body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}
.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}
.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}
#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}
.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}
मिपा दिवाळी अंक २०१९
अनुक्रमणिका
'विपश्यना' - ध्यानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग
ध्यानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग हे फारच 'लोडेड' वाक्य आहे; कारण ह्यात ध्यान, ज्ञान आणि मार्ग (विपश्यना) ह्या तीन वेगवेगळ्या संकल्पनांचा उल्लेख येतो. प्रत्येक संकल्पना हा एक मोठा अभ्यासाचा विषय असल्याने ह्या तिन्ही संकल्पना स्वतंत्ररीत्या समजून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक संकल्पना स्वतंत्ररीत्या समजून घेतली की त्यांचा परस्पर संबंध, जो विपश्यनेचा गाभा आहे, त्याचे रसग्रहण करण्याचा ह्या लेखाचा मानस आहे.
सर्वात आधी ज्ञान म्हणजे नेमके काय ते बघू या...
शाळा-कॉलेजात शिकलेले, आजूबाजूच्या वातावरणात रममाण होऊन आत्मसात केलेले, स्वानुभवातून आलेले, असे अनेक प्रकारे मिळवलेले कौशल्य आणि माहिती, हे आपण ज्या भौतिक जगात वावरतो त्याबद्दलचे भौतिक ज्ञान झाले. ते ज्ञान आपल्याला रोजच्या जगात तग धरून राहण्यासाठी (Survival) गरजेच आणि तेवढ्यापुरतेच मर्यादित असते. जडसृष्टीच्या ह्या ज्ञानाने धुंद होऊन आपण सगळे एका कैफात जगत असतो.
दृश्य भौतिक जगातल्या सर्व वस्तू ह्या जड (Solid) असतात, हा न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्राचा (Classical Physicsचा) पाया आहे. पदार्थ हे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्या सूक्ष्म कणांनी बनलेले असतात हे ज्ञान Classical Physicsनुसार प्रमाणित झाले होते. ते पुढे क्वांटम फिजिक्सने आमूलाग्र बदलून टाकले. क्वांटम फिजिक्सच्या विविध थिअरींनुसार, सर्वात सूक्ष्म कण तरंगलहरी (Waves) असतात आणि 'ऑब्झर्व्हर इफेक्ट'नुसार ते जड स्वरूपात प्रकट होतात, असा सिद्धान्त मांडला आहे. हे सर्व सूक्ष्मात जाणे कशासाठी? तर, हे विश्व कसे बनले आहे, आपण कसे बनलो आहोत, आपल्या अस्तित्वाच्या मागच्या कोणत्या शक्ती आहेत हे ज्ञान मिळवण्यासाठी! पण हे सगळे बाह्य, जड आणि दृश्य प्रकाराने मिळवलेले ज्ञान फक्त अस्तित्वाचा मागोवा घेणार आहे आणि अस्तित्वाच्या भौतिक सुखासाठीच आहे. अफाट वेगाने भौतिक प्रगती करूनही, भौतिक ज्ञानात भर पडूनही मनुष्यप्राण्याच्या आयुष्यातले दु:ख संपले का? तो समाधानी झाला का? त्याचे विकार संपले का? तर नाही, उलटपक्षी तो अधिक महत्त्वाकांक्षी होऊन अधिकाधिक विकारक्षम झाला आणि नेणिवेत जगू लागलाय.
मनुष्य, अज्ञानामुळे (Ignoranceमुळे) इंद्रियसुखांच्या मागे लागून, ‘इंद्रियसुख’ हेच अंतिम सत्य मानून बसला आहे. त्यासाठी भौतिकज्ञानाला म्हणजेच प्रत्यक्ष किंवा दृश्य ज्ञानालाच विज्ञान समजून तो सुखलोलुप होण्यात धन्यता मानतो आहे.
ज्ञानं तेसहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः ।
यज्ज्ञात्वा नेह भूयोसन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ॥
भगवतगीतेतल्या ह्या श्लोकात (७.२) कृष्ण सांगतो - ज्ञान दोन प्रकारचे आहे, प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान. आपण ज्याला विज्ञान (Science) समजून बसलो आहोत ते प्रत्यक्षात आहे प्राकृत जगताचे ज्ञान (प्रत्यक्ष ज्ञान). कृष्ण ज्याला दिव्य ज्ञान म्हणतो आहे हे आहे खरे विज्ञान, जाणिवेचे (Consciousnessचे) आकलन. हे विज्ञान म्हणजेच, जडावस्थेच्या (gross reality) पलीकडे जाऊन सूक्ष्मावस्थेतली (subtle reality) अनुभूती घेत जाणिवेचे (consciousness) होणारे ज्ञान!
आता प्रश्न पडेल की ह्या दिव्य ज्ञानाची (विज्ञान) गरजच काय? भौतिक जगात सुखसोयीयुक्त (Luxurious) आयुष्य मजेत चालले आले की! त्या सुखाबरोबर दु:खही असतेच आणि त्यामुळे येणारे चढउतार मान्य करूनच आयुष्याचा गाडा मजेत चालू आहे. काय गरज आहे ह्या असल्या सूक्ष्मावस्थेची आणि जाणिवेची? प्रश्न रास्त आहे. जन्म झाल्यापासून ते आताच्या क्षणापर्यंत आपल्या जगण्याचा एक पॅटर्न तयार झाला आहे, तो शरीर आणि मन ह्यांच्या परस्पर संबंधांवर आधारित असतो. आपण सतत बाह्य जगाकडून, ५ इंद्रियांद्वारे मिळणाऱ्या संदेशांवर प्रतिक्रिया देत असतो. आणि हे इतके यंत्रवत झालेले असते की आपण आपल्या नकळत रीअॅक्ट होत असतो, निरंतर. आपल्या रोजच्या अनुभवांमधून आपण आपला जगण्याचा पॅटर्न सतत सुधारत, अधिकाधिक साचेबद्ध, ठरावीक आणि यांत्रिक करत असतो, आपल्या नकळत. हे सगळे अतिशय सूक्ष्म पातळीवर चाललेले असते, अविरत.
पण आयुष्यात एखादी वेळ अशी येते की त्या परिस्थितीला कसे हाताळायचे हे ज्ञान आपल्याकडे नसते. त्या वेळी मनुष्य उन्मळून पडतो, उद्ध्वस्त होतो. बरेच जण म्हणतील की अशी परिस्थिती फक्त कमकुवत मनाच्या लोकांबाबत होऊ शकते, कणखर मनाचे लोक कुठलीही परिस्थिती हाताळू शकतात. हा आत्मविश्वास आतापर्यंतच्या आयुष्यातल्या अनुभवांवरून आलेला असतो. पण वृद्धावस्था, मोठे आजारपण किंवा मृत्यूची चाहूल ह्या आत्मविश्वासाला तडे देते, कारण ह्या परिस्थितींचा अनुभव नसतो आणि सूक्ष्म पातळीवर मन आणि शरीर ह्यांच्या परस्पर संबंधाच्या शास्त्राचे ज्ञान नसते आणि तेव्हा दु:खाशी सामना होतो, जो आतापर्यंत झालेला नसतो.
