पुनरागमनायच...

यशोधरा's picture
यशोधरा in लेखमाला
12 Sep 2019 - 6:05 am

h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
}
h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
}

p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}

a: {
color: #990000;
}

a:link {
text-decoration: none;
}

a:hover {
text-decoration: underline;
}
div.chitra {
max-width:600px;
margin: auto;
}
div.chitra1 {
max-width:400px;
margin: auto;
}
div.chitra2 {
max-width:300px;
margin: auto;
}

पुनरागमनायच...

"येणार येणार म्हणताना गणपती आले आणि आज, बघता बघता त्यांना निरोप द्यायचीही वेळ समोर येऊन ठाकली आहे. किती पटकन अनंतचतुर्दशीचा दिवस येतो... बाप्पाला निरोप देताना, गणेशोत्सवानिमित्त प्रकाशित होणाऱ्या लेखमालेचाही आज समारोप होतो आहे, त्या निमित्ताने दोन शब्द लिहावेसे वाटतात."

गणपती येण्याची चाहूल लागते आणि वातावरणात, आसमंतात हळूहळू ऊर्जा सळसळायला लागते. तुम्हा-आम्हाला ह्या ऊर्जेची लागण व्हायला वेळ लागत नाही. बाप्पा मुक्कामी असेतोवर ही ऊर्जा साऱ्या आसमंतात जिथे तिथे जाणवत राहते. सर्वत्र विलक्षण उत्साही, मंगलमय अशा वातावरणाचा येत असलेला अनुभव मोठा सुखद, आनंददायक वाटत राहतो आणि आपल्या आप्तगणांसह हा आनंद साजरा होत असेल, तर तो द्विगुणित झाला नाही तरच नवल! गणपती, मागोमाग येणार्‍या गौराया आणि ह्या साऱ्यांच्या दर्शनानिमित्त एकत्र येणारे आप्तजन, मित्रपरिवार ह्यांच्यासाठी कराव्या लागणाऱ्या उस्तवारीने श्रमी व्हायला होत नाही, उलट आणखी बळ येतं. हे हवेसे, करावेसे वाटणारे श्रम असतात. गजाननाच्या लोभस दर्शनाने 'सानंद, आनंद डोले' अशी मनाची अवस्था झालेली असते. मोद विहरतो चोहीकडे, असं काहीसं होतं खरं.

खरं पाहता जेव्हापासून गणेशोत्सव सुरू झाला, तेव्हापासून ते आजच्या उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडला आहे, उत्सव साजरा करण्याची कारणं बदलली आहेत, असलीच तर उद्दिष्टंदेखील बदलली असावीत. कालानुरूप पुढे आणखीही बदल होत जातील. तरीही आपल्याला उत्सवाचं वाटणारं आकर्षण आणि हौस कमी होणार नाही. उत्सव हे खरं तर सर्व प्रकारचे भेदभाव बाजूला ठेवून, विसरून सगळ्यांनी एकत्र येण्याचं चांगलं निमित्त. त्यातून सामाजिक भान जोपासलं जात असेल तर अधिक उत्तम. ह्या वर्षीच्या अस्मानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी असं भान वैयक्तिकरीत्या आणि सामाजिक स्तरावर, उत्सवांच्या धामधुमीमध्येही काही अंशी राखलं गेलं, ह्याचं समाधान आहे. ज्या कारणाने गणेशोत्सवाची मूळ मुहूर्तमेढ रोवली गेली, त्या संकल्पनेपाशी गणेशोत्सव पुन्हा पुन्हा असाच परतून येत राहू देत आणि नव्या भानाने वातावरण अधिक उजळून, झळाळून टाकू देत, ह्यापेक्षा गजाननाकडे आणखी वेगळं काय मागायचं?

तेरा वर्षांपूर्वी गणेशचतुर्थीला मिपाचा जन्म झाला, त्याअर्थी गणेशोत्सवाशी मिपाचं एक आंतरिक नातं आहे, म्हणायला हरकत नसावी. म्हणून ह्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या लेखमालेचंही महत्त्व. ह्या वर्षी मिपावरच्या या उपक्रमाचं संयोजन करण्याची संधी मला पहिल्यांदाच मिळाली, त्यासाठी मिपा प्रशासनाचे मनापासून आभार.

