विप्रंना एक प्रश्न...

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in काथ्याकूट
4 Nov 2008 - 2:24 pm
गाभा: 

गेल्या काही दिवसांपासून, विप्र मिपावर समुपदेशनाबद्दल, विशेषतः वाढत्या वयातील मुलं आणि त्यांचे पालक यांच्या बाबतीतल्या समस्यांबद्दल लिहित आहेत. त्यांचे बरेच लिखाण, एखाद्याला पटो वा न पटो पण दखल घेण्याजोगं असतं. त्यांनी घेतलेल्या समुपदेशनाच्या वर्गांबद्दल पण इथे मिपावर लिहून आलं आहे.

मला विप्रंना असं विचारायचं आहे:

०१. तुम्हाला असे वर्ग घेताना साधारण कश्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो?
०२. तुम्ही जे काही करता आहात त्या मधे अजून व्यापकता आणण्याबद्दल तुमचे काही प्रयत्न चालू आहेत का?
०३. हे काम तुम्ही एकटेच करता की, अजून काही साथिदार तुमच्या बरोबर आहेत?

विप्रंनी या सगळ्या विषयावर नियमित अशी लेखमाला लिहिली तर?

असो. हे सगळे प्रश्न असे एका धाग्यातून जाहिर पणे विचाराय्चं कारण की, समविचारी लोकांना पण विप्रंच्या उत्तराचा फायदा होईल.

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Nov 2008 - 2:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बिपीनभौंनी तीन प्रश्न विचारून एक प्रश्न असं लिहिलं आहे ते बरोबर आहे का असा माझा पहिला प्रश्न आहे. बाकी विप्रकाका तुम्ही लिहाच असं माझं मत आहे. मला काही "वाढत्या वयातील मुलं आणि त्यांचे पालक" याबाबतीत फार अनुभव नाही. पण सेकंड-हँड अनुभव आणि त्यावर तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील.

विनायक प्रभू's picture

4 Nov 2008 - 6:24 pm | विनायक प्रभू

१. मुलांचा प्रतिसाद अगदी चांगला असतो. कारण मला केव्हाही १४ वर्षाचे व्हायची कला अवगत आहे. शाळामधुन फुकट असल्यामुळे येतात आमंत्रणे. समाजाचा म्हणाल तर कामाला शुभेच्छा भरपूर. पण इतर सहभाग अगदी शुन्य. मानसिक पाठींबा मात्र कपाट्भरून. भरपूर जणाना हाका मारल्या. पण आजपर्यंत कुणीही पुढे आलेले नाही.
२.समाजच उदासिन असेल तर व्याप्ती कशी वाढेल.? आजकाल अशा कार्याची गरज कशी आहे ह्यावर लंब्या चवड्या गप्पा होतात.आधी मी बरीच डोकेफोड केली. सर्व मोठ्या मोठ्या व्यक्तीना भेटलो. मी मराठी, मराठी अस्मिता वाले तर जोरात आश्वासने देतात. पण ऍनवेळी फक्त मरेस्तोवर आठ्या. नाद सोडला. मला जमेल तेवढ करतो.
३. देवाच्या दयेने मी हा कार्यक्रम माझ्या उत्पन्नातला ठराविक भाग खर्च करुन चालू ठेवला आहे. बघू किती पर्यंत चालतो ते.(बायडीला सांगून) माझ्या उत्पन्नात उतार आला तरी माझे हे एकला चालो रे थांबणार नाही. रामदासाना हा किडा चावलेला आहे. त्या जीवाला ह्या खड्ड्यात घ्यायला जिवावर येत आहे.(त्यांच्या घरात १०वी १२ वी -सायन्स एकाचवेळी आहे.प्रचंड ताण असणार येत्या काही वर्षात)
४. मी लिहिल्यामुळे जर काही होत असेल तर दिवसभर दुसरे काही करणार नाही. पण लिखाण फार कमी लोकापर्यंत पोहोचते.
शिवाय समोरासमोर चा इफेक्ट वेगळा असतो;.
५. प्रतिज्ञा_ मिपा सद्स्यानी कधीही हाक मारावी. मी हजर आहे. व्यनि मधुन अथवा समोरासमोर. कुठलेही मानधन नाही कसलीही फी नाही. माझ्या स्पेशलाय्झेशन्स बद्दल वेगळे सांगायला नको.

