"प्रत्येकवेळी काही झालं तरी मीच...."
तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच तो कडाडला.
"काय मी मी लावलंय सारखं.मी हे केलं मी ते केलं.
मला जसं जमतय तसं मी करतोय. कधी कसलीच तक्रार करत नाही तुझ्याकडे.
तु म्हणालीस म्हणुन चाललोय ना मुलीच्या शाळेत मिटींगला. ऑफिस मद्धे कामाचे डोंगर पडलेत त्याचं आधीच टेन्शन आलंय तरी काही बोललो का ?
उतर ईथेच" असं म्हणून त्याने कारचा दरवाजा उघडुन तिला खाली उतरवलं.
"प्रत्येकवेळी काही झालं तरी मीच सॉरी म्हणायचं. चुक कोणाचीही असो" तिने मनातल्या मनात मघाचे वाक्य पूर्ण केले.आता त्याचा राग कसा घालवायचा असा विचार करत, तिच्या कामांचा ढीग पूर्ण करायला ती ऑफिसमद्धे निघाली.
प्रतिक्रिया
12 Feb 2019 - 6:44 pm | तुषार काळभोर
चांगली सांगितलीये
12 Feb 2019 - 8:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
12 Feb 2019 - 10:03 pm | श्वेता२४
नेमकं ते कळलं नाही
13 Feb 2019 - 9:45 am | विजुभाऊ
+१
आवडली कथा
व पुं ची " घर हरवलेली माणसे " आठवली
13 Feb 2019 - 10:19 am | विनिता००२
ह्यालाच म्हणातात...उलट्या बोंबा :(
+१
14 Feb 2019 - 4:58 am | ज्योति अळवणी
पटली
14 Feb 2019 - 7:51 pm | बोरु
+१
14 Feb 2019 - 8:07 pm | नाखु
आवडली, घरोघरी मातीच्या चुली (पक्षी शेगड्या)
...... नाखु पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर
15 Feb 2019 - 3:06 pm | समीरसूर
आवडली
15 Feb 2019 - 7:36 pm | स्मिता.
+१
नाट्यमय कलाटणीपेक्षा वेगळी अशी घरोघरीची कथा आवडली.
16 Feb 2019 - 9:14 am | ज्ञानोबाचे पैजार
गोष्ट आवडली
पैजारबुवा,
16 Feb 2019 - 5:03 pm | नँक्स
+१
17 Feb 2019 - 8:38 am | भीमराव
१
19 Feb 2019 - 2:45 pm | लई भारी
+१
19 Feb 2019 - 4:06 pm | सिद्धार्थ ४
+१
19 Feb 2019 - 9:22 pm | रांचो
+१
25 Feb 2019 - 3:15 pm | विजुभाऊ
शशक स्पर्धेसठी केवळ +१ मतांची संख्या हाच एकमेव निकाला साठीचा क्रायटेरीया आहे काय?