सत्यमेव जयते

वडापाव's picture
वडापाव in काथ्याकूट
5 Nov 2008 - 10:26 pm
गाभा: 

जयते या शब्दाचा मूळ धातू 'जय' हा धातू परस्मैपदी आहे.
थोडक्यात, सत्यमेव जयति हे व्याकरणदृष्ट्या योग्य आहे.
(माझ्या माहितीप्रमाणे)
जय हा धातू उभयपदी असल्यास जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही विनंती !!

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

5 Nov 2008 - 11:20 pm | विसोबा खेचर

अरे देवा!

चालू द्या..! :)

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Nov 2008 - 11:34 pm | बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =))

तात्या, तू कितना भी भाग, ये संस्कृत तेरा पीछा नही छोडेगा ;)

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

6 Nov 2008 - 1:27 am | चतुरंग

+१ असेच म्हणतो!

(स्वयं बातास्मि : वत्सा रंगा, संस्कृत शब्द उच्चारताच हा तात्या पलायन का बरे करतो? ;) )

चतुरंग

पिवळा डांबिस's picture

6 Nov 2008 - 8:59 am | पिवळा डांबिस

अरे देवा, चालू द्या.....
:)

घाटावरचे भट's picture

6 Nov 2008 - 1:59 am | घाटावरचे भट

'जय' हा धातू परस्मैपदी असला तरी 'जयते' हे त्याचे आर्ष रूप आहे असे शाळेत शिकल्याचे आठवते. आर्ष बोले तो 'आ ऋष', बोले तो ऋषींपासून चालत आलेलं, म्हणजेच अत्यंत पुरातन. म्हणून ते जयते असंच वापरलं जातं. ;)

-भटोबा (९वी - अ)

अनिल हटेला's picture

6 Nov 2008 - 8:36 am | अनिल हटेला

>>>>>जय' हा धातू परस्मैपदी असला तरी 'जयते' हे त्याचे आर्ष रूप आहे असे शाळेत शिकल्याचे आठवते. आर्ष बोले तो 'आ ऋष', बोले तो ऋषींपासून चालत आलेलं, म्हणजेच अत्यंत पुरातन. म्हणून ते जयते असंच वापरलं जातं.

अरे देवा !!!!!

असेच म्हणतो !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विजुभाऊ's picture

6 Nov 2008 - 12:45 pm | विजुभाऊ

परस्मै पदी धातु

से इते ध्वे
ते इते अन्ते
असे चालतात.
त्या प्रमाणे "जय" या धातुचे तृतीयपदी एक वचन जयते असे चालते.
धातु याचा व्यापक अर्थ मराठीत क्रियापद असा घ्यावा.
नववीत; संस्कृत मधे "क बु धा वि" असे एक प्रकरण असायचे त्याचा इथे सम्बन्ध नाहीय्ये.

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

विनायक प्रभू's picture

6 Nov 2008 - 2:01 pm | विनायक प्रभू

सुसंस्क्रुत सवालाला असा असंस्क्रुत प्रतिसाद. माझ्या बालमनावार किती आघात कराल.
असो. करमणुक झाली. दिवस चांगला जाणार.
अंमळ असंस्क्रुत वि.प्रा.

उर्मिला००'s picture

6 Nov 2008 - 6:11 pm | उर्मिला००

जयते = जि-जय(१गण,उभयपद) असा हा धातु आहे.त्यामुळे याची परस्मैपदी आणि आत्मनेपदी दोन्हीही रुपे होतात्.जसे,
जयति-जयतः-जयन्ति, किंवा जयते-जयेते-जयन्ते!
उदा. भारती कवेर्जयति !,जयन्ति ते सु़कृतिन: रससिद्धः कविश्वर:
उदा.सत्यमेव जयते !
पण हे सांगा वडापाव महोदय,हा प्रश्न तुम्हाला का पडला?

सुनील's picture

6 Nov 2008 - 6:43 pm | सुनील

सम्राट अशोक याने सारनाथ येथे उभारलेल्या स्तंभावरील हे वाक्य आहे. अर्थात, आजवर हजारो-लाखो जाणकारांच्या नजरेखालून गेलेले. त्यात काही चूक असती तर ती केव्हाच ध्यानात आली असती. तशी ती आली नाही म्हणजे हे वाक्य व्याकरणदृष्ट्या योग्यच असणार याची खात्री होती. तसा खुलासा येथेही केला गेला आहेच. तेव्हा वाद नसावा!

