h3 {
font-size: 22px;
font-family: 'mukta', sans-serif;
}
h4 {
font-size: 19px;
font-family: 'mukta', sans-serif;
color:#333333;
}
h6 {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
line-height: 1.5;
text-align: justify;
}
p {
font-size: 18px;
font-family: 'Noto Sans', sans-serif;
text-align: justify;
margin-left:10px;
}
a: {
color: #990000;
}
a:link {
text-decoration: none;
}
a:hover {
text-decoration: underline;
}
div.chitra {
max-width:600px;
margin: auto;
}
अळूच्या वड्या
समस्त मिपाकरांना सुदृढ अन निरोगी आरोग्य लाभो, हीच श्री गणरायाचरणी प्रार्थना.
आताशी घरोघरी, मंडपात बाप्पा विराजमान झाले असतील. पाकगृहात आया-बायकांची लगबग चालू असेल. यजमान बाप्ये मंडळी आरतीच्या तयारीला लागली असतील. तीर्थप्रसाद वाटण्यासाठी पोराटोरांची लुडबुड चालू असेल. एव्हाना उकडीच्या मोदकांचा घमघमाट तुमच्याही नाकापर्यंत पोहोचलाच असेल आणि तो आता येते दहा दिवस येतच राहील. बाप्पांची तर चंगळ आहेच पर्यायाने आपलीही. गोडाधोडाच फारसं अप्रूप नसल्याने माझा ओढा मात्र तिखट-चमचमीत पदार्थांकडे जास्त आहे.
मग काय म्हणता, बाप्पाच्या प्रसादाचा मान नसला, तरी नैवेद्याच्या ताटात हक्काचं स्थान असलेल्या अळूवडीवर एखादा प्रयोग करायचा का? नाही म्हणजे तळणीच्याच करू या, पण आमच्या मातोश्री करतात तशा नारळाच्या दुधातल्या अळूवड्या करू या?
चला तर मग, लागू या तयारीला? जरा सामानाची जुळवाजुळव करून ठेवली की झटपट होतायत बघा.
♦ वडीच्या अळूची पानं किमान ८ ते १०.
गरम मसाल्याच्या वाटणासाठी ▼
♦ १ वाटी सुकं खोबरं + काळीमिरी ८-१० दाणे + खसखस १ चमचा
♦ ४-५ सुक्या लाल मिरच्या + दालचिनी १ ते १.५ इंच हे सगळं कोरडं भाजून.
♦ १ मध्यम कांदा (बारीक उभा चिरून) गुलाबी रंगावर परतून.
सारणासाठी ▼
♦ बेसन २ वाट्या
♦ तांदळाचं पीठ २ चमचे
♦ १/२ चमचा हळद
♦ धणे-जिरे पूड १ चमचा
♦ हिरवं वाटण १-२ चमचे (कोथिंबीर + हिरव्या मिरच्या)
♦ आलं-लसूण पेस्ट १-२ चमचे
♦ लाल तिखट १-२ चमचे
♦ मीठ चवीनुसार.
♦ चिंचगुळाचं पाणी लागेल तसं.
♦ २-३ चमचे मोहन
♦ १ ते १.५ नारळांचं दूध
सर्वप्रथम अळूची पानं स्वच्छ धुऊन कोरडी करून घेऊ. पानांच्या खालच्या बाजूच्या जाड शिरा कापून टाकू आणि त्यावरून लाटणंही फिरवू.
सारणाचं सामान आणि सुकं वाटण एकत्र करून त्यात बेताबेताने चिंचगुळाचं पाणी टाकत पीठ भिजवून घेऊ.
यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घेऊ. साधारण श्रीखंडाची घनता आली पाहिजे, म्हणजे पानं सारवताना सारण ओघळून बाहेर नाही येणार.
अळूचं एक एक पान घेऊन त्यावर वरील सारण नीट सारवून घेऊ. एक उलटं, दुसरं सुलटं असं करत किमान ४-५ पानं सारवू.
नंतर पानांच्या सर्व कडा आतल्या बाजूने मुडपून, त्यालाही थोडं सारण लावू.
