नमस्कार मंडळी,
खर तर आपले क्लिंटन भाऊ राजकीय धाग्याचे काम नेहमी करायचे पण हल्ली ते अज्ञातवासात गेल्यामुळे म्हंटल आपण बघावा काढून असा एखादा धागा.
तर परवा निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर केली, त्याप्रमाणे दिनांक २१ ऑक्टोबर रोजी निवडणुका आणि दिनांक २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.
सध्या भाजपची सगळीकडे घौडदौड चालू आहे त्यामुळे भाजपच्या विजयाच्या अपेक्षेपेक्षा तो किती मोठ्ठा विजय मिळवतो हे पाहणे रंजक ठरेल.
अगदी कालपर्यंत राज्यात भाजप-शिवसेना युती होणार का ? हे विचारले जात होते. स्वतः अमित शहा आणि पप्र. मोदी यांना युती खरतर नकोच होती पण काल बातमी येऊन धडकली कि अखेर युतीचे घोडे गंगेत न्हाले एकदाचे.
या सगळ्यात सुमडीत राहून उद्धवरावांनी युती तर राखलीच शिवाय १२४ च्या आसपास जागा राखून भाजपची एकहाती सत्ता येणार नाही याची खबरदारी घेतलीये.
आता चमत्कार झाला तरच भाजप ९०% /१००% स्ट्राईक राखून जिंकेल जे अशक्य वाटत आहे. १६४-(वजा)२० मित्रपक्ष = १४४ जागा भाजप बहुदा लढवेल. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी शिवसेनेची मदत लागणार हे नक्की.
माझा असा अंदाज आहे कि फडणवीसांची युतीची हि खेळी त्यांचे स्थान भक्कम करण्यासोबतच पक्षांतर्गत विरोधकांवर सुद्धा अंकुश ठेवणारी वाटत आहे, कारण भाजपची एकहाती सत्ता येऊ शकते हे माहित असूनही फडणवीस साहेब युतीसाठी इतका का आटापिटा करत होते ? कारण एकहाती सत्ता आली तर मुख्यमंत्री पदासाठी बरेच दावेदार उभे राहतील आणि मग कदाचित आपल्या हातून हे पद निसटू शकते अशी भीती फडणवीस साहेबांना वाटली असावी.
पण आता युती झाल्यावर सत्ता आली आणि शिवसेनेवर अंकुश ठेवायचा झाला तर फ़क़्त फडणवीसच सध्यातरी ठेऊ शकतात त्यामुळे हा युतीचा हुकुमी डाव फडणवीस खेळले असावे.
दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील मैत्री, विश्वास ज्यामुळे दोघे एकमेकांना गेली ५ वर्ष सांभाळून घेत आहे.त्यामुळे या सर्व गोष्टी विचारात घेऊन फडणविसांनी सध्यातरी युतीला प्राधान्य दिलेले वाटत आहे.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी बद्दल नंतर प्रतिसादात लिहील कारण त्यांचे सगळे लांबून तरी विस्कळीत दिसत आहे.
असो हे सगळे अंदाज प्रार्थमिक स्वरूपातील आहे दिवस जातील त्याप्रमाणे यात कदाचित आदल होतील, बाकी तुमची मते सुद्धा जाणून घ्यायला नक्कीच आवडतील मंडळी.
----------------------------------------
आकडेवारीचा प्रचंड कंटाळा आहे त्यामुळे कोणी आकडेवारी टाकली तर लयी बर होईल.
प्रतिक्रिया
5 Oct 2019 - 1:36 pm | Rajesh188
कुत्र्याचे शेपूट सरळ होत नाही असे मानवी स्वभाव विषयी बोलले जाते
.
स्वभाव आणि विचार सहसा माणसाचे बदलत नाहीत .
पण ह्या नेत्यांचे विचार दर 5 वर्षांनी बदलत असतात .
त्यामुळे त्या पक्षाचे विचार पटले म्हणून मी पक्ष सोडून त्या पक्षात जात आहे असे सांगून पक्षांतर करतात .
5 Oct 2019 - 7:02 pm | कंजूस
युती विरोधात सर्वांनी एकालाच पाठिंबा द्यायचा घाटत आहे. चंद्रकांत पाटिलांविरोधात मनसेचे शिंदे.
वरळीतही ठाकरेविरोधात बिचुकलेंना पाठिंबा मिळेल?
