच ताळमेळ दिसत नव्हता. दिसत होती फक्त सत्तापिपासू व्रुत्ती

त्याही पुढे जावून, महाविकास आघाडीचे सरकार उद्या उद्धव ठाकरेंचे नाव घोषित करुन , सत्ता स्थापनेचा दावा दाखल करणार म्हंटल्यावर, आदल्या रात्रीत सारी सुत्रे हालवुन, राज्यपालांना जागे करुन पहाटेच राष्ट्रपती राजवट घालवून, भुरट्यासारखे सकाळीच शपथ विधी उरकून आपण कसे काहीही करु शकतो हे दाखविण्याची नीच वृत्ती सरळ सरळ दिसत होती..
ज्या पक्षाचे बहुसंख्य आमदार आणि नेते आपल्या बाजुने नाहीत, पण त्यांचे तथाकथीत गटनेते आणि कागदोपत्री तांत्रीक बाजू आपल्या बाजुने आहेत , आणि आपण येनकेन मार्गाने सत्ता स्थापण करु, आणि गटनेत्या विरुद्ध मतदान केल्याने राष्ट्रवादीचे आमदार अपात्र ठरवु आणि आपले बहुमत सिद्ध करु असले कपटी राजकारण सरळ सरळ दिसत होते. जे त्यांनी कर्नाटक, गोव्यात, मनिपुर ला केले तश्याच, किंवा त्याही पुढे जावून करण्याची ही व्रुत्ती होती यात कोणाचे दुमत नसावे.
पण या मर्गाने सत्ता हाती आलि असती काय किंवा नाही आली काय, नैतिकतेचे जे दिंडोरे बडवले जात होते, तो नैतिकतेचा ढोलच भाजपने स्वताच फोडला .
फडणवीस सरकारणे बुधवारी सायंकाळी पाच वाजे पर्यंत बहुमताचा कौल घ्यावा असा निकाल सर्वोच्च न्यायालयानेच दिला आणि गुप्त मतदान ऐवजी प्रक्रीयेचे थेट प्रक्षेपण करावयास लावून , ऑपरेशन कमळ म्हणुन केल्या जाणार्‍या बाता गप्प करुन राजिनामा नाट्य रंगले गेले.

उलट, शिवसेना कॉन्ग्रेस बरोबर गेली या एका कारणाने, आपल्या विचारधारेची त्यांची मते पुढील निवडनुकीत ते आपल्याकडे वळवु शकले असते, पण ती संधी त्यांनी अजित पवार या व्यक्तीशी सलगी करुन घालवली आणि हा भाजपच्या नैतिकतेच्या ह्रासातील महाराष्ट्रातील एक ठळक गोष्ट ठरेल यात मला काही शंका वाटत नाही.

त्याही पुढे जावुन, आशिश शेलार सारखे नेते , ज्या पद्ध्तीने माध्यमांपुढे येवून, आमच्या कडे गटनेता असल्याने आम्हीच बहुमत सिद्ध करु अश्या पद्धतीची जी भाषा करत होती ती नक्कीच पुन्हा अरेरावी, अहंकाराचीच होती हे स्पष्ट दिसत होते.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देताना ही शिवसेनेला लावलेली दुषणे नक्कीच त्यांच्या सारख्या उच्चविभुषित व्यक्तीला शोभणारे नाही, राजकारणात जे झाले ते झाले, पण पुन्हा सोडुन जाताना पुढील सरकारला शुभेच्छा देवुन त्यांनी निरोप घ्यायला हवा होता, पण अहंकाराचा फुटलेला ढोल भले भले पचवु शकत नाहीत हे खरे आहेच.

या सगळ्या प्रकारणात , आयटीसेल ने पसरवलेले , तथाकथित माणलेल्या चाणक्याचे चहा पितानाचे फोटो, त्यांचे समर्थन करणारे त्यांचे समर्थक यांची किव वाटत होती.. त्या दिवशी मी नेमके पुण्यापासुन बाहेर होतो, आणि मला हे घडलेले काही माहिती नव्हते. जेंव्हा मला पहिल्यांदा हे कळाले की भाजपा ने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शपथ घेतली हे ऐकुन मला धक्का बसला, आणि शरद पवार यांच्या बद्दल असलेला आदर एका क्षणात धुळीला मिळाला, नंतर कळाले हा पाठिंबा त्यांचा नाही.

पण मला प्रश्न पडतो, बिजेपी चे जे समर्थक आहेत हे मात्र तरीही या असल्या युतीबद्दल खुष होऊन, कशी जिरवली शिवसेनेची, (नव्हे ती भाजपाची पण भुमिका होती म्हणा) अश्या अविर्भावात वागत होती. आणि हे नक्कीच योग्य नाही. आपला ३० वर्षापासुन असलेला सहकार्‍याची कशी जीरवली, आपण कसे चाणक्य , आपण कसे काहीही करु शकतो असा भाव कधीही वाईटच.
रावण पण अश्याच अंहकाराने मेला.. आणि अहंकाराचे दहन हे होतेच होते. त्यातच जाता जाता ९ सिंचन फाईल्स ही बंद केल्या गेल्या हे विशेष.. असो.

४. शरद पवार आणि श्री. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

माझे एक स्पष्ट मत आहे, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणे हे महाराष्ट्रात फक्त दोनच व्यक्ती करु शकत होत्या, एक म्हणजे खुद्द स्व. बाळासाहेब ठाकरे आणि दूसरे म्हणजे श्री शरद पवार. आणि ही नक्कीच अतिशयोक्ती नाही. आणि भाजपा, मोदी, शहा हे कधीच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करु शकले नसते ही काळ्या दगडावरची रेघ आहे, आणि आता यावेळेस २.५ वर्षे ही मुख्यमंत्रीपद आपल्या हातुन देण्यास ते तयात नव्हते हे दिसून आलेच.

शरद पवार ह्या माणसाचे व्यक्तिमत्वच असे आहे. तो मैत्रीला जागणारा माणुस आहे, बाळासाहबे आणि शरद पवार हे किती चांगले मित्र होते हे वेगळे सांगणे न लागे. राजकिय मतभेद आणि नात्यातील मैत्री हे शरद पवारां येव्हडे कोणीच निट संभाळु शकत नव्हते.
आणि जेंव्हा उद्धव ठाकरे २.५ वर्षांसाठी शिवसेनेसाठी मुख्यमंत्री पद भाजपाला मागत होते, तेंव्हाच मी माझ्या मित्रांना सांगितले होते की, उद्धव ठाकरे हे ५ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. आणि ते भाकित आज खरे झाले.

शरद पवारांनी उद्धव च्या पाठिमागे सर्व शक्ती मन लावून लावली, आणि याला कारण होते त्यांचे आणि बाळासाहेबांचे मैत्रीचे नाते. शरद पवारांवर खंजीर खुपसणारे, बेभरवाशी असे कितीही आरोप होत असले तरी वयक्तीक रित्या मला तरी ते कधीच मैत्रीच्या नात्याला तडे जावून देणारे वाटत नाहीत.
त्यामुळेच श्री नरेंद्र मोदी सुद्धा त्यांना आपले राजकीय गुरु मानतात, आणि राजकारण त्यांच्याकडुन शिकलेत असे बोलतात. देशातील असे कितीतरी वेगवेगळे नेते आहेत त्यांचे शरद पवार यांच्याबरोबर चांगले नाते आहे. ( अवांतर , १९७८ चे उदा. देवून शरद पवारांनी पाठित खंजीर खुपसला असे बोलले जाते. मी तेंव्हा जन्मलो पण नव्हतो त्यामुळे त्यावर बोलत नाही. पण काय माहीत , तेंव्हाही आणिबाणीच्या तडाक्यात, सुधाकर रावांची फरफटच चालु असेल म्हणुन शरद पवार यांनी यशवंत रावांच्या म्हणण्याने राकराकरण केले असेल, हा मुद्दा वेगळा आहे आपण पुलोद च्या वेळेस चे वेगळे बोलू)

स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी सुप्रिया ताईंना पहिल्यांदा बिनविरोध राज्यसभेवर निवडुन आणले होते, आणि शरद पवारांनी त्याची परतफेड उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करुन केली हे नक्कीच. आणि यामुळे २३ तारखेला जे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानी फडणवीस मुख्यमंत्री झाले असे सकाळी कळाले, तेंव्हा मला ९९% वाटले होते , हे शक्य नाही. आणि १ % जर असे झाले असते तर शरद पवार या नावावरुन माझा पहिल्यांदा भरोसा उठला असता.. पण शरद पवार हे जनतेच्या मनातील पण ओळखतात, आणि कधी कुठल्या वेळी कुठली चाल खेळायची हे त्यांच्या व्यतिरीक्त कोणालाच जास्त कळत नाही. अगदी साम दाम दंड भेद वापरणारे अमित शहा पण त्यांच्यापुढे फिकेच.
त्यामुळे मला राष्ट्रवादीची २०१४ ची टॅग लाईन जास्त आवडते," मी प्रचंड आशावादी, हे भविष्य माझ्या हाती.. "

उलट ह्या निभावलेल्या मैत्री मुळे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दलचे मनातील स्थान आणखिनच घट्ट झाले. आज बाळासाहबे ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी सुद्धा हवे होते असे मला मनोमन वाटते.

