h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
}
h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
}
p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}
a: {
color: #990000;
}
a:link {
text-decoration: none;
}
a:hover {
text-decoration: underline;
}
div.chitra {
max-width:600px;
margin: auto;
}
div.chitra1 {
max-width:462px;
margin: auto;
}
div.chitra2 {
max-width:320px;
margin: auto;
}
आरास
गणपतीच्या पूजेसाठी मंडळी झाली गोळापरिवारांच्या मिलनाचा वार्षिक हा सोहळातीन दिवसांच्या बहराचा, तेरडा आणू या पूजेलाबाप्पांच्या लाडक्या दूर्वा, शमी-केवडा, रक्तपुष्पमेळामोदक, लाडू, पंचखाद्य सादर हो नैवेद्यालारक्षणकर्त्या, विघ्नहर्त्या, नमू या मंगलमूर्तीलाया, या, जमुनी करू आरती, एकमुखाने म्हणू चला
गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
तर असा हा सगळ्यांचा लाडका गणपतीबाप्पा. कुणाच्या घरी दीड दिवसांचा पाहुणा, तर कुणाकडचा मुक्काम अगदी दहा दिवसांचा. मुक्काम कितीही असो, या पाहुण्याच्या स्वागताचा उत्साह तितकाच सारखा. या उत्साहाचा, उत्सवाचा एक अविभाज्य भाग म्हणजे 'गणपतीची आरास.' प्रत्येक जण शक्य होईल तशी आरास करतो. पण आराशीशिवाय गणपती? अ श क्य!
आरास म्हणताच माझं मन नकळतच भूतकाळात डोकावतं आणि शाळकरी वयात केलेल्या आराशीच्या आणि सजावटीच्या आठवणी जाग्या होतात. कसं आहे ना मंडळी, झाला चालू 'नॉस्टाल्जिया फीवर' असं म्हणून काहींनी नाकं मुरडलीही असतील एव्हाना! पण ही सजावट स्वनिर्मित, साहजिकच माझ्या या सुखद आठवणींमध्ये आजच्या 'डी आय वाय'वाल्यांनाही सामील का करून घेऊ नये? या विचारामुळेच पुढे लिहीत राहिले. काय सांगावं, कदाचित तुम्हीही व्हाल 'नॉस्टाल्जिक!'
तर आमच्या घरच्या गणपतीबाप्पांच्या बैठक व्यवस्थेचा भार असायचा आम्हा भावंडांवर, बच्चेकंपनीवर. सजावट करायची असायची ती घरातल्या उपलब्ध साहित्यातून आणि मर्यादित खर्चात. एक मात्र होतं की घरातल्या वस्तू हव्या तशा आणि हव्या तेवढ्या वापरण्याची मुभा होती, अर्थातच काळजीपूर्वक वापरण्याच्या अटीवर! यामध्ये पहिली धाड पडायची ती अभ्यासाच्या टेबलावर. शाळेला तर सुट्टीच असायची. शिवाय दिवाळीसारखा 'गृहपाठ'ही नसायचा. मग कुणाला हवी असणार ती वह्या-पुस्तकं? रीतसर टेबल भिंतीला लागायचं. त्यावर आईने कशिदा केलेल्या चादरी अंथरल्या जायच्या. सगळीकडून पिना, टाचण्या लावून टेबल नीटपणे झाकलं जायचं. या प्रयत्नात अनेकदा कधी एक बाजू उघडी पडायची, तर कधी दुसरी. मग नीट न लावल्याचं खापर एकमेकांच्या डोक्यावर फोडलं जायचं. अधूनमधून शाब्दिक चकमकी व्हायच्या, पण लगेच समेटही होऊन जायचा. भिंतीवरच्या खिळ्यांवर दोऱ्या बांधल्या जायच्या. त्यावर आईच्या रेशमी, जरीच्या साड्या निऱ्या करून तीन बाजूंनी सोडून वरून शंकूसारख्या बांधल्या जायच्या. हे सारं चालायचं चतुर्थीच्या आदल्या रात्री. पण आमच्या हल्ल्यागुल्ल्यावर घरातल्या मोठ्यांकडून "...आटपा रे लवकर आणि झोपा, म्हणजे सकाळी लवकर निघून बाप्पांना घरी घेऊन येता येईल..." इतपतच ओरडा मिळत असे. आम्हीही मग आटपतं घेत असू. आपल्याच कारागिरीवर आपणच खूश होत बाप्पांच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत झोपी जायचो.
