अमेरिकेत सारे कांही शक्य आहे ?

आनंद घारे's picture
आनंद घारे in काथ्याकूट
5 Nov 2008 - 10:47 pm
गाभा: 

मी अमेरिकेत आलो तेंव्हा इथे होऊ घातलेल्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली होती. पण अमेरिकेत भ्रमण करतांना रस्त्यात कोठेही मोठी छायाचित्रे असलेले अवाढव्य फलक दिसले नाहीत की कोठेही ध्वनीवर्धकांचा कर्कश गोंगाट ऐकू आला नाही. न्यूयॉर्क आणि शिकागोसारख्या महानगरांमधल्या मोठ्या मैदानात किंवा इतर शहरांमधल्या मोठ्या सभागृहांमध्ये प्रचाराच्या सभा होत असत आणि त्याचे वृत्तांत टी.व्ही.वर दाखवत होते. त्याखेरीज टी.व्हीवरील कांही चॅनेल्सवर निवडणुकीनिमित्य सतत कांही ना कार्यक्रम चालले असायचे. आजकाल इकडे प्रचाराचा सर्वाधिक भर बहुधा टी.व्ही.वरच होत असावा. ओबामा आणि सिनेटर मॅकेन यांच्या वेगवेगळ्या तसेच अमोरासमोर बसून घेतलेल्या मुलाखतीसुध्दा झाल्या.

येथील लोकांच्या स्थानिक समस्यांशी माझे कांहीच देणे घेणे नसल्यामुळे मी जास्त खोलात जाण्याचा प्रयत्न कधी केला नाही, पण त्यांच्या बोलण्याचा थोडा एकंदर अंदाज येत होता. प्रेसिडेंट बुश यांच्या कारकीर्दीत झालेल्या गैरव्यवहारामुळे आज अमेरिका आर्थिक संकटात सापडली आहे असाच येथील सर्वसामान्य जनतेचा समज आहे. पण त्याचे फार मोठे भांडवल करण्याचा मोह टाळून, "प्राप्त परिस्थितीतून बाहेर येऊन पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करण्याची अमेरिकन जनतेला गरज आहे आणि आपण सर्वांनी मिळून ते करायचे आहे. " असे प्रतिपादन ओबामा करायचे. त्यासाठी करण्याच्या उपाययोजनांचे सूतोवाच ते आपल्या भाषणात करत. मॅकेन यांनी मात्र ओबामांच्या भाषणावर आसूड ओढण्याचेच काम मुख्यतः केले. मॅकेन यांच्या भाषणात जेवढा ओबामाचा उल्लेख मला आढळला तेवढा मॅकेन यांच्या नांवाचा उल्लेख ओबामांच्या भाषणात मला तरी जाणवला नाही. "ओबामा जे सांगताहेत ते ते कसे काय करणार आहेत?" असा सवाल मॅकेन हे नेहमी करायचे. त्यावर एक मंद स्मित करून "अमेरिकेत सारे कांही शक्य आहे" असे ओबामा सांगायचे.

ओबामा हे मिश्र वंशाचे आहेत याचा जेवढा गवगवा प्रसारमाध्यमांनी केला तेवढाच त्याचा अनुल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. "मी सर्व अमेरिकन जनतेचा प्रतिनिधी आहे." असेच ते नेहमी सांगत आले. त्यांनी विचारपूर्वक घेतलेल्या या धोरणाचा त्यांना चांगला फायदा झाला असे दिसते. एकजात सर्व गौरेतरांचा भरघोस पाठिंबा त्यांना मिळालाच, पण सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे असंतुष्ट असलेले बहुसंख्य गौरवर्णीय त्यांच्या बाजूला आले. त्यामुळेच ते प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत.

निवडणूक जिंकल्यानंतर लगेच केलेल्या भाषणाची सुरुवात श्री. ओबामा यांनी या शब्दात केली.
"If there is anyone out there who still doubts that America is a place where all things are possible; who still wonders if the dream of our founders is alive in our time; who still questions the power of our democracy, tonight is your answer."

