काँग्रेस ची हार का? मोदींची जीत का ?

चौकटराजा's picture
चौकटराजा in राजकारण
24 May 2019 - 11:28 am

खरे तर मथळ्याचे नाव "काँग्रेस ची हार का ? भाजपाची वा एन डी ए ची जीत का?" असे असावयास हवे पण मुळात लोकांनी भाजपाला वा एन डी ए ला मते न देता मोदीना दिली आहेत .एका प्रकारे अध्यक्षीय लोकशाही आणण्यासाठी भारतीय जनतेने हे पाऊल उचलले आहे का ? असे वाटावे. संसदीय लोकशाहीचे पावित्र्य प्रथम डागाळले ते १९६९ साली ज्यावेळी इंदिरा गांधी यांनी आपल्याच पक्षाने पुरस्कृत केलेला नीलम संजीव रेड्डी हा राष्ट्रपती पदाचा उमेदवार पाडल्यापासून .पुढे अनेक वेळा " शेकुलारीझम " असा गोंडस नादान शब्द घेऊन जातीचे , धर्माचे , व्होट बँकांचे , तुष्टीकरणाचे अनेक खेळ संसदीय लोकशाहीत खेळले गेले . खासदार खरेदी साठी नोटांची बंडले वगैरे प्रकार झाले. संसद बंद पाडून गोधळ निर्माण करून देशावासियांना शरमेने मान खाली घालायला लावणारे आपले लोकप्रतिनिधी आपण पाहिले . " पुरी सिस्टम सडी हुई है ..." असे डायलॉग असणारे सिनेमा ही आले.

काँग्रेस ची स्थापना १८८५ साली झाली. ती काँग्रेस प्रथमी फुटली ही डॉ. केशव बळीराम हेडगेवार या काँग्रेसी माणसाने 'रा स्व संघ ' नावाचे संघटना स्थापन केल्याने .अनेक प्रकारची बदनामी , तुरुंगवास ,बंदी सहन करीत आजही हे संघटन आपल्या असे म्हणतात की ८३००० शाखांसह कार्यरत आहे. हिंदूंचे रक्षण हे त्यांचे ध्येय आहे असे ते सांगत असतात. भारतातील अनेक हिंदूंना आपला धर्म " खतरेमे" आहे असे वाटत नसल्याने संघास हिंदू लोकसंख्येच्या प्रमाणात आश्रय नाही ही वस्तुस्थिती आहे. आणीबाणी १९७५ साली जाहीर केल्यावर त्यावेळी अनेक संघीयांना विनाकारण तुरूंगात डाम्बले गेले हा इतिहास आहे.साधारण या वेळे पासून मूळ जनसंघ नावाचा अशक्त असलेला पक्ष वर्धिष्णू व्हायला सुरुवात झालेली दिसते .दोन अपवाद सोडता जसा या जनसंघाचा नवा अवतार भा ज पा वाढू लागला तसा तो सर्व सामावेशक होऊन काँगेस चा ह्रास व्हायला सुरुवात झाली

काँगेस नावाची एक संस्कृती आहे. "मुसलीम व दलितांचे तुष्टीकरण , हाय कमांडचा वरचष्मा, हिंदी पट्ट्याचे प्राबल्य , पक्ष सेवे पेंक्षा गांधी निष्ठेला प्राधान्य , उद्दाम पणा , अहंकार , शक्यतो युतीबिती ना करणे " ई या संस्कृती ची वैशिष्टये आहेत. भाजपा मध्ये ही हाय कमांड आहे पण त्यात अध्यक्ष बदल होता असल्याने दगडा पेक्षा वीट मऊ अशी ती हाय कमांड आहे .आता भाजपा ने ही दलित व ओ बी सी यांना भटजी व शेटजी यांच्या जोडीला घेतल्याने काँग्रेस चा बेस कमी झाला आहे. त्यात मुलायम यांनी मुसलमान , मायावती यांनी दलित काँग्रेसच्या बेस मधून पळवून नेल्याने कर्क रोगासह टी बी अशी काँग्रेस ची अवस्था होत गेली आहे. एकाच घराण्यावर नेतृत्व व निर्णय प्रक्रियेसाठी विसंबून राहिल्यामुळे पर्यायी नेतृत्व इथे निर्माणच होत नाही.

२०१४ साली केवळ ४४ जागा मिळाल्याने काँग्रेस अधिक हताश झाली.राहुल यांनी ४४ का झाल्या याचा शोध न घेता फक्त मोदी चुका काय करतात यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली . टेनिस च्य भाषेत सांगायचे झाले तर फक्त प्रतिस्पर्ध्याच्या चुकांचे गूण मिळवायचे पण बिनतोड सर्वीस कडे लक्ष द्यायचे नाही असा खेळ त्यांनी चालू ठेवला तब्बल ५ वर्षे . काँग्रेस पक्षाचे " पॅकेज " चे राजकारण मोदीनी ठोकरले. मते न मिळण्याचा धोका होता तरीही . राफेल चा राहूलाने खेळ चालू केला त्यात बोफोर्स मध्ये त्याच्या वडिलांची मि क्लीन ही प्रतिमा जशी धुळीस मिळाली तशी राफेल ही आपल्याला एक नामी संधी आहे असे त्यांना वाटले पण सर्वोच्च न्यायालयाने आडकाठी त्याच्या अटकळीत आणली. नोटबंदी मुळे नक्की फायदा काय झाला ते मोदीना देशाला स्पष्टपणे पट्विता आले नाही पण काँग्रेसचे पाठीराखे मनमोहन सिंग , अमर्त्य सेन व रघुराम राजन यांनी तरी त्याचे तोटे पटवून दिले का ? नुसते मोठा घोटाळा असे म्हणून ममो गप्प झाले. जी एस टी चा त्रास काही प्रमाणात व्यापाऱयांना झाला आहे पण तसे तो पूर्वी ऑक्ट्रॉय व व्हॅट मध्ये होत होताच . त्यामुळेच जी एस टी चा बार ही फुसका झाला. काही लोकांनी मोदींचे सरकार " हुकूमशाही व भीतीदायक असल्याचा गदारोळ माजविला . संडास , स्वच्छता भारत यांची टवाळी केली . अशाना जनधन , विमा, पेन्शन , आयकर सवलत, आयकर परताव्याची खात्री , ६००० रूपये शेतकर्याना , महिला बँक , बाळंतपणाची वाढती रजा , रेरा , टेलिकॉम रिफॉर्म , मेट्रो,रस्ते ई अनेक विषयाला स्पर्श करून मोदीनी " सैद्धांतिकांना चपराक मारली आहे. जरा स्वातंत्र्याचा संकोच झाला तरी चालेल पण संडास , घर व भाकरी द्या हे जनतेने ३५० जागा देऊन मोदीना आवाहन केलेले दिसते.

