बिहार-१.

कलंत्री's picture
कलंत्री in काथ्याकूट
6 Nov 2008 - 8:25 pm
गाभा: 

सध्या बिहार या ना त्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आहे. आजवर बिहारच्या संदर्भात असलेल्या माहितीचे आदान प्रदान व्हावे या हेतुने हा लेख प्रपंच करत आहे. माहितीत त्रुटी असेल तर ती कळविणे / दुरुस्त करणे. (स्वैर विचार मंथन आहे.)

१.भारत आणि पाकिस्तान यात काय साम्य आहे असे जर विचारले तर अनेक साम्यस्थळांपैकी एक साधर्म्य म्हणजे बिहारीची या देशात समान असलेली स्थिती. स्वातंत्र्यपूर्व काळात अंदाजे १० लाख बिहारी मुसलमान पाकिस्तान मध्ये विस्थापित झाले. तेथील स्थानिक जनतेने त्यांना मुजाहिद ( परके) असा ठप्पा लावला आणि पंजाबी, सिंधी, बलुची आणि पठाणी लोकांनी त्याना कधीही आपलेसे केले नाही. आजही त्यांचे वंशज झोपडपट्टीत अत्यंत हलाखिचे जीवन जगत असतात.

भारतात महाराष्ट्राने ( विशेषता) तरुणांनी सध्या त्यांच्या विरुद्ध मोहिम उघडली आहेच, त्याचबरोबर गोवा, दिल्ली आणि वंगवासियांचा त्यांच्या विरुद्ध रोष आहे असे माध्यमाच्या बातम्यावरुन कळते.

२. याचा मागोवा घेतला असता ( १५० वर्षापूर्वी) इंग्रजांनी अनेक संस्थाने जिंकली, खालसा केली. परंतु त्यात्या समाजाचे मात्र त्यांचे स्नेहाचे / आपुलकीचे संबंध राहिले. उदा. मराठे, पंजाबी, बंगाली, मुसलमान प्रजा इत्यादी. त्यांनी या समाजाला आपल्या सैन्यात मानाच्या जागा, प्रशासनात मानाचे हुद्दे दिले. शिक्षणात मदत केली. मात्र त्यांनी बिहारीमाणसाला आपला रामागडी ( बटलर ) चे स्थान दिले. नकळतच सर्वच समाज अजून मागासलेल्या ठिकाणी पोहोचला.

३.१९६० च्या सुमारास ५० वर्षानंतर भारत कोठे असेल याचा आढावा घेण्यासाठी काही चाचण्या, माहिती गोळा करण्यात आली. खनिज संपत्ती, त्या प्रदेशाची माणसे, त्यांच्या विकासाच्या संध्या इत्यादी इत्यादी. त्यात त्या समितीचा असा निष्कर्ष असा होता की बिहार ५० वर्षानंतर अग्रगण्य राज्य असेल, वस्तुस्थिती आपण जाणत आहातच.

४. भ्रष्टाचाराचा जर विचार केलातर सर्वच राज्यात भ्रष्टाचार आहेच. बिहारमध्ये तो आहेच, मग इतर राज्यं मात्र पुढे आहेत आणि बिहाराची अधोगती असे का? बरे बिहार मध्ये देशभक्ती नाही असे म्हणावे तर स्वातंत्र्य आंदोलनात अनेक नेते बिहारचेच होते, उदा. राजेंद्र प्रसाद, जयप्रकाश नारायण, कृपलानी इत्यादी.

इतके असताना बिहार मागे का आणि त्याच बरोबर आपल्या देशात अश्या प्रांतवाद, भाषावाद, वंशवाद या आधारे फुटीची कल्पना पसरत गेली तर आपला एकसंध देश खर्‍या अर्थाने एकसंध राहिल का? एक सुजाण नागरिक म्हणून काय करता येऊ शकते याबद्दलचे माझे विचार पुढच्या लेखात....तो पर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

6 Nov 2008 - 8:28 pm | आजानुकर्ण

मुजाहिद की मुहाजिर?

आपला
(विस्थापित) आजानुकर्ण

पिवळा डांबिस's picture

7 Nov 2008 - 9:43 am | पिवळा डांबिस

आजानुकर्णजी, आपण जाणकार आहांत....
पण आम्हाला वाटतं मुहाजीर.....

(मुहाजरीन, वापस जाओ!!!! या घोषणा होत्या स्थानिक लोकांच्या, सिंधमध्ये....)