५. श्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राबाहेरच्या मुद्द्यांचा प्रचार

खरे तर, वयक्तिक विचाराल तर निवडनुक डिक्लेअर होण्या अगोदर मला श्री देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील असे वाटत होते. देवेंद्र फडणवीस हे उच्च विभुषित आहेत. त्यांची प्रशासनावरील पकड ही चांगली आहे. कॉन्ग्रेस संपवल्यात जमा होती. आणि राष्ट्रवादीतील फक्त १७ आमदार सोडले तर बाकी सगळे आणि त्यांच्या बरोबर कित्येक नगरसेवक तसेच कॉन्ग्रेस चे आमदार ही भाजपा ने आपल्या गोटात सामिल केले होते.
परंतु त्यांच्या भाषणातुन , बोलण्यातून, मी..मी..मी, आम्ही, अहंकार हा जास्त दिसत होता हे भाजपा वाले पण मान्य करतीलच. त्यातच २०१४ साली 'कुठे न्हेवुन ठेवलाय महाराष्ट्र माझा' ही टॅगलाईन वापरुन लोकल मुद्द्यांवर लढवलेली निवडनुक, आणि आता स्वताच्या ५ वर्षांच्या कार्यकाळानंतर लोकल कुठला ही मुद्दा न घेता लढवलेली हि २०१९ ची निवडनुक यात खुपच फरक जानवला. लोकल मुद्देच प्रचारात नसणे हे कशामुळे होते हे चिंतन त्यांना करावेच लागेल.
३७०, राम मंदिर, ट्रीपल तलाख बील, हे योग्यच पण त्याचा महाराष्ट्राशी डायरेक्ट काहीच संबंध नाही. निदान २०१४ च्या स्वताच्याच जाहिरातीला त्यांनी उत्तरे दिली असती तरी बहुमत हे भाजपा कडेच जास्त असते, याबाबत कोणाचेच दुमत नसावे.

मी येथे स्पष्ट सांगु ईच्छितो की, भाजपा समर्थक, भाजपा आयटी सेल हे जेव्हडे भाजपा ने ५ वर्षात केले असे म्हणतात, त्याच्या १० % जरी भाजपाने, श्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात फक्त बोलले असते तरी त्यांचाच विजय होता. पण त्यामुळे कदाचीत ते गेल्या ५ वर्षात काहीच करु शकले नाहीत का? हा प्रश्न पण पुढे येतोच. भले समर्थक लिस्ट च्या लिस्ट दाखवतील, मग हेच भाजपाला का सांगता आले नाही ? हा चिंतनाचाच विषय आहे.

त्यामुळे , भाजपा समर्थकांना माझा डायरेक्ट प्रश्न आहे, तुम्ही जे भाजपा ने जे जे केले म्हणता ते ते , भाजपा स्वता का प्रचारात सांगू शकले नाहित याबद्दल त्यांना एकदा तरी जाब विचारा ..

६. तथाकथित कॉन्ग्रेस बरोबर हात मिळवनी करुन सेनेनी लाचारी पत्करली अशी दुषणे देणे

मला येथे स्पष्ट सांगायचे आहे, साम दाम दंड भेद करुन भाजपा ने कोणाशी ही कशी ही युती केली, त्यांनी कोणत्याही नेत्याला कॉन्ग्रेस आणि राष्ट्रवादीतुनही आयात केले की चाणक्य निती, भाजपा ने राष्ट्रवादी शी , नव्हे अजित पवार यांच्या शी हातमिळवणी केली की लाचारी नाही आणि शिवसेने ने कॉन्ग्रेस बरोबर हातमिळवणी केली की लाचारी ? आपण असे दुतोंडी कसे बोलु शकतो ..
गोवा, मनिपुर, कर्णाटक तसेच बिहार आणि काश्मिर मध्ये भाजपा ने काय काय केले आहे हे सगळे जाणुन आहेतच ते पुन्हा येथे लिहित बसुन वेळ वाया घालवत नाही, पण आपण केले तर चाणक्य निती आणि दूसर्‍यांनी केले तर लाचारी, ही असली सवय भाजपा ने अजुन तरी सोडावी असे मला वाटते.

विरोधात राहुन ही बर्‍याच गोष्टींवर अंकुश ठेवुन , पुन्हा पुढील निवडनुकीत आपण पुन्हा सत्तेवर कसे येवू हे भाजपा ने पाहिले पाहिजे, ना की शिवसेना कशी लाचार मग आम्ही कसे भारी हे असले आता सोडले पाहिजे ...

शरद पवार यांच्या मध्यस्थीने, कॉन्ग्रेस आणि शिवसेना एकत्र येत आहेत, कॉन्ग्रेस आधी बाहेरुन पाठिंबा देणार होती, परंतु त्यांना सत्तेत सामावुन घेवुन , बाहेरील पाठिंबा मध्येच कधीही काढु शकणारी कॉन्ग्रेसची नितीच त्यांनी येथे फोल केली. त्यामुळे सरकार मध्येच न कोसळण्यासाठी कॉन्ग्रेस ला मंत्रीपदे देवून त्यांना सरकार मध्ये घ्यावे लागले, नाहीतर जर योग्य जागा असत्या, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेच सरकार आपल्याला येथे दिसले असते हे वेगळे सांगणे न लागावे..

७. कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आणि महाराष्ट्राची आजची स्तिथी.

भाजपा ने ५ वर्षात काय केले आणि कॉन्ग्रेस ने त्या अगोदरच्या १५ वर्षात काय केले हे या लेखाचे मुद्देच नाहियेत.
तरीही महराष्ट्राची स्तिथी यावर अवती भोवती बघुन थोडक्यात बोलायचे झाले तर, शेतकरी , रस्ते, रोजगार, यांचे खरेच हाल झालेले दिसतील.
खड्ड्यांचे प्रमाण जागोजागी खुप आहे, तसेच महाराष्ट्रावर २०१४ पर्यंत जे २.५ लाख करोड असलेले कर्ज फक्त ५ वर्षात डबल म्हणजे ५ लाख करोड च्या जवळ गेले आहे.
५ वर्षांचे महाराष्ट्राचे उत्पन्न आणि हे वरचे २.५ लाख करोड चे कर्ज असे मिळुन कोठे कोठे, काय काय कामे केली गेली याची निट शहानिशा लोकांपुढे का येत नाही असे मला नेहमी वाटते.. आम्ही ५ वर्षात इतके पैसे होते आणि इतकी अशी अशी कामे केली आणि त्याला इतके इतके पैसे लागले.. हे सरळ सरळ हिशोब जनते पुढे का ठेवला जात नाही हे मला कळत नाही, आणि हे बंधनकारक असावे असे मला वाटते.

आता, ५ लाख करोडाचे कर्ज घेवून , पुन्हा सुधारणा करण्याचे इंद्रधनुष्य श्री उद्धव ठाकरे हे कसे पेलावतात हे मला पहायला आवडेल आणि या साठी त्यांना मनापासुन शुभेच्छा .

आणि मला वाटते मोदी जसे मला १० वर्ष द्या बदल करावयास असे म्हणताना दिसले, तसे उद्धव यांनी म्हणु नये असे मला वयक्तीक वाटते. जे काय दाखवायचे आहे ते योग्य पद्धतीने त्यांनी ५ वर्षात कामातुन दाखवुन द्यावे.

कॉमन मिनिमम प्रॉग्रॅम बद्दल मला आताच काही जास्त माहिती नसले, तरी कॉन्ग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी बर्याचश्या मुद्यामध्ये सैलता दखवली असली तरी राष्ट्रीय मुद्दे आणि राजकिय राजकारण हे दोन्ही वेगवेगळे ते ठेवतील या बाबत मला कोणतीही शंका नाही..