आता आतल्या बाजूने वळवून पानांचा लोळ करू. ज्या पात्रात हे लोळ उकडायचे आहेत, त्यात खाली केळीचं पान (न मिळाल्यास एखादं सुती कापड) ठेवून रचू.
कुकरला (शिट्टी न लावता) किंवा इडली पात्रात पाणी ठेवून हे लोळ वाफवून घेऊ. एक-दोन लोळ लगेचच ३-४ मिनिटांत बाहेर काढून घेऊ. ज्या वड्या तळायच्या आहेत, त्या जरा जास्त वेळ वाफवू. (अंदाजे १०-१५ मिनिटं.)
लवकर बाहेर काढलेल्या लोळाचे थोडे मोठे अंदाजे (३/४ इंच जाडीचे) तुकडे करून घेऊ.
एका कढईत नारळाचं दूध घेऊन त्यात चवीपुरतं मीठ टाकून उकळी आणू. नंतर त्यात अळूवड्या सोडून मध्यम आचेवर दूध आटवू. वडीतल्या बेसनाच्या सारणामुळे दूध दाट व्हायला मदत होईलच.
बघा बरं, झाल्या की नाही लगेच नारळाच्या दुधातल्या अळूवड्या! हाय काय आन नाय काय.
आणि हो, बरोबर याही ताटात हव्यातच, नाही का?
प्रतिक्रिया
5 Sep 2019 - 8:13 am | यशोधरा
वा, वा! मस्तच!
बऱ्याच दिवसांनी (की महिन्यां, वर्षांनी?) गंपाची पाककृती पाहून आनंद झाला!
बाप्पा पण खुष होणार!
5 Sep 2019 - 8:16 am | ज्ञानोबाचे पैजार
वेलकम ब्याक गणपाशेठ.
गणेश लेखमाले निमित्ताने का होईना तुम्ही परत एकदा झारा हातात घेतला याचा आनंद झाला.
आता लेखणी आणि झारा खाली ठेवू नका.
पैजारबुवा,
5 Sep 2019 - 8:29 am | प्रचेतस
खूप दिवसांनी, महिन्यांनी, वर्षांनी गणपाची नवी पाककृती वाचायला मिळाली पण सार्थक झालं. अतिशय निगुतीनं केलेली. झक्कास.
5 Sep 2019 - 8:40 am | गवि
वेगळ्याच प्रकारची पाककृती. गणपाशेठच्या लौकिकाला साजेशी. उत्तम आहे. करुन पहिली जाईल.
5 Sep 2019 - 8:47 am | नाखु
दिसतोय हा.
अळुवडीचे सारण जरा हटके,बाकरवडीसारखे दिसतेय नक्कीच आवडेल ह्या पद्धतीने करुन बघायला!
पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु
5 Sep 2019 - 10:03 am | जालिम लोशन
सुदंर
5 Sep 2019 - 11:06 am | पिंगू
या तर शाही अळूवड्या.. घरच्या परसात आयमीन गच्चीत दोनच अळूची पाने असल्याने पुढच्या आठवड्यात हा बेत केला जाईल..
5 Sep 2019 - 11:29 am | प्रशांत
मस्त ...
व्हेज असुनही पाकृ आवडल्या गेली आहे.
आता गणपती नंतर उतारा म्हणुन नॉन व्हेज पाकृ येवु द्या.
- प्रशांत
5 Sep 2019 - 11:32 am | गवि
काय ही तामसी आहाराची इच्छा? गणपती देवा, याला सुधार.. याच्यात सात्विक विचार जागृत कर.
5 Sep 2019 - 11:48 am | यशोधरा
गणेश लेखमालिकेत लेख न दिल्याचे परिमार्जन दिवाळी अंकात लिहून करा, मगच ह्याला सामिष आहार मिळू देत रे बाप्पा!!
5 Sep 2019 - 11:40 am | यश राज
पाककृती आवडली.
अळूवडी म्हणजे जीव की प्राण,पण नारळाच्या दुधातली पाककृती प्रथमच कळली.
करून बघायला हरकत नाही.
5 Sep 2019 - 11:58 am | सुबोध खरे
अळूवडी म्हणजे जीव की प्राण,पण नारळाच्या दुधातली पाककृती प्रथमच कळली.