केरळ राज्यात मुसलीम ,हिंदू व ख्रिस्ती ३३ /३३ टक्के आहेत. म्हणजे ६६ टक्के जातीय धर्मीय बेस अवघड हे उमजून आसाम ,बंगाल,, अरुणाचल ई भागातील लोकांच्या कल्याणाच्या योजना आणून भाजपाचा विस्तार चालू असलेला दिसतो .या बेस पट्यात प्रामाणिकपणे योजना राबवाल्या गेल्या तर दिल्लीवर राज्य करता येते हे गणित अमित शहा व मोदी या तथाकथित दोन हुकूमशहांचे आहे .लोकांना जो पर्यंत विकास दिसेल , जो पर्यंत भाववाढ बेसूमार होणार नाही तो पर्यंत मोदी स्वराज , आडवाणी याचा मान राखतात की नाही यांच्याशी सामान्य माणसाला काही देणे घेणे नाही हे " घुसमट " वाल्या बुद्धीवंतांनी ( नावे इथे देत नाही ) लक्षात घेणे गरजेचे आहे. उत्तम संवाद , अभ्यासू पणा , विनोद, अभिनय , कामाचा उरक ई गुणामुळे मोदींच्या आत्मस्तुती या दोषांकडे लोक उदारपणे दुर्लक्ष करतात. मोकळेपणा व धूर्तपणा याचा उत्तम संगम त्यांच्यात आहे.म्हणून भा ज पा चा अश्वमेध घोडा कोणी रोखू शकत नाही .

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

24 May 2019 - 11:38 am | यशोधरा

लेख आवडला.

रविकिरण फडके's picture

24 May 2019 - 12:26 pm | रविकिरण फडके

"नोटबंदी मुळे नक्की फायदा काय झाला ते मोदीना देशाला स्पष्टपणे पट्विता आले नाही पण काँग्रेसचे पाठीराखे मनमोहन सिंग, अमर्त्य सेन व रघुराम राजन यांनी तरी त्याचे तोटे पटवून दिले का ? नुसते मोठा घोटाळा असे म्हणून ममो गप्प झाले."

(वरील विधानावर माझे म्हणणे असे की) जेव्हा अमुक एका कृतीमुळे फायदा (किंवा तोटा) झाला असे विधान केले जाते तेव्हा काय फायदा (किंवा तोटा) झाला हे सिद्ध करण्याची जबाबदारी ही ते विधान करणाऱ्यावर असते, आणि तशी ती असायला हवी. उदा., एखादे औषध घेतले तर कोणत्या परिणामांची अपेक्षा आहे, ते परिणाम किती काळाने दिसायला लागतील, तोवर आणखी काय काय होऊ शकेल, हे जर डॉक्टरने सांगितले नाही, आणि जे काही झाले तेच अपेक्षित होते, असे म्हणायला सुरुवात केली, तर तुम्ही पुन्हा त्या डॉक्टरकडे जाल का? काही परिणाम लगेच दृग्गोचर होतात, काहींना बराच काळ लागेल, हेही तुम्हाला आधीच कळले पाहिजे की नाही? नाहीतर अंगारे-धुपारे करणारा बुवा वा वैदू काय वाईट?
तात्पर्य काय, तर यशापयश हे आधी निश्चित केलेल्या निकषांवर मोजायचे असते (side effects वगळता). आणि जेव्हा 'goal post' च बदलली जाऊ लागते, तेव्हा तर ती अपयशाचीच निदर्शक असते.
ह्या न्यायाने, नोटबंदीचे (निश्चलनीकरणाचे) फायदे काय झाले हे सांगण्याची जबाबदारी सरकारची होती, आणि ती पार पाडण्यात सरकार निःसंशय अपयशी ठरले. इथे तर, 'काला धन' कमी करणे (०८ नोव्हेंबरचे भाषण) हा हेतू साध्य झाला की नाही हेच ठामपणाने सांगता न आल्याने, 'लेस कॅश' चा उदोउदो सुरु झाला.

(जाता जाता: काळा पैसा हा रोग नसून ते रोगाचे केवळ एक लक्षण आहे हे आपण लक्षात घेत नाही तोवर तो रोग दूर होणार नाही. रोग काय आहे, त्या रोगाची कारणे कोणती आहेत, ह्याबद्दल चर्चा करण्याची ही जागा नव्हे.)

डँबिस००७'s picture

25 May 2019 - 12:13 pm | डँबिस००७

काळा पैसा हा रोग नसून ते रोगाचे केवळ एक लक्षण आहे हे आपण लक्षात घेत नाही तोवर तो रोग दूर होणार नाही. रोग काय आहे, त्या रोगाची कारणे कोणती आहेत, ह्याबद्दल चर्चा करण्याची ही जागा नव्हे.

नोटबंदी होउन बराच काळ लोटलेला आहे. तुमच्या सारख्या Expert नी ह्या वर लेख लिहावा !!

सुबोध खरे's picture

24 May 2019 - 12:31 pm | सुबोध खरे

रा स्व संघाचे संस्थापक हे डॉ बळीराम हेडगेवार नसून त्यांचे सुपुत्र डॉ. केशव बळीराम हेडगेवार होते.

चौकटराजा's picture

24 May 2019 - 12:51 pm | चौकटराजा

धन्यवाद !

mrcoolguynice's picture

24 May 2019 - 1:16 pm | mrcoolguynice

काँग्रेस ची हार ? का, मोदींची जीत ?...

दोन्हीही ...

"मोदींची जीत" हेही तितकंच खरंय जितकं "विरोधकांची हार".