तरी शिवसेना आणि कॉन्ग्रेस एकत्र आली म्हणुन 'हिंदुत्व खतरे मे है' असे भाजपा ने आणि त्यांच्या समर्थकांनी म्हणु नये. सारे भारतीय एक आहेत आणि एकच मानले पाहिजेत.
कदाचीत भाजपा तरीही जास्तच हिंदुत्व हिंदुत्व , आणि लाचारी लाचारी म्हणत राहिला तर शिवसेने ने जास्त नादी न लागता एकच सांगावे

"हिदुत्व उन्ही का खतरे मे है, जिनका भगवान मोदी है !
फक्त, हिंदु ह्रदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आणि मराठा योद्धा लोकनेते श्री शरद पवार "

असो थांबतो...

---------------- गणेश जगताप

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

28 Nov 2019 - 4:02 pm | शाम भागवत

मुख्यमंत्री कोणीही होवो. कोणत्याही पक्षाचा होवो.
त्याने स्वतःची धन केली नाही पाहिजे. त्याचे सगेसोयरे अनुचित मार्गांनी श्रीमंत होताना दिसले नाही पाहिजेत.
सगळे निर्णय लोकहितार्थच घेतले जात असतात. पण पैसा मात्र दुसर्‍याच कोणाच्या तरी खिशात जात असतो. त्यामुळे आपली प्रगती होत नाही आहे असे मला वाटते.
माझा आवडता मुख्यमंत्री असा ठरतो.

रूपयातले फक्त १४ पैसे लाभार्थींपर्यंत पोहोचतात हे राजीव गांधीच्या १९८४ च्या विधानावर माझे वरचे मत बनले आहे. भ्रष्टाचार कमी झाला व हे १४ पैश्याचे प्रमाण २८ पैसे झाले तरी दुप्पट प्रगती होऊ शकते.
असो.

तुम्ही चार ओळींचा धागा न टाकता जे काही विश्लेषण मांडले त्याबद्लल धन्यवाद.
आवडले.

लेख आवडला व पटला देखील....१+

बहुसंख्य प्रतिक्रिया/ लेख इ वाचून,
मिपा हे एक, " कुजक्या भक्त थेरड्यांचे कंपू स्थळ आहे", असा जर कोणाचा समज झाला असेल, तर तो समज खोटा ठरवत , इथं आपल्या सारख्या तरुण (पुलोद च्या वेळेस आपला जन्म न झालेला असल्यावरून बांधलेला कयास) व्यक्तीचे लेख, एक सुखद अनपेक्षित झुळूक घेऊन येतात.

आता "देवेंद्र अमित मोदी", यां पैलवानाचा पुढचा कुठला डाव असेल ? तर आता ह्याला हिंदुत्वाचा पुळका येईल.

राऊत एका पत्रकार परिषदेत म्हणाले,
बाबरी विध्वंसानंतर लिबरहान आयोगासमोर हे पुळकेवाल्यानी काखा वर केलेल्या, व आमचा काहीच संबंध नाही म्हणाले.
पुढं जाऊन हेही म्हणाले की हा विध्वंस, शिवसैनिकांनी केला असावा.
त्यावेळेस बाळासाहेब जाहीरपणे आयोगासमोर म्हणाले, की जर शिवसैनिकांनी बाबरी उद्धवस्त केली असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे.

आता सत्तेबाहेर असणारे हिंदुत्वाचा उमाळा आलेले हे सोईस्करपणे विसरतील...

असो निस्ती घोळून घोळून बोलबच्चन हणायचं, आणि संघर्ष करायची वेळ आली, बौध्दिक घेत बसायचं, अशी यांची चाल चेहेरा चारित्र्य....

मुक्त विहारि's picture

28 Nov 2019 - 10:08 pm | मुक्त विहारि

लेख वाचला. ...

श्रिपाद पणशिकर's picture

28 Nov 2019 - 11:29 pm | श्रिपाद पणशिकर

आपण इतक्या मेहनती ने लेख लिहिलात मि तो पुर्ण वाचला आपले धन्यवाद.
कधीकाळी मिपावर जे काहि "आप" "केजरीवाल" समर्थक होते आणि आप ची खिंड लढवायचे आपण त्यापैकी एक. आजघडिला आपले अरविंद केजरीवाल ह्या बद्दल काय मत आहे?
माझा प्रश्न सहज साधा आहे कुठल्याही प्रकारचा खोचकपणा त्यात नाहिये.

गणेशा's picture

29 Nov 2019 - 11:10 am | गणेशा

श्रिपाद जी,
या धाग्याला तुमचा हा प्रश्न अवांतर असला आणि हा खोचक नक्कीच नसला तरि थोडक्यात उत्तर देतो आणि थोडे अतिअवांतर करतो. परंतु याबाबत पुढील चर्चा कोणीही येथे करु नये असे वाटते.
अवांतर :
माझ्या त्या मुळ धाग्याची लिंक :https://misalpav.com/node/30307
येथे मुळ धाग्यात आणि प्रतिसादात मिळून ७० कलमी कार्यक्रम जो त्यांनी ठरवला होता तोच दिलेला आहे. आणि त्यातील किती कामे पुर्ण झाली, किती कामे प्रगतीपथावर आहेत, आणि कीती गोष्टी फेक होत्या यावरुन त्या सरकारचे यश अपयश आपण पाहू शकतो.
माझ्या वयक्तीक मताने, केजरीवाल हे मध्यम वर्गीय लोक विकासाच्या केद्रींय स्थानी ठेवून निर्णय घेतात. आणि नुकत्याच ऐकलेल्या महिला बस प्रवास या बाबत घेतलेल्या निर्णया बद्दल त्यांचे अभिनंदन. एका वाक्यात सांगायचे झाल्यास अरविंद केजरीवाल हे आता तरी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वात जास्त योग्य निर्णय घेवून ते राबवताना दिसतात असे माझे मत.

अतिअवांतर( 'मी' पणा सांगतोय असे कृपया समजु नये, मला वाटते प्रत्येकाने वेळो वेळी आपल्यात बदल करावेच करावे असे मला वाटते आणि या मधुन एका ही व्यक्तीने आपले लक्ष थोडेसे फॅमिली साठी जास्त केले तरी मला अभिमान वाटेल म्हणुन लिहितोय, कारण राजकारण, त्यावरील मते, आणि त्यांचेच कायम अनुकरण करत राहिल्यास आपला कार्यभाग बुडाला असे मला वाटते.) :

खरे तर २०१४ -१५ ही वर्षे माझ्या साठी खुप वेगळी होती.. या वर्षात मी पुन्हा मुंबई वरुन पुण्यात परतलो. मुलीचा बाप झालो. आणि मुलगी म्हणजे बापाचे सर्व आयुष्य, त्यामुळे एक ट्रेकिंग सोडले तर माझा सारा वेळ मुली बरोबर गेला.. तीची शाळा, स्विमिंग शिकवणे , स्केटींग, वेगवेगळ्या भुमिका, सायकल शिकवणे, माझ्या बरोबर ट्रेकिंग ला घेवून जाने अश्या कित्येक गोष्टी आणि त्याबरोबरचे अनेक छोटे छोटे क्षण मी अक्षरसा जगलो. (फेसबूक ला आहे बरेचसे)
त्यामुळे २०१५ नंतर देशतील इतर राज्यातील घडामोडीच काय, बर्‍याच श्या गोष्टींकडे मी पाहिले ही नाही. अगदी तुम्ही पाहु शकता मिपा वरती पण मी गेल्या ४ वर्षात जास्त फिरकलो नाहीच.
त्यामुळे केजरीवाल या व्यक्तीबद्दल पुन्हा नव्याने बोलायला माझ्याकडे जास्त डेटाच नाही.
आणि मला वाटते. आपापली राजकिय मते मांडुन झाल्यावर तीच कशी बरोबर दूसरे कसे चूक , आणि मी असेच म्हंटलो होते आणि आता पहा कसे बरोबर होते आहे हे असले समर्थन कोणी करुच नये . "समर्थन हे चुकीच्या गोष्टींना लागते, जे बरोबर असते ते शास्वत असते त्याला आधाराची गरज नसते." ..