+१००
5 Sep 2019 - 12:15 pm | पद्मावति
आहा...कातील फोटो आणि रेसेपी.
5 Sep 2019 - 12:20 pm | पियुशा
अह्हाहा !!! गम्पा दादा जिओ ४ चान्द लगा दिये तुमने तो :)
5 Sep 2019 - 12:22 pm | उपेक्षित
अळूवडी म्हणजे जीव की प्राण,पण नारळाच्या दुधातली पाककृती प्रथमच कळली. >>>>> हेच बोलतो
5 Sep 2019 - 1:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अळुवड्या आवडल्या. स्टेप बाय स्टेप ताकलेले फोटो, स्टेप बाय जीवघेणे झाले आहे. पाकृ येऊ देत जा भो. गणेशाकड़े फार मागणे नाही.
चखण्याला कशा लागत असतील अशा वड्या ?
-दिलीप बिरुटे
5 Sep 2019 - 1:52 pm | आजी
नेहमीपेक्षा वेगळीच पाककृती आहे. तपशिलात छायाचित्रांसाहित लिहिल्याबद्दल धन्यवाद.
7 Sep 2019 - 6:53 pm | तुषार काळभोर
वाफवलेल्या वड्या, तळलेल्या वड्या नेहमीच आवडतात.
आता हा नारळाच्या दुधातील अळूवड्या प्रकार पहिल्यांदा पाहतोय.
कुणी करून घातल्या तर आवडेल. ;)
5 Sep 2019 - 6:05 pm | स्वाती दिनेश
फारच छान आहेत रे ह्या नारळाच्या दुधातल्या अळूवड्या.. आणि नेहमीच्या तळणीच्या अळूवड्या तर.. क्या केहने..?
मस्त, मस्त.. दिल खूष!
स्वाती
5 Sep 2019 - 7:39 pm | नूतन सावंत
नारळाचं दूध घालून कोणता पदार्थ छान होत नाही?हा प्रश्नच आहे.या अळूवड्या झकासच झाल्यात,आणि फोटो तर काय गणपाभाऊ, जबरदस्तच आहेत.या मसाल्यात कधी केली नाही अळूवडी,पण नक्की करून पाहीन.
माझ्या साबांचं माहेर डहाणू असल्याने तिथंही नारळाच्या दुधतली अळूवडी करतात पण म्गसाला वेगळा असतो. आणि अळूवडी डायरेक्ट नारळाच्या दुधातच शिजवतात.आता तीही करणे आलेच.
5 Sep 2019 - 7:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
अळूवडी अत्यंत आवडता प्रकार. घरी तळलेल्या अळूवड्या ही नेहमीची गोष्ट आहे. केवळ वाफवलेल्या अळूवड्या फस्त करणे हा आवडता उद्योग आहे. त्यामुळे, मी जागेवर नसलो तर माझ्यासाठी (तळण्यापूर्वी) वाफवलेल्या अळूवड्या बाजूला काढून ठेवल्या जातात. :)
नारळाच्या दुधातल्या अळूवड्या कधी खाल्ल्या नाहीत, पण चवदार प्रकार वाटतोय.
6 Sep 2019 - 7:27 pm | मदनबाण
आहाहा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माझा बाप्पा नाचु लागला... :- (Sanket wadekar)
7 Sep 2019 - 12:03 pm | श्वेता२४
पाककृती आहे. नारळाच्या दुधातली आळूवडी हा प्रकार प्रथमच माहित झाला. सारणही वेगळं आहे. फोटो सुंदरच. करुन बघेन.
14 Sep 2019 - 11:34 am | टर्मीनेटर
इंटरेस्टिंग रेसिपी....नक्की ट्राय करण्यात येईल 👍
20 Jan 2020 - 8:02 am | दीपा माने
मी गणपांच्या पाकृंची नेहेमीच पंखा आहे. आणखीही पाकृ येत रहाव्या. धन्यवाद गणपाजी.
20 Jan 2020 - 5:28 pm | बापू मामा
अळूवडी खावी तर चिंचवड गावात चापेकर चौकातील करमरकर यांच्या रुचिरा स्नँक्स येथेच
20 Jan 2020 - 7:30 pm | प्रचेतस
त्यांची कोथिंबीर वडी पण खूप भारी असते.