तर, मन आणि शरीर म्हणजेच आपण की आपण ह्या मन आणि शरीरापासून वेगळे आहोत? जर वेगळे आहोत, तर मग आपण म्हणजे नेमके कोण? आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? आणि अंतिम सत्य काय? हे जाणिवेच्या सूक्ष्म (विज्ञान) पातळीवरून समजून घेणे म्हणजे ज्ञान.
आता ध्यान म्हणजे काय ते बघू या.
जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः।
शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः।।
भगवद्गीतेतल्या ध्यानयोग ह्या प्रकरणातील वरील श्लोकात (६.७) कृष्ण सांगतो की ज्याने मन जिंकले आहे, त्याला शांती प्राप्त झाली आहे. अशा मनुष्यासाठी सुख-दु:ख, मान-अपमान, शीत-उष्ण हे समान असतात आणि तो मनुष्य कोणत्याही स्थितीत शांतच असतो.
ते मन का जिंकायचे आणि कसे जिंकायचे, त्याआधी हे मन म्हणजे काय आणि कसे काम करते हे समजून घ्यावे लागेल.
मज्जातंतुशास्त्राच्या सिद्धान्तांनुसार मानवी मेंदूची कार्यपद्धती, बाह्य जगतातून मिळालेल्या कुठल्याही संदेशाला ‘उपलब्ध माहितीच्या आधारे प्रतिक्षिप्त होणे (react)’ अशी असते. ही उपलब्ध माहिती आपण जन्म झाल्यापासून ते आतापर्यंत, पाच इंद्रियांच्या - कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा यांच्या साहाय्याने बाह्य जगतातून मिळवलेली असते. पंचेंद्रिये त्यांच्या कार्यपरिप्रेक्ष्यातल्या, बाह्य जगतातल्या प्रत्येक जड आणि सूक्ष्म गोष्टींच्या नोंदी घेत असतात आणि मेंदूतल्या स्मृतिकोशांमधे साठवून ठेवत असतात, चोवीस तास,अविरत. आपल्या संपर्कात असलेल्या व्यक्ती, घटना, घटनास्थळे, घटनांच्या वेळा, त्या त्या वेळी त्या त्या व्यक्ती आणि घटनांवर व्यक्त केलेल्या / झालेल्या भावना, क्रिया-प्रतिक्रिया ह्या सगळ्या गोष्टी ‘स्मृती’ म्हणून स्मृतिकोशांमध्ये साठवल्या जातात.. बिग डेटाच म्हणा ना! ह्या व्यक्ती, ठिकाण, भौतिक वस्तू आणि वेळ ह्या संदर्भातल्या अनुभूती ज्या आपल्या स्मृती बनल्या आहेत, त्या आपले व्यक्तिमत्त्व ठरवतात, वर्तणूक ठरवतात. रोज रोज आपण त्याच-त्याच व्यक्तींच्या संपर्कात येतो, उदा. नातेवाईक, बॉस, सहकर्मी, मित्र, शेजारी, वगैरे; त्याच त्याच वस्तू हाताळतो, उदा., टूथब्रश, टॉवेल, कार, कपडे, बूट, वगैरे; त्याच त्याच ठिकाणी जातो, उदा., ऑफिस, कॉफीशॉप, बाग, देऊळ, थिएटर, बार, रेस्तराँ, वगैरे; त्याच त्याच गोष्टी करतो, उदा., ऑफिसमध्ये पाट्या टाकणे, फेसबुकवर मतांच्या पिंका टाकत बसणे, बिचिंग करणे, कुचाळक्या करणे, जप करणे, मंत्र म्हणणे, भजन करणे, वगैरे. हे होताना, आपल्या मनात विविध भावना निर्माण होतात आणि त्याही स्मृतिकोशांमधे साठवल्या जातात. ह्या स्मृतींशी निगडित भावनांवर आरूढ होऊन अंतःपटलावर सतत उगम पावणारे विविध विचार हेच आपले मन.
आता कल्पना करा, एखादा खडूस सहकर्मी तुम्हाला अजिबात आवडत नाही, कारण तुम्हालाही स्पष्ट सांगता येत नाही, पण तो तुम्हाला आवडत नाही. तो समोर आला की तुम्ही त्याच्याशी नजरानजर टाळता. हे सगळे स्मृतिकोशांमधे साठवलेले आहे. एके दिवशी ऑफिसामध्ये तुम्ही एक आवाज ऐकता, कान तो आवाज मेंदूच्या आवाज प्रोसेस करणाऱ्या विभागाकडे पाठवतात. तिथे तो आवाज ओळखला जातो आणि स्मृतिकोशातून त्या आवाजाचा मालक तुमचा खडूस सहकर्मी आहे हे कळते. आता लगेच त्याच्याविषयी असणाऱ्या भावनांचे मज्जातंतूचे जाळे (neural network) उद्दीपित होऊन त्या भावना शरीरभर पसरतात. हे झाल्या झाल्या तुमचे मन प्रतिक्षिप्त क्रिया करते आणि तुमचा चेहऱ्यावर नाराजी झळकू लागते. त्याच्याबद्दलच्या जुन्या आठवणी विचारांच्या स्वरूपात अंतःपटलावर उमटू लागतात, ज्या कटू असतात. ह्या विचारांमुळे उद्दीपित झालेल्या भावना आणखी तीव्र होऊ लागतात. त्या आवाजाची कुजबुज अजूनही चालूच आहे. कान ती कुजबुज मेंदूच्या आवाज प्रोसेस करणाऱ्या विभागाकडे पाठवत राहतात आणि विचार येत राहणे आणि भावना उद्दीपित होत राहणे हे दुष्टचक्र चालू राहते. हे इतक्या प्रचंड वेगात होत असते की हे होतेय ही जाणीवच आपल्याला नसते. मग भावनेचा प्रचंड उद्रेक होऊन तुम्ही आवाजाच्या दिशेने जाऊन, "शांत बसा!" असे जोरात ओरडता. पण ओरडून झाल्यावर तुमच्या लक्षात येते की तो तुमचा खडूस सहकर्मी नसतोच मुळी, नवीनच रुजू झालेला एक नवीन कर्मचारी असतो. नवीन असल्यामुळे तो हळू आवाजात बोलत असतो.