मला तर वाटते,
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याच्यासाठी वेगवेगळे रोल येतात, आणि त्या त्या रोल ला त्याने पूर्ण न्याय दिला पाहिजे, त्यामुळे इतर सामजिक, आर्थिक , सोशल गोष्टींवर परिणाम झाला तरी चालेल.

आणि सर्वांत महत्वाचे " आपण आपल्या विचारांशी प्रामाणिक रहाणे, हेच या जगातील सर्वश्रेष्ट कर्तव्य आहे "

श्रिपाद पणशिकर's picture

29 Nov 2019 - 11:28 am | श्रिपाद पणशिकर

धन्यवाद भौ

जॉनविक्क's picture

29 Nov 2019 - 11:43 am | जॉनविक्क

एका वाक्यात सांगायचे झाल्यास अरविंद केजरीवाल हे आता तरी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वात जास्त योग्य निर्णय घेवून ते राबवताना दिसतात असे माझे मत.

सहमत आहे.

छान विश्लेषण केले आहे .
शिवसेने ला गृहीत धरणे.
आणि आपल्या बरोबर राहणे ही सेनेची मजबुरी आहे असा गैर समज bjp नी करून घेतला होता.
सत्तेत सहभागी असून सुधा निर्णय प्रक्रियेत कुठेच सेना दिसत नव्हती.आणि ह्याची सेना नेत्यांना होती.
पण मोदी ची लाट आणि लोकसभेच्या निवडणुकीत bjp ला मिळालेलं अभूतपूर्व यश अशी प्रतिकूल असल्या मुळेच युती करून bjp ला बेसावध ठेवण्याचे काम सेने नी विचार पूर्वक केले असावे..
पण एक प्रश्न खूप दिवस मला पडला होता त्याचे उत्तर अजुन सुद्धा शोधून सापडत नाही.
विविध जातींचे निघालेले शांती पूर्व मोर्चे.
त्या मोर्चा त कोणत्याच पक्षाचा उघड सहभाग नसणे.
बिना नेत्याची जनता एक होवू शकत नाही हे सत्य असताना लाखो च्या संख्येने लोक शिस्तबध्द पण एक कशी झाली.
विविध जातीत समाज मध्यम मधून होणारी जहरी टीका ही सर्व सामान्य माणूस करत नाही पण ती होत होती.
जाती जाती मध्ये फूट पाडण्याचे जोरदार प्रयत्न ह्या 5 वर्षात झाले..
ह्या सर्व घटने मागे कोणता राजकीय पक्ष होता हा प्रश्न मला नेहमी पडतो.
ह्यात दोन शक्यता नी गृहीत धरल्या आहेत..
१) स्वतः bjp जाती जाती मध्ये भांडण लावून हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम काँग्रेस ,राष्ट्रवादी करत असेल असा लोकांचा समज होवून लोक bjp ला धर्मा साठी मतदान करतील .
2)किंवा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस असेल.
हिंदू मध्ये फूट पाडून bjp चे मतदार कमी करणे हा सरळ अंदाज.
पण ह्या प्रश्नाचे उत्तर सरळ आणि सोपे नक्कीच नसणार

तुम्ही विचारलेले प्रश्न हे क्लिष्ट आहेत. आणि त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला गेला तर जातीय आणि धार्मिक चिखलात आपण उडी मारली असे वाटु शकते.

मुळात, मी कधी ही जात ,धर्म पाहुन कोणाशी मैत्री केली नाही, तसेच हिंदुत्व वादी किंवा सेक्युलर आहे म्हणुन त्या पक्षाला वोट केले नाही.

जातीय तेढ, हिंदुत्व, धर्म या पलिकडे जावून विकास होउ शकतच नाही का ? हा खरा प्रश्न मला भेडसावतो.

मान्य भारत हा अनेक जातींचा , वेगवेगळ्या धर्माचा देश आहे, पण विशिष्ट जातीसाठी , धर्मासाठी एकत्र येणे ठिक पण तेच कसे चांगले आणि इतर जाती धर्म म्हणजे देशद्रोह जनू, असे जोपर्यंत लोक मानत राहतील तोपर्यंत अशी जनता कोणत्या ना कोणत्या माथी भडकवणार्‍या पक्षाची गुलाम म्हणुनच जगेल .. आणि गुलाम म्हणुनच मरेल.

जातीवरुन , हिंदुत्वा वरुन , सेक्युलर पणा वरुन मतांची भिक मागण्या पेक्षा, विकासावरुन, लोकांच्या पायाभुत सुविधा देण्यावरुन, शेकर्‍यांच्या भल्यावरुन आणि प्रत्येक नागरीकाच्या हितावरुन मत मागितली तर ती योग्य ..
पण धर्मांदात ठार आंधळे झालेले आपण हे कधी मान्य करणार काय माहीती...

असो .

मुक्त विहारि's picture

29 Nov 2019 - 9:17 pm | मुक्त विहारि

एक नंबर. ...

जियो हजारो साल. ...

श्रीरंग_जोशी's picture

29 Nov 2019 - 10:33 am | श्रीरंग_जोशी

आपल्या राज्यातल्या राजकीय घडामोडींचे उत्तम विश्लेषण केले आहे. लेखाच्या आशयाशी मी बहुतांशी सहमत आहे. या संतुलित लेखनासाठी गणेशाचे आभार.

२४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर मला समाधान वाटले. माझ्या मते त्याचे प्रमुख कारण म्हणजे जनतेच्या जगण्याशी संबंधीत विषयावर गंभीरपणे काम करण्याऐवजी छद्म राष्ट्रवाद, अतिरेकी प्रचार अन त्याला विरोधकांबद्दलच्या कौशल्यपूर्ण अपप्रचाराची जोड दिल्यास (यासाठी सरकारी यंत्रणेचा मुक्तहस्ताने गैरवापर करून) सहजपणे निवडणुका जिंकता येतात या आविर्भावात सत्ताधारी गेली काही वर्षे वावरत होते. विदर्भाने अन माझ्या अमरावती जिल्ह्याने यात मोलाची कामगिरी बजावल्याने मला अधिकच बरे वाटले.

या निवडणुकीत घेता येतील असे काही धडे म्हणजे की कुणाचाही मजबुरीचा इतका गैरफायदा घेऊ नये की संधी मिळताच तो एका दमात सगळे उट्टे काढेल. तसेच निवडणूकपूर्व करार जाहीरपणे संदिग्ध ठेवण्यापेक्षा होईल तेवढे स्पष्ट करावे. बहुधा महाराष्ट्रात सहकारी पक्षाला निवडणुकीपर्यंत वापरून घ्यायचे अन नंतर फारसे अवलंबून राहण्याची वेळच येणार नाही अशा आत्मविश्वासात मुख्य सत्ताधारी पक्ष राहिला.

राज्य सरकारच्या नव्या नेतृत्वाबद्दल -
गेल्या दोन दशकांत मुख्य प्रवाहातील पुढारी असूनही सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या समस्यांवर सर्वाधिक आंदोलने केलेला माणूस म्हणजे उद्धव ठाकरे. असा माणूस मुख्यमंत्री बनल्याने नक्कीच अधिक अपेक्षा आहेत. दुर्दैवाने सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या समस्यांचे मूळ राज्य सरकारपेक्षा केंद्र सरकारच्या धोरणांमध्ये अधिक असते अन तिथे या बाबती किती आनंदीआनंद आहे हे गेली साडेपाच वर्षे दिसत आहेच.

नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन व पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा.

७०च्या दशकानंतर प्रथमच महाराष्ट्रात एकाच मुख्यमंत्र्याने पूर्ण ५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन. १९९९ ते २०१४ त्यांची विधानसभेतली विरोधी पक्षातली कामगिरी पाहता आता विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्याकडूनही बर्‍याच अपेक्षा आहेत.

या निवडणुकीच्या निकालांनी दिखाऊपणा करणार्‍या सत्ताधार्‍यांना जमिनीवर आणण्याचे काम सुरू केले आहे. ते असेच जोमाने पुढे सुरू राहो अशी सदीच्छा व्यक्त करतो.

