टिंग्डि टिडिडिडि
टिंग्डि टिडिडिडि
टिंग्डि टिडिडिडि
टिंग्डि टिंग्डिटिंग.
.
1994 सालची गोष्ट आहे. अर्थात हे सर्व समजण्याचं वयही नव्हतं तेव्हा. फारतर चवथ्या इयत्तेत असेन. आमची आवड त्याकाळी 'हम आपके है कौन' टाइप सिनेमा पुरती मर्यादित होती. आणि आवडते गाणे माइ नी माइ. (किंबहुना तेच दाखवले जात असल्यामुळे आमचा व्यासंगही इतका विस्तृत नसेल. 'अ आ ई, उ ऊ ऊ, मेरा दिल ना तोडो' वगैरे निषिद्ध होतं तिथे हे काय?)
.
पण तारुण्यात प्रवेश केला आणि ह्या गाण्याची महती समजली.
.
टिंग्डि टिडिडिडि
टिंग्डि टिडिडिडि
टिंग्डि टिडिडिडि
टिंग्डि टिंग्डिटिंग
.
ए $$ हे $$ आ $$ हा $$ हा $$ हा
हे $$ हे $$ आ $$ हा $$ हा
.
टिंग्डि टिडिडिडि
टिंग्डि टिडिडिडि
टिंग्डि टिडिडिडि
टिंग्डि टिंग्डिटिंग
.
हा रिदम ऐकल्यावर ज्याच्या अंगावर शहारे-रोमांच-काटे येत नाहीत असा माणूस विरळा.
.
पिवळ्या-करड्या रंगाच्या अर्धपारदर्शक शिफॉन साडीत, भरलेल्या अंगाची, उंचपूरी, सौंदर्य-मादकता यांचा मिलाफ असलेली, कमनीय शरीराचं देणं लाभलेली, पहिल्या पावसाच्या सरिंनी भिजलेली, कामातुर रविना डोळ्यासमोर येत नसेल तर नवल!
.
तब्बल 25 वर्षे. दोन तप झाले. तरीही काल-परवा ऐकल्यासारखं वाटतंय. अगदी परिपूर्ण गाणं आहे हे. गेयता, नर्तनमूल्य व प्रणय या सर्वांनी ओतप्रोत भरून, ओथंबुन वाहणारा प्रपात.
गाण्यातील शब्द-अर्थ-लय एकदम सुसंबद्ध आहे. संगीतकाराने चढत्या चालीचा केलेला वापरही अप्रतिम.
*ए-हे-आ-हा-हा-हा* ह्या मार्दवात अलकाने आणि त्याचवेळी आपल्या बोलक्या डोळ्यांनी रविनाने कमाल केली आहे. हृदयाची सतत वाढत चाललेली धडधड जाणवणारी. त्यावर कडी केली आहे नृत्यदिग्दर्शकाने. पावसाचा, तिच्या तलम वस्त्राचा, भिजलेल्या केसांचा अन कमनीय बांध्याचा केलेला वापर.
उफ़्फ़्फ़. काय सांगु अन किती सांगु!!
.
त्यावर कहर म्हणजे रांगडा मर्द अक्षयकुमार. तो ज्या सहजतेने तिला कवेत घेतो अन गिरकी मारतो, केवळ अशक्य. अक्षयचं लाजणं देखील सूचक-अर्थपूर्ण आहे.
.
अंधाऱ्या जागेत फटीतुन झिरपत येणाऱ्या प्रकाशाच्या कवडशांचा, टपकणाऱ्या थेंबांचा, तुटक्या-मोडक्या जिन्याचा आणि सर्वात कहर म्हणजे टेरेसवरील जागेचा, सैरभैर वाऱ्याचा, अमर्याद पावसाचा अन दोन सचेतन कायांचा उस्फुर्त संवाद दिग्दर्शकाने टिपला आहे.
.
रविना ही काही त्याकाळची आघाडीची नटी नव्हती किंवा तिच्या अभिनयाच्या जोरावर (माधुरी-जूही-श्रीदेवी प्रमाणे) सिनेमे हिट करून देत नव्हती. एक मल्टीस्टारर (नसीर-परेश-सुनिल-अक्षय) सिनेमा, त्यात असावी म्हणून घेतलेली नटी.
.
पण जे व्हायचं तेच झालं. एक अजरामर कलाकृती घडली. खुद्द डायरेक्टरने देखील विचार केला नसेल इतकं जुळून आलेलं समीकरण आहे हे गाणं.
.