या पहिल्या प्रयत्नात मला सांभाळून घेणाऱ्या, वेळोवेळी सूचना करणाऱ्या, मतं मांडणाऱ्या आणि माझ्याबरोबर लेखमालेच्या उत्तम सादरीकरणासाठी झटणाऱ्या मिपा सल्लागार आणि साहित्य संपादक ह्यांना अनेक धन्यवाद. नूलकरकाका हरेक उपक्रमात न कंटाळता, न चुकता प्रत्येक लिखाणाचं मुद्रितशोधन करून त्याचं रूपडं साजरं बनवतात आणि इतरही मौलिक सूचना करतात, त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत! दर उपक्रमातील लेखमाला आणि अंक अभ्या ह्यांच्या बॅनर व इतर सजावटींनी सजतात. ह्याही वर्षी उत्तम बॅनर व हेडर-फूटर सजावटीसाठी मदत करण्यासाठी अभ्या ह्यांचं कौतुक व आभार. स्तोत्रे, आरतीचे ऑडिओ धाग्यांत उपलब्ध करून देण्यासाठी सतीश गावडेंनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचेही आभार मानते. प्रशांत व नीलकांत प्रत्येक उपक्रमात पडद्यामागे राहून शांतपणे वेळोवेळी आलेल्या तांत्रिक अडचणी सोडवण्याचं काम करत असतात आणि प्रत्येक उपक्रम तडीस नेण्यामध्ये ह्या दोघांचा वाटा असतोच. ह्याशिवाय, मिसळपावसारखं माध्यम मिपाकरांसाठी सातत्याने उपलब्ध करून ठेवण्यासाठीही त्यांचे आभार मानू तितके कमी आहेत. आलेल्या लहान-मोठया अडचणींमधून मार्ग काढून, श्रीगणेश लेखमालेच्या यशस्वी प्रकाशनाचं श्रेय मदतीचा हात पुढे करणाऱ्या प्रत्येक मिपाकराचं आहे, हे कृतज्ञतापूर्वक नमूद करते.

उपक्रमाच्या ह्या सर्व सव्यापसव्यानंतरही लेखमालेमध्ये काही कसर राहिली असेल, कुठे काही चुकलं असेल तर त्याची जबाबदारी घेत, मोठेपणा दाखवून सांभाळून घ्यायची मी तुम्हा सर्वांना विनंती करते. पहिल्यांदाच असं काम करताना चुकतमाकत, लेखमालेच्या झलकींपासून समारोपापर्यंत पोहोचेपर्यंत, अनुभवांतून शिकत जाण्याचा हा प्रवास माझ्यासाठी मोठा विलक्षण होता.

आता, आणखी एका मोठ्या ऋणाचा उल्लेख करावयाचा आहे आणि तो म्हणजे मिपा लेखमालेसाठी वेळात वेळ काढून एकाहून एक सुरेख लेख, कविता लिहून देणाऱ्या, चित्रकला, दृक्-श्राव्य माध्यमांचा वापर करत लेखमालेचं रूपडं अधिकाधिक आकर्षक करायला मदत करणाऱ्या तुम्हां मिपाकरांच्या ऋणाचा. तुमच्या सहभागाशिवाय काहीच शक्य झालं नसतं, ही कृतज्ञ जाणीव मनात वागवत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. ही लेखमाला नवीन रूपात सादर करण्यासाठी टर्मीनेटर ह्यांनी मोठ्या उत्साहाने स्वतःहोऊन काम करायची तयारी दाखवून हातभारही लावला आहे, त्यांचं प्रचंड कौतुक आणि मनापासून आभार. त्याचप्रमाणे, गणपतीच्या सुरेख चित्रासाठी नीना ह्यांचं अतिशय कौतुक आणि आभार! भविष्यातील उपक्रमांसाठी काम करण्यासाठी नवीन चेहरे ह्या उपक्रमामध्ये मिपाला मिळाले, हे बाप्पाने जाता जाता पदरात घातलेलं ह्या उपक्रमाचं एक घवघवीत यश!

शेवटी आता बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर यायची आठवण करून देता देता आणि जड मनाने त्याला तात्पुरता का होईना, निरोप देताना म्हणायचं तरी काय मंडळी?

बस इतकंच की, पुनरागमनाय च...