"अमेरिका ही अशी जागा आहे की जिथे सारे कांही शक्य आहे, याबद्दल जर अजूनही कोणाच्या मनात शंका असेल, आपल्या पूर्वजांची स्वप्ने आजही जीवंत आहेत कां असा विचार कोणाच्या मनात येत असेल, लोकशाहीच्या सामर्थ्याबद्दल कोणाला प्रश्न पडला असेल, तर आज त्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळाली आहेत. " या शब्दात सिनेटर बरॅक ओबामा यांनी आपल्या विजयाचा स्वीकार केला. खरोखरच ज्या गोष्टीची कल्पनाही दोन वर्षापूर्वी कोणी केली नसती ती आज शक्य झाली आहे आणि त्याचे सर्व श्रेय ओबामा यांनी अमेरिकेच्या जनतेला दिले आहे. यात विनयाचा भाग किती आणि कृतज्ञतेची प्रामाणिक भावना किती असा प्रश्न कोणाला पडेल. पण ज्या आत्मविश्वासाने ओबामा यांनी आपली कँपेन चालवली होती त्याबद्दल इथे आलेल्या दिवसापासून मला त्यांचे कौतुक वाटत होते.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

5 Nov 2008 - 11:25 pm | विसोबा खेचर

आजपर्यंत सतत पाकिसानला आणि भारतात होणार्‍या पाकिस्तानी दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या भारतद्वेष्ट्या अमेरीकेचं आम्हाला काडीचंही कवतिक नाही..!

तात्या.

विकास's picture

6 Nov 2008 - 12:04 am | विकास

आजपर्यंत सतत पाकिसानला आणि भारतात होणार्‍या पाकिस्तानी दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या भारतद्वेष्ट्या अमेरीकेचं आम्हाला काडीचंही कवतिक नाही..!

खतपाणी बाहेरून घातले जात नाही तर आतूनच घातले जाते. आपलच नाणं खोटं (नेतृत्व - सर्वपक्षीय!) म्हणून बाहेरच्यांचे चालते... भारतात काड्या करणारी मग ती कधी अमेरिका असोत तर कधी रशिया किंवा टाटाच्या जागेत सिंगूरला कॉमी बांधवांच्या पायघड्यांवरून येत असलेले चिनी...

तरी देखील एक गोष्ट अनुभावने नक्कीच शिकलो आणि ते म्हणजे, हा देश आणि यातील शहाणे देशवासीय (सगळे शहाणे नाहीत) हे दुसर्‍यांच्या अनुभवाकडून शिकताना कमीपणा वाटून घेत नाहीत...दुसर्‍यांच्या ज्ञानाचा स्वतःसाठी उपयोग करून घेयला कमीपणा वाटून घेत नाहीत... त्याच्या जोरावर किंबहूना मोठेच झालेत!

कौतूक वाटणारी माणसे आणि प्रसंग हे जगभर येत असतात आणि जातही असतात... ते पहाताना, अनुभवताना, त्या घडणार्‍या इतिहासात रहाताना, तेव्हढ्यापुरते कौतुक/appreciation करणे यातून आपणपण काही धडे घेऊ शकतो असे वाटते. त्यात त्या संदर्भात बाकी राष्ट्र, आंतर्राष्ट्रीय राजकारण वगैरे येण्याचा प्रश्न उद्भवू नये असे वाटते. (दूध का दूध और पानी का पानी)

या संदर्भातून आज ओबामाचा विजय आणि त्याचे त्यानंतरचे केलेले संयमी भाषण नक्कीच चांगले आहे आणि म्हणून त्याच्याकडून बर्‍याच आशा आहेत. जे अमेरिकेत घडते त्याचे परीणाम आजच्या काळात तरी सार्‍या जगावर घडतात ही कितीही आवडली नाही तरी वस्तुस्थिती आहे. (हेच पहाना: SENSEX - 10,120.0, -511.11, -4.81%). उद्या जर त्याने क्लिंटनला काश्मिरसाठी मध्यस्थीला पाठवले तर त्याला जो विरोध करायचा आहे तो करायचाच... (पण आधी पाहूया तसे तो खरेच करेल का ते :-) )

