सजणा...दूर व्हा ना....दूर व्हा ना.... जाऊ द्या... सोडा... जाऊ द्या

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in जनातलं, मनातलं
4 Nov 2008 - 11:44 pm

नुकताच झी मराठी चॅनलवरील "सारेगमप लिटिल चॅम्प्स" हा लहान शाळकरी मुलांच्या संगीत स्पर्घेचा कार्यक्रम पाहिला.

त्यात कुमारी आर्या आंबेकर या चिमुरड्या शाळकरी मुलीने ग. दि. माडगूळकरांची

सजणा‌‌‍ऽऽऽऽ दूर व्हा ना‌‍ऽऽऽऽ दूर व्हा नाऽऽऽ जाऊ द्याऽऽऽ सोडा‌ऽऽऽ, जाऊ द्याऽऽऽऽऽ

ही लावणी सादर केली आणि तिच्या गाण्याने तमाम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रेक्षकच नव्हे तर परीक्षकसुद्धा तिचे गाणे ऐकून "हैराण" झाले. तिचा आवाज, नज़ाकत, सादरीकरण सारे काही केवळ अप्रतिम होते. तिने या लावणीने तमाम मराठी रसिकांच्या "कानाचे पारणे" फेडले. अर्थात तिला सर्वाधिक गुण या भागातील सादरीकरणाचे मिळाले, हे सांगणे न लगे.

तिचे गाणे संपल्यावर आम्ही इतके भारावलो होतो की आम्ही आमच्या गुगल निरोपकावरील स्टेटस मेसेजमध्ये ते गाणे लिहिले होते. आमचे स्नेही श्री. प्रकाश घाटपांडे तेव्हा ऑनलाईन होते. त्यांच्याशी तिच्या परफॉर्मन्सबद्दल चर्चा झाली. घाटपांडे हे देखिल गदिमांचे चाहते. ते देखिल तिचे गाणे ऐकून आमच्यासारखेच "वेडे" झाले होते.

कुमारी आर्या आंबेकर हिचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी तिला आमच्या लाख लाख शुभेच्छा.

तिच्या पत्रिकेतील पंचमस्थानाचा उपनक्षत्रस्वामी नवम, दशम आणि एकादश स्थानाचा बलवान कार्येश असो व तिला पुढील महादशा नवम, दशम व एकादश स्थानांशी संबंधीत येऊन तिची कीर्ति, नावलौकिक देशभर होवो अशा ज्योतिषशास्त्रीय शुभेच्छांसह.....

आपला,
(मंत्रमुग्ध) धोंडोपंत

संगीतअभिनंदन

प्रतिक्रिया

शाल्मली's picture

5 Nov 2008 - 12:44 am | शाल्मली

मी पण आत्ताच तो कार्यक्रम पाहिला. आणि तेव्हापासून तेच गाणं गुणगुणत आहे. :)
मलाही ते गाणं फार आवडते. आर्यानेही ते फारच मस्त म्हणले.

<<कुमारी आर्या आंबेकर हिचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी तिला आमच्या लाख लाख शुभेच्छा. <<
शुभेच्छा !

माझे हे आवडते गाणे आहे. आंतरजालावर मी अनेक दिवस हे गाणे शोधत आहे. पण मला कुठेही मिळत नाहीये.
कुणाला माहीत असल्यास/मिळाल्यास कृपया त्याचा दुवा द्यावा.

--शाल्मली.

विसोबा खेचर's picture

5 Nov 2008 - 12:23 am | विसोबा खेचर

आर्याचं मनापासून कौतुक आणि तिला पुढील वाटचालीकरता शुभेच्छा...!

फक्त एकच गोष्ट राहून राहून वाटते ती अशी की 'यश' हा प्रकार हल्ली मुलांच्या फार चटकन डोक्यात जातो आणि पुढील प्रगती खुंटते. आर्याच्या बाबतीत तसं होता कामा नये...!

हल्ली हजारोंची बक्षिसं काय अन् काय काय! छ्या..! साला, आमच्या बाबुजींचे तर खायचेदेखील वांधे होते..!

आमचे भीमण्णा म्हणतात,

"की कुणीही गाऊ लागला/लागली की किमान पहिली १० वर्ष त्याला फक्त गाऊ द्यावं! त्यावर बरेवाईट, कुठलेच अभिप्राय देऊ नयेत.. परंतु हल्ली जरा कुठे एखादा राग कुणाला गुणगुणता येऊ लागला की लगेच त्यावर अग्रलेख येतो..!" :)

असो,

आपला,
(जुनाजाणता) तात्या.

