जावे फेरोंच्या देशा - भाग ८ : आस्वान दर्शन

कोमल's picture
कोमल in भटकंती
16 Oct 2019 - 6:09 pm

भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ भाग १३ भाग १४

.anch {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #fff !important;
background-color: #2196F3 !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}
.anch-crr {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #000 !important;
background-color: #ccc !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}

२४ सप्टेंबर २०१८

आज लवकरच जाग आली. पहाटे ५:३० च्या सुमारास. समोर नील नदीचा संथ शांत प्रवाह आम्हाला रूम मध्ये बसू देईना. पटकन जॅकेट चढवून आम्ही खाली आलो. रस्ता ओलांडून समोरच्या बाकावर बसलो. थंड झुळुका नदीच्या पृष्ठभागावर नक्षी उमटवत अलगत आमच्यापर्यंत येत होत्या. थोडावेळ बसून नदीकाठाने एक लांबवर चक्कर मारून हॉटेलवर परत आलो. 

आवरून, नाश्ता करून तयार होईपर्यंत मुस्तफा येऊन वाट पाहत थांबला होताच. आजचा पहिला स्टॉप होता Unfinished Obelisk अर्थात अपूर्ण ओबेलिस्क. ओबेलिस्क म्हणजे एक उभा उंच चौकोनी खांब, ज्याच्या टोकावर छोटासा पिरॅमिड असतो. खाली रुंद आणि वर निमुळता होता जाणाऱ्या खांबावर बनवणाऱ्या फेरोच नाव, बनवल्याचा कालखंड वगैरे माहिती कर्तृश मध्ये कोरलेली असते. राणी आणि फेरो हॅटशेप्सयुतने हि ओबेलिस्क बनवायला घेतली. ओबेलिस्क पूर्ण झाल्यावर लुक्झॉर च्या कर्नाक मंदिरात स्थापन करायचा विचार होता, पण काम सुरु झाल्यावर काही दिवसांतच ओबेलिस्कच्या ग्रॅनाईट तडे गेले आणि अपशकुन म्हणून काम थांबवण्यात आलं. अर्ध्या तासांत ओबेलिस्कचा परिसर पाहून झाला आणि आम्ही बाहेर आलो. 

5 Terre

Unfinished Obelisk जालावरुन साभार

ऊन हळू हळू वाढायला लागलं होत. आता जायचं होत आस्वान हाय डॅम पाहायला. थोडा वळणांचा रस्ता पार केल्यावर गाडी एका पूलावर आली ज्याच्या उजव्या हाताला आस्वान low dam आणि डाव्या हाताला high dam ची भिंत. खालच्या धरणाचं बॅकवॉटर मागे टाकून गाडी हाय डॅमच्या आवारात पोहोचली. धरणाच्या भिंतीवर गाडी जाते. तिथे एका ठिकाणी पार्क करून आम्ही धरणाचा नजारा पाहू लागलो. नजर जाईल तिथवर साठवलेल्या पाण्याचा पसारा. राष्ट्रपती नासर, ज्यांनी या अद्भुत प्रोजेक्टचं स्वप्न पाहिलं, त्यांचं नाव या महाकाय जलाशयाला दिलं आहे. संपूर्ण नुबीया, असंख्य पुरातन मंदिरे, अवशेष गिळंकृत करून ५५० किलोमीटर पर्यंत पसरलेल्या या विस्तीर्ण जलाशयाने इजिप्तच्या विकासामध्ये कमालीचा हातभार लावला आहे हे मात्र खरं. नासर लेक वरून येणाऱ्या गार वाऱ्याच्या आस्वाद घेत, तिथल्या माहितीचे बोर्ड वाचत, फार छान वेळ गेला. 