7 Oct 2019 - 12:46 am | एकुलता एक डॉन
7 Oct 2019 - 12:46 am | एकुलता एक डॉन
भाजप ची पहीली यादी
हर्षवर्धन पाटील - काँग्रेस
राधाकृष्ण विखे पाटील - काँग्रेस
कालिदास कोळंबकर - काँग्रेस
प्रशांत ठाकूर - काँग्रेस
रवीशेठ पाटील - काँग्रेस
मदन भोसले - काँग्रेस
जयकुमार गोरे - काँग्रेस
विजयकुमार गावित - राष्ट्रवादी
संदीप नाईक - राष्ट्रवादी
वैभव पिचड - राष्ट्रवादी
बबनराव पाचपुते - राष्ट्रवादी
राणा जगजितसिंह पाटील - राष्ट्रवादी
शिवेंद्रसिंह भोसले - राष्ट्रवादी
रडतय कोन नाथाभाउ, तावडे
7 Oct 2019 - 10:13 pm | रविकिरण फडके
"यामुळे माझ्यासारख्या अनेक लोकांना या निवडणुकीत फारसा रस राहिलेला नाही" (डॉ. खरे)
त्या अनेक लोकांत मीही एक. माझ्या मताने किंवा मताशिवाय; युती निवडून येणारच आहे. तर ती माझ्या मताशिवायच येऊ दे. Irrelevant च जर राहायचं आहे तर त्यासाठी कष्ट का घ्या? पण ते महत्वाचे नाही.
जर युती निवडून येणार होतीच तर हे सगळे उपद्व्याप कशासाठी, तर नुसते बहुमत नाही, जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी, ते का, तर आमचे एक मित्र म्हणतात, राज्यसभेत निर्विवाद बहुमत व्हावे, म्हणून.
तसे असेल तर एकच निष्कर्ष निघतो - BJP चा कुठल्यातरी मोट्ठ्या घटनादुरुस्तीचा बेत आहे.
मिपावरील जाणकारांना काय वाटते? उदा. अध्यक्षीय राज्यपद्धत?
8 Oct 2019 - 1:56 pm | उपेक्षित
मिपावरील जाणकारांना काय वाटते? उदा. अध्यक्षीय राज्यपद्धत? >>>>>>>>>>>>>> >>>>>>>>>>>>>>>>मी जाणकार नाही पण कदाचित समान नागरी कायदा (ज्याची गरज आहे) लागू होईल. आणि मला नाही वाटत कि राज्यसभेत अजून बहुमत लागेलच कारण आत्ता आहे त्या बहुमतात (राज्यसभेचे बोलत आहे) ३७० रद्द झालेच कि.
अध्यक्षीय राज्यपद्धत आपल्या ईथे चालेल असे नाही वाटत पण मोदी-शहा जोडगोळीचा काय बी नेम नाही बघा. :)
11 Oct 2019 - 6:43 am | जेम्स वांड
लागू झाला तर भारताचा फार काही कायापालट होईल एका रात्रीत असे वाटत नाही. ह्या कायद्याबद्दल बुद्धिभेदच भरपूर पसरला आहे अन राजकीय पक्षांनी हा मुद्दा वाटेल तसे ध्रुवीकरण करायला वापरून घेतलाय. मला वाटतं समान नागरी कायदा आणि नागरिक कायदा ह्यातला फरक लक्षात घेतला तरी चालेल.
11 Oct 2019 - 10:27 am | सुबोध खरे
समान नागरी कायदा हे घटनेतील मार्गदर्शक तत्व आहे. "The State shall endeavour to secure for citizens a uniform civil code throughout the territory of India."घटनेचे कलम ४४
परंतु मुस्लिम लांगूलचालनाच्या धोरणापायी काँग्रेसने ७० वर्षे त्यासाठी कोणताही प्रयत्न केला नव्हता.
यात सामान्य माणसाला फार फरक पडेल असे नाही परंतु मुसलमान लोकांना झुकते माप दिले गेल्याची एक भावना लोकांच्या मनात खदखदते आहे त्याचे परिमार्जन होईल हे नक्की.
खरं तर एकपत्नीत्वाचा कायदा हा मुसलमान स्त्रियांना समान हक्क देणारा असेल. आणि त्याच बरोबर मुसलमान वारसाहक्कात मुलीला मुलाच्या अर्धाच हिस्सा मिळतो तो समान होईल. सध्याचे मुसलमान वैयक्तिक कायदे हे सरळ सरळ पुरुषांच्या सोयीचे आणि स्त्रियांना समान हक्क नाकारणारे आहेत आणि यामुळेच ते मुसलमान पुरुषांना आणि मुल्ला मौलवी आणि राजकारण्यांना बदलायचे नाहीत.
मुस्लिम मुलींचे वयात आल्यावर लग्न करणे धर्माला मान्य आहे पण समान नागरी कायदा आला कि १८ वर्षाच्या अगोदर मुलींचे लग्न करणे हे बेकायदेशीर ठरेल. सध्या त्याबद्दल न्यायालयांत गोंधळाची स्थिती आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/sc-to-study-if-under-18-muslim...