खुसपट's picture

14 Nov 2008 - 11:45 pm | खुसपट

भारतातून अमेरीकेत गेलेल्या आणि स्वतःचे कर्तृत्व अनेक क्षेत्रात सिद्ध केलेल्या भारतियांचे कौतुक तरी वाटेल ना? अमेरीकेत बुद्धीवंतांना जे स्वातंत्र्य मिळाले त्यामुळेच ती ईतर देशांपेक्षा वेगळी ठरली. ही गोष्ट नाकारता येण्यासारखी नाही. मलाही अमेरीकन लोकांचे कौतुक नाही.

(१००% भारतीय ) खुसपट

आनंद घारे's picture

5 Nov 2008 - 11:56 pm | आनंद घारे

या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पाकिस्तानाबद्दल वाईट मत असलेले पण मेहदी हसन आणि गुलाम अली वगैरे कलाकारांचे असंख्य चाहते भारतात आहेत. त्याचप्रमाणे आपल्या लतादीदींचे चाहते पाकिस्तानातसुद्धा आहेत. 'भारतद्वेष'' हा कांही अमेरिकेतील सर्व जनतेचा स्थायी भाव नाही, तो त्याच्या सरकारच्या परराष्ट्रधोरणाचा भाग होता. उद्या कदाचित तो बदलेल किंवा वाढेलसुद्धा. अमेरिकन सरकारच्या भूतकाळातल्या धोरणासाठी बरॅक ओबामा यांना जबाबदार धरता येणार नाही . त्यांच्यात कांही चांगले गुण दिसले तर त्याला चांगले म्हंटल्याने कांही बिघडत नाही असे मला वाटते.
"अमेरिकेत सारे कांही शक्य आहे." असा बरॅक ओबामा यांचा विश्वास आहे आणि एका बाबतीत तो खरा ठरला एवढेच मला म्हणायचे आहे. यात अमेरिकेचे कौतुक करण्याचा हेतू नव्हता. हे स्पष्ट करण्यासाठी मी मथळ्यामध्ये एक प्रश्नचिन्ह (?) जोडले आहे.

विकास's picture

6 Nov 2008 - 12:14 am | विकास

"अमेरिकेत सारे कांही शक्य आहे." असा बरॅक ओबामा यांचा विश्वास आहे आणि एका बाबतीत तो खरा ठरला एवढेच मला म्हणायचे आहे. यात अमेरिकेचे कौतुक करण्याचा हेतू नव्हता. हे स्पष्ट करण्यासाठी मी मथळ्यामध्ये एक प्रश्नचिन्ह (?) जोडले आहे.

अमेरिकेत जे आज शक्य आहे असे वाटले ते भारतात आधीच झालेले आहे. जातीयभेद असून देखील घटना लिहायला आंबेडकरांना मानायला आणि त्यानंतर कायम "घटनेचे शिल्पकार" म्हणताना कुठे कुणाला काही चुकीचे/कमी वाटले नाही. तिथपासून, राजकीय पटलावर अनेक असे चमत्कार घडले - स्त्री पंतप्रधान, स्त्री राष्ट्रपती, अल्पसंख्य पंतप्रधान, अल्पसंख्य राष्ट्रपती (ते तर बरेच झालेत), दलीत राष्ट्रपती, अनेक अल्पसंख्य/स्त्री/दलीत आदी मुख्यमंत्री, मंत्री आणि वरीष्ठ. अब्दुल कलामांना एका भटजीकडून बर्‍याच बाबतीत शिक्षण मिळाले आणि अतिसामान्य व्यक्ती राष्ट्रपतीपदापर्यंत पोचली.

अर्थात म्हणून ओबामाच्या घटनेचे महत्व आणि मुल्य कमी नाही आहे....पण जसे जगातील मोठ्या लोकशाही असलेल्या अमेरिकेत हे घडू शकते तसेच जगातील लोकसंख्येने सर्वात मोठ्या असलेल्या भारतात पण असे घडते इतकेच म्हणत आहे.