श्रीगणेश लेखमाला २०१९

प्रतिक्रिया

दरवर्षीप्रमाणच गणेश लेखमाला ह्या वर्षीही उत्तम झाली. अनेकानेक उत्तमोत्तम लेख वाचायला मिळाले.
मनःपूर्वक धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Sep 2019 - 8:22 am | ज्ञानोबाचे पैजार

लेखमाला अतिशय वाचनिय आणि देखणी झाली आहे.
पुढच्या वर्षी लवकर या असा बाप्पाला आग्रह करण्यामागे श्री गणेश लेखमाला हे देखील एक कारण आहे.
ज्या दृष्य अदृष्य हातांनी ही लेखमाला आमच्या पर्यंत पोचवण्यासाठी मेहनत घेतली त्यांचे अनेक अनेक आभार.
पैजारबुवा,

ज्योति अळवणी's picture

12 Sep 2019 - 9:23 am | ज्योति अळवणी

लेखनमाला तर उत्तमच झाली यावेळची.

मनोज जोशींच्या मुलाखतीसाठी संपादक मंडळ आणि विशीषत: यशोधराजी तुम्ही केलेली मदत... धन्यवाद म्हणून त्याचं महत्व कमी करू इच्छित नाही. पण उल्लेख होणं खूप महत्वाचं!!

एक मिपाकर असल्याचा आनंद आहे. आणि आपला खारीचा वाटा सगळेच कौतुकाने वाचून प्रतिसाद देतात याने खूप बरं वाटतं

ज्योति अळवणी's picture

12 Sep 2019 - 9:23 am | ज्योति अळवणी

लेखनमाला तर उत्तमच झाली यावेळची.

मनोज जोशींच्या मुलाखतीसाठी संपादक मंडळ आणि विशीषत: यशोधराजी तुम्ही केलेली मदत... धन्यवाद म्हणून त्याचं महत्व कमी करू इच्छित नाही. पण उल्लेख होणं खूप महत्वाचं!!

एक मिपाकर असल्याचा आनंद आहे. आणि आपला खारीचा वाटा सगळेच कौतुकाने वाचून प्रतिसाद देतात याने खूप बरं वाटतं

नाखु's picture

12 Sep 2019 - 9:53 am | नाखु

मुक्त आणि बहुरंगी असल्यानेही विलक्षण झाली आहे.
गणपती चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती असलेला आहे आणि म्हणूनच ही लेखमाला कुठल्याही एकाच विषयाला वाहिलेली नाही हे उत्तम.
सफाईदार संकलन,विषयागणीक लेखचित्रे आणि मांडणी यामुळेच एखाद्या दिवाळी अंकाच्या तोडीसतोड झाला आहे.
सर्व सहभागींचे धन्यवाद.
वाचकांनी सुद्धा आवर्जून पोचपावती दिली पाहिजेच, कुठल्याही सूचना,सुधारणा असतील तर त्याही दिल्याच पाहिजेत.
मिपा वर्धिष्णू करणे हेच मिपाकरांचे आद्यकर्तव्य आहे यावर ठाम विश्वास असलेला...

वाचकांची पत्रेवाला नाखु.

कुमार१'s picture

12 Sep 2019 - 10:02 am | कुमार१

मनःपूर्वक धन्यवाद.

जॉनविक्क's picture

12 Sep 2019 - 10:31 am | जॉनविक्क

नाहीतर आता डोळे ओले होतील.

खूप छान शब्दात सर्वांच्याच भावना मांडल्या आहेत. अतिशय धन्यवाद.

जालिम लोशन's picture

12 Sep 2019 - 11:43 am | जालिम लोशन

सुदंर अशी लेखमाला दिली त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासुन आभार.

या गणेश लेखमालेने आता नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे. पुढील संयोजकांची जबाबदारी वाढवली आहे. यशोधरा आणि टीमचं अभिनंदन..

जॉनविक्क's picture

12 Sep 2019 - 12:23 pm | जॉनविक्क

या गणेश लेखमालेने आता नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे.

हे फक्त म्हणायचे की खरेच हे मोजायची काही परिमाणे समजावता येतील ?

पद्मावति's picture

12 Sep 2019 - 12:12 pm | पद्मावति

अतिशय सुंदर लेखमाला झाली. उत्तमोत्तम लेखन यानिमित्ताने आम्हाला वाचायला मिळाले. हि लेखमाला यशस्वी करण्यास ज्यांचा हातभार लागला त्यांचे खूप खूप आभार. विशेष कौतुक यशोचे. लेखमालेच्या प्रारंभिक नियोजनापासून ते टीजर्सपर्यंत आणि सादरीकरणापासून ते सांगतेपर्यंत अगदी बारीक सारीक डिटेल्ससुद्धा तीने समर्थपणे सांभाळले. तिच्या मेहनतीचे, सातत्याचे आणि चिकाटीचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. यशो अँड टीम वेल डन!