यानंतर शिक्षण सार्वत्रिक आणि सक्तिचे करणे सोपे जाईल.
परंतु आपले राष्ट्र हे सर्वधर्मियांना समान वागवते हा संदेश सर्वत्र (देशांतर्गत आणि देशाबाहेर) जाईल.
सामान्य माणसाला सकृतदर्शनी अशा कोणत्याही गोष्टीचा फायदा दिसत नाही. ( आपल्याकडे स्वस्त ते मस्त आणि फुकट ते पौष्टिक या मनोवृत्तीमुळे लांबवरचा विचार करण्याची बहुतांश माणसांना गरज भासत नाही). पण जिओने मिनिटाला सहा पैसे असा दुसऱ्या कंपनीला फोन केल्यावर पैसे लावणार असे सांगितले हि गोष्ट वाऱ्या सारखी पसरली.
त्यामुळे माणसे सामान नागरी कायदा सारख्या गोष्टी बाबतीत उदासीन असतात.
मला काय फायदा? असा विचार करणारे लोक लांबवरचा विचार करू शकत नाहीत.
(कोऊ राजा होऊ हमें का हानी?) हा विचार १८५६ सालच्या एका पुस्तकात लिहिलेला होता.
11 Oct 2019 - 11:46 am | गणेशा
समान नागरी कायदा करणार , ही अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात निवडनुक अजेंडा पैकी एक होता, आणि तो नाही झाला.
भाजपचा एकतर्फी समर्थक नसलो तरी त्या वेळेस मी वाजपेयी यां सारख्या योग्य माणासासाठी बिजेपी ला मतदान ही केले होते..
आजकाल , या पक्षातुन त्या पक्षात उडी मारणारे पाहुन . आणि पार्टी विथ डिफरन्स चा डंका वाजवताना, ज्यांना ५० -७० वर्षे काय केले हे विचारताना त्यांनाच आपल्या स्टेज वर, पक्षामध्ये आणले , मग काय बोलायचे ? परवा संगमणेर ला ठाकरे म्हणाले ५० वर्षे कॉन्ग्रेस ने लुटले, आणि माझी विरोधी पक्षनेते स्टेज वर होते .. आता काय बोलायचे ?
बाकी समान नागरी कायदा आणि जातमुक्त भारत झाल्यास माझे मत मी पुन्हा भाजप कडे नक्की वळवेल ..
पण , अजुनही कोथरुड मध्ये झालेल्या गोष्टी पाहुन , आपण जातमुक्त नक्की होतोय का हा प्रश्न वाटत आहेच ..
11 Oct 2019 - 1:48 pm | सुबोध खरे
सामान नागरिक कायदा हा भाजपच्या जाहीरनाम्यात फार पूर्वी पासून आहेच. त्यात तीन तलाक आणि ३७० कलम हि होते. सगळ्याच गोष्टी एकाच वेळेस करणे शक्य नाही. त्यामुळे ज्या गोष्टी प्राधान्याने करायच्या आहेत त्या केल्या जातील असा मला विश्वास वाटतो.
परंतु ज्या तर्हेने काँग्रेस राष्ट्रवादीचे डागाळलेले नेते स्वच्छ होण्यासाठी भाजप मध्ये येत आहेत ते पाहून श्री मोदींनी दाखवलेल्या आशा आकांक्षांवर राज्यातील भाजप किती खरा ठरणार याबाबत मात्र मला शंका निर्माण झाली आहे.
शिवसेनेबाबतची भाजपची स्थिती असून अडचण आणि नसून खोळंबा अशीच आहे. शिवसेनेच्या विरोधात लढले(युती न करता) तरी भाजपाला बहुमत मिळेल परंतु निसटते बहुमत घेउन इतर पक्षांशी हात मिळवणी करण्यापेक्षा शिवसेना बरी अशी स्थिती आहे. कदाचित शिवसेनेला हाताळण्यात श्री फडणवीस गेली पाच वर्षे तरी यशस्वी झाले असे वाटल्यामुळे युतीला अजून पाच वर्षे द्यायला हरकत नाही असा श्रेष्ठींचा विचार असावा.
11 Oct 2019 - 3:43 pm | गणेशा
बाकी तुमचे मुद्दे बरोबर आहेत,
पण कॉन्ग्रेस राष्ट्रवादील नेते न घेता पण भाजप शिवसेना युती राज्यात यावेळेस निवडुन आलीच असती, त्यामुळे पार्टी विथ डिफरंस हे बिरुद त्यांना मिरवता पण आले असते..
आता सगळे एका माळेचे मणी असेच वाटत आहे..