भास्कर केन्डे's picture

6 Nov 2008 - 12:39 am | भास्कर केन्डे

श्री विकास यांच्या दोन्ही प्रतिसादांशी सहमत.

तात्या,
कौतुक कराच असे कोणी म्हणत नाहीये. पण ज्या चांगल्या गोष्टी त्यांच्यात आहेत त्या आपण स्विकारायाला लाजायची काय गरज? आता हेच पहा ना. आपल्याकडे एक सरकार जाऊन दुसरे आले की पहिल्या सरकारमधले कधी जेलमध्ये जातील काही सांगता येत नाही. आठवा जयललिता-करुणानिधी आखाडा. कमीत कमी जे अगोदरच्यांनी केले ते नष्ट करने हे तर आपल्याकडे निवडणुका संपल्यावरचे ब्रिदवाक्य. जसे की सेना-भाजपाने सुरु केलेल्या झुनका भाकर केंद्राचे झाले. पडत्या काळात आम्ही आधार घेतला आहे दोन वेळच्या जेवनासाठी त्या केंद्रांमध्ये. तेथे भ्रष्टाचार होतो या सबबीखाली त्यानंतर आलेल्या काँग्रेसी सरकारने ती सगळी केंद्रे बंद केली. त्यातला भ्रष्टाचार कमी करुन गरिबांना अजून दिलासा का नाही दिला? असे हे सुडाचे राजकारण अमेरिकेत होताना दिसत नाही. ओबामा म्हणतो आहे की तो विरोधी पक्षाला सोबत घेऊन त्याचे सरकार बनवणार. ही चांगली बाब आपणही घेतली तर बिघडले कुठे? आपली लोकशाही तरी कुठे परिपक्व आहे... खूप आंतर काटायचे आहे आपल्याला सुद्धा. नव्हे का?

आपला,
(मन आणि डोळे बंद न केलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.

मराठी_माणूस's picture

6 Nov 2008 - 8:39 am | मराठी_माणूस

'भारतद्वेष'' हा कांही अमेरिकेतील सर्व जनतेचा स्थायी भाव नाही, तो त्याच्या सरकारच्या परराष्ट्रधोरणाचा भाग होता.

दुसर्‍या राष्ट्राचा द्वेष हा परराष्ट्रधोरणाचा भाग कसा काय असु शकतो ?

खुसपट's picture

14 Nov 2008 - 11:50 pm | खुसपट

राजकीय गुगली, खरा कल व कृती कळू नये म्हणून !

चायनामन टाकणारा खुसपट

भाग्यश्री's picture

6 Nov 2008 - 12:03 am | भाग्यश्री

येस, त्यानी भाषण सहीच केलं. वक्तृत्व चांगलंच आहे..

पण हे अमेरीकेमधे जरा उशीरा शक्य झालंय.. हिलरी आणि ओबामा उभ राहीले तेव्हा , एक बाई आणि एक न-गोरा उभा राहील्याने अमेरिकेला(प्रगत राष्ट्राला) एकदमच फार बदलाला सामोरे जावे लागले.
आपल्याकडे(प्रगतशील देश) किंवा इतरही राष्ट्रात कधीच स्त्री पंतप्रधान्/राष्ट्रपती व मायनॉरिटीमधला राष्ट्रपती आले आहेत.. त्यामुळे या विरोधाभासाची थोडी मजा वाटली. :)

पण तरीही बरं वाटलं ओबामा आलेला पाहून.. बुशच्या नालायक धोरणांमुळे(होती का काही धोरणं?) एकंदरीतच फार नुकसान झालंय. ओबामा इराक युद्धाच्याही विरोधात आहे. निदान विचारांनी तो चांगला वाटतो. उद्या कृती काय करतो ते पाहायचे..

सुक्या's picture

6 Nov 2008 - 12:30 am | सुक्या

अमेरिकेत सारे कांही शक्य आहे -- चूक
भारतात सारे कांही शक्य आहे.