असो, त्यानिमित्ताने मेटॅलर्जीवरही मजेशीर चर्चा झाली!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धोंडोपंत's picture

6 Nov 2008 - 9:23 pm | धोंडोपंत

महत्वाची सूचना:-

चर्चेचा विषय भरकटवणारे असभ्य, विपर्यस्त लेखन उडविण्यात आले आहे याची नोंद घ्यावी.

ज्या चर्चाविषयात स्वत:ला गम्य नसेल तो सोडून द्यावा. तथ्यहीन, असभ्य लेखन करून गंभीर विषय भरकटवू नये.

मिसळपाववरील लेखनस्वातंत्र्याचा दुरूपयोग करू नये. लेखनस्वातंत्र्याच्या मर्यांदांचे उल्लंघन होऊन ते स्वैराचाराकडे झुकल्यास उडविण्यात येईल.

सभ्यतेचे संकेत पाळले जातील याची काळजी लेखन करतांना घ्यावी.

धोंडोपंत
मॉडरेटर, मिसळपाव डॉट कॉम

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

कलंत्री's picture

6 Nov 2008 - 9:29 pm | कलंत्री

मिपा हे सर्वसामान्य मराठी युवाचे आवडते असे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर शुद्धलेखनाचा बाऊ तर होत नाही आणि त्याच बरोबर अश्या ज्ञानवर्धक चर्चाही होऊ शकतात.

धोंडोपंतांनी निर्देशाचे सर्वांनी पालन केले तर दोन्ही बाबींचा मिपाकरांना आनंद घेता येईल.

कशिद's picture

6 Nov 2008 - 10:54 pm | कशिद

सहमत...

चिपळूनचा बाल्या's picture

7 Nov 2008 - 8:55 am | चिपळूनचा बाल्या

तात्या, ते मनोगत सोडून मी इकड आलो सुद्धलेखन दुड्डाचार्याला कंटालुन..इकडे पन तेच क चालू आहे?

शेखर's picture

7 Nov 2008 - 9:07 am | शेखर

बाल्या,

धोंडोपंतानी स्वच्छ शब्दात लिहले आहे. त्यांनी कुठेही शुद्धलेखनासंबधी लिहले नाही. "चर्चेचा विषय भरकटवणारे असभ्य, विपर्यस्त लेखन उडविण्यात आले आहे" असे स्पष्ट लिहले आहे.

शुद्धलेखन मरु दे पण शुद्धवाचन तरी कर.

शेखर

सुशील's picture

7 Nov 2008 - 9:23 am | सुशील

मी बाल्याशी सहमत आहे. असल्या शुद्धलेखनाच्या कीस काढणार्‍या चर्चांनी मला उबग येतो.

भाषांतरकार's picture

13 Nov 2008 - 11:56 pm | भाषांतरकार

मूळ धातू जी १ गण परस्मैपद
वस्तुतः त्याचे रूप पाणिनीय व्याकरणानुसार "जयति" असेच व्हायला हवे
परंतु संस्कृत साहित्यामध्ये काही रूपे सध्याच्या व्याकरणाला अनुसरून आढळत नाहीत. याचे कारण असे आहे की फार पुरातन काळी संस्कृत ही बोली भाषा होती. त्या भाषेच्या व्याकरणाचे शास्त्रशुद्ध नियम नव्हते. पाणिनि नावाच्या ऋषीने, ज्यांना आजही "आधुनिक भाषाशास्त्राचे जनक" मानले जाते, संस्कृत भाषेचा सागोपांग अभ्यास करून व्याकरणाचे नियम तयार केले. त्यानंतरच या भाषेला "संस्कृत" म्हणजे "well formed" असे म्हटले जाऊ लागले. तसेच पाणिनि ऋषींच्या आधी संस्कृत साहित्यात प्रचलित झालेल्या रूपांना त्या काळच्या ऋषींनी प्रचलित केलेली रूपे म्हणून आर्ष रूपे म्हणतात .

भाषांतर अनुदिनी संचालक :
http://freetranslationblog.blogspot.com

वडापाव's picture

16 Nov 2008 - 8:41 pm | वडापाव

पूरेपूर माहिती सांगितलीत !
धन्यवाद!

आपला नम्र,
वडापाव