आणि विरोधक, शरद पवार यांवर बोलण्या पेक्षा ५ वर्षात आम्ही हे केले यावर भाजपा शिवसेनेने मते मागितले पाहिजे...
(भले काही झाले तरी तेच येणार आहे असे वाटते आहे )
19 Oct 2019 - 8:23 am | भंकस बाबा
समान नागरी कायदा ही गोष्ट परिकथेसारखी वाटते.
कोणताही कायदा येऊ द्या , त्याला आपला शांतिप्रिय समाज फाट्यावर मारतो. अगदी तीन तलाक देखिल! अतिशय कमी तक्रारी या कायद्याच्या चौकटित येत आहेत. एकतर तक्रार करणाऱ्या बंडखोराला वाळीत टाकले जाते वा त्याला धमक्या दिल्या जातात. समान नागरी कायदा हा विशिष्ट समाजाला समोर ठेऊन बनवण्यात येणार आहे हे आपल्याकडील बुद्धिवंतानी व डाव्यानी अगदी पद्धतशीरपणे शांतिप्रिय समाजाच्या मनावर ठसवले आहे. त्यामुळे कायदा आला तर सगळे आलबेल होईल या भ्रमात सत्ताधार्यानी वा बहुजनसमाजाने राहु नए.
(ता. क. इथे बुद्धिवंत म्हणजे जे कमोडवर बसून भारतीय पद्धतिच्या शौचालयाचे फायदे सांगतात ते असा अर्थ घ्यावा)
8 Oct 2019 - 3:54 pm | बोलघेवडा
राजकारण म्हणून अमुक नेत्याला किंवा ढमुक पक्षाला फायदा होईल. पण सर्वसामान्य माणूस विशेषकरून प्रामाणिक कर भरणारा, खुल्या गटातील व्यक्तीस काही फायदा होईल हि आशा मला तरी राहिली नाहीये.
16 Oct 2019 - 6:50 am | रविकिरण फडके
समान नागरी कायदा झाला तर हिन्दू अविभक्त कुटुम्ब कायदाही जाईल ना? मग ह्या कायद्याच्या आधारे आयकर चुकविणाऱ्या लोकांचे काय होईल? त्यामुळे, हा कायदा सर्वच हिंदू लोकांना हवा आहे असे नसावे.
16 Oct 2019 - 12:49 pm | उपेक्षित
फडके साहेब, शक्यतो इथे फ़क़्त विधानसभा निवडणुकी संदर्भात प्रतिसाद केले तर उत्तम. आपण समजून घ्याल हि आशा करतो.
बाकी नित्याच्या घडामोडींसाठी इथे भेट द्या http://www.misalpav.com/node/45420#comment-1050187
16 Oct 2019 - 9:32 am | सुबोध खरे
https://www.business-standard.com/article/economy-policy/law-commission-...
https://www.jagranjosh.com/general-knowledge/why-uniform-civil-code-is-n...
18 Oct 2019 - 8:45 pm | Rajesh188
आता पर्यंत केंद्र आणि राज्य सरकार निवडण्यासाठी किती तरी निवडणूक झाल्या .
सरकार बदली गेली .
आणि आपण सर्व त्याचे साक्षीदार पण आहोत .
पण प्रामाणिक पने कोणाला असे वाटत आहे की .
प्रशासन च्या दर्जामध्ये सुधारणा झालीय .
उलट दर्जा घसरत च चालला आहे .
सरकार बदल झाल्याचा काही परिणाम लोकांना अनुभव ला मिळाला आहे तर त्याचे उत्तर सुधा नाहीच आहे .
सरकार बदलून ,काही ही फरक पडत नाही .
आता लोक बदल्याण्याची गरज आहे .
उत्तम चरित्र आणि प्रामाणिक लोकांना निवडून दिले तरच भारतात काही तरी बदल होईल .
फक्त निवडणुकीचा खेळ खेळून काही ही होणार नाही.
18 Oct 2019 - 8:45 pm | Rajesh188
आता पर्यंत केंद्र आणि राज्य सरकार निवडण्यासाठी किती तरी निवडणूक झाल्या .
सरकार बदली गेली .
आणि आपण सर्व त्याचे साक्षीदार पण आहोत .
पण प्रामाणिक पने कोणाला असे वाटत आहे की .
प्रशासन च्या दर्जामध्ये सुधारणा झालीय .
उलट दर्जा घसरत च चालला आहे .
सरकार बदल झाल्याचा काही परिणाम लोकांना अनुभव ला मिळाला आहे तर त्याचे उत्तर सुधा नाहीच आहे .
सरकार बदलून ,काही ही फरक पडत नाही .
आता लोक बदल्याण्याची गरज आहे .