भारतात लालु, पास्वान, मायवती, शिबु सोरेन असे लायकी नसलेले लोक मंत्री आहेत. इथे अशा लोकांना झाडु मारायला पन ठेवनार नाहीत.
भारतात सारे सरकारी कर्मचारी बाजारातल्या भाजीपाल्यासारखे भाव लावुन लाच मागतात. लाच देनारेही देतात. भ्रष्टाचार मला इथे इतका दिसला नाही. सरकारी कर्मचारी काम कर्म म्हनुन करतात भारतात ते उपकार म्हनुन करतात.

बर्‍याच गोष्टी आहेत ज्या अमेरिकेकडुन शिकण्यासारख्या आहेत. आम्ही फक्त नको ते घेतो चांगले ते सोडतो.

ओबामा निवडुन आल्यावर जरा बरं वाटलं. त्याचे काही प्लन चांगले आहेत. त्यामुळेच (अन बुश च्या युद्धधार्जिन्या नितीला कंटाळुन) लोकांनी अश्वेत प्रेसिडेंट ला मते दिली.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

पिवळा डांबिस's picture

6 Nov 2008 - 4:05 am | पिवळा डांबिस

ओबामा निवडुन आल्यावर जरा बरं वाटलं. त्याचे काही प्लन चांगले आहेत.
आरं पन त्ये प्लान पार पाडन्यासाटी त्यो इन्कमटॅक्स वाहाढवनार हाये, त्येचं काय?
:(

सुक्या's picture

6 Nov 2008 - 5:12 am | सुक्या

त्याचे काही प्लॅन (जमलं की लिवायला) इन्कमटॅक्स वाढवनारे आहेत, काही आउटसोर्सिंग कमी करनारे आहेत. आउटसोर्सिंग वर चालनार्‍या भारतीय कंपण्यांसाठी ही चांगली गोष्ट नाही परंतु इथे टॅक्स मधे जानारा सारा (कमीत कमी ८०%) तर कामांसाठी वापरला जातो. आनी टॅक्स असतो ८ ते १० टक्के. भारतातही आम्ही देतच होतो ना टॅक्स. तो ही घसघशीत ३३ टक्के. सगळाच जातो गटारात. एक तर माजलेल्या सरकारी कर्मचार्‍यांना अन पोट सुटलेल्या नेते लोकांच्या खिशात. बुश ने केलेली घाण साफ करायला वेळ लागेलच. बजेट एकदा सरप्लस मधे आलं की आपोआपच टॅक्स कमी करतील.

ईथल्या चांगल्या इकानामी चा भारताला पन फायदा होइलच हो. हथली इकानामी बोंबलली तर सारीच इकानामी बोंबलती बगा.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

पिवळा डांबिस's picture

6 Nov 2008 - 8:56 am | पिवळा डांबिस

परंतु इथे टॅक्स मधे जानारा सारा (कमीत कमी ८०%) तर कामांसाठी वापरला जातो.
सहमत!!!
आनी टॅक्स असतो ८ ते १० टक्के.
काय राव कुठच्या गावात रहाता? आमी पण रहायला येतो की तुमच्या गावात!!!!:)

मजं म्हन्नं आसं की ह्यो आदीच टॅक्स वाडावनार!! आनी त्यात आत्ताच्या इकोनोमीची कंडिशन लक्षात घेतली तर त्याचे प्लान तरी राबवनार न्हाई किंवा डेफिसिट वाडवनार!!
खरं का नाय?

एकलव्य's picture

6 Nov 2008 - 9:13 am | एकलव्य

परंतु इथे टॅक्स मधे जानारा सारा (कमीत कमी ८०%) तर कामांसाठी वापरला जातो.
काय म्हणता? डेफिसिटस् पहा, युद्धावरचा आणि वॉलस्ट्रीटवरचा खर्च पहा. ८०% कसले धरून बसला आहात ८००%ची नासाडी झालेली दिसेल. (अतिश्योक्ति अलंकार आहे... भावार्थ समजून घ्या, शब्दशः पकडू नका!)

आनी टॅक्स असतो ८ ते १० टक्के.