महासंग्राम's picture

24 May 2019 - 2:29 pm | महासंग्राम

हे गणित अमित शहा व मोदी या तथाकथित दोन हुकूमशहांचे आहे .

लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिल्यावरही त्यांना हुकूमशहा म्हणायचे अजब तर्कट आहे,

मुळात लोकांनी भाजपाला वा एन डी ए ला मते न देता मोदीना दिली आहेत .

लोकांनी विकास करणार्यांना मतं दिली आहेत, जे विकास करू शकत नाही अथवा त्या लायकीचे नाहीत त्यांचा साफ नाकारलं आहे .
फक्त मोदींना मत दिली असती तर चंद्रकांत खैरे, आढळराव पाटील, अनंत गीते, आनंदराव अडसूळ यांसारखे दिग्गज पराभूत झाले नसते.

जनता कायम मूर्खच असते आपण त्यांना बसवून जे दाखवू तेच खरं मानणारी हे समजून चालणारे ल्युटेयन्स पॉलिटिक्सचाय चौकटीचा जमाना गेला आता. एवढ्या मोठया संख्येने निवडून देणारी जनता सुतिया नसते हे कधीतरी लक्षात घ्या. आतातरी पराभव झाला हे मान्य करा. अर्थातच जमलं तर नाहीतर २०२४ पर्यंत इनो आणि रुदाली आहेच.

चौकटराजा's picture

24 May 2019 - 2:35 pm | चौकटराजा

ते अंध द्वेषी च्य दृष्टीने हुकूमशाहाच आहेत . सबब त्यांना " तथाकथित " हुकूमशहा म्हटले आहे !

अभ्या..'s picture

24 May 2019 - 3:31 pm | अभ्या..

मंबा, (हे सिम्बा अका संग्राम भालेरावच्या चालीवर वाचावे)
जरा नीट वाचत चला, तथाकथित लिहिलंय पष्ट. सेनेचा गुण लावून घेऊ नका इतक्यात.
आणि तुम्ही म्हणताय

लोकांनी विकास करणार्यांना मतं दिली आहेत, जे विकास करू शकत नाही अथवा त्या लायकीचे नाहीत त्यांचा साफ नाकारलं आहे .
फक्त मोदींना मत दिली असती तर चंद्रकांत खैरे, आढळराव पाटील, अनंत गीते, आनंदराव अडसूळ यांसारखे दिग्गज पराभूत झाले नसते.

जरा आमच्या जुन्या सोलापुरच्या मतदारसंघाबाबत बोला बरं.
निवडून आलेल्या महाराजांचं नाव प्रचार सुरु होईपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं. त्यांनी काय विकास केला हेही माहित नव्हतं. कसे आले निवडून?

चौकटराजा's picture

24 May 2019 - 5:53 pm | चौकटराजा

तुम्ही तेंचि ब्यानर केली असणार यामुळे बाप्पा निवडून आले ! ))))

महासंग्राम's picture

25 May 2019 - 10:22 am | महासंग्राम

शेठ, तुमचे महाराज या आधी लोकसभेला उभे होते का ? असल्यास विजयी झाले होते का ?

आणि मामू आ. सुशीलकुमार शिंदें साहेब दोन वेळा का पराभूत झाले ते पण सांगा ? त्यांच्या कार्यकाळात किती उद्योग धंदे सोलापुरात आले ते हि सांगा, एकेकाळी नावाजलेला गिरणी उद्योग त्यांच्या कार्यकाळात का उभारी घेऊ शकला नाही ते हि सांगा कि राव

पुढे अनेक वेळा " शेकुलारीझम " असा गोंडस नादान शब्द घेऊन जातीचे , धर्माचे , व्होट बँकांचे , तुष्टीकरणाचे अनेक खेळ संसदीय लोकशाहीत खेळले गेले .

टेनिस च्य भाषेत सांगायचे झाले तर फक्त प्रतिस्पर्ध्याच्या चुकांचे गूण मिळवायचे पण बिनतोड सर्वीस कडे लक्ष द्यायचे नाही असा खेळ त्यांनी चालू ठेवला

भंकस बाबा's picture

24 May 2019 - 5:31 pm | भंकस बाबा

सेल्फ गोल करण्यात कोंग्रेस आघाडिवर होती. त्यांची सर्वात मोठी चुकी होती 'राफेल' ! राफेल मुद्द्यावरुन रागाने पार फ्रांस, अनिल अंबानी यांना व्यासपीठावर आणले. जो देशाचा सुजाण नागरिक आहे त्याला यातील फोलपणा लगेच कळला. शिवाय आळवलेला मुस्लिम राग देखिल मैफिल खराब करून गेला. जो पंरपरागत कोंग्रेसचा हिंदू मतदार होता तो देखिल भाजपच्या तंबूत जाऊन बसला. तरी रागाने सोम्य हिंदुत्व दाखवून सहानभूति मिळवायचा प्रयत्न केला, पण उशीर झाला होता.
भविष्यात या निकालामुळे मुस्लिम लांगुलचालन कमी होईल अशी आशा करायला हरकत नसावी.

भंकस बाबा's picture

24 May 2019 - 5:32 pm | भंकस बाबा

सेल्फ गोल करण्यात कोंग्रेस आघाडिवर होती. त्यांची सर्वात मोठी चुकी होती 'राफेल' ! राफेल मुद्द्यावरुन रागाने पार फ्रांस, अनिल अंबानी यांना व्यासपीठावर आणले. जो देशाचा सुजाण नागरिक आहे त्याला यातील फोलपणा लगेच कळला. शिवाय आळवलेला मुस्लिम राग देखिल मैफिल खराब करून गेला. जो पंरपरागत कोंग्रेसचा हिंदू मतदार होता तो देखिल भाजपच्या तंबूत जाऊन बसला. तरी रागाने सोम्य हिंदुत्व दाखवून सहानभूति मिळवायचा प्रयत्न केला, पण उशीर झाला होता.
भविष्यात या निकालामुळे मुस्लिम लांगुलचालन कमी होईल अशी आशा करायला हरकत नसावी.