ह्या गाण्याची फ्रेम-न-फ्रेम, अगदी अक्षय छत्री हातात धरून जिना चढून वर येताना ते रविना धुंद होऊन जलपरीसारखी टेरेसवरील पाण्यात लोळत असेपर्यंत, कोरल्यागत आठवते. बीट-न-बीट, शब्द-न-शब्द, रविनाची अदा-न-अदा लक्षात आहे. मनात घर करून बसले आहे.
.
मला तरी हे गाणं *वन्स इन अ डिकेड* टाइप वाटते. ह्या संपूर्ण टीमसाठी, अलका याग्निक -उदित नारायण - आनंद बक्षी - विजु शाह - राजीव राय - अक्षय कुमार आणि स्पेशली रविनासाठी एकदा बघाच.
.
#रसग्रहण #मोहरा #रविना #टिपटिप
- काळे पुष्पक
प्रतिक्रिया
5 Apr 2019 - 2:52 pm | शाली
कोणतं गाणं आहे हे? खरच नाही समजले.
5 Apr 2019 - 2:52 pm | वपाडाव
https://m.youtube.com/watch?v=PAQYnne4Yn4
5 Apr 2019 - 2:56 pm | शाली
ओह! टिप टिप बरसा पाणी. माफ करा, लक्षात नाही आले. लिहिताना तुमच्या डोक्यात ऱ्हिदम असणार, वाचताना माझे डोके रिकामे होते. :)
5 Apr 2019 - 3:01 pm | गवि
मान्य आहे, पण तुम्ही
"भरो, मांग मेरी भरो,
करो, प्यार मुझे करो
अंग से अंग लगादे
प्रेमसुधा बरसादे (चुभूदेघे)
दासी तेरी प्यासी रही कितने जनम .. "
हे गाणं पाहिलं नाहीत का?
मकु आहे त्यात.
5 Apr 2019 - 4:38 pm | वपाडाव
पाह्यलंय. पण ते तितकं श्रवणीय नाही.
नुसतं मनच नाही तर हात-पाय-मेंदु थिरकायला लावणारं गाणं आहे हे!
5 Apr 2019 - 3:07 pm | जेम्स वांड
चुराके दिल मेरा मदी असलेले लटकेझटके अलगच
5 Apr 2019 - 4:09 pm | चौथा कोनाडा
भारी गाणं आहे, शृगांरिक ! मादकता खल्ल्लास करणारी !
5 Apr 2019 - 5:23 pm | मराठी कथालेखक
रविनाला पुर्वी सुंदरच दिसायची .. तिच्याकरिता खास बघावं असं गाणं : परंपरामधलं "फुलों के इस शहर मे"
टीप टीप बरसाच्या तुलनेनं हे गाणं फारसं लोकप्रिय नाही पण तरी रविना आवडत असेल तर एकदा नक्की बघा.
नंतर रविना अधिक बारीक झाली, खराब दिसू लागली.
5 Apr 2019 - 5:25 pm | राजेंद्र मेहेंदळे
गाण्याचे म्हणतोय मी, रविनाचे नाही :)
6 Apr 2019 - 5:17 pm | वपाडाव
जो जे वंछिल तो ते लाहो।
आम्ही दोन्ही गोष्टी त्याच समरसतेने करू.
5 Apr 2019 - 5:54 pm | प्रसाद गोडबोले
सुंदर !
बाकी जुने कलाकार मिपावर परतत आहेत हे पाहुन आनंद झाला :)
5 Apr 2019 - 8:10 pm | अमरेंद्र बाहुबली
छान गाणं. 4 वर्षा आधी मी कॉलेज ला बस मध्ये जायचो. त्यावेळी बस ड्रायव्हर काका दोन गाणे पुन्हा पुन्हा वाजवायचे. त्यात हे एक टीप टीप बरसा पाणी. आणी दुसरं मेरा दिल जीस दिल पे फिदा है. एक दिलरुबा है.
6 Apr 2019 - 5:04 pm | वपाडाव
आपल्या आठवणी जागवल्या त्यानिमित्ताने.
प्रवासाचा शिण क्षणार्धात गायब होत असेल ह्या गाण्याने.
5 Apr 2019 - 8:33 pm | ज्ञानोबाचे पैजार
त्याचे यथार्थ वर्णन केले आहे. पहिल्यांदा "टिंग्डि टिडिडिडि" वाचून काहीच कळात नव्हते पण
पिवळ्या-करड्या रंगाच्या अर्धपारदर्शक शिफॉन साडीत, भरलेल्या अंगाची, उंचपूरी, सौंदर्य-मादकता यांचा मिलाफ असलेली, कमनीय शरीराचं देणं लाभलेली, पहिल्या पावसाच्या सरिंनी भिजलेली, कामातुर रविना डोळ्यासमोर येत नसेल तर नवल!