> काय राव कुठच्या गावात रहाता? आमी पण रहायला येतो की तुमच्या गावात!!!!

आम्हीपण येतो पहिल्या गाडीने.

अमेरिकेत काहीही होऊ शकते हे मात्र खरे!
लालू, सोरेन फिके पडतील असा बुश होऊन गेला ना राव? पलिनकडे बघा भ्रष्ट्राचार येथे नसतो असे म्हणण्याचे धाडस होणार नाही. चेनी पाहला तर भलेभले भ्रष्ट्रासुर अगदी भुरटे चोर वाटतील.

- बराक एकलव्य

सुक्या's picture

6 Nov 2008 - 1:01 pm | सुक्या

आनी टॅक्स असतो ८ ते १० टक्के.

वाइच गडबड झाली. . बगा . आताच कापला गेल्याला टॅक्स अन टॅक्स परतावा धरुन बगितलं तर टॅक्स १४ टक्केच्या आसपास आला. व्यवस्थीत चेक करावे लागेल.
बाकी चुकीच्या माहीतीबद्दल क्षमस्व!!

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

खुसपट's picture

15 Nov 2008 - 12:04 am | खुसपट

अमेरीका अस्तित्वात नव्हती , २५० वर्षांपूर्वी , तोपर्यंत आपली अर्थव्यवस्था संपन्नच होती. ती मोगल, तुर्की बादशहांनी , आणि नंतर ब्रिटीशांनी यथेच्छ लुटली. अमेरीकन तेल कम्पन्यांनी लुटली.

आर्थिक ईतिहासाचा अभ्यासक ( खुसपट )

एकलव्य's picture

15 Nov 2008 - 8:25 am | एकलव्य

अहो अभ्यासक -

मोगल, तुर्की बाहेरून आले पण भारतातच राहिले... इंग्रज हे पहिले राज्यकर्ते होते की ज्यांनी मुळापासून खणले आणि जहाजांवर घालून सातासमुद्रापलिकडे नेले.

(ईकॉनॉमिस्ट) एकलव्य

सर्वात तरुण आणि पहिला आफ्रिकन-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान बराक ओबामा मिळवतो आहे. ४७ वर्षाचा हा तरणाबांड माणूस अस्खलित वकृत्त्व करतो. कालच्या विजयानंतर त्याने दिलेले विजय भाषण (व्हिक्टरी स्पीच) हे खरोखरच अतिशय स्फूर्तिदायक आहे. मी अमेरिकन नागरिक नसूनही त्याचे ते भाषण ऐकताना माझ्या अंगावर काहीवेळा काटा आला तर अमेरिकन नागरिकांना ते किती आपलेसे वाटले असेल ह्याची कल्पना आपण करु शकतो!

अमेरिकेचे परराष्ट्र धोरण, त्यांची पाकिस्तान-भारत प्रश्नातली भूमिका ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन एक परिपक्व राजकीय नेता कसा असावा/कसा असू शकतो ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून ओबामाच्या प्रतिमेकडे बघता येऊ शकेल इतके ते भाषण प्रभावी होते. येणार्‍या कालखंडात भारताला सहाय्यभूत किंवा भारतद्वेष्टी भूमिका तो घेईल हे पहावे लागले.
अमेरिका हा काही सर्वस्वी आदर्श देश आहे असे अजिबात नाही पण त्यांच्या ज्या गुणांमुळे आज ते जगावर राज्य करु शकताहेत त्यांचा योग्य तो अभ्यास करण्यात कमीपणा वाटायचे काही कारण आहे असे मला वाटत नाही.
बाहेरच्या महासत्ता काय कुरापती करतात, काड्या घालतात ह्याच बरोबर किंबहुना ह्याहीपेक्षा, आपल्या राजकीय नेतृत्वाकडे नसलेली प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती, एकमताचा अभाव आणि एक देश म्हणून आपली प्रतिमा ठासून दुसर्‍यासमोर न मांडता येणे ह्या कमकुवत दुव्यांचाही आपल्या प्रश्नांची व्याप्ती वाढवण्यात मोठा सहभाग आहे असे मला वाटते. पक्षीय राजकारण, अंतर्गत हेवेदावे आणि संकुचित राजकीय स्वार्थ ह्या तीनही गोष्टींनी आपले राजकारण पंगु झाले आहे.