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Nov 2008 - 6:35 pm | बिपिन कार्यकर्ते

विप्र,

तुम्ही एखादा उपक्रम व्यवस्थित आखून लोकांसमोर मांडलात तर बरेच लोक पुढे येतील मदत करायला. असे काही करता आहात का? साधारणपणे अश्या कामांमधे आर्थिक आणि शारिरीक, दोन्ही प्रकारची मदत लागते. एखादा विचार असेल डोक्यात तर मांडा लोकांपुढे.

बिपिन कार्यकर्ते

विनायक प्रभू's picture

4 Nov 2008 - 6:42 pm | विनायक प्रभू

लोक? कुठले?
मिपा सद्स्यासमोर असे मांडायला गेलो तर काही गड्बड तर होणार नाही ना? मला नियमावली माहित नाही>

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Nov 2008 - 7:31 pm | बिपिन कार्यकर्ते

मिपा नियमावली वगैरे मला पण माहित नाही पूर्णपणे. तात्या / संपादक वगैरे त्यावर जास्त प्रकाश टाकू शकतिल. पण मला वाटते की तुमच्या मनात एखादा उपक्रम असेल तर तो इथे मांडायला काहीच हरकत नसावी. एखाद्याला इच्छा असेल तर होतील सहभागी. मागे पण अनाथ मुलांच्या संदर्भात असे काही सामाजिक आशयाचे उपक्रम मिपावर चर्चिले गेले होते असे आठवते आहे.

मात्र असा एखादा उपक्रम मिपाच्या नावाने / वतीने करायला नक्कीच चालकांच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता असेल.

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Nov 2008 - 6:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विप्र काका,
मला जेवढं शक्य होईल तेवढी मदत करायला मी तयार आहे. सध्या आर्थिक मदत कठीण आहे पण स्वयंसेविका तयार आहे.

अदिती

विनायक प्रभू's picture

5 Nov 2008 - 10:00 am | विनायक प्रभू

र्रुपरेषा जवळ जवळ तयार आहे. सर्व तयारी झाली की मिपावर मांडतो. अर्थात तात्यांची परवानगी घेउन.

मनस्वी's picture

5 Nov 2008 - 5:02 pm | मनस्वी

>(त्यांच्या घरात १०वी १२ वी -सायन्स एकाचवेळी आहे.प्रचंड ताण असणार येत्या काही वर्षात)
त्यात ताण कसला? नसेल येत तर तो क्रिएट करावा काय?
बर्‍याच घरात असते असे १० वी - १२ वी एकत्र.
पालक आणि तत्त्ववेत्ते च नको एवढा बाऊ करून एक विचित्र 'वातावरण निर्मिती' करतात.

विनायक प्रभू's picture

5 Nov 2008 - 6:58 pm | विनायक प्रभू

शाळा शाळात हा कार्यक्रम फुकट करावा लागतो. त्याचा आर्थिक भार त्यांना द्यावासा वाटत नाही असे म्हटले आहे मी.
मी तत्ववेत्ता नाही. मी विचीत्र वातावरण कमी करतो.

विनायक प्रभू's picture

4 Nov 2008 - 7:04 pm | विनायक प्रभू

सेकंड हँड अनुभवावर लिही. बरोबर उत्तरे देईन. अशी उत्तरे घेता घेता तू पण समुपदेशक होशील. आणि तुझ्या भागात हे कार्य पुढे नेशील. नाहीतरी तू आजी बाई आहेसच. एकदम रिक्वायर्ड क्वालिफिकेशन.

विनायक प्रभू's picture

4 Nov 2008 - 3:03 pm | विनायक प्रभू

आता अंमळ घाईत आहे. सविस्तर उत्तर देतो. तो बहुतेक एक मोठा लेखच होईल. वरील प्रष्नाना धरुन इतर कोणाला काही प्रष्न असतील तर विचारावेत.

मनस्वी's picture

4 Nov 2008 - 3:18 pm | मनस्वी

(१) समुपदेशक जे समुपदेशन करतो ते त्या व्यक्तीसाठी १००% बरोबरच असते का? जर हो, तर का?
(२) त्या व्यक्तीसाठी समुपदेशकाच्या उपदेशांशिवाय इतरही उत्तम पर्याय असू शकतात. मग त्या पर्यायांकडे दुर्लक्ष नाही का होत?

लिखाळ's picture

4 Nov 2008 - 3:34 pm | लिखाळ

>त्या व्यक्तीसाठी समुपदेशकाच्या उपदेशांशिवाय इतरही उत्तम पर्याय असू शकतात. मग त्या पर्यायांकडे दुर्लक्ष नाही का होत?<

या प्रश्नाचे उत्तर विप्र देतीलच..