विनायक प्रभू's picture

5 Nov 2008 - 9:54 am | विनायक प्रभू

लाख्मोलाचे बोललात तात्या.
एकदम सहमत

टारझन's picture

5 Nov 2008 - 6:31 pm | टारझन

फक्त एकच गोष्ट राहून राहून वाटते ती अशी की 'यश' हा प्रकार हल्ली मुलांच्या फार चटकन डोक्यात जातो आणि पुढील प्रगती खुंटते. आर्याच्या बाबतीत तसं होता कामा नये...!
आहो ... यश डोक्यात जाणं, प्रगती होणं/नं होणं ,आंघोळीला गेलं की पाणी संपणं, आपल्यालाच माशी मेलेला पाव मिळणं किंवा आपल्याच भेळमधे खडे येणं.... या सर्व गोष्टी पंचम स्थानात गुरू बळकट , मंगळ बुध च्या बरोबर फिरायला गेला असेल तर , किंवा शनी जुलाबाने अष्टम स्थानात कमकुवत पडला असेल तरच होणं शक्य आहे ... जगात काय होते काय नाही ते सगळे आपले गुरू भाउ, शनी काका, राहू-केतु मामा , मंगळ सासरे आणि इतल नातेवाईक डिसाइड करतात ...

अवांतर : आर्याचं कौतुक करावं की तिच्या ग्रहदशेंच ?

--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा

पक्या's picture

5 Nov 2008 - 9:23 am | पक्या

आर्याच्या आवाजाचं कौतुक आणि तिला पुढील वाटचालीकरता शुभेच्छा...!
तात्यांशी सहमत.
आणखी एक मला खटकणारी गोष्ट म्हणजे अशी शृंगारिक गाणी लहान मुलांकडून गावून घेतली जातात. अशा लहान वयात त्या मुलांना त्या गाण्यातील अर्थ कितीसा कळत असेल? लहान मुलांच्या नृत्यांच्या स्पर्धेत ही हेच घडते. लहान वयात अभिप्रेत नसलेले हावभाव आणि अंगविक्षेप नाचताना स्पर्धक मुले करतात. मुलांचे कौतुक होते खरे पण ते कितीसे योग्य आहे?

प्रकाश घाटपांडे's picture

5 Nov 2008 - 7:20 pm | प्रकाश घाटपांडे

पक्या भौ
गाण्याचा अर्थ पुर्ण कळावा अशी अपेक्षा लहान मुलांकडून करावी असे नाही. अर्थ पुर्ण समजल्याशिवाय गाणे गावे असेही नाही. परभाषेतील गाणी गाताना त्या भाषेचा बाज हा गायका कडून राखला जात असला तरी तो स्वरांच्या माध्यमातुन. निरक्षर जसे अक्षर चित्रलिपी म्हणुन वाचतात तसे आहे ते. कौतुक करावेसे वाटते. कौतुक होते. अंगविक्षेप हा देह बोली आहे. हल्लीची लहान मुले अकाली तरुण झालेली आहेत.
योग्य अयोग्य सापेक्ष आहे.
पक्या घाटपांडे

झकासराव's picture

5 Nov 2008 - 9:41 am | झकासराव

काल पाहिला मी हा कार्यक्रम.
खरच अप्रतिमच म्हणाली ती हे गाण.
:)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

यशोधरा's picture

5 Nov 2008 - 6:21 pm | यशोधरा

पक्या, तुमच्याशी सहमत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, लहान मुले अशी नाचताना वा गाताना पालक प्रोत्साहन देताना दिसतात. खास करुन लहान मुले वयाला न शोभणारे हावभाव आणि अंगविक्षेप करताना पाहून आणि त्यांना प्रोत्साहन मिळताना पाहून खूपच वाईट वाटते.

आजानुकर्ण's picture

8 Nov 2008 - 8:39 am | आजानुकर्ण

http://in.youtube.com/watch?v=8vuuaQ5bVHk&eurl=

काय गाणं म्हटलंय... क्या बात है.... क्या बात है.... क्या बात है.....

आपला
(मंत्रमुग्ध) आजानुकर्ण

कृपया इथे यूट्यूब चित्रफिती चकटवू नयेत, त्यामुळे आय ई वापरणार्‍या मंडळींना त्रास होतो. युट्यूबचे केवळ दुवेच द्यावेत...!

-- आणिबाणीचा शासनकर्ता.

अनामिका's picture

8 Nov 2008 - 4:26 pm | अनामिका

आर्याचे कौतुक करायला शब्द थिटे पडतायत्.इतक्या लहान वयात गाण्याची इतकी समज असणे दुर्मिळ गोष्ट आहे.
आर्याचे मनापासुन अभिनंदन्.आणि उत्तरोत्तर तिच्या प्रगतिचा आलेख असाच चढता रहावा हीच सदिच्छा!
गाण ऐकल्यापासुन मुळ गाण आंतरजालावर शोधायचा प्रयत्न केला.
आणि अखेरीस इथे सापड्ले. < http://www.gadima.com/chaitraban/html/lavnya.php>

"अनामिका"
अनुदिनी-
http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/

शाल्मली's picture

9 Nov 2008 - 3:59 am | शाल्मली

तुम्ही दिलेल्या दुव्यावर जाऊन लगेच मूळ गाणे ऐकले.
मी पण गेले काही दिवस हे गाणे शोधत होते. आणि अखेरीस ऐकायला मिळाले :)
धन्यवाद.
--शाल्मली.