विसोबा खेचर's picture

7 Nov 2008 - 10:33 am | विसोबा खेचर

अलिकडच्या काळातल्या सर्फरोश या चित्रपटात नसिरुद्दीन शहाच्या तोंडी हा शब्द ऐकला होता...

तात्या.

छोटा डॉन's picture

7 Nov 2008 - 7:21 pm | छोटा डॉन

च्यायला तुम्ही चेष्टा करता आहात की खरच संभ्रम आहे ???
असो.

मुहाजीर : ज्याची स्वतःची भुमी असुन सुद्धा त्याला परक्याची वागणुक दिली जाते तो , उदा: भारतातुन फाळणीनंतर पाकीस्तानात गेलेले विस्थापीत मुस्लिम.
मुजाहीद : "जेहाद" चा योद्धा, धर्म स्थापनेसाठी व संरक्षणासाठी लढणारा योद्धा ...

सबब, इथे योग्य शब्द " मुहाजीर " ...

स्वगत : च्यायला, ह्यांनी पोपट तर केला नाही माझा ????

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भास्कर केन्डे's picture

6 Nov 2008 - 9:09 pm | भास्कर केन्डे

मात्र त्यांनी बिहारीमाणसाला आपला रामागडी ( बटलर ) चे स्थान दिले. नकळतच सर्वच समाज अजून मागासलेल्या ठिकाणी पोहोचला.
-- म्हणजे बिहारी लोकांचे मागसलेपण हे इंग्रजांमुळे आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का? तसेच देशातल्या इतर भागांची प्रगती इंग्रजांच्या मदतीने झाली आहे असा अर्थ पण यातून निघतो. आपल्याला तसे म्हणायचे आहे का?

असा निष्कर्ष असा होता की बिहार ५० वर्षानंतर अग्रगण्य राज्य असेल
-- हे मत आपल्या वरील मताशी थोडेसे विसंगत आहे असे वाटते. बिहार तेथील स्थानिक नेत्यांच्या भ्रष्टपणाच्या, स्वार्थाच्या तसेच गुंडगिरीच्या टोकाला जाण्याच्या प्रकारामुळे मागासला आहे.

अवांतर - स्वातंत्र्य मिळण्याच्या काळात ब्रम्हदेशाबद्दलही असेच निष्कर्ष काढले गेले होते. तेथे असलेली खनिज संपत्ती, पर्जन्यप्रमाण, रेल्वे यंत्रणा, वगैरे यात तो प्रदेश भारतापेक्षा सरस होता. आज काय आहे हे ही आपण जाणताच. ब्रम्हदेशाचे उदाहरण यासाठी घेतले की तो प्रदेश सुद्धा अगोदर ब्रिटिश इंडियाचा भाग होता, त्यांची संस्कृती सुद्धा आपल्याशी साधर्म्य साधते व त्यांना सुद्धा आपल्या सुमारासच स्वातंत्र्य मिळाले.

आपला,
(कष्टवादी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

कलंत्री's picture

6 Nov 2008 - 9:23 pm | कलंत्री

भास्कर राव,

आपला लेख मला पुढील लेख लिहण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. माझ्यामते महाराष्ट्राच्या प्रगतीमागे दोन/ तीन घटना सांगायला हव्यात.

१.१८४२ च्या सुमारास इंग्लंड मध्ये पहिली रेल्वे धावली. ही बातमी मुंबईच्या विद्वानांना समजताच त्यांनी त्यांच्या ब्रिटीश मित्रांपाशी / आधिकार्‍यापाशी भारतात सुद्धा असाच प्रयोग व्हावा असा लकडा लावला. १८५३ मध्ये मुंबई - ठाणे - मुंबई अशी रेल्वे धावायला लागली.
२.समाजाच्या प्रगतीसाठी अर्थव्यवस्था बळकट असायला हवी या विचारातुन बॅक ऑफ महाराष्ट्राचा जन्म झाला. या बॅकेंचा जन्मदाता तसा मध्यमवर्गीयच होता.
३. साने गुरुजी यांचा असा आग्रह असायचा की जगातील सर्वच विचारधन मराठी यायलाच हवे. त्यामुळे इतर भाषेच्या मधील लोककथा, कल्पना, विचार ते मराठीत आणण्यासाठी धडपडत असत.

