India Deserves Better - १०. मेळघाट - कुपोषण, बालमृत्यु आणि सरकारी कागदी यंत्रणा
पार्श्वभुमी
विधर्भामधील, सातपुडा पर्वतरांगातील धारणी आणि चिखलदरा या तालुक्यांचा मिळुन मेळघाट विभाग बनलेला आहे. मेळघाट कुपोषण आणि बालमृत्यु हे येथील जणू समिकरणच झालेले आहे. मेळघाट हा तसा ९०% आदीवासी भाग आहे, येथील बालमृत्यु आणि कुपोषण यात घट झाल्याचा सरकार कितीही दिंडोरा पिटत असला तरीही येथील १०,००० च्या वर बालकांचा मृत्यु झालेला आहे. त्यामुळे कागदावर असलेल्या यंत्रणा , आणि कुपोषणातील घट प्रत्यक्षात मात्र दिसत नाही. कुपोषणमुक्ती साठी कोठ्यावधी रुपयांचा खर्च केला जातो, पण तेथील बालके त्या परिस्थीतीतुन बाहेर आल्याचे दिसत नाही. धारणी तालुक्यात सप्टेंबर महिन्यात १६४१ तर आक्टोबर महिन्यात १५०२ बालके कुपोषणाच्या अतितीव्र छायेत आढळुन आलेली आहेत.
कुपोषण मुक्तीच्या शासनाच्या योजना कुचकामी ठरल्या असुन, ज्या योजना सुरु आहेत, त्यावर अधीकारी कर्मचार्यांचे नियंत्रण नाही , आरोग्य विभाग, बालविकास प्रकल्प विभागातील रिक्त जागाही कुपोषणाला जबाबदार आहेत असे सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवी पटेल यांचे म्हणणे आहे.
न्यायालयाचे ही ताशेरे
मेळघाटातील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यु रोखण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकार वर मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. मेळाघाटातील समस्या सोडवायला सरकारला डॉ. बाबा आमटे, डॉ. बंग, डॉ. रविंद्र कोल्हे , यांच्या सारखीच माणसे लागतात का ? सरकारला आपली जबाबदारी कळत नाही का ? या समाजसुधारकांच्या कामामुळे सरकारला आपली जबाबदारी संपली असे वाटते का? असे बोलत सरकारला जाब विचारला होता. इतकेच काय मुख्यमंत्री ( तत्कालीन) हे खुद्द विधर्भातील असुनही त्यांना मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न गेल्या पाच वर्षात सोडवता आला नाही अशी खंतही खंडपिठाने व्यक्त केली .
मेळघाटातील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यु रोखण्यात यावेत यासाठी बंडू साने यांनी केलेल्या याचिकेवर न्यायालय सुनावणी देत होते, आदिवासी दुर्गम भागात कुपोषण निर्मुलणासाठी नेमलेले आधीकारी साधे फिरकत ही नाही हे याचिकाकर्त्यांनी निदर्शनास आणुन दिले होते.
कुपोषणामुळे होणारे बालमृत्यु रोखण्यासाठी सरकारी योजनांसाठी जो निधी मंजुर झाला होता त्याचा वापर कशा प्रकारे करण्यात आला, असा सवाल करीत कोर्टाने याप्रकरणी केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.
परिस्थीती
कुपोषणाचा कलंक मिटवण्यासाठी शासणाचे अधिकारी, कर्मचारी काम करत नसुन , फक्त अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातुन कुपोषणमुक्ती करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचबरोबर हे सर्व बालमृत्यू कुपोषणाने झाले नसून विविध कारणांमुळे झालेले आहेत असे सरकारचे म्हणणे आहे. कमी वजन, कमी दिवसाचे बाळ जन्माला येणे, जंतूसंसर्ग, श्वसनदाह, कमी तापमान, जन्मजात व्यंग इत्यादी कारणे त्यामागे असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मुळात कुपोषणाची जबाबदारी कोणीही घेण्यास तयार नसुन दूसर्या विभागाकडे बोट दाखवुन टोलवाटोलवी होत असल्याचे दिसते आहे. जे अहवाल सादर झाले, त्याची अमंलबजावणी कोणीही करत नसल्याचे दिसते आहे. प्रत्यक्ष गावांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी पोहोचत नाहीत. केवळ कार्यालयांमध्ये बसून उपाययोजना आखल्या जातात, असा मेळघाटात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा आक्षेप आहे.