5 Terre

अरब सोव्हियत मैत्री प्रतीक

5 Terre

धराणातून नील मध्ये सोडलेले पाणी

5 Terre

अथांग पसरलेला नासर जलाशय

पुढचा स्टॉप होता फिलाई मंदिर, आस्वान हाय डॅम प्रोजेक्ट मधून वाचवलेल्या मंदिरांपैकी एक, आता एका बेटावर हलवण्यात आलेलं. ११ वाजता तिकीट घेऊन, बेटावर घेऊन जाणाऱ्या बोट मालकांशी घासाघीस करून एकदाचे आम्ही मंदिराच्या आवारात पोहोचलो. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर पहिल्या मंडपात पोहोचलो. ओसायरिस आणि इसिस यांना अर्पण केलेल्या या मंदिरात सुरवातीला उजव्या हाताला लागते mammisi म्हणजे जन्माची खोली . हि खोली मुख्य मंदिराला लागून असते.या मंदिराची हि खोली इसिस आणि ऑसिरीस यांचा मुलगा होरस याला अर्पण केली आहे.

5 Terre

फिलाई मंदिर बोटीमधून

5 Terre

मॅमिसि म्हणजे जन्माची खोली

याच्या शेजारीच मुख्य मंदिराच्या आवारात घेऊन जाणाऱ्या मार्गाच्या दोन्ही बाजूला सुंदर उंच खांब आहेत. या खांबांच्या शेवटी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या भिंतीवर फेरो शत्रूची मुंडकी धडावेगळी करत शक्ती प्रदर्शन आहे, ओसायरिस, इसिस, होरस, हॅथॉर यांना विविध प्रकारच्या भेटी देत आहे असे दर्शवणारे रिलिफ्स आहेत. इथून आत गेल्यावर एक ऐसपैस सोपा लागतो. येथील खांबांवर हॅथॉरचे मुखवटे कोरलेले आहेत.

5 Terre

खांबांच्या पॅसेज नंतर असलेले मुख्य द्वार

5 Terre

मुख्य प्रवेशद्वार

5 Terre

हॅथॉरचे मुखवटे

पुढे अजुन काही दरवाजे पार करुन मुख्य मंदिराच्या गाभार्‍यात आपला प्रवेश होतो. इथे इसिस आणि होरस यांच्या रिलिफ्स मधून आई मुलाच्या नात्याचे क्षण दाखवले आहेत. सोबतीला नेहमीचे फेरो देवतांना भेटी अर्पण करत आहे हे रिलिफ्स पण आहेतच. पण बऱ्याच रिलिफ्सना छिन्नी हाथोड्याने नष्ट केलं आहे. पुढच्या काही दिवसांत आम्हाला याचं कारण कळालं ते म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरू जेव्हा धर्मप्रसार करतांना फिरत इजिप्त मध्ये आले तेव्हा त्यांनी या शिल्पकलेला अश्लील मानून नष्ट केले. (असंच परप्रांतीय धर्मप्रसारासाठी भारतात आल्यावर झालेले सुद्धा दिसून येते, हे अजून एक साम्य.)

5 Terre

गाभार्‍याकडे जाणारे दरवाजे

5 Terre

इसिस होरसला स्तनपान करतांना

5 Terre

फेरो इसिसला विविध भेटी देतांना

5 Terre

फेरो इसिसचे सिस्ट्रम वाद्य वाजवून मनोरंजन करतांना

5 Terre

फेरो इसिसला विविध भेटी देतांना

5 Terre

फेरो इसिसला विविध भेटी देतांना

ओसायरिस हा सुबत्तेचा देव. याच्या हातातील Crook and flail हे त्याचे चिन्ह. Crook म्हणजे आकडा, मेंढ्याना हाकारतांना वापरतात तसा. त्यामुळे ओसायरिसला मेंढपाळांचा देव पण म्हटले गेले आहे. Flail म्हणजे धान्य झोडपायची काठी. ही जमीनीच्या सुपिकतेची निशाणी. त्यामुळे धान्य आणि गुरे यांच्या सुबत्तेचा देव असा ओसायरिस.

5 Terre

फेरो ओसायरिसला धान्य आणि फळे देतांना.

5 Terre

लाईट/साउंड शो च्या जागेवरुन डावीकडे मुख्य मंदिर, उजवीकडे मॅमिसि

मंदिराच्या बाहेर लाईट अँड साऊंड शो साठी दगडी खुर्च्या मांडल्या आहेत. तिथे थोडावेळ आराम करत बसलो. निल नदीवरून गार वाऱ्याच्या झुळूका येत असल्या तरी दुपारच्या तापलेल्या सूर्याने दगडी खुर्च्या 'बसणेबल' नव्हत्या म्हणून आम्ही आवरते घेऊन निघालो. बोटीने किनाऱ्यावर आणून सोडलं आणि आम्ही पुढचा स्टॉप नाईल म्युसिअम कडे निघालो.