जालिम लोशन's picture

24 May 2019 - 6:43 pm | जालिम लोशन

+1

सर्वात महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो की सक्षम प्रतीस्पर्धी नसणे.
दुसर म्हणजे जबरदस्त मार्केटिंग. निवडुन आल्यापासुन ते ह्या निवड्णुकिच्या शेवटच्या दिवसापर्यंत (हे तुम्ही जरा मागे वळुन पाहिलत तर लक्षात येईल उदा. मॅडिसन स्केवर च् भाषण्, जपान मध्ये जाउन ढोल वाजवणे, नेत्यांना मिठी मारणे, योगाच्या विविध पोज मध्ले फोटो, ना खाउंगा ना खाने दुंगा, देश का चोकीदार, सामान्य चायवाला व जातीचा केलेला वापर, मेक ईन ईंडिया, गंगा आरती असे मोठाले एवेंन्ट्स,......शेवटी केदारनाथ, र्ईत्यादी.) सतत आपण चर्चेत राहुन तयार केलेली आपली एक सकारात्मक ईमेज.
तसेच स्वच्छ भारत योजना, उज्ज्वला योजना, जनधन योजना, प्र मं आवास योजना, मुद्रा योजना, नोट्बंदी, जी एस टी, अशा योजना(या मध्ये नोटबंदी फसली अस्ली तरी आपण काळ्या पैस्यांविरुद्ध काम करत आहोत असा मेसेला गेला.)

सरकारी बँकात पैसे टाकुन त्यांची पत सुधारणे, Insolvency and Bankruptcy Code, हे दोन निर्णय माझ्या मते खुप महत्त्वाचे वाटतात.

व निवड्नुकांच्या सुरवातीला झालेल्या बालाकोटच्या घटनेने मोदी ईमेजला अजुन बळ दिले.

सुमार केतकर साय्बांचे उदाहरन ड्वाळयससमोर ठ्येवून तुमि राज्यसबेच्या शीटकड्ये इस्पिडमद्ये जावू र्‍हायले हाहात, ह्ये कळ्विन्यास आमाल लईच आनंद व्हवू र्‍हायला हाये, बर्का. =))

नाखु's picture

24 May 2019 - 10:31 pm | नाखु

यांनी मिळवलेला विजय एकाच झापडबंद विचारसरणी आणि एकाच आयामातून जोखला तर काहीच हाती लागणार नाही

पण जरा पक्षनिरपेक्ष आणि वस्तुनिष्ठ माहिती आकलन केलं तर जे वाटेल ते
घराणेशाही नाकारली गेली आहे (अपवादात्मक परिस्थितीत काहींनी कर्तृत्व सिद्ध केलले) सोडून थेट झोपलेल्या धेंडाना घरी बसवले
विरोधकांच्या मुद्दे आणि कृती यात सुसंगती कधीही नव्हती.
आक्षेप काय आहे या पेक्षा कोण विचारतो त्याला महत्त्व आहे ( मिपावर याचा बरेचदा अनुभव असेलच)
लावरे व्हिडिओ वाले भलेही मुद्दे रास्त असतील तरी मांडणार्याची विश्वासार्हता आणि नक्की काय उद्देश आहे उपाय काय सुचवले जातात ते नक्कीच पाहिले असणार

पन्नास वर्षे मतदारांना फक्त पाच वर्षांनी विकत घेतली जाणारी वस्तू समजलं जायची, कायमचेच पैशाने नाही तर कधी इतर जात धर्म आदि प्रलोभने दाखवून.त्याला बर्याच प्रमाणात चाप बसला
आता ज्या ज्या हिरीरीने सहभागी होऊन मोदी कसे देशाला घातक आहेत खड्डयात घालत आहेत असं हवेत आरोप करणारे जालीय विचारवंत आहेत तसेच पुर्वीच्या सरकारने पोसलेले (हो हाच शब्द चपखल आहे) तथाकथित पुरोगामी विश्लेषक, हुजरेगिरी साहित्यिक आणि पंचतारांकित एन जी ओं यांच्या सरकारी पैशाने चंगळ व बेलगाम उपभोग घेण्याची आप्पलपोटी वृत्ती ला चांगलाच चाप बसला आणि मग ही सगळी पिलावळ मोदींच्या मागे हात धुवून लागली सोबतीला अर्धहळकुंडी कलाकार वगैरे होतेच (आठवा पुरस्कार वापसी टोळी,)
सतत आणि सर्वत्र द्वेषमूलक प्रतिक्रिया देऊन या लोकांनी मोदींसाठी अप्रत्यक्षरीत्या महत्त्व निर्माण करुन दिले.
राफेलचे तुणतुणे युवराज रोज नवनवीन आकडे जाहीर करुन मनोरंजन जास्त आणि विश्वासार्हता शून्य टक्के मोंदीना चर्चेत ठेवत होतेच ( कॉंग्रेस मध्ये खुशमस्कर्यांची कमी नाही ते उच्चशिक्षित असूनही चरणी निष्ठा अर्पण केली असलेले आहेत)
आता शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा जे संपूर्ण आयुष्य एकमेकांना पाण्यात बघण्यात चालवत होते ते व्यक्तिगत स्वार्थासाठी एकत्र येतात फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीला दूर करण्यासाठी !!!! म्हणजेच ही व्यक्ती (मोदी) नक्कीच काही करत आहे.
दृष्य नाही पण या गणंगाना कुठेतरी फटके बसतायत जे दाखवता येत नाही आणि सहनही करता येत नाही.
हीच बाब हेरून तटस्थ मतदार मोदींना पाठींबा दिला तर बरं होईल असा विचार करुन मतदान केले असावे
जे काही निर्भेळ यश मिळवले त्याबद्दल अभिनंदन.
आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

भाजपा भक्त अशा शिक्कामोर्तब करण्यात आलेला चिल्लर नाखु पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर

महाराष्ट्रात मुस्लिम,दलित मतदारांनी कॉन्ग्रेसची साथ सोडली हे कारण खरे आहे. वंचित आघाडीकडे वळलेत. मराठा आरक्षण हे कारण असेल का?

टर्मीनेटर's picture

25 May 2019 - 12:13 pm | टर्मीनेटर

छान विवेचन!
भ्रामक विश्वात रममाण होऊन अखंड मोदीद्वेषाचा राग आळवणाऱ्या सर्व (तथाकथित) बुद्धीमंत पुरोगाम्यांना वास्तवाची जाणीव बहुमताद्वारे सर्वसामान्य नागरिकांनी करून दिली आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2019 - 1:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

थोडक्यात पण योग्य आणि समयोचित विश्लेषण.