पण माझे मत असे की,
समुपदेशन नेहमी दोन बाजूंचा विचार करुन असते.
१. तात्विक बाजू - जेथे मुलाचा स्वभाव, त्याच्या सवयी यावर विचार होतो.
२. व्यावहारिक बाजू - तो काय शिकतो, कसा अभ्यास करतो इत्यादी.
उदा. एखादा मुलगा अभ्यास करत नसेल, स्वप्नाळू असेल, मोठी स्वप्ने पाहणे पण कृती न करणे, एकलकोंडा अश्या प्रकारातला तर त्याच्या प्रगतीसाठी सपुपद्शक त्याला सांगेल की तुझ्या दिनचर्येत बदल कर. खेळायला जा, व्यायाम कर, मित्रांत मिसळ, दिवसाला शिस्त बद्धकर, वेळेवर उठ-जेव-झोप इत्यादी. आणि त्याचवेळी त्या मुलाचा शैक्षणिक कल ओळखून तो सांगेल की तू शास्त्र शाखेत जाण्या ऐवजी कला शाखा निवड आणि परदेशी भाषेचा अभ्यास कर तो तुला रुचेल !
आता यामध्ये मुलाला उत्साह येणे, त्याचे व्यक्तिमत्व सुधारणे यासाठी सांगितलेले उपाय बरोबर ठरतील. पण एखादे वेळी कला शाखा निवडिचा सल्ला चुकेल. वाढत्यावयातल्या मुलांना एकदा मार्गस्थ केले की एखाद्या वेळेला शैक्षणिक निर्णय त्यापुढे तो मुलगा स्वतः सुद्धा घेऊ शकतो. अश्या वेळी समुपदेशक त्याचा अनुभव पणाला लाऊनच सल्ला देत असतो. तो सर्वज्ञ नसून विहरीत अडकलेल्या माणसाला विहिरीतून बाहेर यायला मदत करणारा मार्गदर्शक असतो.
-- लिखाळ.

टारझन's picture

4 Nov 2008 - 4:33 pm | टारझन

टाळ्या =D> =D> =D> =D>

--टाराज ठाकरे
(मिसळपाव नवनिर्माण सेना)
मी मिपाचा , मिपा माझा

विनायक प्रभू's picture

4 Nov 2008 - 6:46 pm | विनायक प्रभू

आता मला उत्तर द्यायची गरज नाही. धन्यवाद लिखाळ्जी.
मी समुपदेशक नाही. असलो तर फक्त कॅटॅलिस्ट. दोन संयूगात रिएक्शन घडवून आणणारा.
मला माहीत असलेला शेवट्चा समुपदेशक गिता सांगुन निघुन गेला.

आता मला उत्तर द्यायची गरज नाही. धन्यवाद लिखाळ्जी.

> (२) त्या व्यक्तीसाठी समुपदेशकाच्या उपदेशांशिवाय इतरही उत्तम पर्याय असू शकतात. मग त्या पर्यायांकडे दुर्लक्ष नाही का होत?
लिखाळांनी फक्त या प्रश्नाला उत्तर दिले आहे.

मी समुपदेशक नाही. असलो तर फक्त कॅटॅलिस्ट. दोन संयूगात रिएक्शन घडवून आणणारा.

सर्वसामान्य लोकांना समुपदेशक आणि कॅटॅलिस्ट यातील फरक कळतो का? ते तुमच्याकडे तुम्हाला समुपदेशक समजूनच येतात ना?
कसली संयुगे? कसली रिऍक्शन? सामान्य विद्यार्थ्याला आणि त्यांच्या पालकांना ही संयुगे आणि रिऍक्शन्स काय आहे, ह्याचा बोध होतो का?

मुलांना एकदा मार्गस्थ केले की एखाद्या वेळेला शैक्षणिक निर्णय त्यापुढे तो मुलगा स्वतः सुद्धा घेऊ शकतो. अश्या वेळी समुपदेशक त्याचा अनुभव पणाला लाऊनच सल्ला देत असतो. तो सर्वज्ञ नसून विहरीत अडकलेल्या माणसाला विहिरीतून बाहेर यायला मदत करणारा मार्गदर्शक असतो.

माझा प्रश्न असा आहे की 'मार्गस्थ' केलेला मार्ग १००% बरोबरच असतो का? आज जगात अगणित ऑप्शन्स आहेत करिअरचे. ते जर समुपदेशकालाच ठाऊक नसतील तर?
विहिरीत अडकलेल्या माणसाला फक्त विहिरीतून बाहेर यायचे असते.

