२०२० पर्यंत गाड्यांचे बरेच नॉर्म्स बदलणार आहेत, इलेक्ट्रिक गाड्या येणार आहेत तर आता गाडी घेणे किती सयुक्तिक आहे? रोज फारतर २५ किलोमीटर गाडी फिरू शकते तर पेट्रोल, डीझेल किंवा सीएनजी ह्यापैकी कशावर चालणारी गाडी सयुक्तिक आहे? अर्थात वर्षभरात फारतर एखादे दुसरी ट्रीप महाराष्ट्रात होवू शकते. शिवाय मंदीमुळे खरेच गाड्या कमी किमतीला मिळत आहेत का किंवा त्यांच्या किमती अजून कमी होतील का? नवीन नॉर्म्समुळे जुन्या गाड्या आता घेणे फायद्यात ठरू शकते का? सद्या ओला उबेर हा पर्याय आहेच पण त्यांच्यासाठी वाट पाहणे आणि त्या ऐनवेळेला दर वाढवतात. त्याहीपेक्षा त्या वेळेवर येत नाहीत. त्यामुळे त्या वापरणे अवघड आहे. तसेही गाडी हि शौक म्हणून नाही तर गरज म्हणूनच घायची आहे. पाठीचे दुखणे भयंकर वाढल्याने चार चाकी गाडी घ्यावी असा विचार आहे. खरोखरच चार चाकीने दोन चाकीच्या तुलनेत पाटीचे दुखणे थोडे सुसह्य होवू शकते का? शिवाय पैशाचा विचार करता जुनी कार घ्यावी का नवीन?
प्रतिक्रिया
9 Oct 2019 - 2:33 pm | जालिम लोशन
विकत घेतांना घरुन पिशवी घेवुन याल? का दुकानात कॅरिबॅग मागाल?
9 Oct 2019 - 3:17 pm | जेडी
मी कशी मागायची ते ठरवेन, कॅरी बॅगेतुन का पोत्यात बांधुन ते पण मीच ठरवेन, तुला कशाला चिंता लागलीय बाबा/ बाई? नीट बोल की.....
9 Oct 2019 - 4:13 pm | बाप्पू
तुम्ही जर तुमच्या शारीरिक दुखण्यामुळे कार घेत असाल तर दुचाकी पेक्षा कार ने तुम्हाला प्रवास करताना नक्कीच कमी त्रास होईल.
आता भारत सरकार च्या नव्या मानांकनानुसार कार उपलब्ध आहेत त्यामुळे 2020 ची वाट पाहण्याची आवश्यकता नाही.
मंदीमुळे नवीन गाडी घेताना खूपच स्वस्त मिळेल अशी काही परस्थिती नाहीये. पण थोडा फार डिस्कॉउंट नक्की मिळेल. ते तुमच्या बार्गेनिंग स्किल वर पण अवलंबून आहे.
पण कार घेताना खालील मुद्दे देखील लक्षात घ्या.
1) पार्किंग - कार चे पार्किंग असणे खूप महत्वाचे आहे. पार्किंग नसेल तर कार घेऊ नका. खूप अडचणी येतात नंतर आणि भांडणे पण होतात. ते हाताळायची तयारी असेल तर काही अडचण नाही.
2) रोजचा प्रवास - फक्त 25 किमी रोज आणि वर्षभरात 2च ट्रिप इतका प्रवास असेल तर माझा सल्ला असा आहे कि ओला उबेर च बेस्ट पडेल.
कार घेतल्यानंतर त्याची देखभाल, बिघाड आणि दुरुस्ती, इन्शुरन्स, PUC, टोल आणि इंधन ( पेट्रोल / डिझेल ) हे सर्व तुम्हालाच करावे लागणार आहे. त्यामुळे या सर्वांची किंमत आणि लागणारा वेळ देखील तुम्हाला द्यावा लागेल.
3) लोन कि कॅश -
तुमचा होणारा वापर पाहता तुम्ही जर लोन वर कार घेण्याच्या मूड मध्ये असाल तर या फंदात पडू नका. बाकी तुमची कार घेण्याची "हौस" किंवा " आवड" असेल तर मग ठीक आहे. कारण हौसेला मोल नसते.