चतुरंग

विकास's picture

6 Nov 2008 - 1:55 am | विकास

त्यांचे विजय भाषण स्फुर्तीदायक होते. फक्त मला ते एकाचे आभार मानायचे विसरले असे वाटले...ज्याच्यामुळे केवळ राष्ट्राध्यक्ष पदच नाही तर सिनेट आणि हाउस दोन्हीत डेमोक्रॅटीक बहुमत आले...

कोणाचे लक्षात आले का? - अर्थात आपल्या लाडक्या जॉर्ज बुशचे! त्याने जर इतका गोंधळ घातला नसता आणि रिपब्लिकन नेतृत्वाने त्याच्या पुढे नांग टाकली नसती तर इतका मोठा विजय अशक्य वाटतो :-)

चतुरंग's picture

6 Nov 2008 - 1:58 am | चतुरंग

खाजगी भेटीत मानणार असेल, तसेही बुशने त्याला आवतण धाडले आहे लवकरच भेटूया म्हणून! ;)

चतुरंग

विकास's picture

6 Nov 2008 - 2:06 am | विकास

जाणारा राष्ट्राध्यक्ष येणार्‍या राष्ट्राध्यक्षासाठी २० जानेवारीला (सत्तांतराच्या दिवशी) ओव्हल ऑफिसमधील राष्ट्राध्यक्षाचा मेजाच्या ड्रॉवर मधे एक बंद लिफाफा ठेवतो, ज्यात त्याचे अनुभवाचे बोल आणि चार हिताच्या गोष्टी सांगितलेल्या असतात. त्यात बुश काय लिहील याची उत्सुकता आहे! अर्थात ते कधीच बाहेर येत नाही...

याचे उपाय दिले होते
पहीला पेचप्रसंग-अरबांना दोष द्या
दुसरा पेचप्रसंग-मंदीला दोष द्या.
तीसरा पेचप्रसंग-निवडणूकीची तयारी करा.

विकास's picture

6 Nov 2008 - 8:36 am | विकास

गुड वन! लक्षात ठेवायला चांगला आहे! =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Nov 2008 - 7:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहीला पेचप्रसंग-अरबांना दोष द्या
दुसरा पेचप्रसंग-मंदीला दोष द्या.
तीसरा पेचप्रसंग-निवडणूकीची तयारी करा.

आवडले !!!

लेख, त्यावरील प्रतिसादही वाचनीय आहेत.

-दिलीप बिरुटे
(वाचक)

विकास's picture

6 Nov 2008 - 7:51 pm | विकास

पहीला पेचप्रसंग-अरबांना दोष द्या
दुसरा पेचप्रसंग-मंदीला दोष द्या.
तीसरा पेचप्रसंग-निवडणूकीची तयारी करा.

आणि या सगळ्याच पेचप्रसंगासंदर्भात अर्थातच मला (म्हणजे बुशला) दोष द्या!

लिखाळ's picture

6 Nov 2008 - 11:21 pm | लिखाळ

हा हा.. हे मस्त !

ओबामांचे विजयी भाषण ऐकतोच आता घरी गेल्यावर..
-- लिखाळ.

अवलिया's picture

6 Nov 2008 - 7:59 pm | अवलिया

अमेरिका खुप चांगली आहे. तिथे जे काही होते ते दुसरीकडे होत नाही. वगैरे वगैरे अगदी सहमत आहे. अमेरिकन माणूस स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी तसेच दुस-याच्या हक्काविषयी किती सजग आहे हे सगळे जाणतात. मानवतेवर त्यांची असलेली श्रद्धा वगैरे सगळे फार छान आहे.

पण ... हा पण फार महत्वाचा आहे.