विनायक प्रभू's picture

5 Nov 2008 - 7:15 pm | विनायक प्रभू

मला जवळ जवळ सगळे ऑप्शन्स माहित आहेत. मला बाकीच्यांचे महित नाही. तुम्ही जर मूंबईत असाल तर एका पालक सभेला जरुर या. तुमच्या सर्व प्रष्नाची उत्तरे मी काहीही न बोलता मिळतील. आपल्या सारखी मते असलेल्या मिपा सद्स्यानी हा अनुभव घेतलेला आहे. नंतर एकदम मतपरिवर्तन. कॅटॅलिस्ट वर नंतर लिहीन.
अवांतरः पालकांचे ऑप्शन्स आधीच ठरलेले असतात. त्याना माझ्याकडुन फक्त अधिक माहिती हवी असते. त्यांची माहिती बहुदा चूक असते हा भाग अलाहिदा.

तर त्याचा काही फारसा उपयोग होणार नाही असा माझा विचार आहे.
आता त्याची कारणं सांगतो.
१ पालकांना लॉजीक हवे असते हा गैरसमज आहे.त्यांच्या मनात समुपदेशक हा अमेरीकन काउबॉयचा अवतार असतो. तो घोड्यावर बसून येतो.तो कमरेला ,हाताला , खांद्यावर बंदूका लावलेला महापुरुष असतो.तो एका फैरीत खलनायकाला संपवणार. एकदा का त्याच्या पायावर पोराला घातलं की आपण सुटलो.
२ याला पर्याय एकच.आयती सोल्युशन देणं.स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवायला हे पुरेसे असते पण खर्चीकही असते म्हणून स्वस्त अशी सोल्युशन्स तयार करून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे.
३ अशा उपक्रमाचा आराखडा मी बनवला होता/आहे.विशेषकरून मुंबई बाहेरच्या आणि मुंबईच्या सावलीत वाढणार्‍या छोट्या शहरात (उदा: अंबरनाथ-विरार-पेण-वगैरे.)विद्यार्थ्यांना सीईटीच्या सराव -परीक्षांची सुविधा उपलब्ध असतेच असे नाही.(अपवाद लातूरचा आहे).या परीक्षा कमीतकमी तीन ते चार वेळा घेतल्या तर या विद्यार्थ्यांची यशस्वी होण्याची शक्यता बरीच वाढते.
४ बारावीची परीक्षेनंतर या वेळी फार कमी वेळ मिळणार आहे सीईटीच्या सरावासाठी.
सौ बात की एक बात फक्तसमुपदेशन किंवा लेख लिहून काही होणार नाही.ग्रास रुट लेव्हलला काम करणार्‍यांची आवश्यकताही तेव्हढीच आहे.
असो.

भास्कर केन्डे's picture

4 Nov 2008 - 9:33 pm | भास्कर केन्डे

समाजाचा म्हणाल तर कामाला शुभेच्छा भरपूर. पण इतर सहभाग अगदी शुन्य. मानसिक पाठींबा मात्र कपाट्भरून. भरपूर जणाना हाका मारल्या. पण आजपर्यंत कुणीही पुढे आलेले नाही.
विप्र, भावना पोचल्या. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या बहुतेकांचे हेच अनुभव/मत असते. पण म्हणून केवळ समाजाच्या डोक्यावर खापर फोडून आपण रिकामे होऊ शकत नाही. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना वेळ देणे शक्य होत नाही ही वस्तुस्थिती आहे.
लोक सामाजसेवा करु इच्छित असतील तर सरकारनेही मदत करायला हवी. उदा. मला इकडे मुलांच्या सुधारगृहात (जेलमध्ये) समुपदेशनासाठी बोलावले गेले होते. मुलांचा प्रतिसादही चांगला मिळाला. (बाकी माहिती नंतर कधी). काम झाल्यावर जेलमधून निघालो तेव्हा तिथल्या अधिकार्‍याने मला त्याच्या केबिनमध्ये बोलावले. आभार मानले अन पन्नास डॉलरचा चेक देऊ केला. अर्थात मी तो नाकारला अन खरेच गरजू समाजसेवकासाठी ते पैसे द्यावेत असा मनोदय व्यक्त केला. तेव्हा मला ही माहिती कळाली की इथे सरकार सर्वच समाजसेवकांना तासावर अथवा महिना-पगार अशा स्वरुपात अर्थिक मदत करते.