ह्या उदाहरणावरून लक्षात येते की पंचेंद्रियांकडून मिळणाऱ्या बाह्य जगतातील उत्तेजना (stimuli) आपल्या मनाचा ताबा घेतात आणि मन यांत्रिकपणे जुन्या स्मृतींच्या आधारे शरीराकडून प्रतिक्षिप्त क्रिया करून घेत, आपल्या नकळत. वरच्या उदाहरणात नेमका प्रॉब्लेम कुठे सुरू झाला? स्मृतिकोशातील मज्जातंतूंच्या जाळ्यातून मिळालेल्या माहितीवरून तर्कबुद्धी जेव्हा त्या आवाजाचा मालक खडूस सहकर्मी आहे हे ठरवते तेव्हा? नाही, मनाला अजूनही प्रतिक्षिप्त व्हायला अजूनही उत्तेजना (stimuli) मिळाली नाहीये. पण ज्या क्षणी त्या आवाजाचा मालक खडूस कर्मचारी आहे हे समजून भावना उद्दीपित झाल्या, त्याच क्षणी तिरस्काराच्या संवेदना शरीरभर पसरतात. ह्या संवेदनाच ओरडण्याची प्रतिक्षिप्त क्रिया होण्यास कारणीभूत असतात, कारण मन फक्त आणि फक्त संवेदनांवरच प्रतिक्षिप्त होतं.
ह्या संवेदना बारा महिने चोवीस तास शरीरभर लहरत असतात. मन अविरत ह्या संवेदना वाचत असते आणि त्यांच्यावर प्रतिक्षिप्त क्रिया करत असते. हे होत असते, कारण आपण जाणिवेत नसतो. मोहाचा (ignoranceचा) पडदा पडल्यामुळे आपण नेणिवेत गेलेलो असतो आणि बाह्य जगातील घडामोडींमुळे उद्दीपित होऊन, मनाचा तोल जाऊन, मन शरीराकडून ‘प्रतिक्षिप्त क्रिया’ करून घेत राहते, आपल्या नकळत.
मनाचे दोन भाग असतात. पंचेंद्रियांकडून माहिती मिळवत राहून ती मेंदूतल्या ज्ञानकेंद्रांकडे प्रोसेसिंगसाठी पाठवत राहणे हे काम करणारे मन 'चेतन मन' असते. त्या माहितीचे ज्ञानकेंद्रात प्रोसेसिंग करून प्रतिक्षिप्त क्रिया घडवून आणण्याचे काम करणारा भाग 'अचेतन मन'. हे अचेतन मन १२ महिने २४ X ७ कार्यरत असते, अगदी आपण झोपेत असतानाही. आपल्या वर्तणुकीला हेच अचेतन मन जबाबदार असते आणि संवेदनांवर प्रतिक्षिप्त होत असते . ह्या अचेतन मनाचा तोल ढळू न देणे आणि हे मन जे ‘आपल्या’ नकळत प्रतिक्षिप्त क्रिया करून घेतेय ते ‘आपण’ म्हणजे कोण? हेच ज्ञान मिळविण्यासाठी ध्यान करायचे.
ध्यान करायचे म्हणजे अचेतन मनाला ताब्यात ठेवून, प्रतिक्षिप्त क्रिया करू देण्याऐवजी, जाणिवेत ठेवून, ‘सुनियंत्रित क्रिया’ करायला शिकवायचे. ध्यान करायचे म्हणजे अचेतन मनाचे ‘रिप्रोग्रामिंग’ करायचे. हे ध्यान करणं अतिशय शास्त्रआधारित तंत्र आहे. ह्यात काहीही धार्मिक नाही, संप्रदायी नाही, दैवी नाही किंवा स्पिरीच्युअल नाही. ध्यान करणं आध्यात्मिक जरूर आहे कारण अध्यात्म म्हणजे स्वतःचं तटस्थ निरीक्षण, ह्यात आत्मा वगैरे काही नाही. मन आणि शरीर यांच्या परस्परसंबंधांचे शास्त्र अनुभवण्याचा अभ्यास म्हणजे ध्यान!
आता ज्ञान आणि ध्यान म्हणजे काय हे कळल्यावर ध्यानाचा मार्ग, विपश्यनेकडे वळूयात...
आपलं मन चंचल असतं, ते शरीरावरील संवेदना पकडून, स्मृतीकोशांतील आठवणी काढून भूतकाळात रमलेलं असतं नाहीतर भविष्यातलं स्वप्नरंजन करण्यात मग्न असतं. नीट विचार करून बघा, मन वर्तमानात रमत नाही. ते वर्तमानात थांबायलाच तयार नसतं. जर मनाच रिप्रोग्रामिंग करायचं तर मन ताब्यात आणून त्याला वर्तमानात स्थिर करणं ही पहिली आणि गरजेची पायरी आहे. जर बाह्य संदेश मिळत राहिले तर मन आपला चंचल राहण्याचा धर्म पूर्ण करत राहणार म्हणजे हे बाह्य संदेश थांबावयाला हवेत. इथून थियरी संपून प्रॅक्टिकल (मार्गक्रमण) सुरू होते.
समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिर: |
सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ||
भगवतगीतेतल्या ध्यानयोग ह्या प्रकरणातील वरील श्लोकात (६.१३) सांगितलेल्या स्थितीत शरीर, मान आणि डोके उभ्या सरळ रेषेत धरून डोळे बंद करून मांडी घालून स्थिर बसायचे. डोळे बंद केल्यास आपण बाह्य जगताशी संबंध तोडू शकतो आणि अंतर्मुख होण्याची ती पहिली पायरी आहे. त्यानंतर मन एकाग्र करून त्याला वर्तमानात थांबून ठेवल्यास ते शांत होऊ लागत. जितकी मनाची एकाग्रता जास्त तितके ते अधिकाधिक शांत होत जाते. मनाला सतत काहीतरी काम लागत ते स्वस्थ बसत नाही. पण आता बाहेरचे मन उद्दीपित करणारे संदेश येणं बंद झालंय आणि मन वर्तमानात स्थिर झालंय, ही झाली समाधीवस्था. ह्या अवस्थेत मनाच्या तळाशी खोल दडलेले विकार बाहेर येतात, विचारांच्या रूपात आणि ते विचार शरीरावर संवेदना पसरवतात. बस्स, मनाला ह्या संवेदनाच हव्या असतात, त्याचं ‘प्रतिक्षिप्त होणं’ हा जन्मसिद्ध अधिकार बजावायला. पण इथेच आपल्याला रिप्रोग्रमिंग करायचेय मनाचे. शरीरावर होणाऱ्या संवेदनांचं तटस्थपणे फक्त निरीक्षण करायचं, अजिबात रीअॅक्ट न होता.
संवेदनाचं तटस्थ निरीक्षण म्हणजे काय? आपण परत वरचं उदाहरण बघूया. ज्याक्षणी त्या आवाजाचा मालक खडूस कर्मचारी आहे हे समजून भावना उद्दीपित झाल्या, त्याक्षणी तिरस्काराच्या संवेदना शरीरभर पसरल्या होत्या. म्हणजे नेमकं काय झालं होतं? सर्वप्रथम श्वासाची लय बदलते, नॉर्मल लयीतला श्वास जड होतो. त्यानंतर हाताच्या तळव्यांना कंप सुटतो, चेहऱ्याचं एकंदरीत तापमान वाढतं, जशा भावना तीव्र होत जातात तसं शरीरभर कंप जाणवू लागतो. ह्या साऱ्या संवेदना आहेत. हे जर त्यावेळी कळलं असतं आणि त्यावेळी जर श्वासावर आणि शरीरभर पसरत असलेल्या संवेदनांवर जर लक्ष केंद्रित केलं असतं तर जाणिवेत राहता येऊन जी प्रतिक्षिप्त क्रिया केली गेली, ती न होता, परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळता आली असती.