बाकी तुम्ही काय निर्णय घेणार किंवा घेतला ते सांगा नंतर....
9 Oct 2019 - 11:26 pm | जेडी
धन्यवाद बाप्पू, गाडीची सर्वकॅश तर माझ्याकडे नाही पण पाटीचे दुखणे सतत डोकं वर काढते. शिवाय, ओलाउबर परवडत नाही. ११ किमी साठी २५० ते ४५० एवढा दर पडतो. शिवाय त्या वेळेवर नसतात. बाकी बाबींचा विचार करुन इथे नक्की सांगेन.
9 Oct 2019 - 11:33 pm | जेडी
पार्किंग स्वत:चे आहे
11 Oct 2019 - 10:59 am | बाप्पू
ओके. पार्किंग असेल तर मग काळजी नाही.
आणि इतरांनी इथे सुचवल्याप्रमाणे, तुम्ही सर्टिफाइड सेकंड हॅन्ड कार देखील घेऊ शकता. पण असा व्यवहार करताना गाडीचा एक जाणकार सोबत न्या, शक्यतो मित्र किंचा नातेवाईक असावा ज्याला गाडीबद्दल माहिती आहे. फक्त तोंड ओळखीच्या मेकॅनिक ला नेऊ नका कारण त्याचे "हितसंबध" असू शकतात.
मेकॅनिक एखादा चांगला मित्र किंवा अगदीच जवळचा असेल तरच त्याचा सल्ला घ्या.
बाकी जर तुम्हाला गाडी चांगली येत असेल तर मी म्हणेल कि शक्यतो नवी घ्या.
तुमचे थोडे जास्त पैसे जातील, पण वारंवार काम काढणे, अचानक बंद पडणे अश्या भीतीपासून सुटका. आणि वारंटी, फ्री सर्विसिंग इ. चा फायदा घेता येईल.. दुर्दैवाने काही बिघाड झाल्यास कंपनीच्या सर्विस सेंटर वाल्यांबरोबर हक्काने भांडता येईल.
तसेच नवी गाडी चालवणे आणि सेकंड हॅन्ड गाडी चालवणे यात जमीन अस्मान चा फरक आहे. टेस्ट ड्राईव्ह घेताना तुम्हाला समजेलच..
पुढचा निर्णय घेण्यासाठी शुभेच्छा. !!!!
9 Oct 2019 - 4:31 pm | जॉनविक्क
दोन तीन वर्षे वापरून ठरवा काय करायचे ते. तूर्त नवीन घेउ नये हे नक्की.
9 Oct 2019 - 5:54 pm | आनन्दा
अर्धसहमत. वापरलेली गाडी घेताना नीट तपासून घ्यावी लागते. नाहीतर ती मेंटेनन्स म्हणून भरपूर चुना लावते.
अवांतर - उबर चा स्टॉक आयपीओच्या बर्याच खाली आहे म्हणे. का ते माहीत नाही. बाकी उबर परवडत नाही असेच माझेही मत आहे. आत्ताच हे लोक ४०-४० रु किलोमीटर रेट लावायला लागले आहेत, जर सगळ्यानीच गाड्या घेणे बंद केले तर भविष्यात किलोमीटरला १००रू दूर नाही.
अन्य प्रश्नांना माझा पास. फक्त - १. बार्गेनिंग स्किल असेल तर मंदी असो वा नसो, घासाघीस करता येतेच. २. गाडी कॅश ने घेतली तर बार्गेनिंग पॉवर जास्त राहते असे ऐंकून आहे.
9 Oct 2019 - 11:29 pm | जेडी
धन्यवाद, जुनी गाडी बंद पडली तर रस्त्यात अशी सारखी भिती वाटते पण ह्यावरपण विचार चालु आहे.