उत्तम चरित्र आणि प्रामाणिक लोकांना निवडून दिले तरच भारतात काही तरी बदल होईल .
फक्त निवडणुकीचा खेळ खेळून काही ही होणार नाही.
18 Oct 2019 - 8:46 pm | Rajesh188
आता पर्यंत केंद्र आणि राज्य सरकार निवडण्यासाठी किती तरी निवडणूक झाल्या .
सरकार बदली गेली .
आणि आपण सर्व त्याचे साक्षीदार पण आहोत .
पण प्रामाणिक पने कोणाला असे वाटत आहे की .
प्रशासन च्या दर्जामध्ये सुधारणा झालीय .
उलट दर्जा घसरत च चालला आहे .
सरकार बदल झाल्याचा काही परिणाम लोकांना अनुभव ला मिळाला आहे तर त्याचे उत्तर सुधा नाहीच आहे .
सरकार बदलून ,काही ही फरक पडत नाही .
आता लोक बदल्याण्याची गरज आहे .
उत्तम चरित्र आणि प्रामाणिक लोकांना निवडून दिले तरच भारतात काही तरी बदल होईल .
फक्त निवडणुकीचा खेळ खेळून काही ही होणार नाही.
19 Oct 2019 - 2:31 pm | उपेक्षित
मंडळी २१ ऑक्टोबरला सर्वांनी आवर्जून मतदान कराव हि विनंती.
19 Oct 2019 - 7:44 pm | धर्मराजमुटके
अहो विनंती कसली करता, आपला हक्कच आहे तो. तो बजावलाच पाहिजे.
19 Oct 2019 - 3:28 pm | माहितगार
मंडळी माझे महाराष्ट्रातील बातम्यांवर आजीबात लक्ष नाही, पण माझे आंतरजालीय शोध विश्लेषण गेल्या दोन दिवसात शरद पवारांची आंतरजालीय शोधप्रीयता अत्यंत लक्षणीय वाढल्याचे सुचवते आहे. शिवसेना भाजपाच्या सोबत असणे ऊपयूक्त ठरेल असे वाटते आहे.
शोधप्रीयता लोकप्रीयतेचे निदर्शक निघालीतर : राज ठाकरे या वेळी कुणा सोबत आहेत का ? खासकरून त्यांची आणि राष्ट्रवादी एक झाले तर भाजपा+ शिवसेनेला तगडी स्पर्धा मिळू शकण्यची शक्यता असू शकेल (पण वेगेळे असतील तर भाजपा शिवसेनेचा फायदा होईल?)
19 Oct 2019 - 7:37 pm | उपेक्षित
राष्ट्रवादीमुळे शिवसेनेला थोडा फटका बसेल असे वाटत आहे कारण बहुतेक ठिकाणी शिवसेनेसमोर राष्ट्रवादीचे उमेदवार आहे,
बाकी या वयात आजारपण सांभाळून धडाडीने प्रचार करणाऱ्या शरद पवारांना सलाम (बाकी कसा का असेना माणूस) या बाबतीत मानले त्यांना.
अंदाज बांधुयात का ?
भाजप + मित्रपक्ष - १२० ते १३० जागा
शिवसेना - ६० ते ७० जागा
राष्ट्रवादी - ४० ते ४५ जागा
कॉंग्रेस - ३० ते ३५ जागा
इतर - ८ ते १० जागा
असे चित्र वाटत आहे सध्यातरी 24 ला बघू काय ते :)
21 Oct 2019 - 1:13 pm | प्रसाद_१९८२
बाकी या वयात आजारपण सांभाळून धडाडीने प्रचार करणाऱ्या शरद पवारांना सलाम (बाकी कसा का असेना माणूस) या बाबतीत मानले त्यांना.
--
अगदी !
मागे ईडीची नोटीस आल्याबरोबर पवार ८० वर्ष्याचे म्हातारे झाले होते व आता सत्तेच्या लालसेपोटी ८० वर्ष्याचे तरुण.
आहे की नाही गम्मत !
22 Oct 2019 - 7:26 pm | उपेक्षित
मी तरी प्रत्येक गोष्ट राजकारण म्हणून बघत नाही बाबा तुमचे माहित नाही, असो आपले आपले views ;)
21 Oct 2019 - 6:42 pm | शाम भागवत
यायला लागले एक्झीट पोल.
भाजप+ वाले सरकार बनवणार.
चला.
आता ५ वर्षे आपली नेहमीची कामे सुरू करायला हरकत नाही.
:)
21 Oct 2019 - 8:54 pm | जालिम लोशन
ह्या वेळी तुम्ही अंदाज नाही दिलेत?
21 Oct 2019 - 9:03 pm | शाम भागवत
फारच एकतर्फी निवडणूक होती हो.
कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे मतदार घराबाहेर पडले की नाही एवढीच उत्सकता राहीली आहे. तेवढ्यासाठी विजेता किती फरकाने जिंकला ते तपासायचे आहे.
21 Oct 2019 - 9:48 pm | ढब्ब्या
भाजपा स्वबळावर सत्ता आणी आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते :)
21 Oct 2019 - 9:17 pm | Rajesh188
भारतीय उपखंडात शाप आहे इथे जगातील सर्वात
जास्त मूर्ख लोक जन्म
घेतली
23 Oct 2019 - 12:09 pm | सुबोध खरे
सर्वात जास्त लोकसंख्या आहे म्हटल्यावर सांख्यिकीने सर्वत जास्त मूर्ख सर्वात जास्त वेडे, सर्वात जास्त भ्रष्ट लोक इथेच जन्म घेणार
तसेच सर्वात जास्त हुशार, सर्वात जास्त समाजसेवक, सर्वात जास्त चांगली माणसे सुद्धा येथेच जन्माला येणार.
24 Oct 2019 - 1:48 pm | उपेक्षित
अत्तापर्यंत आलेल्या कलानुसार BJP+शिवसेना सरकार येणार हे तर नक्की झालय पण जितक्या जागांची अपेक्षा होती त्याच्या जवळपासही फिरकू शकले नाहीये (खासकरून BJP)
धाग्याच्या सुरवातीला म्हंटल्याप्रमाणे मधल्यामध्ये शिवसेना फायदा आणि राष्ट्रवादी भाव खाऊन जात आहे.
युती करून आणि दोन्ही कॉंग्रेसच्या भ्रष्ट लोकांना दार उघडे करून देऊन BJP ने आपल्या पायावर धोंडा मारलाय असे आत्तापर्यंतच्या कलांवरून जाणवत आहे.
बाकी कोथरूड मतदार संघात टफ फाईट चालू आहे, जे एकतर्फी वातावरण आहे म्हणत होते ते तसे नव्हते.
सातार्यातून उदयन भोसले जवळजवळ ३० हजारांनी मागे आहेत (लोकसभेसाठी)
24 Oct 2019 - 3:44 pm | शाम भागवत
पाटलांना ५२% मते मिळाली.
24 Oct 2019 - 5:26 pm | उपेक्षित
१ लाख ६० हजार मताधिक्यच्या बाता पाटलांनी मारल्या होत्या शेवटी २० हजारावर आले ते पण शेवटच्या फेर्यांमध्ये बाजी मारली BJP ने (पारंपारिक मतदारांमुळे) असो मी तरी याला टफ फाईट म्हणेल.
24 Oct 2019 - 6:11 pm | शाम भागवत
ओके.
24 Oct 2019 - 11:17 pm | थॉर माणूस
इलेक्शन कमिशनच्या साईटवर राजे ८७७१७ मतांनी पडले असे दाखवत आहेत. सातारा विधानसभा मतदारसंघातली आघाडी आणि कोरेगाव मतदारसंघातली निसटती आघाडी सोडली तर बाकी सगळीकडे राजे पिछाडीवर दिसत आहेत. बरं श्रीनिवास पाटील २००९ पासून कधीही लोकसभेला लढले नाहीत, सातारा मतदारसंघातून एकदाही लढलेले नाहीत. असे असताना ८५०००+ चे मताधिक्य कौतुकास्पदच आहे. मला तरी हे मताधिक्य पाटील यांच्या बाजूने कमी आणि राजेंच्या विरोधात जास्त आहे असे वाटते.
24 Oct 2019 - 3:30 pm | प्रसाद_१९८२
"अबकी बार, २५० पार" म्हणणारा भाजपा आज चांगलाच तोंडावर आपटला आहे. सत्तेचा माज व मतदारांना गृहित धरण्यांची वृत्ती, यामुळेच आज १२२ जागां वरुन फक्त ९९ जागांवर येऊन आपटलाय भाजपा आज.
24 Oct 2019 - 3:57 pm | गणेशा
सत्ता जरी भाजपा शिवसेनेची येत असली तरी , एक प्रकारे जनतेने त्यांना संदेश दिलेला आहे की,
जर तुम्हाला विकासावर, लोकल मुद्द्यांच्या प्रगतिवर राजकारण करायचे नसेल, आणि फक्त अहंकारातुन वागायचे असल्यास आम्ही नविन पर्यायाचा विचार करु..
त्यामुळे , विरोधी पक्षातुन आणि खास करुन राष्ट्रवादीला उभी भेग पाडण्यात यसस्वी झालेला भाजपाला समोर कोणी विरोधक शिल्लकच नाहीत, या अंहकारातुन या निर्णयांनी नक्कीच जागे केले असणार.
