कुंभमेळा

क्रांती's picture
क्रांती in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

कुंभमेळा

अरुण परतता की चंद्र मंदावलेला
इथुनतिथुन साऱ्या सारख्या दु:खवेळा
जिथुन हरवले मी आणि अस्तित्व माझे,
चिरविव्हल व्यथांचा जन्म हा कुंभमेळा

कलकलकल वाहे द्वेषगंगा विखारी
दुरुन निघुन जाता पावले खेचणारी
नितळ निखळ पाणी शोधता ठाव नाही
खळबळत उराशी पातके येति सारी

घणघणघण घंटा वाजती यातनांच्या
ठणकठणक झांजा पाशवी वासनांच्या
कलकलत पिशाच्चे वेढती जीवनाला
किरकिरत सभोती सावल्या भावनांच्या

अनवरत मनाला आस खंतावण्याची
प्रखर तमतळाशी जात मंदावण्याची
भिजुन विझुन गेली चेतना, जिद्द मेली
अबल क्षत परांनी उंच झेपावण्याची

विटत सुकत गेला निश्चयाचा तजेला
अगणित तमछाया घेरती जाणिवेला
जिथुन हरवले मी आणि अस्तित्व माझे,
चिरविव्हल व्यथांचा जन्म हा कुंभमेळा

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

माई, तुझ्याकडलं शब्दवैभव अफाट, अचाट आहे!
किती प्रत्ययकारी लिहितेस..

पाषाणभेद's picture

26 Oct 2019 - 3:48 pm | पाषाणभेद

मानवाचे सारे आयुष्य कवितेत उतरले आहे.

पद्मावति's picture

26 Oct 2019 - 4:07 pm | पद्मावति

खुप सुरेख!

बरखा's picture

31 Oct 2019 - 10:55 pm | बरखा

नितळ निखळ पाणी शोधता ठाव नाही
खळबळत उराशी पातके येति सारी
खुप सुरेख!

चित्रगुप्त's picture

3 Nov 2019 - 12:16 am | चित्रगुप्त

वृत्तबद्ध कविता हल्ली फार कमी वाचायला मिळतात. अप्रतिम रचना झालेली आहे. हे अगदी ओळखीचे वृत्त आहे (वदनि कवळ घेता... किंवा .... कलकलकल हंसे फार केले सुटाया...) परंतु त्याचे नाव विसरलो आहे. कृपया कळवावे.

श्वेता२४'s picture

6 Nov 2019 - 11:50 am | श्वेता२४

कविता खुप आवडली

अलकनंदा's picture

19 Nov 2019 - 1:53 pm | अलकनंदा

उत्तम रचना. सुरेख.