मनाची एकाग्रता आणि संवेदनांचे तटस्थ निरीक्षण हाच विपश्यना ध्यानप्रक्रियेचा गाभा आहे. विपश्यना शब्दाची फोड वि + पश्यना अशी आहे. पश्यना म्हणजे पाहणे आणि विपश्यना म्हणजे विशेष पद्धतीने पाहणे. थोडक्यात स्वतःच्या आत डोकावणे!
विपश्यना ध्यानपद्धतीच्या पहिल्या टप्प्यात (आनपान सती) केवळ मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता मिळण्यासाठी सराव केला जातो. श्वासावर मन एकाग्र करून समाधीवस्था प्राप्त करायची असते. ही तीव्र एकाग्रता किंवा समाधीवस्था पुढच्या टप्प्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. पुढचा टप्पा आहे विपश्यनेचा, ज्यात शरीरभर क्षण-प्रतीक्षणं उगम पावणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या संवेदनांचे तटस्थ निरीक्षण करायचे असते, त्या संवेदनांवर प्रतिक्षिप्त (react) न होता. डोक्याच्या टाळूपासून सुरुवात करून, इंचाइंचाने पुढे सरकत, पायाच्या अंगठ्यापर्यंत, शरीरावरील प्रत्येक भागावर उगम पावणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या संवेदनांचे तटस्थ निरीक्षण करत प्रवास करायची प्रक्रिया (body scanning) म्हणजेच विपश्यना!
ह्या प्रवासात संवेदनांवर प्रतिक्षिप्त न होणं हेच असतं मनाचं रिप्रोग्रमींग! जितक्या नियमितपणे विपश्यना साधना केली जाते, तितके मनाच्या खोल भागात दबून ठेवले गेलेले विकार विचारांच्या स्परूपात वर येऊन शरीरभर संवेदना पसरवतात. त्या संवेदनांवर रीअॅक्ट झाले नाही तर त्या संवेदना क्षीण होऊन विरून जातात आणि मनाची त्या विकारांपासून मुक्तता होते.
विपश्यनाध्यानाची निरंतर साधना हेच सर्व विकारांपासून मुक्त होण्याचे गुपित, म्हणजेच ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग!
प्रतिक्रिया
26 Oct 2019 - 9:44 am | प्रकाश घाटपांडे
तरी मला सोकाजीबद्द्ल संशय होताच. हे अस कधी त्याच्याकडून बाहेर पडेल याचा. आतून आलेले लिहिलय. पण ते अंतिम सत्य भानगड नश्शे फार तर आपल्या पुरत सत्य त्या क्षणापर्यंत आपल्यापुरत अंतिम. अस मला वाटत.
28 Oct 2019 - 5:06 pm | सोत्रि
पकाकाका, धन्यवाद.
अन्तिम सत्य आपल्या पुरत सत्य असत, अगदी १००%! म्हणूनच ते अध्यात्म, अधि + आत्म असत.
तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो ह्याचा आनन्दच आहे! :=)) :=)) :=))
- (शास्त्रापुरता) सोकाजी
26 Oct 2019 - 12:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मालक लेखन आवडलं. आवडलं यासाठी की अनेक मित्र मैत्रिणी या विपश्यनेच्या 'नादी' लागलेले पाहिले आहेत. आणि त्या दहा दिवसाच्या अनेक वेळच्या अभ्यासक्रमातून आता आनंदी झाल्याचं, बदल झाल्याचे अनेकदा ऐकले आहे. आपणही त्याच अंगाने ही सर्व क्रिया काय असते ते विस्तृतपणे सांगितलं म्हणून लेखन आवडले.
मला हे व्यक्तिगत अजिबात पटत नसले तरी मानसं ज्यामुळे आपली दुःख विसरुन जातील ते ते त्यांनी करावे असे म्हणेन.
सोत्रीसेठ, माझ्यासाठी तुम्ही एखादे रंगीत कॉकटेल दिलं असतं तर ते मला अधिक आवडलं असतं.:)
-दिलीप बिरुटे
26 Oct 2019 - 1:05 pm | पाषाणभेद
>>> मला हे व्यक्तिगत अजिबात पटत नसले तरी मानसं ज्यामुळे आपली दुःख विसरुन जातील ते ते त्यांनी करावे असे म्हणेन.
तेच म्हणतो. पण काय आहे ते एकदा पाहिले पाहिजे.
बाकी सोकाजीचा लेख हा असा असायला पाहिजे होता: "'कॉकटेल' - दारूतून घराकडे जाण्याचा मार्ग"
खॅ खॅ खॅ
( हि आपली टिपीकल मिपा प्रतिक्रीया बरं का सोकाजी.)
बाकी लेख मनापासून लिहीलाय हं. थोडेफार समजले. पण आमच्या बुद्धीचा आवाकाच लहान असल्याने एवढा बीग डाटा त्यात मावणार नाही.
(परत एकदा खॅ खॅ खॅ!!!)
26 Oct 2019 - 1:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"'कॉकटेल' - दारूतून घराकडे जाण्याचा मार्ग"
=))
काही आयडीच्या मनात काही प्रतिमा करून टाकतो म्हणून हे असं होतं. तुम्ही जाऊन या विपश्यनेला.
-दिलीप बिरुटे
(सोकाजीचा विद्यार्थी)
28 Oct 2019 - 6:00 pm | सोत्रि
आपली टिपीकल मिपा प्रतिक्रीया -> बसवला टेम्पोत!
हॅ हॅ हॅ....
- (मिश्कील) सोकाजी
28 Oct 2019 - 5:13 pm | सोत्रि
>> अनेक मित्र मैत्रिणी या विपश्यनेच्या 'नादी' लागलेले पाहिले आहेत
नादी लागलेत म्हणजे काय आणि तुम्हला ते तस का वाटतय?
कॉकटॅलसाठी, आता श्वेता चक्रदेव यान्च्याशी सम्पर्क साधा! त्यान्च्या समर्थ हातात कॉकटेलचा वारसा देऊन मी रिटायरमेन्ट घेइन म्हणातो!
- (मुमुक्षू) सोकाजी
29 Oct 2019 - 11:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नादी लागलेत म्हणजे काय आणि तुम्हला ते तस का वाटतय?
एक तर अनेकदा त्या कोर्सला गेली आहे, स्वयंसेवक म्हणूनही गेलेली आहे, तिच्या बोलण्यातून नेहमी यव झालं आणि त्यव झालं असं ऐकलं आहे, पण राग मोह मद मत्सर आणि मानवी स्वभावाचे जे विकार आहेत ते अजूनही तसेच आहेत असं माझं निरिक्षण आहे.