पक्षांना जावुद्या, पण लोकांना गृहीत धरु नये.. आणि कामावरुन आणि विकासावरुन पुढच्यावेळेस समोर यावे.
सरकार साठी शुभेच्छा !
24 Oct 2019 - 6:33 pm | माहितगार
केवळ मला माहित नाही म्हणून विचारतो आहे.
१) २०१४ च्या निकालांच्या तुलनेत पक्षवार -भाजपा, शिवसेना, काँ, रा.कॉं, मनसे, मतदान टक्केवारीत नेमके कोणकोणते फरक पडले ?
२) काँ, रा.कॉं, सोडून भाजपा शिवसेनात गेलेले किती जण विजयी झाले ?
३) भाजपा शिवसेनातून बंडखोरी केलेले नेमके किती जण निवडून आले?
४) भाजपा शिवसेना युतीचा औरंगाबादेत काही फायदा झाला का ?
24 Oct 2019 - 6:45 pm | हस्तर
आपला पक्ष सोडून शिवसेनेत दाखल झालेले आयाराम पराभूत
राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या दिलीप सोपल यांचा पराभव झाला आहे. अपक्ष लढणाऱ्या राजेंद्र राऊत यांनी सोपल यांचा पराभव केला आहे.
राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला आहे.
काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या भाऊसाहेब कांबळे यांचा श्रीरामपूर मतदारसंघात पराभव झाला आहे.
राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या रश्मी बागल यांचा करमाळा मतदारसंघात पराभव झाला आहे.
राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या शेखर गोरे यांचा माण-खटाव मतदारसंघातून पराभव झाला आहे.
शिवसेनेत आलेल्या विजय पाटील यांचा वसई मतदारसंघात पराभव झाला आहे.
माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. परंतु त्यांचा पराभव झाला आहे.
शिवसेनेत आलेल्या संजय कोकाटे यांचा माढा मतदारसंघात पराभव झाला आहे.
काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या दिलीप माने यांचा सोलापूर मध्य मतदारसंघात पराभव झाला आहे.
शिवसेनेत आलेल्या नागनाथ क्षीरसागर यांचा मोहोळ मतदारसंघात पराभव झाला आहे.
काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या निर्मला गावित यांचा इगतपुरी मतदारसंघात पराभव झाला आहे.
आपला पक्ष सोडून भाजपत दाखल झालेले आयाराम पराभूत
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा इंदापूर मतदारसंघात पराभव झाला आहे.
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या वैभव पिचड यांचा अकोले मतदारसंघात पराभव झाला आहे.
वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये आलेल्या गोपिचंद पडळकर यांचा बारामती मतदारसंघात पराभव झाला आहे.
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या गोपालदास अग्रवाल यांचा गोंदिया मतदारसंघात पराभव झाला आहे.
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या धैर्यशील कदम यांचा कराड उत्तर मतदारसंघातून पराभव झाला आहे.
भाजपमध्ये आलेल्या रमेश आडसकर यांचा माजलगावमधून पराभव झाला आहे.
भाजपच्या भरत गावित यांचा नवापूर मतदारसंघातून पराभव झाला आहे.
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या उदयनराजे भोसले यांच्या पराभव झाला आहे.
https://www.majhapaper.com/2019/10/24/the-defiant-candidates-rejected-th...
24 Oct 2019 - 7:37 pm | गणेशा
बरोबर,
पण १५-२० असे निवडुन आले असे पण न्युज ला बोलत होते.
नाव लक्षात राहिलेले.
सत्तार शिवसेनेत येवुन सिल्लोड मधुन निवडुन आले.
विखे भाजप मध्ये येवुन शिर्डी मधुन निवडुन आले
राणा जगतिशिंग का काय भाजपात जावुन उस्मानबादेतुन विजयी.
विजयकुमार गावित वगैरे आधीच भाजपा मध्ये गेले होते, ते पण निवडुन आलेत.
बाकी लक्शात नाही
24 Oct 2019 - 7:48 pm | ढब्ब्या
१९ आयाराम पडले
१६ निवडून आले
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/congress...
24 Oct 2019 - 6:54 pm | कंजूस
हस्तर हेच कळण्यासाठी टिवी लावत होतो पण तिथे कंटाळवाण्या चर्चा चालू.
अपवाद कोणता?
24 Oct 2019 - 8:39 pm | मदनबाण
विरोधकातील लोकांना पक्षात घेतल्याने विरोधक संपवल्याचा फाजील आत्मविश्वास.
निवडणुकीत भाजपा कोणत्या मुद्ध्यांवर लढतय हे भाजपाला देखील कळले नाही आणि ठरवता देखील आले नाही.