अमेरिकेचा (युएस ) भुभाग एकदा सोडला ना, मग अमेरिकन माणसांसारखी रानटी, हलकट, युद्धखोर अन हपापलेली मनुष्यजमात कुठेच नाही. त्यामुळे आम्हाला ना अमेरीकेचे कौतुक ना अमेरिकनांबद्दल आपुलकी.

येणा-या काळात आजवर केलेल्या पापांची भरपाई ते करतीलच. कारण हिशोब हा होतच असतो. कधी लवकर कधी उशीरा.

(भारतीय) नाना

नाना, मला तुमच्या घरातल्या देवावरची फुलं उचलून सांगा....

तुम्हाला आम्ही आणि श्रीकृष्ण सामंतसाहेब,
आम्ही खरंच रानटी, हलकट, युद्धखोर आणि हपापलेले वाटतो का हो?

दुखावलेला, तरीही आपलाच,
पिवळा डांबिस

अवलिया's picture

16 Nov 2008 - 2:25 pm | अवलिया

श्री.पिवळा डांबिस काका,

नानाचा आपल्याला साष्टांग दंडवत.
आपण मला आज्ञा केलीत की ,
नाना, मला तुमच्या घरातल्या देवावरची फुलं उचलून सांगा....
तुम्हाला आम्ही आणि श्रीकृष्ण सामंतसाहेब,
आम्ही खरंच रानटी, हलकट, युद्धखोर आणि हपापलेले वाटतो का हो?

तर हा घ्या माझा कबुली जवाब.....

घरातल्या देवावरची फुले उचलुन
जेजुरीच्या खंडेरायाचा भंडारा भाळी लावुन
तुळजापुरच्या आई भवानीच्या पायावर टेकवलेली कवड्याची माळ गळ्यात घालुन
माहुरच्या रेणुकादेवीच्या पाया पडुन
अष्टविनायकाला मनोमन स्मरुन
नासिकच्या रामकुंडातील तीर्थ प्राशन करुन
त्र्यंबकराजा व घृष्णेश्वरावर बेल वाहुन
गाणगापुराच्या दत्तपादुकांना स्पर्श करुन भस्म कपाळी लावुन
नेवाश्याच्या खांबाला पाठ लावुन
पंढरीच्या माउलीच्या पायाला मिठी घालुन
जगतातील यच्चयावत तीर्थक्षेत्रांचे पावित्र्याला स्मरुन
रायगडाच्या राजाच्या पायाचे वंदन करुन
माझ्या बुद्धीने स्विकारलेल्या व मनाने मानलेल्या अद्वैतवादाला न विसरता
मी हे तुम्हाला सांगतो की ,
माझ्या वरती दिलेल्या प्रतिसादात एकाही काना मात्रेचा फरक होवु शकत नाही,
कारण मी केलेले विधान पुर्णपणे सत्यावर व अभ्यासावर आधारीतच होते.

आता तुमच्याबद्दलच बोलायचे तर मी एवढेच सांगतो की,
बिभीषण रावणाचा भाउ असला तरी त्यामुळे रावणाने, त्याच्या सैन्याने व प्रजेने
आर्यावर्तावर केलेल्या अत्याचाराचे दुष्टत्व तसेच त्याची दाहकता कमी होत नाही.
असो.

आपलाच,
नाना

आनंद घारे's picture

7 Nov 2008 - 7:37 am | आनंद घारे

भारतीय आणि अमेरिकन अशी वर्गवारी करून त्यातल्या कोणत्याही एकाला सरसकट चांगले आणि दुसर्‍याला वाईट म्हणणे बरोबर नाही. हे जग असे कृष्ण धवल बनलेले नाही. आदर्श पुरुषोत्तम राम जसा आपला पूर्वज होता त्याचप्रमाणे दुराचारी रावणसुद्धा आपलाच पूर्वज होता हे आपण नाकारू शकत नाही. आजसुद्धा आपल्याला स्वार्थी , दुर्गुणी तसेच निस्वार्थी , सद्गुणी अशा दोन्ही प्रकारची माणसे सगळीकडे भेटतात. एवढेच नव्हे तर एकाच माणसाचा वेगवेगळा अनुभव येतो.