तेजस आठवले's picture

29 Nov 2019 - 10:29 pm | तेजस आठवले

श्रीरंग_जोशी,
माझा प्रतिसाद तुम्ही वैयक्तिकरित्या घेणार नाही ह्याची खात्री आहे. मला तुमचा हा प्रतिसाद विस्कळीत वाटला, किंवा मला नीट समजला नाही असे म्हणून माझे वैयक्तिक मत मांडतो.
माझी मते तुम्हाला/कोणालाही प्रतिवाद करण्यासाठी मांडलेली नसून एकूण घडलेल्या घटनांवरची प्रतिक्रिया आहे. पुढील मते ही पूर्णपणे माझी वैयक्तिक मते असून इतरांना वेगळी अथवा पूर्णपणे विरोधी मते असण्याचा अधिकार आहे आणि हा अधिकार मला मान्य आहे.

२४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर मला समाधान वाटले. माझ्या मते त्याचे प्रमुख कारण म्हणजे जनतेच्या जगण्याशी संबंधीत विषयावर गंभीरपणे काम करण्याऐवजी छद्म राष्ट्रवाद, अतिरेकी प्रचार अन त्याला विरोधकांबद्दलच्या कौशल्यपूर्ण अपप्रचाराची जोड दिल्यास (यासाठी सरकारी यंत्रणेचा मुक्तहस्ताने गैरवापर करून) सहजपणे निवडणुका जिंकता येतात या आविर्भावात सत्ताधारी गेली काही वर्षे वावरत होते. विदर्भाने अन माझ्या अमरावती जिल्ह्याने यात मोलाची कामगिरी बजावल्याने मला अधिकच बरे वाटले.

महाराष्ट्राच्या निवडणूक निकालाने भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत दिले होते. नंतर त्यांचे एकमेकांशी फाटले आणि ह्याचा फायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसने उचलला. शिवसेनेने स्थापनेपासून कधीही उघडउघड्पणे न मोडलेली तत्वे गुंडाळून ठेवली आणि सत्तेसाठी पूर्णपणे अनैसर्गिक युती केली. सगळ्याच पक्षांनी जो काही तमाशा केला तो अतिशय उबग आणणारा होता. भाजपने ज्या काही कोलांट्याउड्या मारल्या त्या तर अक्षरशः विचित्र आणि मूर्खपणाच्या होत्या.मी वैयक्तिकरित्या भाजपचा समर्थक असलो तरी राणेंपासून आत्ता अजित पवारांपर्यंत केलेली खोगीरभरती मला अजिबात आवडलेली नाही. बऱ्याचशा गोष्टी मला पटल्या नाहीत. पण अटलजींच्या भाजपने नीतिमत्ता अबाधित ठेवत घोडेबाजार न करता देशाची सत्ता हातची जाऊ दिली आणि पुढची दहा वर्षे काँग्रेस देशाच्या डोक्यावर बसली हा इतिहास आहे. काँग्रेस राष्ट्रवादीने नीतिमत्ता गुंडाळून ठेवली तरी चालते आणि भाजपने मात्र सतत पार्टी विथ डिफरन्सच्या नैतिकतेचे भरलेले पातेले डोक्यावर ठेवून वाटचाल केली पाहिजे हे मला वैयक्तिकरित्या मान्य नाही. इतरांची मते वेगळी किंवा पूर्णपणे विरोधी असू शकतात. भाजपने शक्य त्या सर्व मार्गाने सत्ता मिळवावी आणि देशाचे भलं करण्यासाठी ती वापरावी; साम दाम दंड भेद सगळे मार्ग वापरून विरोधकांना नामोहरम करावे ह्या मताचा मी आहे.मोदी-शहा चालवत असलेला भाजप ह्या मार्गावरून नक्कीच जात आहे. कारण तुम्ही नाही केलेत तर काँग्रेस किंवा इतर पक्ष ते करणारच आहेत . हे थोडेसे दोघा भावांसारखे आहे ज्यात एक नैतिकतेच्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करणारा आणि दुसरा वाया गेलेला + पक्का निर्लज्ज आहे. बिघडलेल्याने चोरी केली/मुडदा पडला तर काही विशेष वाटत नाही पण चांगल्या भावाने मात्र जराही वाटेवरून ढळायचे नाही ही अपेक्षा.
भाजपने सत्तेसाठी अजित पवारांना फोडून लोकशाही खड्ड्यात घातली असे म्हणणे ही घोडचूक पण सरकार कोसळून काहीच न घडल्याच्या अविर्भावात अजित पवार परत राष्ट्रवादीत आले हा स्मार्टनेस असे मत सध्या मार्केट मध्ये इन आहे.

छद्म राष्ट्रवाद म्हणजे नक्की काय म्हणायचंय हे जरा उलगडून सांगितलेत तर वाचायला आवडेल. काश्मीरच्या भळभळत्या जखमेला हात लावायचे धाडस आत्ताच्या भारत सरकारने दाखवले. ह्या देशात देशविरोधी वक्तव्ये करणाऱ्याचे लाड होत असत हे कोणीही जबाबदार नागरिक नाकारणार नाही. आमच्या देशाकडे डोळे वटारून पाहाल तर डोळे फोडून टाकू हे सांगण्याची धमक ह्या सरकारने दाखवली. कसाब आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला मुंबईवरचा हल्ला हा सार्वभौमत्वावरील हल्ला होता. त्यावेळी आपण षंढ बसून राहिलो. आपण म्हणण्याचे कारण एक देश म्हणून भारत सरकारने ह्या घटनेचा बदला घेतला नाहीच, परंतु देशातील जनतेने पण मोर्चा, आंदोलने ह्या मार्गानी सरकारवर दबाव आणला नाही. ह्या हल्ल्याचा सूड घेतला जावा ही माझी अजून अपूर्ण राहिलेली इच्छा आहे. शत्रूला ठोकून काढणे आणि परत डोके वर काढू न देणे ह्यासाठी जी जी पाऊले उचलावी लागतील ती भारत सरकारने उचलावीत ह्या मताचा मी आहे. २६/११/२००८ रोजी कसाबने सीएसटी स्थानकात पहिली गोळी झाडण्याच्या ३५ मिनिटे आधी माझी बहीण, नवरा आणि तिच्या दोन मुली ठाण्याला परत येण्यासाठी सीएसटीला गाडीत बसल्या होत्या. मुंबई लोकलमध्ये बॉम्बस्फोट ही एक नियमित होणारी घटना आणि त्यामुळे हतबल झालेल्या मुंबईकरांच्या मनाला लागलेली असहाय्य्यतेची जळू हळूहळू टुम्म अजगरासारखी झाली होती. आपला जीव वाचवण्यासाठी कोणीही येणार नाही आणि आपले सरकारसुद्धा आपले रक्षण करू शकत नाही ही विषण्णता बघितली आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात रस्त्यावर दाऊदच्या नावाने लिहिलेली पोस्टर अजून विस्मरणात गेलेली नाहीत. ९३' दंगलींच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शांतताप्रिय नागरिक उभे असताना जीव मुठीत घेऊन माझी आई मुंबईत कार्यालयात जात असे. त्या वेळी शिवसेनेने सर्वसामान्य माणसांना जी मदत केली ती आयुष्यभर विसरता येणे शक्य नाही हे ही मी इथेच लिहितोय. मुंबई स्पिरिट वगैरे सगळं झूट आहे. ती केवळ एक नाईलाजाने घेतलेली, संवेदनशीलता गोठलेली भूमिका आहे. मनाने मेलेल्या माणसाला शरीराचे मरण जाणवत नाही. मुंबई दुसऱ्या दिवशी उभी राहते हे कौतुकास्पद पण मुंबईच्या सुरक्षेचा झालेला चुथडा दुर्लक्षिला जातो.
पुलवामा हल्ल्यानंतर भारत सरकार ठामपणे उभे राहिले आणि दहशतवादाविरुद्ध कठोरपणे भूमिका घेतली तर तो राष्ट्रवादाचा उन्माद कसा काय? आपल्या सैनिकांवर कोणी दगडफेक करत असेल तर त्यांनी डोकं फोडून घेण्यासाठी तिथे काहीही न करता उभं राहावं ह्या मताचा मी तरी नाही.

राष्ट्रवादाच्या नावाखाली कोणी वैयक्तिक अथवा सामूहिक स्वरूपाचे हल्ले करत असेल तर ते समर्थनीय नाहीत.