मानवी नैसर्गिक विचाराला- स्वभावाला थोपवण्याचा तो विचित्र प्रकार आहे, असं माझं व्यक्तीगत मत आहे. अर्थात विपश्यनेने काही फरक पडत नसल्यामुळे या ज्ञानाच्या मार्गाने जाणार्या त्या त्या सर्वांना आपल्या शुभेच्छा आहेतच. कारण पुन्हा ते मानवी नैसर्गिक स्वभावालाच जागणार आहेत याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही.
शुभं भवतू....!
श्वेताचं स्वागत आहेच, पण तुम्ही निवृत्ती घेऊ नका असेच आमचे म्हणने आहे. :)
-दिलीप बिरुटे
(नैसर्गिक)
29 Oct 2019 - 12:22 pm | सोत्रि
ह्यासाठी एका डॉक्टरने लिहीलेले हे पुस्तक नक्कीच रेकमेन्ड करेन. हे पुस्तक नक्की वाचा! (इथे लिन्क आहे)
दुसर्या एका डॉक्टरने लिहीलेले अजून एक पुस्तक (मराठी) सजेस्ट करतो. मनाचे व्यवस्थापन हे ही पुस्तक नक्की वाचा!(इथे लिन्क आहे)
- (वाचक) सोकाजी
26 Oct 2019 - 12:43 pm | शाम भागवत
माणूस शेवटच्या क्षणापर्यंत शिकतच असतो.
26 Oct 2019 - 3:28 pm | यशोधरा
हे वाचताना खूप शांत वाटले. सोपे, सहज वाटले वाचताना, प्रत्यक्ष अंमल करणे सोपे नसावे. पण प्रयत्नांती जमावे.
26 Oct 2019 - 7:59 pm | सुबोध खरे
अतिशय सुंदर आणि सोपे वर्णन आहे.
मला पूर्वी प्रश्न पडत असे कि विपश्यना करणारे बरेच लोक इतके चिडके किंवा विकारी का दिसतात?
दुर्दैवाने लोक विपश्यना म्हणजे डिटॉक्स सारखी समजतात. म्हणजेच एकदा डिटॉक्स केले कि परत नको नको त्या गोष्टी करणे / खाणे सुरु होते.
खरं तर विपश्यना हि निरंतर चालू राहण्याची प्रक्रिया असायला हवी.
येथे मला स्वामी विवेकानंदांचा एक किस्सा आठवतो आहे.
स्वामीजींना एका माणसाने विचारले कि स्वामीजीं गंगाजल पवित्र आहे आणि त्याला पाप स्पर्श करू शकत नाही हे सत्य आहे का
स्वामीजी हो म्हणाले
त्यावर तो म्हणाला म्हणजे मी गंगा स्नान केले तर माझी पापे धुतली जातील का?
स्वामीजी म्हणाले आपण जेंव्हा गंगा स्नानाला जाता तेंव्हा पाप काठावर बसून असते. आपण स्नान करून बाहेर आलात कि पाप परंत तुमच्यावर आरूढ होते.
यामुळेच विपश्यना वारंवार करूनही माणसे विकारीच राहतात आणि शांत समाधानी झालेली दिसत नाहीत.
जसे स्वच्छता आणि सुरक्षितता हि केवळ दिवाळी साठी करायची गोष्ट नसून कायम चालू राहणारी प्रक्रिया असली पाहिजे तसेच इंद्रिय आणि विकारांवर ताबा मिळवण्याची प्रक्रिया हि निरंतर असावी लागते.
27 Oct 2019 - 10:39 am | प्रकाश घाटपांडे
खरं तर विपश्यना हि निरंतर चालू राहण्याची प्रक्रिया असायला हव>>>>+१. निरन्तर जमेल नाही जमेल, आत्तापुरते तर करु हा विचार असतो
28 Oct 2019 - 5:23 pm | सोत्रि
डॉक, विवेकानन्दान्चा किस्सा अतिशय चपखल!
हे फारच जनरलायझेशन होतय. शान्त स्माधानी होण, ध्यानमार्गाने, हे मार्गक्रमण आहे. तपश्चर्या आहे ती. आत्तापर्यतच्या आयुष्यातले मनावरचे सन्स्कार, तसेच पूर्वसन्चित आणि रोज रोज मनावर होत असणारे सन्स्कार यान्च निर्मूलन ओव्हरनाइट होणार नाही. तुम्हीच तुमच्या शेवटच्या वाक्यात म्हटलत तस आणि जे ह्या लेखात मान्डायचा प्रयत्न केलाय तस, ही प्रक्रिया निरंतर असावी लागते.
ह्यातला दुर्दैव हा शब्द खुप महत्वाचा आहे. तस समजणारेच योग्य ती प्रगती करत नाहीत आणि एकन्दरीत विपश्यनेलाच बोल लावले जातात.
- (मुमुक्षू) सोकाजी
26 Oct 2019 - 8:13 pm | जॉनविक्क
असो, विपश्यनेचा एकमेव प्रॉब्लेम हाच आहि की ती करावी लागते. जन्म होतो, मृत्यू होतो नैसर्गिक आहे जीवाला यासाठी काही करावे लागत नाही...
पण जीवन जगणे करावे लागते.... आणी विपश्यनेचाही हाच प्रॉब्लेम आहे. म्हणूनच बहुतांश लोक ती करूनही आयुष्यभर अथवा महानिर्वाणापर्यंत चालू ठेवू शकत नाहीत. कारण ती कामधंदे नसणाऱ्या अथवा पराकोटीची सुखासीनता असणाऱ्या समाजाचे व्यसन आहे असे कोणाच्याही भावना दुःखावण्याचा हेतू न ठेवता परखडता समोर यावी म्हणून बोलतो.
27 Oct 2019 - 1:31 pm | पाषाणभेद
आपण विस्तृत लिहावे हि विनंती.
आपले परखड बोलणे विचार करण्याजोगे अन पटण्यासारखे आहे.
28 Oct 2019 - 5:37 pm | सोत्रि
करावी लागण हा प्रॉब्लेम कसा काय असू शकतो? 'केल्याने होत आहे रे, आधि केलेची पाहिजे' अस खुद्द समर्थ रामदास स्वामी म्हणून गेलेत की!
नेमक अस वाटण किन्वा अस मत असण ह्यातून मी गेलोय. २०१३ मधे एक मिपाकर, विलासराव, ह्यान्च्याबरोबर नेमक हेच विचार बोलत २-३ तास वाद घातला होता. त्यावेळी त्यान्नी जे मला सान्गितले होते तेच इथे सर्वान्साठी सान्गतो, "विपश्यना ही अनुभूती आहे, योग्य वेळ येताच तिची अनुभूती येइलच!" आज ते सहाअचार्य आहेत आणि वाद घातलेला मी ६ वर्षानन्तर अनुभूती घेतो आहे. मला कामधन्दा आहे आणि पराकोटीची सुखासीनताही नाहीयेय. आणि व्यसनाचे म्हणाल तर सगळी व्यसन का लागतात ह्याच्याच मुळाशी विपश्यना नेते आणि त्यान्च निर्मूलन करण्यात मदत करते.