असा प्रयत्न, दृष्टी, द्रष्टेपण इतर किती प्रांतीयामध्ये असु शकतो?

द्वारकानाथ कलंत्री

स्वामि's picture

6 Nov 2008 - 9:28 pm | स्वामि

कोणत्याही भागाचा विकास हा त्या ठीकाणच्या माणसांवर ,त्यांच्या मनोव्रुत्तीवर अवलंबून असतो.मग महाराष्ट्रात राहूनही विदर्भ मराठवाडा मागासलेलाच आहे ना.

कलंत्री's picture

6 Nov 2008 - 9:38 pm | कलंत्री

सध्या बिहार कसा मागासलेला आहे, भिकारी आहे, कसा भ्रष्टाचारी आहे यावरच चर्चा करावयाची आहे. अश्या विचारामध्येही एक झिंग असते. मुंबईचा विकास आहे ना मग मराठावाडा, विदर्भ मागे आहे तर काय झाले? पुण्यात २४ तास वीज आहे ना मग एखाद्या खेड्यात आपला शेतकरी बंधु वीज नसल्यामुळे आपल्या पिकांना पाणी देऊ शकत नसेल तर काय झाले? पुण्यामुंबईला जलक्रिडाकेंद्र आहेना मग मराठवाड्यात काही ठिकाणी २० दिवस पाणीपुरवठा नसतो याचा विचार करायचा नाही.

ढोल, गवार, शुद्र और नारी ताडन के हे सब आधिकारी, यात बिहारी शब्द टाकायला हवा असाही काहींचा आग्रह आहे असे ऐकतो मी सध्या.

कपिल काळे's picture

6 Nov 2008 - 10:20 pm | कपिल काळे

ज्यावेळी मुक्त अर्थव्यवस्थेचे वारे भारतात वाहू लागले , तेव्हा महाराष्ट्र, गुजरात सारख्या राज्यांमध्ये बरीच गुंतवणूक आली. १९६६ मध्ये शिवसेना स्थापन झाली , ती " उठाव लुंगी, बजाव पुंगी" ह्या दाक्षिणात्य विरोधी भुमिकेतून्च. परंतु अर्थव्यवस्थेत झालेल्य सुधारणांनंतर दक्षिणेकडील राज्यांचाही विकास झाला. त्यामुळे आता फारसे दाक्षिणात्य मुंबईत येत नाहित. परंतु बिहारी अजुनही येतात, ते का?

मुक्त अर्थव्यवस्थेचे वारे भारतात वाहू लागले तेव्हाचे लालू, नंतर राबडीरुपातील लालू, नंतर स्वतंत्रपणे निवडून आलेला लालू, ह्या "शासना" मुळे बिहारचा विकास झाला नाही.( लालू सत्ता हे बिहारींना मिळालेले शासन होते/ आहे."पिपल गेट द गव्हर्नमेंट , दे डिझर्व्ह.")

झारखंड हे राज्य बिहारमधून वेगळे काढल्यावर तर कोळश्याच्या आणि लोह- खनिजाच्या खाणि झारखंडात गेल्या. त्यावर आधारित रोजगार देणारे उद्योग झारखंडला गेले. उदा. टाटा स्टील व इतर खाण उद्योग.
झारखंड राज्याची निर्मिती ही उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी होती.

बिहारकडे आता काहीच उरले नाही. त्यात रणबीर सेना वगैरेंच्या भितीमुळे नवीन उद्योग स्थापन होत नाहीत.

चारा घोटाळा करुनही लालूंचे पोट भरत नाही ( घर मे रबडी होते हुए, लल्लू घास खाने क्यो गया?). नेपाळात झालेल्या धरणांमुळे , त्यातील जादा पाणी सोडून दिले की, कोसी नदी वारंवार पूर आणते त्यामुळे जनजीवन स्थीर नाही. अश्या नानाविध प्रश्नांनी बिहार गांजला आहे.

यावर उपाय कोणता? तो प्रश्न आहे.

परंतु येउ घातलेल्या निवडणुकांमध्ये विकासाचा मुद्दा न मांडता लल्लू व इतर बिहारी नेते, बिहारींवरच्या अन्याय, अत्याचाराचा हुकुमी पत्ता टाकतील. आर्.आर. आबांनी " गोली का जबाब गोली से" असे वक्तव्य करुन ह्या बिहारी नेत्यांना अफूची गोळी रेडिमेड उपलब्ध करुन दिली आहे. ती गोळी, आधीच विकासवंचित सुन्न बिहारी जनतेला दिली जाइल, मग ती जनता पूर्ण बेशुद्ध होइल.

