श्रीगणेश लेखमाला २०१९ - प्रस्तावना

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in लेखमाला
2 Sep 2019 - 6:01 am

h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
}
h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
}

p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}

a: {
color: #990000;
}

a:link {
text-decoration: none;
}

a:hover {
text-decoration: underline;
}

श्रीगणेश लेखमाला २०१९ - प्रस्तावना

गणाधिप नमस्तुभ्यं सर्वविघ्नप्रशान्तिद | उमानंदप्रद प्राज्ञ त्राहि मां भवसागरात् ||

महाराष्ट्रातला माणूस मुळात सण-उत्सव, कला-साहित्य, नाटक, काव्य, मुलाखती यांचा अभिलाषी आहे. आपल्या गणगोतासह कुटुंब-मित्रमंडळींसह उत्तम कलांचा, साहित्याचा, काव्याचा आस्वाद घ्यावा, उत्तम नाटकांना, मैफलींना, मुलाखतींना हजेरी लावावी हे त्याला मनापासून आवडतं; कारण हे सगळे त्याचे मानबिंदू असतात. त्याच्या जगण्याचा अविभाज्य भागच म्हणा ना!

आजच्या वेगवान आयुष्याशी जुळवून घेतानाही आपल्या ह्या हौशी जपायला हाडाचा मऱ्हाठी माणूस विसरत नाही. ह्या हौशींची पूर्तता करायची त्याची परिमाणं मात्र थोडीफार बदलत गेलेली असू शकतात. उदाहरण द्यायचंच झालं, तर वेळेअभावी किंवा भारताबाहेर असल्याने त्याला हवं तेव्हा नाटक पाहायला जाता येत नसेल किंवा एखाद्या मैफलीला हजेरी लावता येत नसेल किंवा पुस्तक प्रदर्शनात हवा तेवढा वेळ रेंगाळता येत नसेल. पण म्हणून त्याच्या आयुष्यातून या गोष्टी हद्दपार होत नाहीत. तंत्रज्ञानाचा वापर करत, त्या 'ऑनलाइन' साजऱ्या होतात. बुद्धीची कास धरत मऱ्हाठी माणूस भावभक्तीत रंगून जातो. महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाची उत्सवप्रियता आणि हौस अनमोल आहे, हेच खरं.

अशा ह्या उत्सवसोहळ्याचे तुम्ही-आम्हीदेखील हौशी पाईक‌ आहोतच की! मिपावरसुद्धा आपण गणेशोत्सव दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. गणपतीचं आगमन आणि मिपास्थापनेचा दिवस असा आनंदोत्सवाचा दुहेरी योग असतो आणि ह्या उत्सवानिमित्त सादर होणाऱ्या लेखमालेची मिपाकर उत्सुकतेने वाट बघत असतात.

तर, आज श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही-आम्ही-सर्व मिपाकरांनी हातभार लावून साकारलेली श्रीगणेश लेखमाला २०१९ आपणां सगळ्यांपुढे सादर करताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे! विविध विषयांवरचे लेख, कथा, कविता, मुक्तक, चित्रकला, दृक्-श्राव्य माध्यम वापरून सादर केलेली मुलाखत असं ह्या मालिकेचं स्वरूप आहे. गणपती म्हटला की त्याचा नैवेद्य आलाच! मिपाच्या बल्लव मंडळाने आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत, आपल्या वैयक्तिक व्यग्र दिनक्रमांतूनही मिपा गणपती हा स्वतःच्या घरचाच गणपती आहे, ह्या भावनेने पाककृती सादर केल्या आहेत. त्यांचाही लेखमालेमध्ये समावेश आहे. आता या लेखमालेवर तुम्हा वाचक मंडळींच्या पसंतीची मोहोर उमटू देत, ही त्या गजाननाच्या चरणी प्रार्थना करतो आणि ही लेखमाला तुम्हांपुढे सादर करतो.

मिपा कुटुंबातील सर्व लेखक-वाचक-सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना श्रीगणेश चतुर्थीच्या आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीगणेश तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो, ह्या सदिच्छा!

श्रीगणेश लेखमाला २०१९

प्रतिक्रिया

फारएन्ड's picture

2 Sep 2019 - 5:22 am | फारएन्ड

गणपती बाप्पा मोरया!

सुंदर आहे गणपतीचे चित्र, आणि प्रस्तावनाही.

कंजूस's picture

2 Sep 2019 - 5:48 am | कंजूस

लेख वाचायला उत्सुक.

यशोधरा's picture

2 Sep 2019 - 6:22 am | यशोधरा

गणपती बाप्पा मोरया!
मिपा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा मिपाकर हो!

तुषार काळभोर's picture

2 Sep 2019 - 7:17 am | तुषार काळभोर

बॅनर, चित्र, पेज डिझाईन, लेख, सर्व काही अतिशय सुंदर!!

यंदाची श्रीगणेश लेखमाला मिपाच्या इतिहासात नोंदवून ठेवण्यासारखी होणार हे नक्की!!

मिपा वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Sep 2019 - 12:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

श्री गणेश लेखमालेचे नवीन रुपडे अत्यंत आकर्षक आहे. खूप आवडले !

उत्तम लुक अँड फील. खूप श्रम घेऊन ही लेखमाला मिपाकरांसाठी आणल्याबद्दल धन्यवाद..

नंदन's picture

2 Sep 2019 - 9:45 am | नंदन

उत्तम लुक अँड फील. खूप श्रम घेऊन ही लेखमाला मिपाकरांसाठी आणल्याबद्दल धन्यवाद..

असेच म्हणतो. लेखमालेतील लेख वाचायला उत्सुक आहे.