मनातले आनखिन
कुपोषणामुळे मृत्यु असे असताना त्याबरोबर इतर कारणांकडे ही पाहिले पाहिजे, गरिबी, शिक्षणासंबधीची नसलेली जाण आणि त्याबरोबर रुढी परंपरा यांचा ही पगडा दिसतो, त्याच बरोबर दळणवळणाच्या साधणांचा अभाव, सिंचणाचे अत्यल्प प्रमाण, उत्पनाची साधणेच नसल्याने अधिक प्रमाणात असलेली गरीबी. रोजगारांच्या समस्यामुळे सकस अन्न न मिळणे, अस्वछता, अशुद्ध पाणी , अंधश्रद्धा, भ्रष्टाचार , अज्ञान अशी अनेक कारणे ही पुढे येतात, आणि सरकारकडुन याबाबत ही ठोस काही होताना दिसत नाहीच. फक्त पुणे-मुंबई-नागपुर-नाशिक अश्या शहरांचा विकास, मेट्रो, महामार्ग , बुलेट ट्रेन हे म्हणजेच विकास हेच चित्र जरी आपल्या डोळ्यासमोर असले तरी पायाभुत सुविधांचा येथील अभाव, जगण्या साठी लागणार्या मुलभुत गरजांचा अभाव असलेला हा भाग पाहिला की आपण नक्की भारतात राहतो की सोमालियाला हा प्रश्न पडतो .. आता तर फक्त मेळघाटच नाही तर ठाणे जिल्हा ही कुपोषणाचा बळी ठरु लागला आहे. आणि हे नक्कीच भयावह आहे. बालमृत्युच नाही तर इतर तरुण आणि स्त्रीया, माता यांच्या मृत्युचे ही अनेक आकडे समोर येत आहेत.
भ्रष्टाचाराच्या अनेक हवेतील वार्ता हवेतच विरल्या जातात , यावर कुठेही कुठली ही अॅक्शन झाल्याचे माझ्या ऐकीवात नाही. आदीवासींसाठी राबवल्या जाणार्या योजना मोठ्या असल्या तरी कीती योजनांचा लाभ कीती आदिवासींना झाला याचे मोजमाप, मुल्यमापण करण्याची गरज कधीच कोणाला वाटली नाही ही शोकांतिकाच आहे.
त्यामुळे मी पुन्हा म्हणु इच्छितो .. India Deserves Better
#India_Deserves_Better
- गणेश जगताप
छायाचित्रे नेट वरुन साभार
प्रतिक्रिया
19 Nov 2019 - 6:53 pm | जॉनविक्क
Indian's also need to be better too.
20 Nov 2019 - 2:13 pm | गणेशा
बरोबर ..
त्यातही याबाबत व्हाट्सपवर मला येणारे रिप्लाय तर खुपच हेलवणारे आणि वाईट परिस्थीती दाखवणारे आहेत, पण व्हाटसअप वर येणारी माहिती ही खरीच आहे असे मानत नसल्याने तसले मुद्दे मी घेत नाही, पण ती परिस्थीती खरी असेल तर आदिवासींचा समुळ नायनाट होईल असेच वाटते आहे.
असो.
24 Nov 2019 - 12:57 pm | मुक्त विहारि
दिवस खराब गेला.
हतबल. ...
27 Nov 2019 - 12:33 pm | गणेशा
फोटो पाहुन खुपच वाईट वाटते.. मन सैरभर होते..
या छोट्या जीवांबद्दल होणारी यातना शब्दात सांगता येत नाही.. तरी खुप वर्षांनी कविता लिहायला घेतो
-------
कुठे ललाटी, निष्प्रभ आभाळ रे..
पोटाच्या खळगीची, ही आबाळ रे..
तुमचे सूर्य तारे, तुमचेच मळे हिरवे गार रे,..
आटलेल्या पाण्यातला, मात्र आम्ही गाळ रे..
काळ्या जमीनीवर फक्त तुमचाच मान रे
पाण्याविना आमचे रान, मात्र खडकाळ रे
क्रुर नियतीचा नशिबी खोल वार रे
भुकेले बालपण आमचे तू सांभाळ रे ..
भविष्यात नसलेले माझे हे गाव रे
मरण लिहिलेला आहे, माझा भाळ रे
- -शब्दमेघ ... मेळघाट डायरी
27 Nov 2019 - 1:21 pm | मुक्त विहारि
माझ्या कडे ह्या अडचणी दूर करण्यासाठी सत्ता नाही आणि आर्थिक पाठबळ पण नाही.
त्यामुळे हतबल होऊन निराश वाटते.
अर्थात ह्या जनते कडून जास्त अपेक्षा पण नाहीत. बाबा महाराज सोन्याच्या सिंहासनावर बसतात आणि चांदीच्या पादुका घेऊन चालतात. त्या जनतेच्या सरकार कडून काही अपेक्षा करण्यात अर्थ नाही. ..
27 Nov 2019 - 5:51 pm | जॉनविक्क
आपला प्रतिसाद बरेच काळानंतर एकोळी म्हणता येईल त्यापेक्षा मोठा वाचायला मिळाला म्हणून फार सकारात्मक वाटत होतं, पण तो वाचल्यावर तर मन अजून खट्टू झाले :(
29 Nov 2019 - 5:52 pm | अलकनंदा
हे वाचणेही त्रासदायक आहे. आता सरकार बदलल्यामुळे ही परिस्थिती सुधारेल असे वाटते का? समजा, परिस्थिती जैसे थे राहिली, तर तुमच्या मते ह्या बाबतीतले हे आताच्या नव्या सरकारचे अपयश असेल का? हा प्रश्न विचारते म्हणजे, या अगोदरही ह्या पक्षांची सरकारे येऊन गेलीच आहेत पण तेव्हाही परिस्थिती काही सुधारलेली नाही.