11 Oct 2019 - 7:04 pm | जॉनविक्क
इंजिन कधी दगा देत नाही आणि सहा साडेसहा लाखात दहा एक वर्ष वापरलेली मर्सिडीस मिळुन जाते असे म्हणतात बोवा
11 Oct 2019 - 8:34 pm | सुबोध खरे
सत्य घटना --आमच्या अगदी जवळच्या नातेवाईकाने तो काम करत असलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेंव्हा त्याने स्वतः ४-५ वर्षे वापरलेली मर्सिडीझ एस क्लास त्याला घसारा झालेल्या रकमेला (DEPRECIATED) कंपनीने देऊ केली होती (पंधरा लाख).
माझ्या पत्नीने विचारले मग घेतली का नाही त्यावर त्याने उत्तर दिले कि त्याची देखभाल फार महाग पडते. त्याच्या चालकाने छोटासा अपघात केला तेंव्हा डावीकडचा बाहेरील आरसा फुटला. तो बदलून घेतला त्याची किंमत १ लाख पाच हजार झाली.
माझ्या पत्नीने हसत हसत त्याला सांगितले कि यात थोडे पैसे टाकले असते तर आमची अख्खी कार आली असती. ( तेंव्हा माझ्याकडे ५ वर्षे वापरलेली मारुती ८०० होती. (साल २००६) जिची बाजारात किंमत साधारण एक लाख दहा ते पंधरा हजार आली असती )
11 Oct 2019 - 11:59 pm | जॉनविक्क
निवडणूक आयोगाला म्हणून तो प्रतिसाद दिला होता. असो.
12 Oct 2019 - 9:49 am | सुबोध खरे
चार पाच वर्षे जुनी मर्सिडीझ परवडेल अशाच किमतीत मिळते. परंतु हा पांढरा हत्ती पोसायला अवघड असतो
https://www.carwale.com/used/mercedesbenz-bclass-cars-in-mumbai/#city=30...
https://www.carwale.com/used/mercedesbenz-bclass-cars-in-mumbai/#city=30...
https://www.carwale.com/used/mercedesbenz-bclass-cars-in-mumbai/#car=11....
12 Oct 2019 - 11:48 am | जॉनविक्क
ही बाबच सरकाजम म्हणून लिहली होती, मुळात पहिलीच गाडी मर्सिडीज घ्यायला लावणे हा त्याहून मोठा सरकाजम न्हवे काय ? :)
12 Oct 2019 - 1:23 pm | सुबोध खरे
आपले म्हणणे बरोबर आहे
पण माझ्या मित्राने पहिली गाडी म्हणून २० वर्षे जुनी मर्सिडीझ घेतली होती. एक वर्ष वापरली आणि फुकून टाकली. बाहेरून दिसायला ती चकाचक होतीच परंतु २० वर्षांनी सुद्धा त्या गाडीचे इंजिन अतिशय उत्तम स्थितीत होते.पण त्याचे सुटे भाग मिळवणे फार जिकिरीचेआणि फार महाग होते.
14 Oct 2019 - 8:38 pm | कानडाऊ योगेशु
माझा एक उच्चशिक्षित मित्र (कलिग) नेहेमी ब्रँडेड सेकंड हँड कारच घेत असतो. त्याच्यामते सेकंड हँड कारचा डिप्रेशिएशन रेट फार कमी असतो. पण अशी कार तो जवळपास वर्षाने विकत असे व पुन्हा दुसरी सेकंड हँड कार. त्याने मर्सिडिस खरेदी करतानाचा किस्सा सांगितला. सेकंड हँड मर्सिडिस होती पण मालकाने एकच अट घातली. टेस्ट ड्राईव न घेता विकत घ्यायची. कार अक्षरशः थ्रो अवे प्राईस मध्ये मिळत होती. व बाहेरुन चकाचक होती. पण मित्राने ऑफर नाकारली.
9 Oct 2019 - 6:15 pm | प्रकाश घाटपांडे
इलेक्ट्रीक गाडी केव्हा येणार आहेत? व्यवहारात रुळायला पण वेळ लागेल.मग फायदे तोटे कळतील
11 Oct 2019 - 11:05 am | बाप्पू
इलेक्ट्रिक गाड्यांची आत्ताशी सुरवात झाली आहे. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जसे कि चार्जिंग स्टेशनं, सर्विस सेंटर इ. होने देखील अपेक्षित आहे. जनमानसात इलेक्ट्रिक कार बद्दल माहिती आणि जनजागृती होण्यास आत्ताशी सुरवात झाली आहे. या गाड्या लोकप्रिय होण्यासाठी, माझ्यामते अजुन कमीत कमी 7-8 वर्षे जातील.