जनतेच्या जगण्याशी संबंधीत विषयावर गंभीरपणे काम : २०१४ पासून महागाई बऱ्यापैकी स्थिर राहिली आहे हे माझे वैयक्तिक मत आहे.(साखरेचे भाव वाढू शकतील कि नाही हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही हे पवारांचे वक्तव्य आणि लगोलग साखरेचे भाव वाढवून दलालांनी उचललेला फायदा डोळ्यासमोर घडताना पहिले आहे - साल २००९). तूर डाळीचे भाव अचानक मार्केट मध्ये वाढणे आणि त्याचा फटका गरिबांना आणि माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाला बसलेला आहे. बेरोजगारी आणि वाढते मंदीसदृश्य वातावरण ह्यावर भाजप सरकारला फारसे काहीही करता आलेले नाही हे ही तितकेच खरे.पण आधार बँक अकाउंटशी जोडून भ्रष्टाचाराची वाट अडवण्याचा प्रयत्न तर केला. प्रत्येकाच्या जगण्याशी संबंधित विषय वेगळे असणारच. ह्या बाबतीत प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करणे कुठल्याही सरकारला शक्य नाही. भारतीय नागरिकांचा दांभिकपणा आणि निवडून येण्यासाठी लोकांना फुकट गोष्टींचं अमिष दाखवणारे राजकीय पक्ष हे एक अतिशय घातक मिश्रण आहे. शेतकरी आणि ग्राहक ह्यातली दलाली मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केले,सरसकट कर्जमाफी देण्यासाठी असलेला प्रचंड दबाव झुगारला . मला वैयक्तिकरित्या हा निर्णय आणि धडाडी आवडली.

अतिरेकी प्रचार अन त्याला विरोधकांबद्दलच्या कौशल्यपूर्ण अपप्रचाराची जोड : हे काही प्रमाणात खरे ठरले हे मान्य. पण अतिरेकी प्रचार हा आत्ताच आकाशातून पडलेला नाही आणि ह्या बाबतीत प्रत्येक पक्षाचे हात काळे आहेत. मोदींना मौत का सौदागर ठरवणारा निर्लज्ज बेरकीपणा असो किंवा हिंदू दहशतवादासारखा मुद्दा असो ह्या बाबतीत कुठल्या पक्षाने पीएचडी केलीय हे जगजाहीर आहे. भोपाळ दुर्घटनेत हजारो बळींना जबाबदार असलेल्या अँडरसनला चुपचाप देशाबाहेर सुरक्षित पोहोचवणाऱ्या काँग्रेसला मोदींनी निरव आणि मल्ल्याला पळून जायला मदत केली हा आरोप करताना काहीही वाटत नाही. १९९३ साली न घडलेला मुस्लिम वस्तीतला शेवटचा बॉम्बस्फोट असो किंवा मालेगाव मशिदीत बॉम्बस्फोट करणारा शांतताप्रिय धर्माचा नागरिक असूच शकत नाही असं उघडपणे म्हणणे असो.दार उल इस्लाम ची स्वप्ने बघत पंधरा मिनिटांसाठी पोलीस हटवून मर्दुमकी गाजवण्याची टाळ्याखेचक वाक्य फेकणारे असोत. जर शिवसैनिकांनी बाबरी पडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे हे वाक्य ही पण एक अशीच मारून ठेवलेली पाचर आहे. कोणीही ह्याला अपवाद नाही. त्यामुळे अतिरेकी प्रचार आत्ताच झाला आणि आधी सगळे रामराज्य होते ह्या भ्रमात मी तरी राहणार नाही.

गेल्या दोन दशकांत मुख्य प्रवाहातील पुढारी असूनही सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या समस्यांवर सर्वाधिक आंदोलने केलेला माणूस म्हणजे उद्धव ठाकरे. असा माणूस मुख्यमंत्री बनल्याने नक्कीच अधिक अपेक्षा आहेत. दुर्दैवाने सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या समस्यांचे मूळ राज्य सरकारपेक्षा केंद्र सरकारच्या धोरणांमध्ये अधिक असते अन तिथे या बाबती किती आनंदीआनंद आहे हे गेली साडेपाच वर्षे दिसत आहेच.

शेतकऱ्यांच्या समस्या ह्या गेल्या साडेपाच वर्षांपासूनच आहेत असे जर म्हणायचे असले तर प्रश्नच मिटला. महात्मा फुले ह्यांनी १८८१ साली शेतकऱ्यांचा आसूड लिहून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले तेव्हापासून तर ते नक्कीच आहेत; त्याआधीही असतील. इंग्रज सरकारने निळ, कापूस अशी कितीतरी उत्पादने बंद पाडली हा इतिहास आहे.सध्याच्या केंद्र सरकारचे चुकत असेल पण ह्या आधीची सरकारे काहीही विशेष फरक पाडू शकली नाहीयेत. शेतकरी आणि शहरी नागरिक ह्यांच्यात वितुष्ट आणण्याचे प्रयत्न मात्र प्रत्येकाने केले. फक्त सध्याच्या केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला जबाबदार धरणे मला योग्य वाटत नाही. प्रेक्षक म्हणून सर्कस बघणे आणि प्रत्यक्ष रिंगमास्टर होऊन प्राण्यांना हाताळणे ह्यातला फरक नव्या माननीय मुख्यमंत्र्यांना कळेलच.

या निवडणुकीच्या निकालांनी दिखाऊपणा करणार्‍या सत्ताधार्‍यांना जमिनीवर आणण्याचे काम सुरू केले आहे. ते असेच जोमाने पुढे सुरू राहो अशी सदीच्छा व्यक्त करतो.

शिवसेना भाजप दोघेही सत्ताधारी होते. शिवसेनेशी पटत नव्हते तर युती करू नये हा शहाणपणा भाजपने दाखवला नाही आणि आपल्याला सरकारमध्ये काहीही किंमत नाही हे माहित असून सुद्धा लोचटपणे सरकारला चिकटून राहण्याची वृत्ती शिवसेनेने दाखवली. शिवसेनेने सत्तेत राहून भाजपवर सतत दोषारोप करायचे आणि विरोधी पक्षांना(काँग्रेस आणि राष्ट्रवादी) कुठलेही मुद्दे हाती लागू न देऊन अस्तित्वहीन करायचे हा मूळ डाव. पुढे शिवसेना आणि भाजप दोघेही ह्यात वाहवत गेले आणि आत्ताची लाजिरवाणी परिस्थिती उद्भवली. ह्या निवडणुकीत बहुमत सेना-भाजप युतीलाच मिळाले, पण त्याचे रूपांतरण युती सरकारमध्ये झाले नाही हे ह्या अपयशाचा धनी फक्त भाजप ठरला. शिवसेना कोडगेपणाने अलगद निसटून गेली. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळावे ही माझी आणि इतर अनेकांची इच्छा असली तरी ही तीन पायांची शर्यत किती काळ चालेल ह्याची खात्री नाही.
भाजपाची जिरवली ह्या नादात आपण कुठली धोंड गळ्यात बांधून घेतली आहे हे तिघांना जेव्हा कळेल तेव्हाच पुढचे राजकीय चित्र सुस्पष्ट होईल.

धन्यवाद.

सुक्या's picture

30 Nov 2019 - 3:42 am | सुक्या

सहमत. मझ्या मनातले बोललात

यशोधरा's picture

30 Nov 2019 - 8:14 am | यशोधरा

शाबास! अतिशय मुद्देसूद आणि शब्द न शब्द खरा प्रतिसाद! उगा भाजपच्या नावाने खडे फोडत, आधी सारे अति आलबेल होते असे भासवत, नकाश्रू गाळणाऱ्यांच्या खोटेपणाचा उबग आला आहे.

गणेशा's picture

2 Dec 2019 - 12:22 am | गणेशा

तेजस जी,
तुम्ही छान लिहिले आहे. आवडले.
फक्त नैतिकतेचे आणि पार्टी विथ डिफरंस चे डोक्यावर ओझे लोकांनी नाही तर स्वतः भाजपनेच घेतले होते आणि ते लोकांना सांगितले होते, कदाचित म्हणून लोक त्यांना तसे विचारत आहेत. असो.

आम्ही पार्टी विथ डिफरन्स आहे, हे बोलण्यातून दिसले पण कृतीतून नाही..

गणेश भाऊ अत्यंत उत्तम लेख आणि संतुलित विचार,

एक महत्वाचा मुद्दा तुमच्या लेखातून निसटला तो फ़क़्त add करतो, या निवडणुकीत फडणवीस इतके अहंकारी दिसले कि आपल्याच पक्षातील निष्ठावंतांना त्यांनी सरळ सरळ अपमानित करून डावलले (तावडे/ बावनकुळे/ मेहता/ खडसे) तसेच पंकजा मुंडे का पडल्या हे पण उघड सत्य आहे.