"भारतीय मतदार सुजाण होत चालला आहे आणि त्याची धर्म-जात-पंथ / प्रलोभने / भूलथापा / सतत, बेजबाबदार आणि तद्दन खोटे आरोप / इत्यादींच्या बळावर दिशाभूल करणे कठीण होत चालले आहे; तेव्हा तसा गैरसमज बाळगून असलेल्यांनी सुधारून सरळ मार्गावर यावे"; या संदेशाची चुणूक २०१४ च्या निवडणूकीत जनतेने दिली होतीच... २०१९च्या निवडणूकीने त्यावर नि:संशय शिक्कामोर्तब केले आहे.

हे समजण्याची कुवत नसणार्‍या आणि/अथवा शहामृगी मन:स्थितीतून बाहेर न येऊ शकणार्‍या राजकारणी, पक्ष, विचारवंत, विश्लेषक, भक्त, गुलाम, इ, इ, इत्यादींची गत पुढच्या निवडणूकीपर्यंत, डायनासोर्सप्रमाणे होईल ! =)) =)) =))

डँबिस००७'s picture

25 May 2019 - 3:42 pm | डँबिस००७

कॉँग्रेसमुक्त भारत का नको?

तुमचा लेख पुर्णपणे गंडलेला आहे ! भारताला प्रखर राष्ट्रवादी विरोधी पक्षाची गरज आहे !! त्या रोलमध्ये कॉँग्रेस बसत नाही !!

जर कॉँग्रेसचा खरा ईतिहास जाणुन घ्यायचा प्रयत्न केला तर कळेल की कॉँग्रेसमुक्त होणे ही भारताची गरज तेंव्हाही होती आणि आताही !!

ज्या कॉँग्रेसने ६०-६५ वर्षै गरीबी हटाव सारख्या घोषणा दिल्या पण गरीबी कधीही हटवली नाही, उलट जनतेला PDS रेशनची सवय लावली, पुढे देशात निवडणुकीच्या घोषणात २ रु कि तांदुळ देणार, आम्हाला निवडुन द्या, अशी नविन प्रथा सुरु झाली !

भारताला असंख्य जाती जमाती मध्ये वाटण्याच काम केल, पण भारतातल्या बहुसंख्य समाजाला दुर्लक्षल व अल्पसंख्यक समाजाच तुष्टीकरण केल ! आजही भारतातली हिंदु मंदिरे ही धर्मदाय संस्थेच्या पर्यायाने सरकारच्या आधिन आहेत पण अल्पसंख्यक समाजाची धर्मस्थळे ही मुक्त !! ( मुक्त म्हणायला फक्त , कारण ती आधिन आहेत विदेशी शक्तीची. आजही चर्चच्या माध्यमातुन ख्रिश्चन समाजाने कोणाला वोट द्यावे हे निर्देश व्हाटीकनचा पोप देतो ! तर मस्जिद मधुन सागण्यात येते की हिंदु उमेदवाराला पाडलेच पाहीजे, हिंदुंना आपली शैक्षणीक संस्था चालवायचा हक्क सुद्धा नाही. पण चर्च व मद्रसे खुशाल चालवले जातात. हिंदु शाळेत गीता वाचली, तर गहजब होतो पण कॉन्व्हेंट शाळेत जबरदस्तीने बायबल वाचावे लागते ते कोणाला दिसत नाही. हिंदु मंदिरावर सरकारचा अंकुश आहे ह्याचे कारण हिंदु मंदिरातुन पैश्याचा अपहार होऊ शकतो म्हणुन भारतातली सर्व मंदिरे धर्मदाय संस्थाच्या खाली आणलेली आहेत. चर्च व दर्गाहला धर्मदाय संस्थेच्या खाली आणायची हिंम्मत सरकारला कधीच झाली नाही. हिंदुंना ह्याची ना जाणिव आहे ना खंत आहे. पण आता पिक्चर बदलत आहे.

काँग्रेसने भ्रष्टाचाराची कुरणे तयार केली, भ्रष्ट अधिकार्यांची बाबुशाही तयार केली , खासगी बँकांना नॅशनलाईज्ड करुन घेतल पण ना बँकांना जनते पर्यंत नेल ना जनतेला बँकैकडे आणल !

ब्रिटीशांनी ९० वर्षांत ९४००० किमीची रेल्वैच जाळ निर्माण केल त्यात काँग्रेसने ६५ वर्षांत फक्त १०,००० किमीची भर टाकली. विकासाची धड कोणतीही कामे केलेली नाहीत. स्वातंत्र्या पुर्वी भारत दोन्ही महायुद्धात सहभागी झालेला होता. ब्रिटीशांनी दुसर्या महायुद्धात वापरण्यासाठी शस्त्रात्रे भारतात बनवली गेलेली होती. त्या साठी भारतात १२५ च्या वर कारखाने चालु होते. अंहिंसेच्या मार्गाने चालणार्या कॉग्रेसच्या बिंडोक नेत्यांद्वारे स्वातंत्र्यानंतर हे कारखाने बंद करण्यात आले. त्याच बरोबर भारतीय आझाद सेनेला नेस्तनाबुत करण्यात आले. पुढे १९६२ च्या युद्धात भारतीय सैनिकांकडे शस्त्रेतर सोडाच घालायला बुटपण नव्हते.

अश्या असंख्य कमतरता असणार्या कॉँग्रेसल भक्कम विरोधी पक्ष कसा स्विकारावा ? मोदीं , भाजप सरकार पुढे व्यवस्थित काम करणार नाहीत म्हणुन विरोधी पक्ष म्हणुन ६५ वर्षांत पथ भ्रष्ट झालेल्या कॉँग्रेसवर विश्वास का दाखवावा?

कॉग्रेस हा कधीच विरोधी पक्ष म्हणुन काम करु शकत नाही. कारण सतत सत्येत असण ही त्यांची सवय होती. त्यासाठी ब्युरोक्रासीचा, मिडीया, एन जी ओ चा व्यवस्थीत उपयोगही त्याम्ना अवगत होता. त्या विरुद्ध भाजपा ही सतत विरोधी पक्ष म्हणुनच होती त्यामुळे त्याम्ना सरकार चालवणे जमणार नाही अशीच अटकळ सर्व बांधत होते. मोदीजींनी १५ वर्षे मुख्य मंत्री पद व गेली ५ वर्षे पंत प्रधान पद सांभाळुन ही अटकळ चुकीची आहे हे दाखवुन दिलेले आहे.