- (मुमुक्षू) सोकाजी
28 Oct 2019 - 10:36 pm | जॉनविक्क
ती विपश्यनेचेच निर्मूलन करेल काय ? मग सगळी व्यसने सुटली कशी म्हणणार ?
श्वासोच्छ्वासाचे उदा त्यासाठीच दिले होते की तो आपोआप होतो तसा जागरूकपणे विशिष्ठ लयीत करताही येतो आणी ते करणे थांबले तर माणसाचा जीव जात नाही तो त्याच्या लयीत शरीर जीवन्त ठेवायला सुरूच राहतो.
पण विपश्यना थांबवली तर ती चालू रहात नाही आणी दीर्घकाळ चालू ठेवली तर व्यक्ती बऱ्याच गोष्टी टाळायला सुरुवात करते. ती व्यक्ती हेखेखोर व आत्मकेंद्रित होते हाच त्यांच्या कुटुंबियांचा अनुभव असतो, समाजाने तर या व्यक्तीच्या प्रत्यक्ष कुटुंबियांसोबत व्यक्तींमधील वागणुकीचा उहापोह न करता त्या व्यक्ती बाबत आपले मत न बनवणेच उत्तम. समाधीअवस्था प्राप्त करूनही अहिंसेचा विकृत तिरस्कार नाकारणारे गौतमबुद्ध कुठे आणी कशात काहीही नसताना विपश्यनेच्या क्षुल्लक आंनदावर समाधी मिळाल्याच्या आविर्भावात व साधनेच्या तथाकथित अभ्यासाने बाहयरुपी वर्तनाने शांत राहून मनात राग व द्वेषाचे धगधगते निखारे राखून विरोधाभासी सम्यकता कमावलेले तथाकथित विपश्यना सपोर्टर्स पैशाला पासरी आहेत.
एक फार मोठा फ्लॉव विपश्यनेमधे आहे पण तो आपणास समजून यायला अजून 6 ते 7 वर्षे यात खपवावी लागतील. नक्कीच चर्चा करू. बाकी आचार्य वगैरे बनणे तर प्रत्यक्ष बुद्धाचेही ध्येय न्हवते त्यामुळे मी विपश्यना करून कोण काय बनलं कोणाची व्यसने सुटली, कोणाची सुरू झाली वगैरे ट्रीफ्लिंग्सना अध्यात्माच्या दृष्टीने विषेश महत्व देत नाही. कोणी देउही नये
9 Nov 2019 - 5:47 pm | स्वधर्म
जॉनक्विक, अापण विपश्यना केली अाहे का? अाणि १०-१२ वर्षांनी कोणता मोठा फ्लॉ अापल्या लक्षात अाला अाहे? इथे सांगितल्यास अनेक जणांचा खूप मोठा वेळ वाचेल. अन्यथा हा वादासाठी वाद असा मुद्दा होईल.
9 Nov 2019 - 10:18 pm | जॉनविक्क
आणी भौतिकतेपलीकडील शाश्वत आंनदाच्या अस्तित्वाची एका बऱ्याच विस्तृत मर्यादे पर्यंत अनुभूती मला विपश्यने इतकी व्यवस्थित इतर साधना वा मार्गातून कधीच मिळाली नाही.
10-12 वर्षांनी जग असे असेल व त्यातून वाचण्यासाठी तुम्ही आतापासून हे उपाय केले पाहिजेत हे बोलणे जास्त असंबद्ध वादासाठीचा वाद ठरेल म्हणून जर आपण विपश्यनेमधे 5 वर्षे (माझा कालावधी इतकाच) सातत्य राखले असेल तर आपल्याशी चर्चा अवश्य होउ शकते व पुढील मार्ग काय असावा यावर माझी मते मी प्रकटही करू शकतो, तो पर्यंत आपण जसे मी आधीच या धाग्यावर म्हटले आहे तसे विपश्यना करून बघायला माझी अडकाठी न्हवे तर सहमती आहे एव्हडेच विचारात घ्यावे यात किंतू नाही.
10 Nov 2019 - 10:18 am | सोत्रि
माझ्या मते त्यांना 'तुमच्या १०-१२ वर्षांच्या साधनेनंतर' कोणता फ्लॉ आढळला असे म्हणायचे असावे. मलाही ते समजून घ्यायला आवडेल.
- (उत्सुक) सोकाजी
10 Nov 2019 - 10:45 am | जॉनविक्क
जे मला बोलायचे विपश्यनेबाबत ते आधीच स्पष्ट केले आहे.
10 Nov 2019 - 10:48 am | जॉनविक्क
त्यांनी माझे म्हणन्यास त्यांचे अनुभवकथनातून पुष्टी केलेली असल्याने आपणास नेमके अजून काय माझाकडून हवे आहे ?
28 Oct 2019 - 10:57 pm | जॉनविक्क
व्यक्ती अध्यात्मात दुबळी होऊ लागली आहे याचे प्रमुख लक्षण, त्यांना स्वानुभवावरही बोलताना जरा ट्रॅकबाहेरचे प्रश्न सुरू केले नेमके काय बोलावे ते हमखास सुचत नाही, टेकुची गरज पडतेच पडते. असो, योग्य असेल तर आम्ही सोकांजीसाठी रामदासांनाही सामोरे जाऊ...
29 Oct 2019 - 7:03 am | सोत्रि
ओके, रामसास स्वामीन्च्या वचनाचा दाखला ही माझी लेखनमर्यादा, ते माझ मत होत कराव लागण्याबद्दल!
पण मुद्दा तो नव्हता, करावी लागण हा प्रॉब्लेम कसा काय असू शकतो? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
- (अभ्यासू) सोकाजी
29 Oct 2019 - 7:17 am | जॉनविक्क
करावी लागण हा प्रॉब्लेम कसा काय असू शकतो.
करावे लागणे हा प्रॉब्लेम का असू शकत नाही हा खरा प्रश्न आहे जर तुम्ही साधंनेमुळे खरोखर बंधनमुक्त होत असाल तर..!
आता माझ्या लेखन मर्यादेला मधे आणून दुसऱ्याच्या वाक्याचा आधार घेतो, जे कृष्णमूर्ती हेच म्हणत असत. बाकी हा दुसऱ्याचा आधार मी माझ्या अध्यात्मिक अनुभवसमृध्दीचा दुबळेपणा म्हणून घेत नसून सध्या मी म्हटले मत आपल्या मताच्या अनुकूल नसल्याने मला स्वतःचा रेफरन्स देऊन बोलणे योग्य ठरणार नाही म्हणून जे. कृष्णमूर्ती मधे आणत आहे कारण स्वानुभवातून हाती काही लागले नसते तर जे. कृष्णमूर्तींनाही सामोरे जाणे अमान्य नाही :) असो मुख्य मुद्दा सुटून भलतीकडेच पाल्हाळ लावल्याबद्दल क्षमा. सध्या फक्त एव्हडाच फोकस असुदे की...