२/४ दिवस बघत आहे का कोणास ठाऊक फडणवीस CM नाही झाले म्हणून आनंदी असलेले इतके लोक बघत आहे (कट्टर BJP वाले माझे घरचे लोक सुद्धा ) कि मलाच विश्वास बसत नाहीये.

तो मुद्दा आणि राज्यपालांचा मुद्दा मी लिहिलेला नाही हे खरे.
मला भाजपने खडसे आणि इतर लोकांना टिकत का नसेल दिले हे शेवट पर्यंत कळले नाही. टिकत देऊन ते देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा डोईजड झाले असते असे वाटत नाही. नाथाभाऊ आधी मोठे होतेच पण आता कदाचित नसते झाले.
राज्यपाला बद्दल दोन्ही बाजूने बोलता येते आणि कोणाचेच चूक नसते वाटले.

बाकी माझ्या घरी पण जवळ जवळ सारखी परिस्थिती आहे, माझ्या जवळच्या रिलेशन मध्येच भाजपा वाले पण खुश, शिवसेना राष्ट्रवादी वाले पण खुश.. उलट शिवसेना वाले माझ्या बायकोचे मामा आणि कंपनी आणि आमचे तर काय सूर जुळले यावेळेस बस कि बस..

बाकी काँग्रेस चे कोणीच नाही आमच्याकडे.. कदाचित बारामती, शिरूर, पुणे, पिंपरी चिंचवड, उरुळी कांचन अश्या ठिकाणाचा संबंध असल्याने काँग्रेस येथे कोठे नाही.

सुक्या's picture

30 Nov 2019 - 12:32 am | सुक्या

सहमत. मझ्या मनातले बोललात

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Nov 2019 - 4:54 am | मिसळलेला काव्यप्रेमी

सगळच पटल असं म्हणू शकत नाही, पण संयत आहे.

माझे एक स्पष्ट मत आहे, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणे हे महाराष्ट्रात फक्त दोनच व्यक्ती करु शकत होत्या, एक म्हणजे खुद्द स्व. बाळासाहेब ठाकरे आणि दूसरे म्हणजे श्री शरद पवार. आणि ही नक्कीच अतिशयोक्ती नाही. आणि भाजपा, मोदी, शहा हे कधीच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करु शकले नसते ही काळ्या दगडावरची रेघ आहे, आणि आता यावेळेस २.५ वर्षे ही मुख्यमंत्रीपद आपल्या हातुन देण्यास ते तयात नव्हते हे दिसून आलेच.

पण मुळात त्यांना मुख्यमंत्री करायचेच का होते? कुठल्या कर्तृत्वासाठी?
माझ्या मते एकजात सगळ्या पक्षांनी जनमताचा अपमान केलेला आहे. फक्त एकच संदेश मिळाला जनतेला या सगळ्या तमाश्यातून, 'जर सत्ता मिळत असेल तर कुठल्याही प्रकारचा माणूस किंवा पक्ष चालतो' आणि असं असेल तर ह्यांना आपसातच ठरवत जाऊ दे यानंतर, उगाच मतदानाचे फार्स कशाला?
१. भाजपा-शिवसेनेला आपसातले वाद मिटवता येत नव्हते तर युती करुन लोकांची दिशाभूल का केली?
२. लोकांनी भाजपा-शिवसेना युतीला निवडले होते आणि काँग्रेस - राष्ट्रवादीला विरोधात बसवले होते, मग या सगळ्यांनी मिळून आपसात वाटण्या कुठल्या आधिकारात केल्या?
३. यामुळे आता छगन भुजबळ सारखे अतीभ्रष्ट नेते मंत्रीपदांवर विराजमान होतील ते नुकसान कोणी भरुन काढायचे.
या सगळ्या नादान आणि नाकर्त्या नेत्यांनी महाराष्ट्राला २५ वर्षे मागे नेलय असं माझं स्पष्ट मत आहे.
काय तर म्हणे महाविकास आघाडी. लाचार, सत्तापिपासू आणि संधीसाधूंची फौज आहे ही.
पुढच्या निवडणूकीत नोटाची मतसंख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याशिवाय राहणार नाही.

गणेशा's picture

2 Dec 2019 - 12:40 am | गणेशा

तू बरोबर बोलतोय मित्रा.
महाविकास आघाडी काय आणि भाजपा प्लस राष्ट्रवादी काय सत्ता पिपासूच.

छगन भुजबळ यांच्या बाबत तू बरोबर बोलला आहे, निवडणुकी ला तिकीट च नव्हते मिळाले पाहिजे हे माझे मत. असो काय बोलावे यावर, जे चूक ते चूकच.

छगन भुजबळ जेल मध्ये गेलेला आहे म्हंटले तर तिकडे कर्नाटक चा मुख्यमंत्री तसलाच जेल मध्ये जाऊन आलेला आहे.
कोणाला काय बोलावे? लोकांनीच असल्या लोकांना घरी बसवावे.

बाकी उद्धव ठाकरे ना मुख्यमंत्री का करायचे होते याबद्दल मला वेगळे वाटते तुझ्यापेक्षा... असो. नंतर बोलतो

चौकस२१२'s picture

13 Feb 2020 - 7:20 am | चौकस२१२

गेलं काही आठवडे महाराष्ट्रातील राजकारणाकडे दुर्लक्ष झालं,,, परत आंतरजालावर बातमी कळली कि अजित पवार हे महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री झाले.. आणि पहिला शब्द मनी आला तो म्हणजे "निर्लज्जपणा" आणि हा शब्द काही दिवस एका भल्या सकाळी पण आला होता जेवहा हेच शूरवीर आणि अतिउत्साही देवेंद्र फडणवीस एकमेकांशी हात मिळवणी करताना पहिले होते.. त्यांत गणेश यांचे हे विश्लेषण वाचले.

खोलात जाऊन सविस्तर आपण लिहिले आहेत.. पण काहीसे एकांगी वाटले..सकाळ मधील श्रीराम पवार या तथाकथित "स्वत्रंत पत्रकाराच्या" लेखनसारखे ? वरून आव आणायचा "निपक्षपाती पानाचा" पण येन केन प्राकारे भाजप ला झोडपायचे! असो ( कारण असे कि पवारांना हे "पचतच" नाही कि काँग्रेसी विचारणशिवाय इतर विचारांचे पक्ष कधी सत्तेवर येऊ शकतात ..आणि त्या पक्षांना पण सत्ता आणि आपला कार्यक्रम राबवण्याचा अधिकार असू शकतो)
- देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे दिली तील नेते यांनी त्या सकाळी भुरट्यासारखे सकाळीच शपथ विधी हा "गाढवपणा" केला हे मान्य आहे .. पण आपण अजित पवारांनी काय केलं त्याबद्दल काहीच बोलत नाही ? उलट त्याबद्दल बोलण्याची जरुरी नाही असे म्हणता ? का?
भाजप जाऊदे पण एक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं दृष्टिकोनातून पाहिलं तर ते काय होत सगळं नाटक?? तेव्हा मात्र "जरा "सेनेसिटीव्ह आहेत" माफ करू .. सुबह का भुला शाम को ...वैगरे सरसराव ( तुम्ही नाही पण इतर समर्थक करतात .. थोडक्यात काय एकाच वाडा अजित दाद अशी निःसीम भक्ती असेल तर बोलणंच खुंटला मग १००० गुन्हे माफ
अजित पवार जर इतर संसदीय लोकशाहीत असते तर या त्यांचं खेळी मुळे त्यांचा राजकीय जीवन संपलं असतं...
- बरं जे झाला ते झालं त्यानंतर शिवसेनेच्या आणि खास करून संजय राऊत यांचं काय ज्या वल्गना , अनैसर्गिक युती केल्यावर करावी लागणारी तडजोड आणि त्या तडजोडीचे लाचार समर्थन हे काय लोकांना दिसत नाही ?
सर्वात हास्यास्पद म्हणजे "वचनपूर्ती" त्या फलकावर बाळासाहबांचा हात ( रुद्राक्ष ) आरे शिवसेनचं कट्टर समर्थकांनो वचनपूर्ती हि स्वबळावर केली तर ती खरी अश्या लाचार तीन तिघाडा वर नाही .. किती निर्लज पण कराल !