सरकारला विरोध फक्त विरोधीपक्षा कडुनच होतो आहे हे समजणे चुकीचे आहे. सरकारला कोणत्या स्तरावर कोणा कोणा कडुन विरोध होत आहे हे समजणे महत्वाचे आहे. परदेशातुन मिळालेल्या करोडो डॉलर्सचा भ्रष्टाचार, अपहार करणार्या एन जी ओ ना आपला दोन
वर्षांचा अहवाल सादर न केल्यामुळे सरकारने ह्या एन जी ओ ना बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बरेच लोकांचे हितसंबंध दुखावले गेले. प्रशांत भुषण, ईंदिरा जयसींग, तिस्ता सितलवाड सारखे लोक चवताळुन उठले. मग असे लोक सुप्रिम कोर्टा द्वारे सरकारला बराच त्रास देऊ लागले होते. एन डी टीव्ही सारखा चॅनेल तर द प्रिंट, क्वींट, वायर सारखे इंटरनेट मिडीया सुद्धा ह्याच कारणाने सरकार विरुद्ध लिहीत आहेत. शेखर गुप्तासारख्या वरिष्ठ पत्रकार सुद्धा ह्या सरकारच्या विरुद्ध उभा ठाकला कारण ह्या सरकारने ऑगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर भ्रष्टाचाराची चौकशी सुरु केलेली आणि त्यात शेखर गुप्ता विरुद्ध भक्कम पुरावा उपलब्ध झालेला आहे. भाजपाने एन डी टीव्ही सारखा चॅनेलला तर पुर्ण वाळित टाकलेले आहे. पण सर्व मिडीया पुर्वीच्या काँग्रेस सरकारच्या सपोर्टवर जगायची ती सपोर्ट सिस्टीमच ह्या सरकारने काढुन घेतली आहे. ह्या सरकार मध्ये मिडीयाचे पंतप्रधाना बरोबरचे फुकट प्रवास बंद झाले. पंत प्रधानांच्या कार्यक्रमाचे कव्हरेज करण्यासाठी पत्रकारांना स्व:ताच्या पैश्याने किंवा कंपनीच्या पैश्याने जाणे भाग पडायला लागले. तसेच अगोदर पंत प्रधाना बरोबर फुकट प्रवास करणार्या पत्रकारांना प्रवासामध्ये मिळणार्या मुफ्त दारुच्या बाटल्याचा रतिब आता कमी झाला. त्याच बरोबर पंत प्रधानांच्या व्यस्त कार्यक्रमाचे कव्हरेज करण्यासाठी पत्रकारांना पुर्ण वेळ सज्ज रहायला लागयला लागले कारण पुर्वीच्या तसल्या कार्यक्रमाचे नियोजन ईतके व्यस्त नसायचे, सकाळी कार्य क्रम असला तर संध्याकाळ , रात्र मोकळी असायची, म्हणजे भेट दिलेल्या शहराचा देशा मध्ये फिरायला पत्रकार मोकळे असत. पंत प्रधान मोदिजींचा कार्यक्रम इतका व्यस्त असतो की त्याचे कव्हरेज करण्यासाठी पत्रकारांना पुर्ण वेळ सज्ज रहायला लागयला लागले.

परदेशातुन फंड केलेले सरकारच्या प्रोजेक्टसना विरोध करणारे एन जी ओ हे असेच सरकारचे विरोधी. मेधा पाटकर ने नर्मदा प्रकल्पाला विरोध केला. विस्थापितांच्या पुर्नवसनाच्या प्रश्ना बाबत जन जागृती करण वेगळ व प्रकल्पाच्याच मुळ संकल्पने बद्दल अप प्रचार करण वेगळ. दुसर उदाहरण म्हणजे कलपक्कम ईथला अणु उर्जा प्रकल्प, ह्याला विरोध करणारे परदेशातुन मिळणार्या पैश्यावर विरोध करत होते हे चौकशी शेवटी सिद्द झाले होते.

अण्णा आंदोलन , त्या आंदोलनातुन निघालेले नवे नेते, हे जनते समोर एक चांगला पर्याय तयार होत होता. पण त्या पर्यायाचा शेव टी केजरीवाल झाला हे खुप दु:खद आहे. सरकारला धारेवर धरु शकणारे स्व:ता ईतक्या खालच्या लेव्हलला जाउ शकतात मग प्रगल्भ विरोधी पक्षाची कल्पना कशी करता येईल ?

गेल्या ७-८ वर्षांत जनता स्वःताच्या अनुभवावरुन खुप काही शिकलेली आहे.

विरोधी पक्ष वैगेरे गैर समजुती आहेत. जस जस वेळ जाईल तस तस नव्या सिस्टीम येत जातील, अंकुश हा तयार होत जाईल. पण विरोधी पक्ष नाही म्हणुन प्रचलित पद्धतीने जनतेने दिलेल्या कौलानुसार परत शपथ घेणार्या सरकारवर अविश्वास दा खवता येणार नाही !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2019 - 4:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारतातील सद्य राजकारणाची सत्य बाजू सांगणारा सुंदर प्रतिसाद.

जालिम लोशन's picture

28 May 2019 - 3:14 pm | जालिम लोशन

आकलनीय विश्लेषण. आणी निकाल.

जालिम लोशन's picture

28 May 2019 - 3:15 pm | जालिम लोशन

आकलनीय विश्लेषण. आणी निकाल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2019 - 4:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही काँग्रेसचची हार कशी काय बुवा ?! आँ, कायच्या काय हाँ, तुमचे चौराकाका !