तुषार काळभोर's picture

12 Sep 2019 - 3:32 pm | तुषार काळभोर

यशोधरा यांनी अतिशय कुशलतेने ही लेखमाला सांभाळली.
त्यांचे, सर्व टीमचे,।लेखकांचे आणि मिपाकरांचे मनापासून आभार!!

.....पुढच्या वर्षी लवकर या!

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Sep 2019 - 12:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

अत्यंत सुरेख, देखणी आणि सुरेल झाली या वेळेची श्रीगणेश लेखमाला !

लेखमालेत साहित्यिक सहभाग घेणार्‍या आणि ती मिपाकरांपर्यंत पोचविण्याचे काम केलेल्या सर्व जणांचे मनापासून कौतूक आणि अभिनंदन !!!

अत्यंत सुरेख, देखणी आणि सुरेल झाली या वेळेची श्रीगणेश लेखमाला !
लेखमालेत साहित्यिक सहभाग घेणार्‍या आणि ती मिपाकरांपर्यंत पोचविण्याचे काम केलेल्या सर्व जणांचे मनापासून कौतूक आणि अभिनंदन !!!

अगदी असेच म्हणतो. पुनरागमनाय च!

खूप सुंदर झालेली आहे लेखमाला!

सर्वांचं खूप खूप कौतुक! यशो तुझंही खास कौतुक आणि आभार!! :-)

सुधीर कांदळकर's picture

12 Sep 2019 - 1:22 pm | सुधीर कांदळकर


अत्यंत सुरेख, देखणी आणि सुरेल झाली या वेळेची श्रीगणेश लेखमाला !

अ‍ॅप्रेझलमध्ये

डॉ. साहेबांच्या या मताशी + १ सहमत.

तरीही अशोताई तुमच्या या लेखात मी छिद्रान्वेषी मालवण्याने एक चूक काढलीच. लेखमाला दर्जेदार होण्यास संमं आणि स्वयंसेवकांचा मोठा वाटा आहे हे निरर्विवाद. पण यशस्वी होण्यात मोठा वाटा वाचकांचा आहे. तेव्हा वाचकांचा ऋणनिर्देश करून त्यांना धन्यवाद देऊयात.

समीरसूर's picture

12 Sep 2019 - 4:53 pm | समीरसूर

आवडले! यावर्षी खरंच उत्तम लेख वाचायला मिळाले. धन्यवाद!

सुधीर कांदळकर's picture

12 Sep 2019 - 6:26 pm | सुधीर कांदळकर

माझा वरचा प्रतिसाद आवडला नसल्यास कृपया काढून टाकावा.

यशोधरा's picture

12 Sep 2019 - 6:31 pm | यशोधरा

असे काही नाही हो :) तुमचे बरोबर आहे, वाचक हाच तर कोणत्याही उपक्रमाचा आधार. त्यांना पसंत पडले, तरच उपक्रम यशस्वी मानायचा.

उलट, आपल्या मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल आपले आभार.

स्वाती दिनेश's picture

12 Sep 2019 - 7:23 pm | स्वाती दिनेश

ह्या वेळची लेखमाला सुरेखच झाली.. एका विषयाचे बंधन नसल्याने चौकटीत न अडकता बहुरंगी झाली.
यशो, तुझे आणि सर्व टीमचे विशेष कौतुक..
स्वाती

मृणालिनी's picture

13 Sep 2019 - 8:29 am | मृणालिनी

खूप छान संयोजन होते. अभिनंदन. :)

श्वेता२४'s picture

13 Sep 2019 - 10:54 am | श्वेता२४

अतीशय वाचनीय, बहुरंगी लेखमाला झाली. यासाठी कष्ट घेणाऱ्या सर्वांचेच आभार.

सुधीर कांदळकर's picture

13 Sep 2019 - 2:13 pm | सुधीर कांदळकर

येऊंद्यात. गणेश लेखमाला झल ३ मधला उतारा पाहा:


एखाद्या रिकाम्या चित्रफलकावर चित्रकर्त्याने हलके हलके रंग भरावेत आणि बघता बघता चित्रफलकाचा नूरच बदलून जावा! आपल्या श्रीगणेश लेखमालेचंसुद्धा काहीसं तसंच झालंय बरं का, मंडळी.

वा! असेच काही पुन्हा येऊद्यात.