- जनतेने भाजप आणि शिवसेनेबद्दल नाराजी दाखवून दिली परंतु त्या युती लाच जास्त जागा दिल्या हे साधा गणित आहे , कोठेही जनादेश हा नव्हता कि काँग्रेस आणि राष्टवादी नि सत्तेत यावे, त्याबद्दल काय?
कोणी म्हणाला कि काँग्रेस आणि राष्टववाडी हे तसे एकच... आणि एकूण जवळ जवळ भाजपएवढीच मते... हो ना मग शरद पवारांनी हि वेगळी चूल विझवून सरळ राहुल दरबारी रुजू व्हावे मग म्हणता येईल कि महाराष्ट्रात काँग्रेसचा आहे म्हणून!

- भाजप आणि अजित पवार यांनी ( राष्ट्रवादी नि नव्हे तर अजित पवार या व्यक्तीने) जे काही केले आणि नंतर ( किंवा आधीपासून) शिवसेनेने जे काही केले यावरून परत एकदा खात्री पटली कि " जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी बिरुदे मिरवरणाऱ्य भारतातील लोकशाही हि एवढी विचित्र आणि घाणेरडी आहे .. थांबा तुम्ही हे म्हण्यायच्या आधी कि राजकारणांत सगळे काही चालते परनु त्यालाही काही तारतम्य असते ...( पुढे उटी बद्दल उदाहरण दिले आहे)

बाकी सुबोध खरे आणि आठवले यांनी आपल्या लेखल्ला दिलेल्या प्रतिक्रिया अगदी चपखल आहेत .

एक मुद्दा मात्र मला मांडावा वाटतो तो म्हणजे युती .. बद्दल आपण जे लिहिले आहे ते
" ..जसे ५६ या संख्येंवरुन उद्धव यांनी मुख्यमंत्री पद मागणे चुकीचे वाटत असले.."
या वाटण्यात काय गैर आहे?
यार एक वेगळं धागा लिहितो

एक भाजप समर्थक म्हणून तुमचे मुद्दे पटणारे नाहित.

फडणवीसांच्या काळात शिवसेनाही सत्तेत सहभागी होती असे असताना भलेही minimum मंत्रीपदे असली तरी सेनेने मारलेल्या कोलांट्याउड्या मला पटलेल्या नाहित. विशेषतः मुंबई मेट्रोसारख्या महत्वाच्या प्रकल्पात काडी घालायचा प्रयत्न संतापजनक होता. आणि आता सत्तेत आल्यावर प्रोजेक्ट रेटला जातो आहे.

मी स्पष्टच म्हणीन की फडणवीसांनी २०१४ साली सेनेला बरोबर घेऊन चुक केली. भाजप ह्या धक्यातुन लवकरसावरला ते बरे झाले. शिवसेनेशी युती करुनभाजपने आपली वाढ थांबवू नये असे मला वाटते. फडणवीस काळात उठसुठ टिका करणारा सामना आता चक्क गप्प आहे. राज्यात २५०००+ रुग्ण झालेत तरीही विरोधु पक्षाने बोलायचे नाही हे संतापजनक आहे. शिवछत्रपतींचे मावळे समजताना फडणविसांच्या पत्नीबद्दल व फडणवीसांच्या जातीबद्दल ज्या काही प्रतिक्रिया येतात त्या पटत नाहीत.

अर्थात भाजप धुतल्या तांदळाइतका स्वच्छ अजिबातच नाही. पण त्यातल्या त्यात भाजप सुसह्य वाटतो इतकेच

गणेशा's picture

24 May 2020 - 11:49 pm | गणेशा

आलामगिर जी,
तुमच्या विचारांचा आदर आहेच..

पण हा धागा आता वरती आला ह्याचे आश्चर्य वाटत आहे..
राजकीय म्हणाला तर माझ्या india deserves better ह्या कुठल्या हि धाग्यांवर मी अजूनही जीव तिडकीने बोलू शकेल..
मग ते शिक्षण, शहरीकरण, शेती, आरे, सायकल रस्ते, हसदेव असे कुठले ही असले तरी नक्कीच..
------
कोणी कोणत्याही पक्षाचे समर्थक असु शकते, पण माझ्या सारखी माणसे देशात राज्यात सत्तांतर घडवतात.. कारण काँग्रेस ला हि विरोध करायचो मी, आता हि मला मोदी आवडत नाहीच... कधी हि एका पक्षाला मी धरून बसलो नाही..
---
2019 ला जे झाले ते मला वाटले तसे लिहिले.. वेगळे मत असु शकते.. नव्हे ते असलेच पाहिजे..
सर्वांचे एकच मत असते तर कसे झाले असते?
---

बाकी स्त्री बद्दल आदराने बोलले पाहिजे हे माझे म्हणणे आहेच, मग ते सौ. देवेंद्र असतील, सोनिया गांधी असतील किंवा ममता असतील..
इटलीची बारबाला वगैरे हि मला आवडत नव्हते, आणि सौ. देवेंद्र याबद्दल लिहिलेले पण नाही..
माझ्या कुठल्या हि लिखाणात, विचारात स्त्री चा अपमान होणार नाही म्हणजे नाहीच.. आणि त्याचा मला अभिमान आहे.. आणि का नसावा?
----

करोना, lockdown आणि तत्सम या काळातील राजकारणावर मी मुद्दाम बोलायचे टाळले.. येथे हि पहा एव्हडा वेळ होता पण नाही प्रतिसाद माझे तिकडे.
मग ते श्री मोदींबद्दल असुद्या, उद्धव ठाकरे यांच्या बद्दल असुद्या की फडणवीस यांच्या बद्दल असुद्या..
हि वेळ राजकारणावर बोलण्याची नाहीच असे माझे स्पष्ट मत आहे..

बाकी राज्यात आणि देशात आर्थिक परिस्थिती खराब आहे..
पैसाच जास्त नाहीये..
करोना बाबतचा सगळ्यांचा अंदाज चुकलाच असे म्हणावे लागेल..
पण घडून गेलेल्या गोष्टी वर दोष देताना त्यांच्या मर्यादा लक्षात घेतल्या मी.. भले, काही निर्णय चुकले, ट्रम्प इव्हेंट पण नाही आवडला मला..
एअरपोर्ट पण बंद करण्यास उशीर नाही आवडले..
Cosara बद्दल चे निर्णय मला मुळीच आवडले नव्हते.. पण हे वयक्तिक मी यावेळेस जाहीर बोललो नाही..
मोदी असो, उद्धव असो वा अन्य कोणी असो, त्यांना देशाची राज्याची हि अवस्था मुळीच आवडत नसेल..
ह्या अवस्थे मध्ये देशात काँग्रेस आणि राज्यात भाजप असते तरी काहीच वेगळी परिस्थिती नसती .. मग आपण दोष कोणाला द्यायचा?
दोष कोणाला द्यायचा असेल तर आपल्याला दिला पाहिजे,
कारण शिक्षण, आरोग्य ह्या प्रती आपण कधी मागण्या केल्यात, ह्या मुद्द्यावर आपण कधी मते दिले आहेत? आपण नेहमीच धार्मिक, मंदिर आणि इतर मुद्द्यावर राजकारण आणि मते दिलेत.
आपले टेस्टिंग सेंटर 52 होते आधी देशात.. हे आपल्याला कमी वाटत नाही? तर अश्या गोष्टींची मागणी आपण कधी केली नाही तर मग आपली लायकी तीच आहे जी आपल्याला मिलते आहे, असे माझे स्पष्ट मत आहे.

Lockdown हे आपली क्षमता, आरोग्य विषयक गोष्टी, ppe kit, testing यात समृद्ध होण्यास वापरले पाहिजे असे माझे मत पहिल्या पासून होते आणि आहे.. या गोष्टीत अपयश आले तर लाखो lockdown पण व्यर्थ आहेत असे माझे मत.
साखळी तुटणे, टाळ्या वाजवणे, थाळ्या कुटने, दिवे लावणे, फुले बरसवने हे माझ्या मते निव्वळ थोतांड आहेत..
मी यातील एकही गोष्ट केली नाही तरी
मी डॉ. लोकांचा आदर बाळगला, पोलिसां प्रती कृतज्ञता बाळगली..
भाजीवाले, मेडिकल वाले यांच्या बद्दल मला आत्मीयता आहे..
या सर्वांचे आभार..
पण मी माझी काळजी घेतली, distansing पाळले..
लोकांना तसे पाळण्यास परावृत्त केले..
हे मला योग्य वाटते.. तेच गरजेचे आहे..

बाकी बोलूच...