दुसऱ्या एका वर्षी ही साड्यांची सजावट आम्ही एकमताने नामंजूर केली. साहजिकच घरातल्या इतर वस्तूंवरून आमच्या नजरा फिरू लागल्या. बघता बघता आमची दृष्टी पडली एका स्टुलावर आणि आम्ही एकदम ओरडलो.... युरेका! हे स्टूल टेबलावर बसण्यासारखं होतं आणि त्याच्या कडांना छान महिरपही होती. चौरंगही स्टुलाच्या आत फिट बसत होता. मग काय, जमलंच की सारं! लगोलग स्टूल टेबलावर चढलं. मंजूर निधीतून क्रेपच्या पट्ट्या, रंगीत कागद इत्यादीची खरेदी झाली. स्टुलाच्या तीन बाजूंनी, रिकाम्या भागात क्रेपच्या रिबिनी पीळ घालून चिकटल्या. स्टुलाच्या पुढच्या बाजूच्या - अर्थात दर्शनी भागातील पायांवर, समोरच्या, डाव्या आणि उजव्या बाजूच्या कमानींवर, दोऱ्यात ओवून गोल फिरवुन तयार झालेली फुलं सजली. क्रेपच्या कागदाना घड्या घालून अर्धवर्तुळाकार पंखा तयार झाला. बाप्पांच्या मागे शोभा आणण्यासाठी एक आरसा आला. पुन्हा एकदा आपल्या सजावटीवर खूश होऊन परस्परांच्या हातावर टाळ्या पडल्या. कित्ती मज्जा!
जसजसे मोठे होऊ लागलो, तसतशी मग रात्र रात्र जागून कोरलेली थर्माकोलची मखरं तयार होऊ लागली. कधी कागदी कमळात बाप्पा विराजमान होऊ लागले, तर कधी चक्क अंगणातील मधुमालतीचा वेल काचेच्या बाटल्यातील पाण्यात उभा राहून बाप्पांवर छत्र धरू लागला. ही नैसर्गिक, जिवंत, पर्यावरणस्नेही आरास मला इतकी भावली की आजही आमचे बाप्पा फुला-पानांच्या आराशीतच विराजमान होऊन आशीर्वाद देत असतात, हे असे.
प्रतिक्रिया
8 Sep 2019 - 11:34 am | सुधीर कांदळकर
आम्ही पण लहानपणी शेजारी आरास करायला जात असू. क्रेपच्या पट्ट्या आणि तयार मिळणारे रंगीत कागदाचे फोल्डेबल झुंबराचे आकार या वस्तू एकदा घेतल्या की दोनचार वेळा वापरता येत. हातात कला नसली तरी चाले. फक्त खिळेहातोडी, दोरा आणि चिकटपट्टी एवढ्याच वस्तूंवर झटपट आरास करीत असू. उंच छतावर चिकटवण्याचे काम मोठी मुले करीत.
मस्त आठवणी जागविल्यात. धन्यवाद.
10 Sep 2019 - 7:29 am | यशोधरा
बाप्पा फारच प्रसन्न दिसतो आहे!
10 Sep 2019 - 8:02 am | तुषार काळभोर
अगदी!!
२००० येइपर्यंत घरगुती सजावट या गोष्टींशिवाय पूर्ण होत नसे.
अभ्यासाचा टेबल, साड्या किंवा रंगीत चमकदार जाळ्या, कशिदा केलेला टेबलक्लॉथ, क्रेपपेपर च्या साध्या ते झुंबरासारखं डिझाईन असलेल्या झुरमुळ्या, मागे एक इंद्रधनुषी पंखा (हा आता मिळत नाही)... असं सगळं असायचं.
10 Sep 2019 - 8:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाप्पा आवडला. आरास सुद्धा लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
10 Sep 2019 - 11:23 am | पद्मावति
खुप मस्तं.
10 Sep 2019 - 11:33 pm | जालिम लोशन
सुदंर
11 Sep 2019 - 12:20 pm | जॉनविक्क
11 Sep 2019 - 5:36 pm | मित्रहो
आरास छान आहे
15 Sep 2019 - 2:42 pm | नूतन
प्रतिसादाबद्दल आभार