हे असेच चालू राहिल.

http://kalekapil.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

7 Nov 2008 - 8:39 am | विसोबा खेचर

बिहार हे राज्यच राईट ऑफ करायला पाहिजे! दुसरं काही नाही! :)

आपला,
(अकाउंटन्ट) तात्या.

मुक्तसुनीत's picture

7 Nov 2008 - 8:43 pm | मुक्तसुनीत

बिहार वरचा एक विनोद :

एके दिवशीची वर्तमानपत्रातली सर्वात मोठी बातमी :

"बिहार पाकिस्तानाला दान करण्यात आला आहे. या घटनेमुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे जीवनमान आणि साक्षरता या गोष्टी ५०% वर गेल्या !"
(कृ. ह. घ्या.)

शक्तिमान's picture

16 Dec 2008 - 12:02 pm | शक्तिमान

सॉलीड विनोद आहे राव.......

वासुनाना आले's picture

7 Nov 2008 - 9:53 am | वासुनाना आले

बिहार हे राज्यच राईट ऑफ करायला पाहिजे! दुसरं काही नाही!
काय फायदा तात्या हे राज्य राईट ऑफ करुन कारण गजकर्णी (राजकारणी) तेच राहणार आहेत ना
तात्या साला एकदा ह्यांचाच गेम झाला पाहीजे

आपला,
(राजकारण द्वेशी )वासुनाना

विजुभाऊ's picture

7 Nov 2008 - 10:22 am | विजुभाऊ

भारतात बरेचसे आय ए एस अधिकारी बिहारी आहेत.
तरिही बीहारमध्य गरीबी जास्त आहे.
शिक्षणाच्चा अभाव हेमुख्य कारण.
झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

विद्यापीठे तक्षशिला व नांलदा बिहार मध्ये होती हे सांगायला देखिल लाज वाटते.जगप्रसिध्द गुप्त राजघराणे,सम्राट हर्षवर्धन ,सम्राट अशोक इ. महान शासकानी बिहार वर राज्य केले. हे देखिल आजची परिस्थिती पाहुन पटायला जड जाते.जातीपाती नष्ट करण्यासाठी बौध्दधर्माची स्थापना देखिल बिहार मध्ये झाली होती.तेच आज देशभरात जातीपातीचे राजकारण करण्यात धन्यता मानत आहेत.इतिहास जरी गौरवशाली असला तरी त्याचा वारसा जपणारे तितकेच समर्थ हवेत. जर असे नसेल तर त्याची दुरावस्था बिहार सारखी होते.
फक्त राज ठाकरेला दोष देउन ह्या राजकारण्याना परत बिहार मध्ये राज्य करण्याची संधी मिळेल,पंरतु बिहारची भावी पिढी ह्याना माफ करणार नाही. त्यासाठीच ज्याना राज ठाकरेचे विचार पटले त्या बिहारयानी पाटन्यात राज ठाकरे फॅन क्लब स्थापन केला आहे. स्वःताचा,समाजाचा विकास घडवला तर इतराच्या वर बिहारला अंवलबुन राहावे लागणार नाही हे काही बिहारयाना पटले ह्यातच राज ठाकरे ह्याच्या आंदोलनाचे यश आहे.
वेताळ

गणा मास्तर's picture

7 Nov 2008 - 11:39 am | गणा मास्तर

एक विनोद
एकदा लालुप्रसाद यादवांनी निवडणुकीत आश्वासन दिले की जर ते निवडुन आले तर ते काश्मीर प्रश्न चुटकीत सोडुन दाखवतील.
झाले लोकसभेत प्रचंड बहुमत मिळवुन लालु पंतप्रधान बनतात. मग ते पाकिस्तानच्या परवेझ मुशरर्फला चर्चेसाठी बोलावतात.
लालु स्वतः चर्चेला जात नाहीत, म्हणतात 'पहले हमारे मिनिस्टरवा जायेंगे'. मंत्री जाउन खुप वेळ होतो, काही तोडगा निघत नाही.
मग लोकांच्या आग्रहानंतर लालु आत जातात आणि पाचच मिनिटांत लालु आणी मुशरर्फ गळ्यात गळे घालुन बाहेर येतात.
मुशरर्फ म्हणतो ' कश्मीर तो हिन्दुस्थानका था, हिन्दुस्थानका है और हिन्दुस्थानका रहेगा'. लोकांना कळत नाही लालुंनी काय जादु केली.
पत्रकार लालुंना विचारतात काय जादु केलीत तर लालु म्हणतात ' हमने मुशरर्फसाहब को कहा इ कश्मीर तो आप रखलो साथमे बिहार फ्री लेलो'.