नव्याने बांधलेलं हे म्युसिअम शाळकरी मुलांसाठी होते. पण आत नाईल नदीचा संपूर्ण आफ्रिकेतील प्रवास, नाईल नदीचा इतिहास वगैरे माहिती फार छान पद्धतीने दर्शवली होती. नदीतील मगरी, सुसरी, मासे, पक्षी भुस्याने भरून ठेवले होते. इजिप्त मधील काही चित्रकारांची चित्रे पण इथे ठेवलेली आहेत. फोटोग्राफीला मनाई असल्याने काढले नाहीत, पण फार काही सुटलं असं वाटलं पण नाही. 

अर्ध्या तासात म्युसिअम उरकले. आता मात्र पोटात मगरी सुसरी उड्या मारत होत्या. मुस्तफा आम्हाला घेऊन एका खास अड्ड्यावर घेऊन गेला. त्याच्या आजोबांपासून त्याच्या घरातील लोक इथे येतात. नदीतील मासे आणि कोळंबी यांच्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या जागेला रेस्टॉरंट पण म्हणता नाही येणार आणि ठेला पण नाही म्हणता येणार. उंच खजुराच्या झाडाखाली चार टेबलं मांडलेली, पण लोक इथून पार्सल जास्त घेऊन जातात. आमच्या साठी सुद्धा असंच एक पार्सल मुस्तफाने घेऊन दिलं आणि आम्हाला परत हॉटेल वर आणून सोडलं. संध्याकाळी पुन्हा भेटायचं ठरवून आम्ही रूम मध्ये आलो. मत्स्याच्या खमंग वासाने तोंडात पूर आला होताच. पार्सल उघडल्या बरोबर एकमेकांशी एक शब्दही न बोलता आम्ही मासा आणि कोळंबीचा आस्वाद घेऊ लागलो. अप्रतिम चव, मस्त कुरकुरीत तळलेली कोळंबी अहाहा!! आज पुन्हा तोंडाला पाणी सुटलं आठवणीने. 

5 Terre

मासे बनवतांनाची एक झलक

5 Terre

फायनल डीश

पाच वाजेपर्यंत आराम करून पुन्हा निघालो. जवळचं नुबीयन म्युसिअम पाहायचं राहिलं होतं ते उरकून घेऊ ठरवलं. चालत १० मिनिटात पोहोचलो. त्या दिवशी का कुणास ठाऊक पण फोटोग्राफी बंद होती आणि ठिकठिकाणी गार्डसचा पण पहारा होता. आस्वान हाय डॅममुळे नष्ट झालेल्या नुबीआ प्रांताची ओळख करून देणारे हे म्युसिअम. त्यांची जीवनशैली कशी होती, शेतीच्या पद्धती, वापरायची भांडी, अलंकार वगैरे तर होतेच पण मला जास्त आकषिर्त केलं ते निर्वासनाच्या वेळी घेतल्या गेलेल्या फोटोग्राफ्सनी. आपण राहतं घर सोडून काही महिन्यांसाठी जरी गेलो तरी परत आल्यावर जो सुखाचा अनुभव असतो तो वेगळाच. पण नुबीयन लोकांना सगळंच मागे सोडून जायचं होत. परत कधीही न येण्यासाठी. जेवढं शक्य आहे ते सामान हाताशी घेऊन बाकी मागेच सोडलेलं, एकटी पडलेली छोटी छोटी दगडी घरे, आवार आणि शेती. सगळंच उदासीन तरीही देशाच्या विकासासाठी नुबीयन लोकांनी स्वीकारलेलं. आणि मी ज्या नुबीयन लोकांना भेटले त्यांच्या बोलण्यातून कधीही याची तक्रार जाणवली नाही. म्युसिअमच्या बाकी दालनांतून मंदिरे स्थलांतरित करतांना सापडलेल्या गोष्टी मांडून ठेवल्या आहेत. आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे अबू सिम्बल मधील मंदिराचे पूर्वीचे आणि आत्ताचे स्थान दर्शवणारे प्रोटोटाईप. गार्डच्या परवानगीने याचा तेवढा फोटो टिपला. 