त्यामुळे तूर्तास पेट्रोल आणि डिझेल गाड्यांशिवाय पर्याय नाही हे नक्की.
10 Oct 2019 - 12:27 am | दादा कोंडके
गाडीची किंमत शोरूमच्या बाहेर काढल्यावर लगेच खूप डिप्रीशिएट होते. पाहिल्यांदा चारचाकी घेणार असाल तर जुनीच घ्या. चांगल्या डिलरकडून घ्या म्हणजे त्यांची स्वतःची चेकलिस्ट असते. त्यांचं कमिशन जास्त असतं तरीसुद्धा तुमचा फायदाच होईल. जुनी गाडी आहे म्हणजे बंद पडते असं नाही. तुमच्या बजेटप्रमाणे किती वर्षे जुनी, किती किलोमिटर रन वगैरे ठरवा. मारूती सुझुकी आणि ह्युंदाईला सर्वात जास्त रिसेल वॅल्यु आहे. तुम्हाला आय २० किंवा स्विफ्ट वगैरे मॉडेल चांगलं पडेल.
10 Oct 2019 - 2:14 am | अमेरिकन त्रिशंकू
आपल्याकडे सर्टिफाईड प्री-ओन्ड वगैरे प्रकार आलेले नाहीयेत का अजून?
10 Oct 2019 - 6:20 am | जेम्स वांड
हे बघा इथं
१. फोर्ड अशुअर्ड
२. मारुती ट्रु व्हॅल्यू
३. महिंद्रा फर्स्ट चॉईस (मल्टी ब्रँड युज कार्स)
४. ह्युंदाई युज कार्स
ह्याशिवाय ओबीव्ही, कार देखो ट्रस्ट सर्टिफिकेट सर्टिफाईड कार्स वगैरे अगणित प्रकार आहेत.
10 Oct 2019 - 9:59 am | सुबोध खरे
मारुती ट्रू व्हॅल्यू मधून एखादी चांगली वापरलेली मारुतीचीच गाडी घ्या.
त्यांचे स्वतःचे ३७६ वेगवेगळे तपासायचे निकष असतात. त्यात बसेल अशीच (अपघात न झालेली गाडी) घ्या. (ते अपघात झालेली गाडी सहसा घेतच नाहीत.)
त्यांच्याकडे गाड्यांची एक वर्षाची पूर्ण गॅरंटी असते शिवाय तीन फुकट सेवा ते पुरवतात. या गाड्या स्वतः विकत घेण्यापेक्षा साधारण ५-१० % महाग पडतात परंतु निदान २-३ वर्षे नक्कीच विना कटकट गाडी वापरता येते.
https://www.marutisuzukitruevalue.com/certificationDetail
10 Oct 2019 - 5:59 pm | चौथा कोनाडा
मारूती ट्रू व्हॅल्यू + १
सहमत !
मारूती ट्रू व्हॅल्यू खुप विश्वासार्ह आहे.
माझ्या दोन नातेवाईकांनी इथुन घेतल्या अन ते खुष आहेत.
11 Oct 2019 - 6:48 am | जेम्स वांड
ट्रु व्हॅल्यूचा कारभार बऱ्यापैकी व्यवस्थित असतो.
15 Oct 2019 - 11:30 am | चौकस२१२
खालील प्रकारचा wyahar आपल्या शहरात मिळत असेल तर पैसेही वाचू शकतात आणि नवीन गाडीचं आनंद हि मिळू शकतो
ते म्हणजे शो रूम मधील "डेमो" डिस्प्ले गाड्या मिळतात का? अर्थात या "डील" मध्ये हे सर्वात महत्वाचे १) संपूर्ण वॉरंटी शाबूत राहते का? २) किती किमी झाले आहेत ?