शिवसेनेची विनाकारण पत्रास बाळगली, जी भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्यास देखील आवडली नाही.
दुसऱ्या पक्षातील लोकांना स्वपक्षात घेण्याची कृती जनतेला आवडणार नाही हे ठावूक असून देखील त्यांच्या भावनांना दुर्लक्षित करण्याची घोडचूक.
केंद्रात तुमच्याच पक्षाचे सरकार असताना राज्यात धड रस्ते देखील असू नयेत याचा जनतेला प्रचंड राग, कारण आधी जनतेने मोदींच्या नावावर मत दिले कारण त्यांनी लोकांना विकासाचे स्वप्न दाखवले होते.
370 बद्धल लोकांनी नक्कीच कौतुक केले, परंतु राज्यात भीषण पूरस्थिती उत्पन्न झाल्यावर तसेच सध्या रोजच्या सुविधाही दुष्कर झाल्याने लोकांत तीव्र रोष उत्पन्न झाला.
राज्यात 370 मुद्द्याचा उपयोग नाही हे अमित शहा यांच्या सारख्या व्यक्तीला देखील कळले नाही हे लोकांच्या लक्षात आले आणि पक्ष राज्यातील लोकांच्या समस्ये बाबत गंभीर नाही असा संदेशच 370 च्या प्रचारातून जनतेत गेला.
ही वरील सर्व कारणे मला भाजपाच्या आजच्या निवडणूक झाल्या नंतरच्या स्थितीला कारणीभूत ठरली असे वाटते.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आता तरी राज्यात चांगले रस्ते बांधा, नाहीतर पुढच्या वेळी सबका साथ सबका विकास ची धिंड निघेल !
24 Oct 2019 - 8:41 pm | सुबोध खरे
साडे आठ वाजता निवडणूक आयोगाच्या साईट वरील माहिती
जिंकले / पुढे आहेत
भाजप ८४/२१ =१०५
शिवसेना ५३/३= ५६
काँग्रेस ३५/९ = ४४
रा काँग्रेस ४६/८ = ५४
अपक्ष ११/२ = १३
24 Oct 2019 - 8:41 pm | सुबोध खरे
http://www.results.eci.gov.in/ACOCT2019/partywiseresult-S13.htm?st=S13
24 Oct 2019 - 10:30 pm | डँबिस००७
१०५ जागा एकट्या भाजपाच्या बळावर !! सहीय !
मनसे नावाचा पक्षाने 101 जागा लढवल्या आणी १ विजय !! अभुतपुर्व !
राज ठाकरेंच्या सभेला भयंकर गर्दी व्हायची. ह्या सभेमध्ये मा मोदी पासुन बर्याच नेत्यांच्या आवाजाच्या, हावभावाच्या नकला केल्या गेल्या . सभेला गर्दी बघुन विरोधी पक्षाचे नेतेपद
आपल्यालाच मिळेल अस
राज ठाकरेला वाटल होत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर तरी अक्कल यायला पाहीजे होती.
मनसेला मनपा मध्ये संधी मिळुन सुद्धा त्याची माती केली आणि आता ह्यांना विरोधी पक्ष नेतेपदाचे डोहाळे लागलेत !!
24 Oct 2019 - 11:19 pm | थॉर माणूस
एकट्या भाजपाच्या बळावर? युती केली होती ना शिवसेनेबरोबर? त्यांचे सगळे उमेदवार उभे केले असते विरोधात तरी १०५ आले असते असे म्हणताय का?
25 Oct 2019 - 9:20 am | सुबोध खरे
गेल्या १० वर्षात चौथ्या क्रमांकाहून पहिल्या क्रमांकावर पक्ष आणणारे, सलग दुसऱ्यांदा १०० हून अधिक आमदार निवडून आणणारे देवेंद्र फडणवीस हे अपयशी, कमनशिबी ईत्यादी ईत्यादी..
गेल्या ५० हून अधिक वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचे सर्वेसर्वा असणारे, ४ वेळेस मुख्यमंत्री असतानाही एकदाही कार्यकाळ पूर्ण करु न शकणारे, एकहाती सत्ताचं काय, ५०-६० आमदारचं जेमतेम निवडून आणू शकणारे शरद पवार हे मात्र तेल लावलेले पैलवान, ७९ वर्षी पक्षाला बळकटी, सर्वाधिक यशस्वी, चितपट करणारे आदी आदी..
पगारी भाट कोणाला कसे तोलतील, तेचं जाणो..!
26 Oct 2019 - 6:33 pm | शाम भागवत
https://youtu.be/2Um02v1a5WA
विधानसभा निवडणुकीचे एक चांगले विश्लेषण.