5 Terre

अबू सिंबल येथील मंदिर पूर्वी आणि आत्ता

म्युसिअम मधून बाहेर पडल्यावर हॉटेलच्या रस्तातच एक कॉप्टिक कॅथीड्रल लागलं. जाताजाता ते तरी का सोडा म्हणून आत गेलो. बाहेरून दुधी रंगाची इमारत आतून मात्र वेगवेगळ्या रंगांनी सजवली होती. प्रार्थनेसाठी बसायला लाकडी बाकडे. वरील उंच छतांवर मोठी झुंबरे टांगलेली आणि भिंतींवर येशूची रंगवलेली चित्रे. छान शांततेत १०-१५ मिनिटे बसून बाहेर आलो.

5 Terre

चर्च बाहेरुन

5 Terre

चर्च आतून

दोन मिनिटात चालत कॉर्निश वर आलो. इथे मकानी नावाचा छान छोटासा कॅफे आहे. इथलं कॅपचिनो फार मस्त असतं. आस्वान मधील शेवटचा दिवस म्हणून अजून एकदा घेऊन निघालो. एव्हाना आस्वान मधील नाईल कॉर्निश माझी फार आवडती जागा बनली होती. थोडं चालायचं मग एखाद्या बाकड्यावर बसायचं, परत छोटासा वॉक घेऊन परत कुठेतरी बसायचं. असं करत मुस्तफाच्या दुकानावरून दोन चकरा मारून झाल्या. 

5 Terre

इजिप्ति गोड पदार्थ कनाफा आणि कॅपचिनो

आठ वाजता तो आला, आणि दुकान दाखवायला घेऊन गेला. आज त्याचे वडील पण होते दुकानात. मुस्तफाने त्यांच्याशी ओळख करून दिली आणि आम्हाला दुकान दाखवायला किंवा संजय (टर्मिनेटर)च्या भाषेत सांगायचं तर अलिबाबाच्या गुहेत घेऊन गेला.

5 Terre

अलिबाबाच्या गुहेत, तुत च्या खुर्चीमध्ये आमचे साहेब

खरंच नजर जाईल तिथे सामानच. हारीने मांडून ठेवलेले गालिचे, कपडे, असंख्य छोटे मोठे पिरॅमिड, सोबतच इजिप्ती देव-देवता होरस, बास्तेत, रा, अनुबिस इ. च्या दगडी मूर्त्या. ममी ठेवायची पेटी, तुत-अंखं-अमुन ची सोन्याची खुर्ची, मास्क वगैरे फायबर मध्ये बनवल्या गोष्टी आणि अजून बरंच काही. आम्ही काही गोष्टी घेतल्या, त्याचं बिल चुकतं करून खाली आलो तोवर मुस्तफा मागून आला आणि त्याने नवऱ्याच्या हातात एक छोटी पिशवी दिली. आम्ही उघडून बघितली तर आत स्कॅरब बीटल ची जोडी निघाली. 

मुस्तफा: हे माझ्या कडून. 
नवरा: छान आहे, पण याची काय गरज होती. असो किती देऊ याचे?
मुस्तफा: नाही हे गिफ्ट आहे माझ्याकडून. तुमच्या दोघांना. 
मी नवऱ्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं, तसं तो पुढे म्हणाला, "हि जोडी शुभ असते. यातील जो उंच आहे तो पुरुषाला दर्शवतो आणि बुटकी आहे ती स्त्री आहे. तुमचं कुटुंब लवकर वाढो म्हणून माझ्याकडून हि छोटीशी भेट."
आम्ही काहीसं हसतच ती भेट स्वीकारली.
बाहेर येऊन त्याच्या वडिलांशी थोडं बोलत बसलो, तोवर मुस्तफा स्पेशल चहा आलाच.