भारतात असे का नाही अशी माहिती काढायला गोलो अन धक्काच बसला... भारतातही दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यात करोडो रुपये समाजसेवकांना वाटले जातात म्हणे!! ... साला मी पण भारतात असताना अनेक वर्षे समाजसेवा करत होतो. एक रुपया सुद्धा नाही मिळाला कधी. मग कुणाला दिले जातात हे पैसे? तर म्हणे सेवाभावी संस्थेंना!!
अर्थात पुढे सांगायला नको... एका एका नगरसेवक, सरपंच, पं स/जि प सदस्य, ते आमदार खासदारांचे मेव्हणे/भाऊ/मित्र अशा सगळ्या पिलावळांच्या सेवाभावी संस्था असतात...

थोडक्यात काय? विप्र स्वतःच्या खिशातून पैसा टाकून जी समाज सेवा करतात त्याचा अर्थिक मोबदला राजकारणातले लोक लुबाडताहेत. :)

आपला,
(समदु:खी) भास्कर

विनायक प्रभू's picture

5 Nov 2008 - 9:49 am | विनायक प्रभू

शिक्षणाचे उदात्त कार्य कार्य फक्त शिक्षकानेच करायचे असते. त्याचा आदर होतो की शिक्षण दिन (का दीन) पाळून.,

विजुभाऊ's picture

5 Nov 2008 - 4:56 pm | विजुभाऊ

१००% सहमत. पालकाना समुपदेशक हा काउ बॉय वाटत असतो.
बरेचदा मिलांपेक्षा पालकानाच समुपदेशनाची गरज असते. माझ्या पहाण्यात १० वर्षाच्या खालचे एकही मूल चुकीचे वागताना आढळले नाही.
पालक त्याच्याकडून जास्त्च अपेक्षा ठेवतात. आपले मूल एक तर अगदीच ढ ( माठ) आहे किंवा ते जगातले सर्वात हुशार आहे असे पालकाना वाटत असते. मुलाने/मुलीने सर्व विद्यात पारम्गत असावे असा विचार करताना पालक म्हणून आपण त्या मुलाला सरव विषयात पारंगत होण्यासाठी किती वेळ ( क्वालिटी टाईम) देतो याचा पालक विचारच करत नाहीत.
आपले मूल्क सर्वसामान्य आहे हेच पालकाना अस्वस्थ करुन सोडते.
खरे तर पालकांचेच समुपदेशन करणे गरजेचे असते.
बालक - पालक हे रीलेशन बदलते असते हेच त्याना ठाउक नसते.
( तुमच्याकडे असलेला बाळ कृष्ण व्हायला हवा असेल तर यशोदेप्रमाणे वागायला शिका)

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

विकेड बनी's picture

5 Nov 2008 - 6:03 pm | विकेड बनी

तुमच्याकडे असलेला बाळ कृष्ण व्हायला हवा असेल तर यशोदेप्रमाणे वागायला शिका

म्हणजे तुमच्या पोराला उखळीला बांधून घाला की बाकीच्यांनी सांगितले म्हणून त्याच्यावर चोरीचा आळ घाला.

तोंडाला लोणी फासले असताना "मैं नहीं माखन खायो|" असे खोट्टे सांगणारा कृष्ण १० वर्षांच्या वर असणार. :))))))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Nov 2008 - 4:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

समुपदेशकाकडे (किंवा कॅटॅलिस्टकडे) जाण्याची वेळच का येते?

मनस्वी's picture

5 Nov 2008 - 5:03 pm | मनस्वी

हा प्रश्न माझ्ह्याकडून पण आहे.

मनस्वी's picture

5 Nov 2008 - 5:14 pm | मनस्वी

.

काय टिकल्या चि़कटवल्या का ग ?
माझी अवस्था तर अगदी समुपदेशनाच्या वर गेलिये .. बाकी !~~!

--संत टारेश्वर
||आता नाही येणे जाणे ||

सोनि's picture

7 Nov 2008 - 4:19 pm | सोनि

वि. प्र.
माझा मुलगा आत्ता ८वी मध्ये आहे त्याच्या साठी मदत हवी आहे , मी आळंदी ला राह्ते, तर त्याच्या जवळ्पास कधी तुमचा वग्र् असतो का?

माहीती कळ्वा.

सोनि

सुनील मोहन's picture

7 Nov 2008 - 6:04 pm | सुनील मोहन

विशेष प्रविष्टी का?