अरे वा! झलकीची दखल घेतल्याचा आनंद वाटला. जरूर प्रयत्न करू.

किसन शिंदे's picture

13 Sep 2019 - 8:40 pm | किसन शिंदे

यावेळची गलेमा सर्वोत्तम होती. विविध विषयांवरचे लेख वाचायला मिळाले. या लेखमालेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्वांचे अभिनंदन !!

नावातकायआहे's picture

13 Sep 2019 - 9:46 pm | नावातकायआहे

लेखनमाला उत्तमच झाली!
सर्व टीमचे आभार!!

सस्नेह's picture

13 Sep 2019 - 10:29 pm | सस्नेह

छानच झाली लेखमाला.
संयोजनही उत्तम.

बहुरंगी बहुढंगी धागारूपी पुष्पांनी गुंफलेली सुंदर लेखमाला!
सर्व लेखक/लेखिका/कवी/कवयत्रींचे आणि संयोजकांचे मनपूर्वक आभार 🙏
गेले पाच-सहा दिवस घर आणि ऑफिस पासून दूर असल्याने मालिकेचे बरेचसे लेख फोनवर वाचले, आणि फोनवर काहीही टंकण्याचा प्रचंड कंटाळा (तिटकारा) असल्याने प्रतिसाद देऊ शकलो नाही (आज ते कार्य पूर्णत्वास नेण्यात येणार आहे).
गणेश लेखमालिकेच्या संयोजनाची जवाबदारी यशस्वी आणि समर्थपणे पेलणाऱ्या यशोधराजींचे अभिनंदन. आणि मला अप्रूप ह्या गोष्टीचे वाटते कि मालिकेसाठीचे संपूर्ण टंकन, ऐनवेळी त्यांचा Laptop बिघडल्याने त्यांनी फोनवर केले 😮 !! त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक!!!

प्राची अश्विनी's picture

15 Sep 2019 - 9:16 am | प्राची अश्विनी

देखणी आणि संग्राह्य लेखमाला!
यशो आणि टीमचे आणि अर्थातच लेखकांचे कौतुक आणि आभार!

मदनबाण's picture

15 Sep 2019 - 5:29 pm | मदनबाण

लेखमाला सुंदर आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा दिल तेरे लिये धड़कता है... :- Aashiqui

आवडाबाई's picture

15 Sep 2019 - 11:07 pm | आवडाबाई

लेखमाला वाचन सुरू आहे, उत्तम आहे.
सहभागी झालेल्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन ! पडद्यामागच्या कलाकारांचे देखिल अभिनंदन.

आता दिवाळी अंक पण जोरदार होउन जाऊ दे, शुभेच्छा !!

सुधीर कांदळकर's picture

16 Sep 2019 - 7:15 am | सुधीर कांदळकर
सुधीर कांदळकर's picture

16 Sep 2019 - 7:16 am | सुधीर कांदळकर
सुधीर कांदळकर's picture

16 Sep 2019 - 7:16 am | सुधीर कांदळकर
सुधीर कांदळकर's picture

16 Sep 2019 - 7:16 am | सुधीर कांदळकर
शैलेन्द्र's picture

18 Sep 2019 - 9:30 am | शैलेन्द्र

मिसळपावशी जुने नाते आहे, एके काळी मिसळपाव दिवसभर उघडे असायचे. पुढे आयुष्य बदलत गेले तसे ते अशक्य झाले.

गणेश लेखमालेच्या निमित्ताने इथे परत डोकावता आले. खूप छान वाटले.

सगळ्या टीमचे खूप खूप आभार..

जॉनविक्क's picture

18 Sep 2019 - 10:33 am | जॉनविक्क

एके काळी मिसळपाव दिवसभर उघडे असायचे.

आता वेळ व्हाट्सअप्प वर जातो !

उपेक्षित's picture

20 Sep 2019 - 10:27 am | उपेक्षित

वाहः सुंदर झालय मनोगत ताई.

गड्डा झब्बू's picture

20 Sep 2019 - 12:28 pm | गड्डा झब्बू

छान झाली गणेश लेखमाला. मालिकेतील सगळच लेखन आवडल.

फार सुंदर झालीये लेखमाला. तुम्हां सर्वांच्या कष्टांचे मोल अवर्णनीय आहे. अभिनंदन!

एस साहेब कुठे अदृश्य झाला होतात इतके दिवस? जवळपास वर्षभर तरी तुमची उपस्थिती दिसली नाही!