आताच संपलेल्या काँग्रेसच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सरळ सरळ निवेदन केले गेले आले आहे की, राहूल गांधीनी या निवडणूकीत कॉन्ग्रेसला उत्तम प्रकारे नेतृत्व दिले आहे. त्यामुळे, त्यांना कॉन्ग्रेसने एकमताने सर्वाधिकार दिलेले आहेत (म्हणजे एक प्रकारे बढती दिली आहे). याशिवाय, खास रेझोल्युशन पास करून कॉन्ग्रेसने राहूल गांधींकडे खास विनंती केली आहे की, त्यांनी कॉन्ग्रेसच्या इतर सर्व पदाधिकार्‍यांनी केलेल्या कामाचे निरिक्षण करून त्यांच्या काय काय चुका झाल्या आहेत त्या त्यांच्या निदर्शनास आणून द्याव्या व त्यांच्या भविष्यातल्या कामकाजात सुधारणा करून घ्याव्या.

यासाठी, त्या रेझोल्युशनव्दारे राहूल गांधींना पक्षाची पुनर्रचना करण्याचेही सर्वाधिकार देण्यात आले आहेत.

आता बोला !

चौकटराजा's picture

25 May 2019 - 4:49 pm | चौकटराजा

कंपनी डबघाईला आली की कामगार काढले जातात एम डी तोच राहतो .. हा बजाज आटो चा अनुभव आमच्या पाठीशी आहे. एकामागून एक अशी पाच उत्पादने गाळात गेल्यावर राग आला तो कामगारांचा .

चौकटराजा's picture

25 May 2019 - 4:55 pm | चौकटराजा

काहीना आठवत असेल एकदा बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनेचा राजीनामा दिला होता . त्यावेळी एकाने टिप्पणी केली ... खुंटा हलवून तो पक्का असल्याची खात्री बाळासाहेबांनी केली इतकेच !

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 May 2019 - 4:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

"लोकशाही तत्वावर चालणारा भारतीय पक्ष" अशी जनतेची दिशाभूल करायचे थांबवा, (एका कॉन्ग्रेसच्याच पदाधिकार्‍याने म्हटल्याप्रमाणे) "फॅमिली लिमिटेड कंपनी" आहे हे सत्य कबूल करा आणि मग काहीही गोंधळ घाला. :)

चौकटराजा's picture

25 May 2019 - 4:45 pm | चौकटराजा

भाऊ तोरसेकर हे मुळात आर्किटेक्ट . ते आवड म्हणून पत्रकार झाले. मोदी विरूद्ध अशी भारत देशात सर्व भाषिकांत पत्रकारांची एक गॅंग आहे . कुमार केतकर, भटेवरा ,अकोलकर,,प्रसन्न जोशी , समर खडस हे त्यातील काही सांबा ! जाने २०१९ मध्ये तोरसेकर यांनी पुस्तक लिहिले "पुन्हा मोदीच का ..? " वरील गॅंग ने त्यांची भरपूर टिंगल केली असणार .त्या पुस्तकाच्या मराठी इंग्रजी हिंदी मध्ये ४ महिन्यात ५ आवृत्य्या निघाल्या ! राफेल चा मुद्दा राहुल ने का निवडला तर त्याचे वडील मिस्टर क्लीन या इमेजला सुरुंग लागला म्हणून .असाच सुरूंग फकीर मोदी यांना लावला येईल असे राहुलला वाटले असावे हा तर्क प्रथम मांडला तो तोरसेकर यांनी.

माझ्या मते" विरोधी पक्ष " ही अतिशय हिडीस संज्ञा भारतीय लोकशाहीत आहे. त्यास फारतर पर्यायी पक्ष असे नाव हवे. झालेय काय की प्रचलित सरकारला श्रेय मिळू नये म्हणून सरकारी विधेयकाची वाट लावण्याचा धंदा संसदेत आतापर्यंत चालू होता. वास्तविक रेरा , जी एस टी यांची चर्चा अनेक वर्षांपासून चालू होतीच . पण मग त्यात आडता कसा घालायचा हे आपले काम आहे असे विरोधक मानतात मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. हा विकृत धडा राजकारणात नगरसेवक झाल्यापासून जो मिळतो तो एखादा राष्ट्रपती झाला तरी त्याची ही वाईट खोड मग जात नाही. जो पर्यंत भारत देशात पक्षीय लोकशाही आहे तो पर्यंत ही विकृती कायम राहाणार .अशी लोकशाही मान्य नसणारा माझ्या तरी पाहण्यात एकच माणूस आहे तो म्हणजे " आण्णा हजारे "

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 May 2019 - 12:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन आवडले. इतिहासाचा धावता धांडोळा आणि सध्याची परिस्थिती याचं थोडक्यात पण सध्याच्या जयजय काराच्या लेखनकाळात वाचावं वाटावा इतका तटस्थपणा लेखनात नक्कीच आहे. आभार. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली गेली नाही असे वाटते. पंतप्रधानांची भाषणे ऐकल्यावर प.नेहरु ते राजीव गांधी आणि इतर पक्षावर टीका करण्यातच जास्त वेळ त्यांनी घातला अर्थात लोकांना काय हवंय हे त्यांनी उत्तम हेरलं आहे, बेकारी, महागाई, भ्रष्टाचार, ढासळलेली आर्थिक स्थिती, हे मुद्दे नव्हते. अर्थात सगळं अलबेल असल्यामुळे हे मुद्दे घ्यायचेच कशाला असे उजव्या बाजूला बसलेल्यांना वाटणे स्वाभाविक आहे. गाजला तो उथळ राष्ट्रवाद आणि छुपा हिंदुत्ववाद त्यानेच इतकी मतं घेतली असे वाटायला लागले. अर्थात हे माझं व्यक्तिगत मत आहे.

बाकी, लोकांनी जर संसदीय पद्धती ऐवजी कोणत्याही पद्धतीने हुकुमशाही सारखंच नेतृत्व हवं असेल तर आपण लोकशाहीमधून निवडलेल्या ४२ % टक्केवारी (आकडा विसरु शकतो) मतदान घेऊन आलेल्या सरकारचं स्वागत करायला पाहिजे. विद्यमान सरकार विरोधात धुसमुस होतीच सरकार येईल पण मताधिक्य कमी असेल अशी वाटणारी जनता अजूनही या अनपेक्षित धक्क्यातून सावरली नाही असे वाटते.