करावे लागणे हा प्रॉब्लेम का असू शकत नाही ?
29 Oct 2019 - 7:24 am | जॉनविक्क
अन्यथा अशी कोणतीही साधना जी करून गोष्टी प्राप्त केल्या जातात त्या टिकवण्यातच ऊर्जा खर्च होत राहते हे माझे प्रामाणिक मत आहे आणी म्हणूनच आशा बाबी मी कामधंदे नसलेल्या अथवा सुखासीन जीवनशैली असलेल्या लोकांची व्यसने मानतो. व्यसन संपलं की नशा उतरते अन्यथा व्यसनापायी माणूस संपतो :)
29 Oct 2019 - 10:26 am | सोत्रि
तुम्ही सुरुवातीला म्हणालात तस, 'जन्म होतो, मृत्यू होतो नैसर्गिक आहे जीवाला यासाठी काही करावे लागत नाही पण जीवन जगणे करावे लागते'
हे जीवन जगणे कराव लागते हाच कर्मयोग! त्यामुळे तो जसा प्रॉब्लेम नाही तसच विपश्यना हाही कर्मयोगच आणि प्रोब्लेम नाही.
पहिला श्वास आणि अखेरचा श्वास आपल्या हातात नाही, पण मधले सगळे श्वास आपल्या हातात असतात. त्यान्चा वापर करून जगण सुसह्य आणि शान्तीमय करण हा कर्मयोग, प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम म्हणजे समस्या, ती समस्या सोडविण्याचा प्रयास हा खुद्द प्रोब्लेम होऊ शकत नाही. हो, चुकीचा प्रयास हा दुसरी समस्या बनू शकतो पण योग्य तो प्रयास / प्रयत्न / साधना हा प्रॉब्लेम नाही.
'श्वासोच्छश्वास१ करता करता सन्वेदनान्ची जाणिव आपोआप होत राहण' ही अवस्था आली कि विपश्यना करावी लागत नाही ती आपोआप होते. त्या अवस्थेपर्यन्त पोहोचण हीच साधना. ते एका रात्रित किन्वा ठराविक मुदतीत व्ह्यायलाच हवे अशी हमी हवी अशी अपेक्षा असल्यास विपश्यनेची ३-४ ओळीन्ची कृती समजली पण विपश्यना साधना नाही अस म्हणण्यास प्रत्यव्याय नसावा.
- (साधक) सोकाजी
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ म्हणूनच बुद्धाने 'श्वास', जो अटळ आणि नैसर्गिक आहे, त्याच्या म्हणून वापर करून साधनेची कृती शोधली जी कुठेही आणि कधीही विनाप्रयास करता येते.
29 Oct 2019 - 12:53 pm | सुबोध खरे
करावी लागण हा प्रॉब्लेम कसा काय असू शकतो.
करावे लागणे हा प्रॉब्लेम का असू शकत नाही ?
मला एवढं मोठं अध्यात्म समजत नाही आणि झेपतही नाही.
परंतु ज्यांना सहज होतं त्यांनी सहज करावं
आणि ज्यांना होत नाही त्यांनी कुंथावं
एकंदरीत मुक्ती मिळणं हे महत्त्वाचं
क्रिया कोणतीही असो
29 Oct 2019 - 9:16 pm | जॉनविक्क
हे एका डॉक्टरपेक्षा जास्त व्यवस्थित कोण सांगेल ?
26 Oct 2019 - 10:53 pm | ज्ञानोबाचे पैजार
सब का मंगल हो,
लेख आवडला
पैजारबुवा,
26 Oct 2019 - 10:57 pm | सौरव जोशी
फारच सुन्दर लेख... "मन वर्तमानात रमत नाही" हे २००% पटल. बर्याचदा ध्यान लावण्याचा प्रयत्न् केलाय पण अपेक्षित यश साध्य झाल नाही कारण अंतर्मानात उठणारे तरंग आटोक्यात ठेवायची कला जमलेली नाही.
"शरीरावर होणाऱ्या संवेदनांचं तटस्थपणे फक्त निरीक्षण करायचं, अजिबात रीअॅक्ट न होता"
हे कधी जमेल का असा विचार करतोय....!
28 Oct 2019 - 5:40 pm | सोत्रि
विचार करण्याएवजी विपश्यना करा! :)
- (साधक) सोकाजी
27 Oct 2019 - 9:28 am | जेम्स वांड
एकंदरीतच फार क्लीष्ट प्रकरण आहे ह्यावर परत एकदा विश्वास पक्का झाला हा हा हा हा
27 Oct 2019 - 1:04 pm | जॉनविक्क
आणी प्रत्यक्ष साधना तर 3 ते 4 ओळीत बसू शकते इतकी साधी सोपी आहे. पण श्वासोच्छ्वासाप्रमाणे ती सतत करावी लागते..आणी श्वासोच्छ्वास तर आपोआप होत असतो पण विपश्यना नाही, ती करावीच लागते अन्यथा तिचे घडणे थांबते म्हणूनच लाखो लोक विपश्यना शिकूनही निर्वाण अवस्था येणारे हाताच्या बोटावर देखील मोजण्याइतके लोक नसावेत.
बुध्दाच्या काळात परिस्थिती नेमकी उलटी होती म्हणून तर बुद्ध धर्म भारतात 1500 वर्षे टिकून होता तितकी वर्षे तर शंकराचार्य आल्यापासून पुनर्स्थापित झालेल्या हिंदु धर्माला देखील अजून झालेली नाहीत :) पण तो वेगळा विषय आहे.
28 Oct 2019 - 5:49 pm | सोत्रि
३ - ४ ओळीत फक्त कृती बसते, साधना नव्हे. नाहीतर बुद्धाच्या प्रवचनान्चे ३ पेटारे (त्रिपीटक) भरलेच नसते.
का, काय आणि कसे हे सर्व समजून केले के विपश्यनेचे योग्यप्रकारे आकलन होऊन योग्य ती प्रगती करता येते. ३ - ४ ओळीत अडकून बसल्यास साधना योग्य तशी होऊ शकणार नाही.
साधना त्यासाठीच करायची की ते घडण हीच सवय होऊन थाम्बणार नाही आणि ते एका रात्रीत होणार नाही.
- (साधक) सोकाजी
28 Oct 2019 - 10:13 pm | जॉनविक्क
शब्द खेळ मला अपेक्षित नाही. तरीही सांगतो साधनेची कृती 3-4 ओळीत बसते. साधना श्वासोच्छ्वासाप्रमाणे सतत करावी लागते, प्रवचने म्हणजे प्रत्यक्ष साधना नाही ती ऐकून साधनेची अनुभूती येत नाही तेंव्हा हे बाजूलाच राहूदे.
