India Deserves Better - ०

गणेशा's picture
गणेशा in राजकारण
25 Sep 2019 - 4:39 pm

note : मिपा वर बर्याच दिवसानी आलो.. मधल्या काळात कोणाचे काहि विशेष असे काहि वाचले नाहि, वाचेल आता. ... २०१५ मधील 'शब्द झाले मोती' ह्य छोटासा लिखानाचा भाग सोडला तर मनातले असे काहि २०१० नंतर लिहिलेच नाहि ... कविता आणि भटकंती या पलिकडे माझीआवड कधी गेली नाहिच.. नाहि म्हणायला थोडे रिप्लाय होते राजकारणी धाग्यावर पण ते माझ्या अल्प ज्ञाना वर.आता ही मला जास्त काही राजकारणातले कळते असे अजिबात नाही ... पण थोडेशे बोलावेच वाटते

----------------------------------------------------------------------------------------------------

आजकाल चे जग हे सोशल मेडिया आणि मार्केटिग वाले आहे ... ते वाईट असे मी म्हणत नाही.. पण आता असे झाले आहे, लोक कुठल्या तरी एका टोकाला धरुन, एकाच द्रुष्टिकोणातून आपली मते बनवत आहेत ... त्यातहि आता लाचार व्यक्तीपुजक लोकांचा अधिक सुळसुळाट झाला आहे..
भाडोत्री IT CELL च्या अनेक एकांगी आणि विशिष्ट उद्दीष्टे असणार्या गोष्टी बरेच जन सारासार विचार न करता एखाद्या दलाला सारखे सोशल मेडिया वर फॉरवर्ड करत असतात .. वाईट या गोष्टीचे वाटते.. चांगल्याला चांगले , आणि वाईटाला वाईट असा सारासार विचार करण्याची लोकांची कुवत आता संपत चालली आहे का ?
एखाद्याचे व त्याच्या कामाचे फक्त उदो उदो करायचे किंवा डायरेक्ट त्याला घालुन पाडुन शिव्या घालायच्या ह्या दोनच विचारसरणी आता राहिल्या आहेत असेच आता वाटत आहे. वाईट या गोष्टीचे वाटते, असल्या उद्दातीकरणात शिकले सवरलेले लोकच जास्त पुढे आहेत..
एखादा व्यक्ती चांगला वाटत असेल पण त्याचे काम चुकले तर ते चुकिचेच . आणि एखादा वाईट वाटत असेल पण त्याचे चांगले काम चांगलेच असा माणनारा वर्ग आता राहिलाच नाही का ?
असल्या या वातावरणात, आपण आपल्या विचारांना व्यक्त न करता , आपल्या आपल्यातच कोणी राहत असेल आणि फक्त हो ला हो आणि नाहि ला नाहि म्हणत असेल तर नंतर काही काळानंतर खालावत चाललेल्या व्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार आपण गमावुन बसलेलो असेल. त्यामुळे कोणी नाराज होतील.. दुखावतील या असल्या पोकळ गोष्टींपेक्षा आपल्याला काय वाटते.. आपल्या भोवतालच्या परिस्थीती बद्दल.. आर्थिक, शैक्षणिक , सामाजिक परिस्थीती बद्दल आपले वयक्तीक नेमके काय म्हणने आहे ? आणि आपल्या, आपण निवडुन दिलेल्या लोकांकडुन आपल्या काय अपेक्षा आहेत हे बिनधास्त लिहिलेच पाहिजे.
एखादे मत चुकीचे असेलही .. ते निट करता येइल . पण आजुबाजुला घडणार्‍या चुकिच्या गोष्टीला वाचा फोडलीच पाहिजे.. भले याची दखल कोणी घेवु वा ना घेवू ...
आपल्या हातात निदान व्यक्त होणे आहे ते तरी निट केले पाहिजे.. आणि ते आपल्या द्रुष्टिकोणासारखे पारदर्शक असलेच पाहिजे ..

म्हणुन , दरवेळेस एका मुद्द्या वर मी बोलणार आहे.. Using HashTag #India_Deserves_Better

प्रतिक्रिया

अरे वा. गणेशा, बरेच दिवसांनी नव्हे तर बरेच वर्षांनी.