दुसऱ्या दिवशी आम्हाला लक्सोर (Luxor) साठी निघायचं होत. जातांना रस्त्यात लागणारी कोम उम्ब, इदफू आणि इस्नाची मंदिरे पण पाहायची होती. मुस्तफाने त्याच्या मित्राची गाडी आमच्या दिमतीला लावून दिली होती. ड्राइवरचा नंबर वगैरे देऊन ठेवला. सकाळी ७ वाजता निघावं लागणार कारण सुरक्षेच्या दृष्टीने रात्री ११ ते सकाळी ६ हायवेवर पर्यटकांना घेऊन जाण्याची मनाई होती. असं सगळं ठरवून त्याचा निरोप घेऊन निघालो. 

पुन्हा एकदा नुबीयन जेवण जेवलो आणि हॉटेलवर परत येऊन बॅग भरून तयार ठेवल्या. हॉटेल रिसेप्शन वर सकाळी ब्रेकफास्ट बॉक्स तयार करून ठेवायला सांगितलं. रूम मध्ये येऊन बराच वेळ नील नदीला न्याहाळत घालवला. तिच्या पासूनच सुरु झाला दिवस तिला पाहात संपला. 

क्रमशः

.polaroid {
width: 80%;
background-color: white;
box-shadow: 0 4px 8px 0 rgba(0, 0, 0, 0.2), 0 6px 20px 0 rgba(0, 0, 0, 0.19);
margin-bottom: 25px;
}

.container-p {
text-align: center;
}

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

16 Oct 2019 - 11:15 pm | पद्मावति

सुंदर.

जॉनविक्क's picture

16 Oct 2019 - 11:34 pm | जॉनविक्क

आज लवकरच जाग आली. पहाटे ५:३० च्या सुमारास. समोर नील नदीचा संथ शांत प्रवाह आम्हाला रूम मध्ये बसू देईना. पटकन जॅकेट चढवून आम्ही खाली आलो. रस्ता ओलांडून समोरच्या बाकावर बसलो. थंड झुळुका नदीच्या पृष्ठभागावर नक्षी उमटवत अलगत आमच्यापर्यंत येत होत्या...

आयुष्य जगायचे असते ते अशाच क्षणांसाठी.

बाकी अतिशय सुबक भित्तिकला बघून मन उचंबळून येतंय. एक मोठं गूढ, एक मोठं नाट्य कार्यकारण समूळ न उलगडणारे.

परत त्या उत्तम भाजलेल्या माशांस पाहता पोटात कालवाकालव झालेली आहे. तुमचे किंवा संजुभाऊंचे कौतुक वाटते ते जडजांबल असणारी इजिप्शियन देवांची, देव्यांची आणि राजा राण्यांची नावं देवनागरीत लिहिल्याबद्दल, आपल्याच्यानं बापजन्मात होणार नाही हे काम.

Angelic

कोमल's picture

17 Oct 2019 - 1:27 pm | कोमल

धन्यवाद वांड भौ.

सुरवातीला मलाही नावे अवघड वाटलेली. पण आता त्यांच्या बाबत इतकं वाचलं गेलं आहे की एखाद्या कथेतील ओळखीचे पात्र वाटतात.

काय अद्भूत शिल्पकला आहे इथली. सगळंच अचाट आहे.
इजिप्तला लवकरात लवकर जावेच लागणार.

काय अद्भूत शिल्पकला आहे इथली

Wait there is more coming on this.. :D

प्रचेतस's picture

17 Oct 2019 - 2:00 pm | प्रचेतस

कार्नाक मंदिर, व्हॅली ऑफ किंग्स :)

जालिम लोशन's picture

17 Oct 2019 - 10:01 am | जालिम लोशन

सुरेख

धन्यवाद पद्मावती, जॉनविक्क, जा.लो.
_/\_

सुर्रेख!! किती सुरेख, देखणे आहे हे सारे!
तुझं लिखाणही मस्त जमतेय.

किल्लेदार's picture

24 Oct 2019 - 5:37 pm | किल्लेदार

छान मालिका.. थोडी घाईत वाचली.

विकांताला पुरवून पुरवून आरामात वाचेन म्हणतो...