29 Nov 2019 - 9:21 pm | मुक्त विहारि
व्यक्ती पुजा आणि माणसांना गाभाऱ्यात बसवणारा आपला समाज आहे.
30 Nov 2019 - 4:31 pm | गणेशा
अलकनंदा जी,
तुमचे प्रश्न रास्त आहेत. परंतू मला मनापासुन सांगायचे आहे. कोणत्याही सरकारच्या विरोधात किंवा कोणत्याही राजकिय पक्षाच्य समर्थनाबद्दल हे लिखान नाही.
हे आहेत आपल्यापुढे दिसणारे आपल्या अवती भोवतीचे प्रश्न
मग ते शिक्षण फी बद्दल असतील (भाग २), सायकल आणि ट्रॅक बद्दल असेल (भाग १) नंतर आलेल्या आरे, शेती, शहरीकरण, हसदेव आरण्य आणि अदाणी ,रस्ते अतिक्रमण असतील, किंवा हे कुपोषणाचे असुद्य हे सगळे सामजिक आहेत.
कुठल्याही सरकार ने यावर काम केलेच पाहिजेच पाहिजे.
परिस्थीती सुधारली पाहिजेच. आणि जर नविन सरकार ने सुद्धा यावर किंवा असल्या सामजिक , पायाभुत गोष्टींवर काम केले नाही तर त्यांना सुद्धा माझा विरोध असेलच.
हे नक्की. उलटा माझे म्हणणे आहे, असे असंख्य लोकांनी पुढे आले पाहिजे.. प्रश्न विचारले पाहिजेतच. चेंज.ऑर्ग वरती ही सरकारला सांगितले पाहिजे.
असो , निदान माझी मिनिमम अपेक्षा येथे आहे की, प्रश्न जरुर विचारावे, असहमती पण दाखवावी पण जो व्यवस्थेविषयी प्रश्न करतोय त्याच्यावर कुठल्याही पक्षाचा, सरकारचा किंवा धर्माचा शिक्का उठवला जावु नये .
अवांतर : मी भाजपा, राष्ट्रवादी, जनता दल, अपक्ष, शिवसेना पुरस्कृत अपक्ष या पक्षांना आता पर्यंत वोट केले आहे, आणि मी नक्कीच डोळे बंद करुन फक्त मतदान करत नाही. त्यामुळे नविन सरकारला पण प्रश्न विचारेल.
बाकी माझ्या ह्या प्रश्नांचा काय फायदा होयील का? यावरुन कोणी काही घेइल का? कोणाच्या विचारसरणीत थोडा बदल होयील का? हे मला सांगता येणार नाही.
30 Nov 2019 - 5:32 pm | अलकनंदा
कसलाही आरोप करायचा उद्देश नाही तरीही ह्या सरकारच्या कालावधीमध्येच बरेच जणांना देशासमोरील प्रश्नांबाबत एकदम जाग आल्याचे प्रकर्षाने दिसते, तेव्हा जरा आश्चर्य वाटते, गंमतही वाटते.
पण चांगले आहे, कोणाच्याही कोंबडयाने उगवले तरी उत्तम आहे.
30 Nov 2019 - 10:23 pm | जॉनविक्क
हे मात्र खरे.
1 Dec 2019 - 10:06 am | गणेशा
यावर बोलतो , पण हा रिप्लाय माझ्या मूळ धाग्याला आणि त्या बद्दलच्या मातांना लागू नाही ...माझे प्रश्न हे कायम होते फक्त्त मिपा वर ते आता आलेत .
तुम्ही म्हणता तसे असेल कदाचीत ... याला कारण हि तसेच आहे .. 2014 च्या आधी भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेले सरकार , आणि आता बदल हवा हे मनोमन वाटणारे सगळे ...
त्यात मोदींनी येऊन अच्छे दिन ची स्वप्ने दाखवली ... मग लोकांनी अपेक्षा ठेवल्या आणि त्याची पूर्ती झाली नसेल म्हणून ते जास्त प्रश्न विचारात आहेत . काही काही वेळेस आधीचे सरकार परवडले पण हे नको असे म्हणणारे bjp समर्थक पण भेटतात ..
हे सरकार मागचे सरकार , असे आपण बोलतो पण 2014 ला आधीचे भ्रष्ट सरकार पाडणारे पण हेच प्रश्न विचारणारे लोक होते असे मला वाटते ..
बाकी फक्त्त डोळे झाकून एकच साईड कशी बरोबर या वर असतात .
मोदींना बहुमत एक नाही 2 वेळा मिळाले ते याच लोकांमधून .. त्यामुळे सरकार विरोधी लोक प्रश्न विचारतात हे त्यांनाच वाटते जे सरकार च्या बाजूने आहेत .
प्रश्न हे व्यवस्थे विरुद्ध आहेत , सरकार कुठले ka असेना ..
बाकी काय बोलू ?
29 Nov 2019 - 9:27 pm | मुक्त विहारि
https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5046554875528450646