-दिलीप बिरुटे

पंतप्रधानांची भाषणे ऐकल्यावर प.नेहरु ते राजीव गांधी आणि इतर पक्षावर टीका करण्यातच जास्त वेळ त्यांनी घातला

हे थोडे एकांगी विधान आहे. विरोधी पक्ष सुद्धा, त्यांच्या विचारवंत सेनेसोबत मोदी, शहा कसे वाईट आहेत, चोर आहेत इतकेच सांगत होते. कोणीही भारताविषयी बोलले नाही, भारतीय जनतेसाठी त्यांच्याकडे काय विकास आराखडा आहे, हे कोणीही सांगितले नाही. मुळात भारतीय जनतेचे सुख, भलाई आणि देशाचा विकास ह्याची त्यांना काहीही पडलेली नाही, केवळ सत्ता हस्तगत करणे हाच एक कलमी कार्यक्रम होता, हे त्यांच्या वागण्या बोलण्यातून त्यांनी अतिशय ठळकपणे जाणवून दिले, आणि त्यामुळे त्यांना हार पत्करावी लागली. मोदी किंवा शहा, ह्यांच्यामुळे नाही. जितक्या लवकर विरोधकांना हे समजेल आणि उमजेल, तितके बरे.

अजूनही मोदींनी लोकांना कशी भुरळ घातली आणि म्हणून विरोधक हरले, ह्याचेच तुणतुणे लावून बसल्यास कठीण आहे. ह्यातून विरोधक जनमानसाच्या विचारशक्तीवर विश्वास ठेवत नाहीत, हेच चित्र तयार होते. सर्व सामान्य लोकांनी त्यांच्या मताला किंमत ना देणाऱ्या लोकांना का निवडून द्यावे?

तेजस आठवले's picture

28 May 2019 - 5:17 pm | तेजस आठवले

+1

राघव's picture

28 May 2019 - 8:20 pm | राघव

+२

लोकांनी जर संसदीय पद्धती ऐवजी कोणत्याही पद्धतीने हुकुमशाही सारखंच नेतृत्व हवं असेल तर

हा सर्वसामान्य जनतेच्या निवडीचा सरळ सरळ अपमान आहे.

लोकांना हुकूमशाही नेतृत्व हवे आहे हि आपली गैर समजूत आहे.

असे असते तर श्रीमती इंदिरा गांधी यांचा पराभव झाला नसता.

आपले मत तेच बरोबर आणि सामान्य जनता मूर्ख आहे असा ग्रह करून घेणे हा दांभिकपणा आहे.

१७व्या लोकसभेच्या निवडणुकीत अभुतपुर्व पराभवा नंतर !!
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन आपला राजीनामा आज कॉग्रेस वर्कींग कमिटीला सादर केला. राजीनाम्याच नाटक तस २३ तारखे नंतरच सुरु झालेल. आज ते प्रत्यक्षात घडल !!
राहुल गांघी पेक्षा जास्त योग्य नेता काँग्रेस मध्ये नसल्याचे कारण दाखवुन
कॉग्रेस वर्कींग कमिटीने राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळुन लावला !
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी पुर्ण काँग्रेसला राहुल गांधी पेक्षा जास्त योग्य नेता सापडु नये ह्यातच पुढे येणार्या काळाची चाहुल आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 May 2019 - 11:02 am | ज्ञानोबाचे पैजार

खांग्रेसच्या पराभवासाठी राहुल गांधी जबाबदार नसून पराभवाची जबबदारी सर्वस्वी मोदी आणि शहा यांच्या कडे जाते. मग राहुलने राजिनामा का द्यावा?
पराभवाची नैतीक जबाबदारी घेउन मोदी आणि शहांनी राजीनामा दिला पाहिजे, त्यासाठी बिचार्‍या राहुल वर दबाव आणू नये.
असे आमचे पष्ट मत आहे.
पैजारबुवा,

नाखु's picture

29 May 2019 - 11:28 am | नाखु

अर्थात ह्या दुकलीनेच लेकराचे हाल केले, कायमच्या परंपरागत जहागिरी अमेठीतून पराजय केला,अजून वीस वर्षे दिली असती तर युवराजांनी अमेठीचे अमरस्टॅडम करुन दिले असते यात तिळमात्र शंका नाही...
नाखु बिनसुपारीवाला

भंकस बाबा's picture

29 May 2019 - 11:59 am | भंकस बाबा

भारताचे भविष्य आहे, अशी पावती खुद्द भारताचे तारणहार लालू यादव यांनी दिली आहे.

भंकस बाबा's picture

29 May 2019 - 12:01 pm | भंकस बाबा

भारताचे भविष्य आहे, अशी पावती खुद्द भारताचे तारणहार लालू यादव यांनी दिली आहे.

मराठी_माणूस's picture

29 May 2019 - 3:16 pm | मराठी_माणूस

भाजपच्या यशात अरुण जेट्ली, सुषमा स्वराज, नितिन गडकरी, देवेंद्र फडणवीस इत्यादींचे काहीच योगदान नाही का ?
का ईतिहासाची पुनरावृत्ती , जशी पुर्वी बरुआ ने केली होती ईंडीआ इज ......

मराठी_माणूस's picture

2 Jun 2019 - 5:39 pm | मराठी_माणूस

आजच्या लोकसत्तेच्या खालील पानावर , पडसाद अंतर्गत सुखदेव काळे यांच्या पत्रामधे काहीसे असेच मत
https://epaper.loksatta.com/2181095/loksatta-mumbai/02-06-2019#page/20/2

सुबोध खरे's picture

29 May 2019 - 6:24 pm | सुबोध खरे

दुष्प्रचार फक्त "चौकीदार चोर आहे" असाच का झाला होता?

जेटली भ्रष्ट आहेत,

गडकरी/ सुषमा स्वराज अकार्यक्षम आहेत
किंवा
फडणवीस चोर आहेत

असा का झाला नव्हता.

या प्रश्नांची उत्तरे शोधा म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

कांग्रेसात गांधी कुटुंबिय ठेवणे त्यांची मर्जी.
असली कांग्रेस नको ही मतदारांची मर्जी.

स्वातंत्र्य पूर्व कॉंग्रेस चे वारसदार समजणे ही काॉ गुलामांची खुदगर्जी आणि गुर्मी ही

सुस्पष्ट आणि थेट वाचकांची पत्रेवाला नाखु