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

आजानुकर्ण's picture

7 Nov 2008 - 7:43 pm | आजानुकर्ण

१दा नेपाळचे १ मंत्री आणि प्रमोद नवलकर (तेव्हा ते शिवसेनेच्या मंत्रींमंडळात मंत्री होते. आता गेलेत बिचारे. ईश्वर आत्म्याला शांती देवो. आमेन!) विमानातून प्रवास करत होते.

नवलकर जात्याच बोलके. त्यांनी गप्पा सुरू केल्या.

'जय महाराष्ट्र! मी नवलकर, महाराष्ट्राचा सांस्कृतिक मंत्री.'

नेपाळच्या मंत्र्यानेही 'जय नेपाळ' करून सांगितले की तो नेपाळचा नेव्ही मिनिष्टर आहे.

नवलकर हुशार. ते म्हणाले 'अंमळ च्युत्त्यात काढता काय मला. नेपाळला समुद्र कुठाय? मग नेव्ही मिनिष्टर कसा काय आला? आम्ही कोकणातले असलो तरी अलिबागवरून आलेलो नाही'

नेपाळचा मंत्री म्हणाला, जर महाराष्ट्राला सांस्कृतिक मंत्री असू शकतो तर नेपाळला नेव्ही मिनिष्टर का असू नये? ;)

असो.
आपला,
(विनोदी) आजानुकर्ण

झकासराव's picture

7 Nov 2008 - 12:07 pm | झकासराव

माझ्या एका बिहारी कलिगच मत अस आहे की लालु जर परत सत्तेवर आला तर उरल्यासुरल्या आशा संपुष्टात येतील.
जर परत नितिशकुमार आला तर ठिक आहे. थोडफार सुधारणा सुरु आहेत अस त्याच मत आहे.
आता झारखंड तर गेला वेगळा होउन. सगळी खनिज संपत्ती गेली तिकडे. आता बिहारचा विकास करायचाच झाला तरी त्याचा वेग कमीच असेल.

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

अभिरत भिरभि-या's picture

7 Nov 2008 - 5:40 pm | अभिरत भिरभि-या

या संबंधीचे एक सुरेख विवेचन येथे वाचायला मिळेल.
http://www.manogat.com/node/2839

विसोबा खेचर's picture

7 Nov 2008 - 5:57 pm | विसोबा खेचर

मिपावरही आजपर्यंत अनेक समाजिक, राजकीय विषयांवर खूप चांगल्या चर्चा झालेल्या आहेत. कधी एखाद्या प्रसंगाच्या निमित्ताने, विषयाच्या निमित्ताने मिपावरीलही एखाद्या चर्चेचा दुवा जर मनोगतावर देता आला तर तो मराठी आंतरजालाकरता सुदिन असेल! :)

विषयांतराबद्दल क्षमस्व...

आपला,
(दिलदार!) तात्या.

कलंत्री's picture

7 Nov 2008 - 7:38 pm | कलंत्री

तसे होईलच. आपण शुद्ध १०० % आणि काळाच्या ओघात टिकणारे तत्वज्ञान सांगत आहोत. ज्ञानेश्वर ( विश्वची माझे घर) तुकारामाचा ( न घडो मत्सर कोणाही जीवाचा हेच वर्म सर्वेश्वर पुजनाचे) हाच आपला आधार आहे.

इनोबा म्हणे's picture

7 Nov 2008 - 11:20 pm | इनोबा म्हणे

मराठा तितूका मेळवावा | महाराष्ट्र धर्म वाढवावा

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

पाषाणभेद's picture

16 Dec 2008 - 1:54 am | पाषाणभेद

कोणता बिहारी/ व्रुत्तपत्र असा लेख महाराष्ट्राबद्दल लिहू शकेल? मोठा प्रर्‍श्न आहे.
आपण मराठी लोक उगीच (च) ईतर राज्यांबद्दल विचार करतो.
जय महाराष्ट्र !
-( सणकी )पाषाणभेद