हे वाचल्यावर अक्खे गाणे कानात वाजायला लागले.
त्याचे एक भ्रष्ट व्हर्जन खाली पहा....८९ लाख लोकांनी हे गाणे पाहिले आहे हे पहाताना लक्षात ठेवा
दुसरा हा व्हिडीओ पण पहा...
हे अजून एक समुहनृत्य
हा शेवटचा अगदी छोटासा व्हिडीओ पहाच..
अजून दोन तीन आहेत पण ते इकडे देता येणार नाहित
पैजारबुवा,
6 Apr 2019 - 11:37 am | आनन्दा
दांडगा व्यासंग बुवा तुमचा..
बाकी चौथा विडिओ व्ही एफ एक्स आहे असे वाटतेय मला.
मुळात तो डान्स तितका चांगला नाही.
6 Apr 2019 - 11:49 am | अभ्या..
त्या चौथ्या गाण्यात व्हिएफएक्स नाही आणि ते करण्याच्या लायकीचे पण नाही. राघव जुयाल ने केलेल्या ह्याच गण्यावरच्या डान्सची भ्रष्ट नक्कल आहे तो डान्स.
आजकाल यु ट्युबावरच्या नवीन डान्सच्या त्याच त्याच टिपिकल स्टेप्स पाहून गोविंदाचे जुने डान्स बघितलेलं बरं असे वाटू लागलंय.
6 Apr 2019 - 4:59 pm | वपाडाव
त्या कॅनडातील पोरीने साडी-गाणे-लोकेशन-स्टेप्स सर्व व्यवस्थित निवडले आहे. पण, पुन्हा, अर्थात जे रविना २५ वर्षापूर्वी करून गेली ते हिला अजुन २५ वर्षे तरी जमणे नाही. असो. आपण विस्तृत प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
6 Apr 2019 - 6:20 am | तुषार काळभोर
एकदम कडक गाणं!!
रविनाची म्हणून आवर्जून पाहतो अशी अजून दोन गाणी. पत्थर के फुल मधली.
कधी तू छलिया लगता है आणि मै ढुंढताही रहा.
6 Apr 2019 - 5:07 pm | वपाडाव
हो. ह्या दोन्ही गाण्यात ती विलक्षण खेळकर आणि बालिश आहे. म्हणजे दोघेही. राजकपूर छाप गाणी असल्याने ती वेगळ्या धाटणीची आहेत. पण दोन्ही गाणी ठेका घ्यायला लावतात व कर्णमधुरपण आहेत.
6 Apr 2019 - 5:19 pm | चौथा कोनाडा
पैलवान , ही दोन्ही गाणी क्लासच आहे. गोगोड्ड आणि मधाळ ! आपुन बी फॅन हय या गाण्यांचे !
6 Apr 2019 - 10:34 pm | प्रमोद देर्देकर
हया तुम्ही तिचं अजून एक अजरामर गाणं विसरता आहात
कोणालाही या सहज स्टेप्स घेवून नाचता येईल
किसी डिस्को में जाये किसी हॉटेल में खाये
अहाहा अजूनही एकतो तर पाय थिरकतात.
9 Apr 2019 - 9:49 pm | वपाडाव
गोविंदा म्हणजे वेगळं विश्व आहे. त्यासोबत फक्त दोन अभिनेत्री शोभल्या. रविना त्यापैकी एक.
आणि या दोघांची केमिस्ट्री केवळ कमाल.
9 Apr 2019 - 10:28 pm | तुषार काळभोर
नीलम?
10 Apr 2019 - 10:03 am | ज्ञानोबाचे पैजार
निलम बरोबर त्याने त्याच्या करियरची सुरुवात केली. त्यांनी बरेच सिनेमे केले
त्यांचे गाजलेले चित्रपट लव्ह ८६, हत्या, खुदगर्ज,
गोविंदा आणि करिष्मा कपूर ही जोडी सुध्दा सुपरहिट होती. अनेक यशस्वी सिनेमे आहेत या दोघांचे.
पटकन आठवणारे म्हणजे हिरो नं १, राजाबाबू, साजन चले ससुराल, कुली नं १, हसिना मान जायेगी, खुद्दार
पैजारबुवा,
8 Apr 2019 - 11:32 am | लई भारी
मला वाटलं मीच एकटा फ्यान हाय वाटत ह्या गाण्यांचा :D
आणि अर्थात टिप-टिप बद्दल काय बोलणार!
