h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
}
h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
margin-left:33%
}
p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
}
a: {
color: #990000;
}
a:link {
text-decoration: none;
}
a:hover {
text-decoration: underline;
}
div.chitra {
max-width:500px;
margin: auto;
}
div.chitra1 {
max-width:400px;
margin: auto;
}
div.chitra2 {
max-width:300px;
margin: auto;
}
रुळावल्या आठवणी
रुळावरून गेली गाडी
दूर आठवांच्या गावा
तिथे मायेचा निर्झर
इवल्या स्वप्नांचा थवा
पारिजात अंगणात
गंध ओतत सांडेल
मोहक अबोली
फिक्या जुईशी भांडेल
तिथे कुंकवाची डबी
जास्वंदीत लवंडली
नवी गुलाबाची कळी
लाल होईतो लाजली
माझं बालपण तिथे
खेळताना सापडेल
तिच्या मऊसूत ओल्या
पदरात आढळेल
माझ्या राठल्या केसात
फिरे मायेचा गं हात
सोडे आठवांचा धूर
गाडी दूर दूर जात...
सोडे आठवांचा धूर
गाडी दूर दूर जात...
प्रचि श्रेयनिर्देश: पद्मावति
प्रतिक्रिया
10 Sep 2019 - 7:30 am | यशोधरा
सुरेख!
10 Sep 2019 - 7:34 am | दुर्गविहारी
मस्त.
10 Sep 2019 - 10:30 am | तुषार काळभोर
अतिशय तरल..
10 Sep 2019 - 11:14 am | पद्मावति
सुरेख!
10 Sep 2019 - 6:30 pm | राजाभाउ
मस्त !!!
10 Sep 2019 - 7:10 pm | shashu
10 Sep 2019 - 7:33 pm | सुधीर कांदळकर
कविता. दुसरे आणि तिसरे कडवे आवडले. कुंकू सांडणे आणि गुलाबकळीचे लाजणे लाजबाबच.
धन्यवाद.
10 Sep 2019 - 10:07 pm | जॉनविक्क
चटकन रुळावरल्या आठवणी असे वाचून अत्यन्त धाकधुकीने धागा उघडला होता. पण धागा उघडताच टायटल वेगळेच दिसलं म्हणून एडिट झाले की काय कन्फर्म करायला पुन्हा बॅक फोर्वोर्ड करून पाहिले अन लक्षात आले मी चुकीचे वाचले होते.
कविता छानच
10 Sep 2019 - 11:41 pm | जालिम लोशन
भारी..
25 Sep 2019 - 6:31 pm | महामाया
छान...
26 Sep 2019 - 4:51 pm | आजी
हृदयस्पर्शी कविता.
27 Sep 2019 - 1:05 pm | श्वेता२४
सुरेख कविता