शैलेन्द्र's picture

2 Sep 2019 - 7:49 am | शैलेन्द्र

सुरेख चित्र, नेहमीप्रमाणेच उत्तम सजावट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Sep 2019 - 9:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

-दिलीप बिरुटे

अनिंद्य's picture

2 Sep 2019 - 9:35 am | अनिंद्य

प्रास्ताविक फस्क्लास !
लेखांची वाट पाहतो आहे.
मिपा वर्धापनदिनाच्या आणि गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा.

आदूबाळ's picture

2 Sep 2019 - 9:50 am | आदूबाळ

वा वा! झकास! लेखांची प्रतीक्षा आहे.

पद्मावति's picture

2 Sep 2019 - 10:03 am | पद्मावति

सुंदर प्रास्ताविक. गणपती बाप्पा मोरया.
बॅनर, चित्र, पेज डिझाईन, लेख, सर्व काही अतिशय सुंदर!! +१

उत्कृष्ट रंगसंगती आणि उत्तम प्रस्तावना.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Sep 2019 - 10:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ट्वीट्वीटिवाटची जवाबदारी पेलणार्‍यांचंही कौतुक आणि अभिनंदन.
आपापल्या परीने मिपा वाचकांपर्यंत पोहचवण्याचं मोठं काम.

ग्रेट.

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

2 Sep 2019 - 10:43 am | यशोधरा

अगदी! ट्विटट्विटाट आणि फेसबुक लिंका.

जालिम लोशन's picture

2 Sep 2019 - 10:45 am | जालिम लोशन

मोरया.

जेम्स वांड's picture

2 Sep 2019 - 10:45 am | जेम्स वांड

काय सुंदर अन फ्रेश डिझाईन आहे, सिम्पल प्रकारात चित्रलेला गणपती तर फारच भारी वाटला, पूर्ण टीमला भरपूर शुभेच्छा. लेख वाचण्यास अतिशय उत्सुक

किसन शिंदे's picture

2 Sep 2019 - 1:22 pm | किसन शिंदे

मिपा वर्धापन दिनाच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा !! गलेमाची प्रस्तावना आणि एकुण सजावट उत्कृष्ट झालीये.

मदनबाण's picture

2 Sep 2019 - 5:31 pm | मदनबाण

गणपती बाप्पा मोरया...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रांजण गावाला, गावाला, महागणपती नांदला... :- Kartiki Barge | Unplugged |

जॉनविक्क's picture

2 Sep 2019 - 5:38 pm | जॉनविक्क

_/\_

नाखु's picture

2 Sep 2019 - 9:30 pm | नाखु

आणि विषय मुक्त दोन्हींचा समतोल राखण्यासाठी केलेली मेहनत,परीश्रम आणि चोखंदळ पणा दिसत आहे.

उत्तम लेखमाला,सगळे लेख वाचून त्यात्या मंडळाच्या अभिप्राय पुस्तिकेत नोंद करणार आहेच पण संपादक चमूचे अभिनंदन.

वाचकांचीच पत्रेवाला नाखु

सुधीर कांदळकर's picture

3 Sep 2019 - 6:47 am | सुधीर कांदळकर

सरस्वतीच्या प्रतीकाचा वापर पदकात खुबीने केलेला आहे. आणि १३ च्या आकड्यात पदक बसवण्याची कल्पना अभिनव. या विविध घटकांचे आकारमान जुळवणे अफलातूनच. ज्याच्या/जिच्या मनात हे साकार झाले त्याला तिला सलाम.


एखाद्या मैफलीला हजेरी लावता येत नसेल किंवा पुस्तक प्रदर्शनात हवा तेवढा वेळ रेंगाळता येत नसेल. पण म्हणून त्याच्या आयुष्यातून या गोष्टी हद्दपार होत नाहीत. तंत्रज्ञानाचा वापर करत, त्या 'ऑनलाइन' साजऱ्या होतात. बुद्धीची कास धरत मऱ्हाठी माणूस भावभक्तीत रंगून जातो. महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाची उत्सवप्रियता आणि हौस अनमोल आहे, हेच खरं.


हे एकदम पटले.

अशाच दर्जेदार कन्टेन्टच्या प्रतीक्षेत.

स्वाती दिनेश's picture

3 Sep 2019 - 7:18 pm | स्वाती दिनेश

प्रस्तावना छानच! लेख वाचेन आता एक एक..
सध्या व्यग्र असल्याने जेमतेम पाकृ देऊ शकले.. लेख द्यायचा होता परंतु वेळेअभावी आणि व्यग्रतेमुळे देऊ शकले नाही..
स्वाती

महाराष्ट्रातला माणूस मुळात सण-उत्सव, कला-साहित्य, नाटक, काव्य, मुलाखती यांचा अभिलाषी आहे.

महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाची उत्सवप्रियता आणि हौस अनमोल आहे, हेच खरं.

अगदी, अगदी. गणराय देखणे आहेत.

गणेश उत्सवात लेखमाला हा छान उपक्रम आहे. पुढील उपक्रमांना शुभेच्छा.

तुषार काळभोर's picture

7 Sep 2019 - 6:22 pm | तुषार काळभोर

अजून उत्कृष्ट लेख येत आहेत.
सर्व लेखकांचे आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार!!

जुइ's picture

7 Sep 2019 - 7:31 pm | जुइ

श्रीगणेश लेखमालेसाठी काम करणार्‍या सार्‍यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन!

प्राची अश्विनी's picture

10 Sep 2019 - 7:58 am | प्राची अश्विनी

नेहमी प्रमाणेच देखणी लेखमाला!