29 Oct 2019 - 6:39 am | सोत्रि
दूरवरून धावत येऊन, कानामागून हात वर करून चेंडू जोरात फेकणे म्हणजे बॉलिंग ही एका वाक्यात बॉलिंगची कृती झाली. ही कृती वाचून आता सगळेच होतकरू, जगप्रसिद्ध बोलर्स व्हायला हवेत. पण सगळेच होत नाहीत आणि झालो असे म्हणणारे पैशाला पासरी आहेत गल्लीबोळत, पण म्हणजे कृतीमधे फ्लॉज आहेत का? तर नाही, चेंडू जोरात फेकण्याचा सराव महत्वाचा.
किती दूरवरून धावत यावे लागेल, खांद्यातून किती जोर काढावा लागेल, चेंडूची दिशा बदलण्यासाठी काय कराव लागत ह्याचा सतत सराव केला तरच ती कृती आत्मसात होते. आणि प्रत्यक्षात जेव्हा फलंदाशी सामना होतो तेव्हा त्यावेळच्या परिस्थीतीला हाताळायला, त्या परिस्थीतीला अनुसरून कसे बदल करता येतात ह्यावर त्या सरावाने आलेल्या कौशल्याचा कस लागतो.
सराव न करता डायरेक्ट वर्ल्ड कप मधे जाउन विकेट्स मिळत नाही अस म्ह्णून, ४-५ वर्षांनी फ्रस्ट्रेशन येऊन कृतीला दोष देऊन निवृत्ती घेण्यात काय हाशील आहे?
- (साधक) सोकाजी
29 Oct 2019 - 7:07 am | जॉनविक्क
तरीही पुन्हा सांगतो साधनेची कृती 3-4 ओळीत बसते. "साधना श्वासोच्छ्वासाप्रमाणे सतत करावी लागते". यापेक्षा जास्त याबाबतीत काही बोलण्यासारखे नाही आणि न्हवते.
27 Oct 2019 - 10:54 am | प्रकाश घाटपांडे
मनोविकारतज्ज्ञ राजेंद्र बर्वे यांचा विपश्यानेवर लेख http://bapumraut.blogspot.com/2013/08/blog-post.html
27 Oct 2019 - 2:32 pm | शाम भागवत
लेख छान आहे.
भगवत्गीतेतील आत्मा, इश्वर व पुनर्जन्म वगैरे कल्पना यात नसल्यामुळे अनिसच्या लोकांसाठी उत्तम मार्ग आहे.
:)
27 Oct 2019 - 6:53 pm | जॉनविक्क
फक्त ईश्वरच नाही. बाकी दोन्ही आहे आणी विपश्यना साधना हा भाग वगळता बुद्धिजमचा विचार केला तर हो यात देवताही आहेत.
27 Oct 2019 - 6:04 pm | कंजूस
विपश्यना ही अध्यात्मिक मार्केटिंग असते.
27 Oct 2019 - 7:01 pm | जॉनविक्क
जी बहुतांश अध्यात्मिक मार्केटिंगचे अंतीम सत्याबाबतचे दावे सत्य असल्याचा वास्तव अनुभव प्रत्यक्ष साधकास फक्त 11 दिवसात देण्याची क्षमता राखून आहे बाकी सगळीकडे श्रद्धा विरहित अनुभूतीच्या नावाने बोंबाबोंब आहे, सश्रद्ध अनुभूती हा फक्त भावनेचा परिपाक असतो म्हणून तीची क्षणभांगुरता फक्त कमालीची अज्ञानी व्यक्तीच अमान्य करेल अन्यथा पूजा केल्याचे आंतरिक समाधान वा पोचवून आल्यावर आलेले समशान वैराग्य अर्ध्या तासात उतरले नसते
28 Oct 2019 - 5:53 pm | सोत्रि
म्हणजे काय ते जरा विस्तृतपणे मांडल तर त्यावर उहापोह करता येईल, अन्यथा हे वाक्य फक्त वैयक्तिक मत उरते.
- (समजून घेण्यास उत्सुक) सोकाजी
28 Oct 2019 - 8:33 pm | कंजूस
काही उपचार ( ध्यान, धारणा,पूज,, विधी ) इत्यादी करण्याकडे सामान्य जनांचा कल असतो. त्याचा उपयोग करून संसारी माणसांना आकर्षित करून आपला चरितार्थ चालवणे हे अंतिम ध्येय असतं.
बरेच लोक ज्ञानी असतात पण ज्ञान लोकांकडे नाहीच किंवा अपुरे आहे हे धरूनच मार्ग सांगितला जातो. किंवा लोक चुकीच्या मार्गावर जात आहेत असं धरूनही मार्ग दाखवण्याचे खटाटोप चालतात.
कुणाला उपयोगी गोष्ट सांगितली जाते तेच ज्ञान. बाकीचा कचरा.
पटलं तर घ्या.
29 Oct 2019 - 6:53 am | सोत्रि
ह्यात मार्केटीन्ग कुठेच दिसल नाही. आणि, ध्यान, धारणा,पूज,, विधी हे सर्व एकत्रित म्हणजे अध्यात्म नाही, कर्मकान्ड आहे!
असो!
हे तुमच मत जर विपश्यनेबद्दल असेल तर ते ऐकीव माहितीवर अधारित आहे की स्वानुभवावर? जर स्वानुभव असेल तर I would like to get stand corrected, कृपया हे तुम्हाला कुठल्या केन्द्रावर अनुभवायला आले ते नक्की शेअर करा.
पण जर ऐकीव माहितीवर आधारित असेल तर ते चुकीचे आहे. विपश्यना फक्त देणागीवर चालते आणि विपश्यनेची शिबीर विनामूल्य असतात. शिबीरात सगळी सेवा जुने साधक स्वयम्सेवक म्हणून देतात.
सेंट पर्सेंट! जे उपयोगाचे तेच घेणे हेच ज्ञान!
- (साधक) सोकाजी
29 Oct 2019 - 9:15 am | कंजूस
मार्केटिंग पटवता येणार नाही पण ते असतं हे माझं मत.
27 Oct 2019 - 9:32 pm | चौकटराजा
माझ्या सोसायटीत आताच्या व पूर्वीच्या हे सगळे व्याप म्हंजे ध्यान , विपश्यना , आर्ट ऑफ लिव्हिंग, रेकी , करणारे व तरीही न करणाऱ्या माझया पेक्षा जास्त विकारग्रस्त असलेले मी पाहिलेत. आयुष्य जगणे ही कला आहे . त्यात सुख दु:ख दोनीही जसेच पहाल तसे असते हा मूळ सिद्धांत आहे. अगदी मरणावर सुद्धा " सुंदर मी होणार " ही कविता लिहिणारे लोक आहेत की !
28 Oct 2019 - 5:59 pm | सोत्रि
ध्यान , विपश्यना , आर्ट ऑफ लिव्हिंग, रेकी ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यान्ची सरमिसळ करून गोन्धळ होऊ शकतो. तसच २-३ उदाहरणांवरून जनरलायझेशनही करणेही उचित होणार नाही.
- (मुमुक्षू) सोकाजी