6 Apr 2019 - 10:49 am | वकील साहेब
लेखाच्या सुरूवातीच ते
टिंग्डि टिडिडिडि
टिंग्डि टिडिडिडि
टिंग्डि टिडिडिडि
टिंग्डि टिंग्डिटिंग.
दूरदर्शनच्या बातम्यांच्या सुरु होण्या अगोदर जी धून वाजायची त्या धूनची आठवण काढून काही लिहिलंय की काय अस वाटल होत. :) :)
6 Apr 2019 - 11:51 am | उगा काहितरीच
परफेक्ट ! हेच वाटलं होतं.
6 Apr 2019 - 5:09 pm | वपाडाव
आयोव. हे तुम्ही म्हणालात तेव्हा आजमावले. खरच असे सुद्धा ऐकु येते. तुमच्या बाजूने विचार केला तर.
6 Apr 2019 - 11:51 am | अभ्या..
एकच लंबर, वपु लिहू लागले.
ह्याच फ्लो मध्ये ते आपले सात समुदर पार मैं तेरे पिछे पिछे येऊ दे की,
सोबत ती देरीमिल्कच्या सासुसून स्पेशल परफॉर्मन्स सहित.
6 Apr 2019 - 5:15 pm | वपाडाव
हा "विश्वात्मा" सिनेमापण राजीव राय ह्यांचाच.
त्या आधी "त्रिदेव"मध्ये तिरछी टोपीवाले गाणं. ते ही ह्यांचं.
वेळ काढून लिहिन. टिप टिप सारखं उस्फूर्त नाही येतए.
6 Apr 2019 - 12:36 pm | कुमार१
अलका याग्निक -उदित नारायण - आनंद बक्षी - विजु शाह - राजीव राय - अक्षय कुमार आणि स्पेशली रविनासाठी एकदा बघाच. >>>> +१
मस्तच...
6 Apr 2019 - 6:39 pm | ऋतुराज चित्रे
दक्षिणेकडील मिड नाईट साँग्ज च्या कार्यक्रमाला ह्याच गाण्याच्या रिदम वापरला आहे.
6 Apr 2019 - 10:56 pm | गवि
रविना सर्वाधिक गोड दिसली ती "अंदाज अपना अपना"मध्ये.
(आणि माधुरी "दिल" मध्ये)
7 Apr 2019 - 6:42 pm | गामा पैलवान
वपाडाव,
गाणं बघितलं तूनळीवर. गाण्याचे बोल 'टिपटिप बरसा पाणी' पेक्षा 'धुवांधार बरसा पाणी' हवे होते. छताला पडलेल्या बारक्याशा भोकशातनं पाणी पडून रवीना इतकी ओलीचिंब होते की वरच्या उघड्या गच्चीवर गेल्यावर काय होणार त्याचा अचूक अंदाज येतो. तसंच पार्श्वभागी दाखवलेल्या गगनचुंबी इमारतींवर पाण्याचा मागमूसही दिसंत नाही.
एकंदरीत पराकोटीच्या विरोधाभासांनी भरलेलं गाणं आहे. नेमकं म्हणूनंच ते प्रेक्षणीय ठरलं आहे. टिपटिप म्हणता खरोखरीचे दोनचार शिंतोडेच जर रवीनावर उडवले असते तर ते तितकसं रोचक झालं नसतं.
आ.न.,
-गा.पै.
9 Apr 2019 - 5:40 pm | वपाडाव
असलं अलंकारिक गाणं! अन भिजलेली रविना सोडून मागच्या बिल्डिंगा काय बघत बसले हो तुम्ही! हट्ट.
.
पैलवान कसा रग्गेल अन रंगेल हवा! आम्ही निरखुन घेतो डोळंभरून!
तुम्ही दळा त्या बिल्डिंगाचं दळण!
8 Apr 2019 - 12:12 pm | गवि
या गाण्याची ट्यून मात्र चोरलेली आहे. हे अनेकांना माहीत असेलच.
डॉ. अल्बानचं मूळ गाणं इथे उल्लेखणं टाळतो.
9 Apr 2019 - 5:34 pm | वपाडाव
हरकत नाही. त्यावेळी अनु मलिक एकटा चोर आहे असे माहिती होते. आता दोघे आहेत असे समजु.
11 Apr 2019 - 5:49 pm | चौथा कोनाडा
"टीप टीप होने लगी, जादू चलने लगे" या जम्पिंगजॅकच्या गाण्यावर त्यावेळी बरेच दिवाने झाले होते.
खास या गाण्यासाठी सिनेमा वारंवार पाहायचे. माझ्या गावाततर पडद्याआवर पैसे ही फेकायचे !