अलीकडे प्रतिसाद दिसले होते तुरळक फक्त. वेलकम बॅक.

पद्मावति's picture

25 Sep 2019 - 4:57 pm | पद्मावति

बरेच दिवसांनी नव्हे तर बरेच वर्षांनी.

असेच म्हणते. वेलकम बॅक.

जॉनविक्क's picture

25 Sep 2019 - 5:19 pm | जॉनविक्क

Old is gold म्हणतात. बघूया किती चोक्ख सोने आहे ते. पूलेशु

यशोधरा's picture

25 Sep 2019 - 5:25 pm | यशोधरा

वेलकम बॅक. तुमच्या नव्या कविताही वाचायला मिळूदेत मिपाच्या दिवाळी अंकात.

गणेशा's picture

25 Sep 2019 - 5:40 pm | गणेशा

कविता खरेच तेंव्हाच बंद केल्या लिहायच्या.
लिखानच बंद केले होते पुर्ण

पुन्हा सुरू करता येईल इच्छा असल्यास.

चौथा कोनाडा's picture

25 Sep 2019 - 5:32 pm | चौथा कोनाडा

पुनःश्च स्वागतम, गणेशा !

होय, इंडिया डिझर्व्हस बेटर ! पण करायचं कस ???

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Sep 2019 - 5:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

वेलकम बॅक !

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Sep 2019 - 7:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

आणि हो, वाईट या गोष्टीचे वाटते.. चांगल्याला चांगले , आणि वाईटाला वाईट असा सारासार विचार करण्याची लोकांची कुवत आता संपत चालली आहे का ? या वाक्यातल्या भावनेशी सहमत आहे.

"....एखादा व्यक्ती चांगला वाटत असेल पण त्याचे काम चुकले तर ते चुकिचेच . आणि एखादा वाईट वाटत असेल पण त्याचे चांगले काम चांगलेच असा माणनारा वर्ग आता राहिलाच नाही का ?"
दुर्दैवाने व्यक्तिपूजा आणि टोकाची भूमिका घेणे हे भारतीय समाजात काही नवीन नाहीये ( अनेक टी व्हीचॅनेल वरचे ८ जणांचे पॅनल वाद ( मासळी बाजार ) बघा
असा वर्ग पूर्वी हि होता आणि आता हि आहे फरक फक्त असा आहे दुधारी तलवारीच्या सोशल मीडिया . या शोधा मुले सेकंदात हे सर्वच चव्हाटयावर येते..
विचार करा आपण किती पटकन आपले विचार असे उघड्यवर बोलून ( लिहून) दाखवतो या माध्यमातून.. हेच आपण उदय आपले विचार उघडपणे शिवाजी उद्यानावर किंवा सारसबागेत चौथऱ्यवर ऊन=भे राहून ओरडून बोलू का !

सोशल मेडिया चुकिचा नाहीच, पण त्याचा वापर भाडोत्री लोक वापरुन काहीही पसरवण्या साठी करायचा आणि ते पसरवण्यासाठी एक दलालासम होउन काहीही विचार न करता आपण त्यात सहभाग घ्यायचा की नाही हे आपण ठरवलेच पाहिजे..

पहिल्या पासुन होत असेल , पण आजच्या इतका विखार तेंव्हा पण होता असे मानने म्हणजे , जे चालले आहे ते पुर्वापार आहे, आणि चुकीचे कसे नाही असे माणण्या सारखेच आहे... असे मला वयक्तीक वाटते

राजकारणाचे म्हणाल तर , बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि अटल बिहारी वाजपेयी या सगळ्यांना मानणारा मी आहे, आणि यांनी उघड्पणे कीतीही काही बोलले असले तरी वयक्तीक पणे असला विखार कटाक्शाने टाळला, आणि त्यात ते यशस्वी झाले..
बाकी जास्त काय बोलु ..

तरीही असे वाटत असेल की हे पुर्वीपासुन होते , तर म्हणुनच , India deserves better, कारण येथे दुसर्याचे ही मत जानुन काय बरोबर काय चुक हे कळले पाहिजेच.